अश्रुंची किंमत (भाग३)

कथा मालिका
अश्रुंची किंमत ३

तेवढ्यात दारावर नाॅक केले गेले.

"मॅडम पेशंट शुध्दीवर आले आहे."

"ओके चला मी येते."

पुढे....

ती डोळ्यांतले भाव लपवत उठून स्वतः चा पांढरा कोट घालून त्या रूम मध्ये जाते.

"कस वाटतंय मिस्टर निशांत?" तिचा आवाज कानावर पडताच निशांत तिच्याकडे बघू लागला. पण त्याची एवढी कंडिशन नीट नव्हती की तो फार काही बोलू शकेल.

तिने स्वतः त्याचे पल्स चेक केले आणि अजून काही दिवस तरी यांना दवाखान्यात राहावे लागेल असे सांगितले. त्याच्या पायाला देखील प्लॅस्टर करून झाले होते.

"मिस सृष्टी मला भेटायला या." असे म्हणत ती ताबडतोब निघून गेली.

साकार आणि सृष्टी दोघेही शारदाच्या केबिनमध्ये जातात.

"सृष्टी तुझी आई कधी पर्यंत पोहोचणार आहे."

"मॅडम ती निघालेली आहे. यायला हवी इतक्यात..."

तेवढ्यात सृष्टीची आई स्मिता तेथे पोहोचते.
"सृष्टी बाबा कसे आहेत ग? मला भेटायचे आहे त्यांना?"

'ती दिसायला अतिशय सुंदर. डोळ्यातले भाव अगदी निरागस. लांबसडक केसांची एक सुंदर बट निघालेली. पण आता काळजीने थरथर कापत होती. गालांवर ओघळणारे अश्रू तिच्या प्रेमाची ओळख करून देत होते.'

मला अश्रु देऊन आनंदाने जगणारे हे जोडपे आज त्याच अश्रुंची किंमत मोजत आहे.

"हॅलो मिसेस निशांत. आधी बसा तुम्ही. हे पाणी घ्या."

निशांतला भेटण्यासाठी तिचा जीव खालीवर होत होता.

"सृष्टी आधी आईला घेऊन जा भेटायला. मग या केबिनमध्ये मध्ये.

रात्रीचे नऊ वाजत आले होते.

"मॅडम आता तुम्ही घरी जा." डॉ रवि शारदा सोबत बोलत होते. ऑपरेशन नंतर सुध्दा बरेच पेशंट तिने तपासले होते. ती खरोखरच थकली होती. शरीरापेक्षाही मनाने ती जास्त थकली होती.

"हो एकदा त्या पेशंटच्या नातेवाईकांना भेटते मग निघते. उद्या सकाळी मला त्यांचे रिपोर्ट दाखवा."

बऱ्याच वेळानंतर सृष्टी आणि तिची आई येतात.

"हे बघा मिसेस... त्यांना डोक्यावर जबर मार होता. त्यामुळे तिथे बरेच टाके पडले आहे. एम आर आर चे रिपोर्ट नील आलेत. परंतु , चोवीस तासांनंतर त्यांना जर... काही त्रास झाला. तर मात्र परत एम आर आय करायची गरज पडू शकते."

"मॅडम तुमची फी..."

"प्लीज आपण नंतर बघू ते सगळं."

असं म्हणत ती जायला लागते. "साकार चल घरी."

"पण आई... आता काळजी करू नकोस. माझे असिस्टंट डॉक्टर आहेत इथे. हवंतर सकाळी लवकर ये."

"बाय सृष्टी." साकार

"आई मला तुला काही सांगायचे आहे. "

"काय ? बोल ना ."

"आत्ता नको. काही इंमपाॅरट्न्ट नाही. नंतर बोलू."

ते दोघेही घरी पोहोचले. सुनिताने स्वयंपाक करून ठेवला होता. रोजच्या पेक्षा आज जास्त वेळ झाला होता. त्या दोघांनी जेवण केले आणि आपापल्या खोलीत निघून गेले.

शारदाची झोप मात्र उडाली होती. सतत निशांत, स्मिता आणि सृष्टीचा चेहरा दिसत होता. त्यात साकारचे वागणे, पझेसिव्ह होणे. हे विचार करण्यासारखे होते. परत तिचा भुतकाळ तिच्या डोळ्या समोरून सरकू लागला. निशांत सोबत घालवलेल्या आठवणींचा पाऊस पडू लागला. तिचे मन वाट दाखवेल तिकडे पळू लागले. काय घडले असेल तिच्या आयुष्यात....

©® अश्विनी मिश्रीकोटकर