आत्मचरित्र - आता या फेरीत काय लिहायच अशी एकदा चर्चासुरू होती तेव्हा संजना मॅडम यांनी छान समजावून सांगितले होते . त्यातले थोडे फार डोक्यावरून वाहून गेले, थोडे समजले. तर त्यानुसार
अशी मी तशी मी
माझ्या आधी मोठा भाऊ, त्यानंतर मी झाली आजोबांची लाडकी नात.
माझ्या आधी मोठा भाऊ, त्यानंतर मी झाली आजोबांची लाडकी नात.
" लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा "
मुंगी साखरेचा रवा "
लहान असताना आमच्या शेजारी दक्षिण भारतीय आजी रहात होत्या,त्यांच्या घरात नारळ फोडण्याचा आवाज आला की मी चालली नारळ पाणी प्यायला. तसे दक्षिण भारतीय पदार्थ मला अजूनही खूप आवडतात. बरेच जण मला म्हणतातही तुझ्या कडे नेहमी दक्षिण भारतीय पदार्थ असतात ,तु नक्की मागच्या जन्मी दक्षिण भारतीय असशील.
मोठ्या भावाने माझे खूप लाड केले.अगदी लहानपणापासून .तो तीन चाकी सायकल फिरवत असताना थांबलेला दिसला की मी जाऊन मागच्या सिटवर बसायची,राणी सारखी आणि मग उठायच नाव नाही.
शाळेत जायला सुरुवात केली ती जिल्हा परिषदेच्या शाळेत .मोठी शाळा पहिली ते चौथी पर्यत ,एका वर्गाच्या दोन तुकड्या अ आणि ब. मोठ खेळायला मैदान होत. रोज प्रार्थना होत होती आणि शनिवारी सकाळी कवायत,पुण्यतिथी -जन्मतिथी ला भाषण होत होती.
तिसरी नंतर वडीलांची शहरात बदली झाली. तिथली शाळा चार मजली होती .पण वर्गात सगळ्यात शेवटी बसायला लागायच म्हणून खूप दिवस आवडत नव्हती. एका वर्गाच्या सात तुकड्या एका वर्गात शंभर मुल,बघूनच घाबरायला व्हायच.
पाचवी पासून पुन्हा शाळा बदलली. हायस्कूल मधे खूप मैत्रिणी होत्या .तिथे मात्र मी कधीच शेवटच्या बाकावर बसली नाही.सकाळी सहा वीसच्या बसने लवकर जायच आणि प्रार्थना सुरु होईपर्यंत खेळायच असा आमच्या ग्रुपचा जसा नियमच होता. फक्त परीक्षा असेल तेव्हा शाळेत जाऊन पण अभ्यास करायचा.
आठवी मधे असताना पुन्हा घर बदलल, त्याबरोबर नवीन मैत्रिणी, नवीन परीसर यासगळ्या बरोबर जुळवून घेण आल.
नववीत असताना आम्हाला संगणक आणि चित्रकला दोन विषयामधून एक विषय निवडायचा होता.आई बाबांनी संगणक विषय घ्यायला सागितला.मी संगणक विषय घेतला मलाही आवडत होता.
चित्रकला काही गुपचूप बसू देत नव्हती. इंटरमीजीएट चित्रकला परीक्षा सूचना आली होती. घरी सांगितले तर आईने पहिले नाही सांगितले नंतर हो पण स्पष्ट सांगितले यावर्षी कर पुढच्या दहावीच्या वर्षी करू देणार नाही .
