अष्टरत्न: टीम अपर्णा (ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२४)

२०२४ ईरा चॅम्पियन ट्रॉफीतील अष्टरत्न सदस्य!
अष्टरत्न:- टीम अपर्णा(ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२४)

© विद्या कुंभार

ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२४ बद्दल समजल्यावर त्यामध्ये भाग घ्यायचा की नाही, खूप विचार केला होता. शेवटी सांघिक स्पर्धा आहे अशा स्पर्धेत काही तरी नक्कीच शिकायला मिळेल असा विचार करून त्यात नाव नोंदणी केली.

जेव्हा टीममधले सदस्य कोण आहेत हे समजल्यावर एक-दोन नाव सोडून बाकी सर्व सदस्य अनोळखी वाटले.

सुरुवातीला ओळख झाली मग संघाचा कर्णधार कोण होणार ह्यावर चर्चा सुरू असताना सर्वांच्या संमतीने अपर्णा ताईंच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.

आधी कोणाला काय येत हे ठरवून पुन्हा कोण कोणत्या फेरीत सहभाग दर्शवेल हे त्यांच्या इच्छेनुसार सांगण्यात आले.

ईरावर आधी कथा लिहिल्या होत्या पण सांघिक स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेत होते. उत्सुकता तर होतीच पण नामदेव सर, मुक्ता ताई आणि गीतांजली ताई ह्यांसारखे महारथी त्यात होते.

नामदेव सर तर कोल्हापूरचे मग एकाच गावचे असल्याने त्यांच्याशी बोलताना ते समजले. त्यांचे लेख आधी वाचले होते स्पर्धेच्या निमित्ताने त्यांच्याशी ओळख झाली.

अलक कसे लिहायचे हे त्याचे नियम समजून आणि अंमलात आणून नामदेव सर आणि गीतांजली ताई ह्यांनी त्यात आमच्या संघाला सतत पुढे नेले. बाकीच्यांनीही त्यात सहभाग घेतला होता.

प्रत्येकाला प्रोत्साहन देण्याचे काम कर्णधार म्हणून अपर्णा ताई, नामदेव सर, गीतांजली ताई, मुक्ता ताई आणि ह्यांचे नाव न घेवून कसे चालेल तर राखी ताई सुद्धा देत होत्या.

राखी ताईंच्या आणि मुक्ता ताईंच्या रिल्सनी तर आमच्या संघाची धुरा छान सांभाळली.

गीतांजली ताई आणि रितिका(अवनी) ताई ह्यांनी प्रेम आणि रहस्यकथांचे लेखन सुंदररीत्या केले.

गीता ताई आजारी पडल्या आणि काही कारणाने अन्य सदस्यांनाही दीर्घ कथा लिहिता आली नाही.त्यावेळी माझ्या सोबतच अजून एक दीर्घ कथा लिहिण्यात भाग्यश्री ताई ह्यांनी मला साथ दिली.कारण नियमानुसार दोन कथा लिहिणे अनिवार्य होते.

मतभेद झाले नाही का तर झाले होते,पण पुन्हा सर्व विसरून सर्वांनी सर्व फेऱ्या पार पाडण्यात खूप छान योगदान दिले.

ह्यात सर्वात जास्त कौतुक कोणाचे करावेसे वाटते ते म्हणजे आमच्या कॅप्टन असलेल्या अपर्णा ताईंचे सर्वांना प्रोत्साहन देवून कुठे अडत असेल तर ती समस्या पूर्ण करण्यात नेहमी पुढे असायच्या.

प्रत्येक सदस्याला त्याच्या वेळेनुसार समजून घेवून त्यांनी संजना मॅडम आणि आमच्या सदस्यांच्या मधला दुवा बनल्याच पण जेव्हा काही गोष्टी कमी पडत होत्या तिथे त्या नेहमी ती गोष्ट येत नसेल तर प्रसंगी माहिती काढून शिकत होत्या.

व्हिडिओ कसे बनवतात ते त्यांनी शिकून घेतले आणि मग सर्व रिल्सचे व्हिडिओ त्यांनीच बनवले. जिथे कमी तिथे मी मग कथा,लेख आणि अलक असो सगळ्यात भाग घेतला. सर्व जबाबदारी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली.कोणाला काही समस्या आली किंवा काही समजत नसेल तर त्या नीट समजून सांगायच्या. "गुड मॉर्निंग चॅम्पस" ह्या मेसेजपासून सुरुवात होऊन रात्री सर्वांचे अपडेट घेवून त्या दुसऱ्या दिवशीचे पण काय करायचे हे सर्वानुमते आणि वेळेनुसार विचारून मग काय करायला हवे ते सांगायच्या.

