Login

अशी नणंद हवी (भाग-३ अंतिम)

विधवा असलेल्या वहिनीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून तिचे पुन्हा लग्न लावून देणाऱ्या नणदेची कथा
#जलदलेखन स्पर्धा

विषय- संसारातील नणदेची भूमिका

शीर्षक:- अशी नणंद हवी

भाग- ३(अंतिम)

मागील भागात-

पण आता सगळ्यात अवघड गोष्ट होती ती म्हणजे  ज्योतीला या लग्नाला मनापासून राजी करणं आणि करूणाने त्यासाठी परवानगी देणे. आता हे आव्हान दिपिका व सुरेशने त्यांच्या खांद्यावर घेतली.

आता पुढे:-

दिपिका व सुरेश निघून ज्योतीला समजवण्यासाठी तिच्याकडे आले. दिपिका तिला म्हणाली, "ज्योती, तू पुन्हा लग्नाचा विचार करावास. किती दिवस तू एकटीने काढणार आहेस? हर्ष खूप चांगला मुलगा आहे. त्यांच तुझ्यावर खूप प्रेम आहे. तो तुझ्याशी लग्न करायला तयार हो."

"दिपू, मान्य आहे की हर्ष चांगला मुलगा आहे पण हरीशबाबतीत जे झालं तेच पुन्हा त्याच्याबाबतीत झाले तर मी सहन करू शकणार नाही. मी अपशकुनी आहे. मी ज्याच्या आयुष्यात जाईन त्याच्यं आयुष्याचं नाहीस होतं. त्यापेक्षा आहे तशी ठीक आहे मी." ज्योती डोळ्यांत पाणी आणत म्हणाली.

तिचे बोलणे दिपाला आवडलं नाही ती रागात म्हणाली,"बास करं, स्वतः असे बोलणे. तुझ्यासमोर उभं आयुष्य पडलयं. दादासोबत जे झालं ते नियतीच्या मनात होतं तेच झालं. पुन्हा तसंच होईल असे का म्हणतेस? हे बघ जरा सकारात्मक विचार कर गं."

"ते ठीक आहे, दिपू. हर्ष तयार आहे पण त्यांच्या घरच्यांच काय? ते तयार होतील का? " ज्योतीने पुन्हा प्रश्न विचारला.

"ओफ्फो, देवा ! किती तुझे प्रश्न? त्याने घरी तुझ्याबद्दल सगळं सांगितले आहे. त्यांना काहीच प्रश्न नाही. त्यांना तू पसंद आहेस. आणि हो तू जर लग्न करणार नसशील तर मीही लग्न करणार नाही." जणू दिपिका तिला चेतावणी देत म्हणाली.

सुरेशही तिला म्हणाले,"बेटा, मी व करूणा तुला आयुष्यभर पुरणार नाही. आम्ही पिकलं पान कधीही गळून पडू. तुला सुखात बघायचं आहे आम्हाला. हर्ष तुला सुखी ठेवणार याची खात्री आहे. बघ बेटा विचार करं."

त्या दोघांच प्रेम, काळजी पाहून तिला गहिवरून आलं. ती कातर स्वरात म्हणाली, "मला थोडा वेळ हवा आहे."

"तू वेळ घे; पण एवढा पण वेळ घेऊ नकोस की वेळ हातातून निसटून जाईल." दिपिका रोखून पाहत म्हणाली व तिथून निघून गेली. तिच्या डोक्यावर मायेने थोपटून सुरेशही तेथून निघून गेले.

ते दोघे जाताच ज्योतीची नजर हरीशच्या फोटोवर पडली. तिचा कंठ दाटून आला. भरल्या डोळ्यांनी ती फोटोकडे पाहत विचार करू लागली.

"दिपूचं म्हणणं पटतं पण भीती वाटते. ती नेहमीच माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. आतातर तिने तिचं आयुष्यचं माझ्यावर सोपवून गेली. तिच्याखातर मला निर्णय घ्यावाचं लागेल."

विचार करता करता ती झोपी गेली.

"ज्योती, हर्ष चांगला मुलगा आहे. तुला मलाही सुखात पाहायचं आहे. तू लग्नाला होकार दे. हवं तर ही माझी शेवटची इच्छा समज. प्लीज ज्योती हो म्हणं." हरीश तिच्या स्वप्नात येऊन म्हणाला.

ती खडबडून जागी झाली. त्याच्या फोटोकडे पाहत होती तर त्यात तिला स्वतःचे प्रतिबिंब दिसले. जणू तो सांगतोय की तिने पुढे जावे. तिने मनाशी एक ठाम निर्णय घेतला.

सुरेश व दिपिका दोघेही करूणाला पोटतिकडीने समजावत होते. पण काही केल्या ती लग्नाला तयार होईना.

"आई, वहिनीच्या जागी मी असते तरी तू अशीच वागली असतीस का गं?" शेवटी रागात वैतागून दिपिका रागाने म्हणाली.

सटाक ऽऽ दिपिकाच्या कानाखाली एक जोराची चापट लगावत "दिपिकाऽऽ " असे करूणा जोरात ओरडली. डोळे रागात लाल झाले होते. 

ती मोठ्याने म्हणाली, "तुझ्या जीभेला काही हाड आहे का? पुन्हा असे बोलशील तर याद राख, जीभ हसडून हातात देईन." तिचा ऊर रागात धपधप होता.

"बघितलंस आई, तुला कल्पनेत ही वहिनीसारखं माझं आयुष्य नको आहे. मग विचार करं वहिनीने कसे इतके दिवस काढले असेल. तुझे शब्द तिच्या मनाला किती यातना देत असतील. आई, अजूनही वेळ गेलेली नाही. वहिनीला तिचं आयुष्य जगू दे. तिलाही सुखी राहण्याचा अधिकार आहे. हर्षभाईही तर मला दादासारखा आहे. तो सगळे सुख देईल तिला. प्लीज आई, एक चांगलं काम करं, आपल्या सुनेचं मुलगी म्हणून कन्यादानाचे पुण्य लाभू दे गं तुला व बाबांना." दिपिका कळकळीने डोळ्यांत पाणी समजावून सांगत होती.

अखेर तिच्या समजावण्याला यश आलं. करूणाला आपल्याच वागण्याचा पश्चात्ताप झाला. विनाकारण आपण ज्योतीला बोल लावले याचे तिला वाईट वाटू लागले. शेवटी तिने ज्योतीची माफी मागितली. तिनेही मोठ्या मनाने तिला माफ केले. करूणाने हसत हसत ज्योती व हर्षच्या लग्नाला होकार दिला.

आता ज्योतीचा निर्णय बाकी होता. पण दिपिका खात्री होती ती लग्नाला होकार देईलच.

ज्योतीनेही दिपिकाखातर लग्नाला होकार दिला. दोन्ही लग्न एकाच मांडवात छान रितीने पार पडले. करूणा व सुरेश यांनी ज्योती व दिपिकाचे कन्यादान एकाच वेळी केले.

दोघींची पाठवणीची घटिका आली तसे दोघी एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागल्या. तेव्हा बघणारे लोक कौतुकाने दिपिकाकडे पाहून म्हणाले 'अशी नंणंद हवी.'

समाप्त-

एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचे दुःख समजून घेऊन तिला पुन्हा नव्याने जगायले शिकवते, तिच्या सुखासाठी सगळ्यांशी लढते. दिपिकासारखी नणंद असेल तर घरात सुखांची नांदी होईल.

©️ जयश्री शिंदे

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. यातील पात्र, घटना, स्थळ सर्व काल्पनिक आहेत. वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

0

🎭 Series Post

View all