तर सुरू झाला चित्रकलेचा प्रवास. चित्रकला परीक्षा वर्ग सकाळी आणि संध्याकाळी शाळेत राहात होता. सकाळी नऊ वाजे पर्यंत ट्यूशन नंतर अकरा वाजता चित्रकला वर्ग नंतर शाळा. घरी यायला सहा वाजत होते.सकाळी कधी कधी शहरी बस यायची तर यायची नाहीतर एक तास बसस्टॉपवर वाट बघत शाळेची वेळ होत होती .संध्याकाळी चित्रकला वर्ग थांबायच तर येताना सोबत कोणी नाही ,बसला खूप गर्दी ,घरी येता येता अंधार होत होता .अशा परीस्थितीत जिद्दीने चित्रकला परीक्षा दिली त्याचा पुढे खूप फायदा झाला .
कधी बाबांची बदली झाली,कधी घर बदलले अस होत असतांना मी कधी कधी आईला म्हणायची
" आई अग मला छान मैत्रिणी भेटतात आणि घर बदलल की सुटून जातात, आपण एकाच ठिकाणी का नाही राहत ? "
" आई अग मला छान मैत्रिणी भेटतात आणि घर बदलल की सुटून जातात, आपण एकाच ठिकाणी का नाही राहत ? "
आई तिच्या परीने समजवत होती. आता लक्षात येत या परीस्थितीने तर मला घडवल. नवीन ठिकाणी गेल्यावर नवीन गोष्टी बरोबर जुळवून घ्यायला शिकवल, तिथ रडत न बसता पुढे जायला शिकवल.
लहानपणापासून शाळेला सुट्टी मिळाली की आम्ही आजी आजोबांच्या घरी जात होतो. आजी - आजोबांनी छान संस्कार केले. स्वतः सोबत इतरांना मदत करायची.
स्वतः ची काम स्वतः कशी करायची शिकवल. तेव्हा काम करताना वाटत होत , सुट्यांमध्ये पण काम करावे लागते. पण आता लक्षात येत तेव्हा लहान असतांना खूप छान सवयी आजी - आजोबांनी लावल्या.
स्वतः ची काम स्वतः कशी करायची शिकवल. तेव्हा काम करताना वाटत होत , सुट्यांमध्ये पण काम करावे लागते. पण आता लक्षात येत तेव्हा लहान असतांना खूप छान सवयी आजी - आजोबांनी लावल्या.
कॉलेज मधे असताना आम्हाला कम्युनिकेशन अँड मीडिया विषय होता. याविषया मधे लेख लिहताना कवितेच्या कधी स्वतःच्या कधी दुसऱ्यांच्या ओळी लिहिल्या की तो लेख खूप छान वाटत होता. तेव्हा बऱ्यापैकी लिखाण सुरु होत.
कोरोना काळात फेसबुक पान वरून ईरा वर वाचन सुरू झाल.वाचता - वाचता मलाही वाटत होत आपणही काही तरी लिहाव, पण सगळ्यात मोठा प्रश्न काय लिहू ? ईरा वर नवीन वर्ष काव्यस्पर्धा होती, तेव्हा सुरुवात केली. त्यानंतर स्पर्धामधे भाग घेत होते. गोष्ट छोटी डोंगराएवढी पासून लेखन प्रवास खऱ्याअर्थाने सुरू झाला. यालेखन प्रवासात संजना मॅडम याची खूप मदत झाली. मी पहिल्यांदा चारोळी लिहिली तर ती मोबाईल मधे मराठी टाइप करता आली नव्हती तर त्याचा फोटो काढून टाकला होता .इत पासून माझी सुरुवात होती. जिल्ह्यास्तरीय मधे भाग घेतला आणि ईरा वर छान मैत्रीणी मला मिळाल्या त्यांनीही मला लिखाण कस असाव कस कराव हे खूप छान सांगितले.
आयुष्यात खूप वेळा संकट येतात तेव्हा जे साथ देतात त्यांना कधी विसरू नये . जे साथ देत नाही त्यांचा उगाच विचार नकरण्यात अर्थ असतो. कठीण काळ हा आपल्या निर्णय क्षमतेची कसोटी असतो तेव्हा समजून निर्णय घेऊन त्यावर ठाम रहायच असत.
© ® वीणा