स्पर्धेत एकाच वयोगटाचे स्पर्धक नव्हते.त्यामुळे जुन्या आणि नवीन पिढीचे विचार हे कथे आणि अन्य साहित्यप्रकारात दिसून आले. शिवाय इथे कोणी लहान आणि मोठा नव्हता.ज्याला जे येते त्यांनी पुढाकार घेवून सर्वांना मदत करायचे हे कॅप्टनने फक्त बोलून न दाखवता पुढे कृतीत आणण्यासाठी प्रयत्न केले. मला एक गोष्ट ह्यातून शिकायला मिळाली की इथे वैयक्तिक पातळीवर विचार न करता एकमेकाला मदत करताना आपण सांघिक वृत्तीने संघाचा विचार केला तर नक्कीच प्रत्येक फेरी पार करू शकतो.
स्वतः साठी विचार न करता आपल्या संघाचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे ह्यासाठी अपर्णा ताईंचे खूप धन्यवाद. नेहमी अडचणी येतील तेव्हा शांत आणि संयमता राखून प्रसंगी शिस्तबध्द पध्दतीने त्यावर मात कशी करावी हे आमच्या कॅप्टनने कृतीतून दाखवून दिले होते.म्हणूनच टीम मधले सदस्य हे भिन्न स्वभावाचे आणि वेगळ्या कलागुणांनी युक्त असलेले रत्नच वाटतात म्हणून टीम अपर्णा मधील सर्व हे सारे अष्टरत्न !

ईरा चॅम्पियन ट्रॉफीमुळे खूप काही शिकता आले. प्रेम,रहस्य , दीर्घ कथा आणि साहित्याचे विविध प्रकार तसेच कमी वेळेत अर्थपूर्ण आशय तो ही व्हिडिओतून आणि अलकमधून प्रत्येकाला सादर करण्याची संधी ही ह्या स्पर्धेने दिली.

********

सांभाळली संघाची धुरा
बहुगुणी असे व्यक्तिमत्त्व
कुशल अशा त्यांचे नाव अपर्णा
प्रत्येक सदस्याला दिले महत्त्व

कॅप्टन बनून अपर्णा ह्यांनी
सर्व फेऱ्या केल्या पार
बहुगुणी लेखिका असलेल्या
संघासाठी घेतले कष्ट फार

नामदेव सर देती
सर्वांना प्रोत्साहन फार
प्रेमकथा,लेख लिहून
केला शब्दांनी वार

कमी पडल्यावर येतात
मुक्ताताई मदतीस धावून सदा
त्यांनी कथा नि रील्समध्ये
दाखवली अनोखी अदा

सहभाग दर्शवण्यास
राखीताई तत्त्पर
स्पर्धेच्या फेरींचा
केला गड त्यांनी सर

शांत नि संयमी स्वभाव
भाग्यश्री त्यांचे नाव
विविध कथांनी त्यांच्या
स्पर्धेत खाल्ला भाव

आशयघन आणि सुंदर
अलक आणि कथा छान
गीतांजलीताईंचे
शांत राहूनच काम

कथा,लेख नि अलक लिहून
संघात त्यांचे योगदान
नाव त्यांचे विद्या
सदा गाती मदतीचे गान

संघाच्या बनल्या भाग
रितिकाताई लिहून कथा
रहस्य आणि प्रेम कथेतून
शब्दांतून मांडली व्यथा

प्रत्येक सदस्यासाठी काही ओळी मी शब्दातून व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे.

संजना मॅडमनी ईरा चॅम्पियन ट्रॉफी आयोजित करून सर्व साहित्यिकांना त्यात भाग घेण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून सारस्वतांना साहित्यात प्रगतीसाठी मदत तर केली पण अनेक विविध स्वभावाची आणि अनोळख्या लेखन शैली असलेल्या लेखक/ लेखिका ह्यांची सांगड घालून नवीन नाती ह्यामुळे जोडली गेली त्यासाठी त्यांचे खूप धन्यवाद.

ईराच्या संजना मॅडमनी
घातला चॅम्पियशिन स्पर्धेचा घाट
खुली केली साहित्यकारांसाठी
नवी नि अनोखी लेखनाची वाट

© विद्या कुंभार.