आनंदी उत्साहाचा झरा अश्विनी

संबंधसेतू मैञीचे
कळीचा सुगंध उमलल्याशिवाय कळत नाही,
व्यक्तिमत्त्वांचे पैलू दिसल्याशिवाय रहात नाही,
बहरणारे जीवन बहरते कोणत्याही परिस्थितीत
गुणी माणुस काळजात घर केल्याशिवाय रहात नाही....

बरोबर ना ?..
व्यक्तीची छाप पडायला एक क्षण पुरेसा असतो,तो क्षण एकदा सदरात कोरला गेला की, मग नसतो कोणताच अहमपणा व शंका ...
ह्या सगळ्यांची प्रचिती आली ती इरा चाॅम्पियन ट्राफी २०२३ मध्ये...दोन वर्षांपासून सुरू असलेली ही स्पर्धा खुप रंगते हे ऐकुन होत मी , ह्या वर्षी आपणही हा अनुभव घ्यावा व त्याचा भाग व्हावा वाटलं..आणि तो दिवस उजाडला,

एका दिवशी स्पर्धेची लिंक आली , त्यानुसार whatsapp ग्रुप झाला व त्यातुन ईश्र्वर चिठ्ठीने दहा दहा स्पर्धकांची टिम बनली , खरंतर न ओळख न काही अश्या टिममध्ये मी टाकली गेली पहिल्या क्षणी तर जरा भितीच वाटली ... टिममध्ये सोनल शिंदे एक चेहेरा फक्त ओळखीचा होता पण बाकी व्यक्ती अनभिज्ञ ... पहिल्या दिवशी ओळखपरेड झाली तसे काही मेंबर्स ह्या स्पर्धेतून गळू लागले .. त्यामुळे टिममध्ये आता उरलेले सात जण .काय? करणार बरं , स्पर्धेमध्ये आपण बाद होणार म्हणजे होणार असच मन म्हणालं पण नंतर च्या दोन दिवसात तीन मेंबर्स ग्रुपमध्ये दाखल झालीत ..ती होती , प्राजक्ता, अश्विनी , वैशाली...

पहिल्या दिवशी आम्ही सात मेंबर्स होती , वृषाली,सोनल , स्वप्नाली,मी, प्रिया,गिंताजंली मॅम..व ह्या टिमला एक कृष्णसखा लाभला ते म्हणजे,"किरण दा"..

आता स्पर्धेला जोर चढू लागला .. संगणमताने "सोनला" कॅप्टन करण्यात आलं टिमच नाव "टिम सोनल "ठरलं...मग सुरू झाला प्रवास ह्या गोड स्पर्धेचा ...बॅनर बनवणं, फोटोंची देवाणघेवाण,ओळखपरेड नंतर पहिली जलद कथा फेरी. तस पहिल्या वेळी जरा अवघडलेपण वाटलं..पण हळूहळू जुळू लागली आमच्या मैञीची तार...जश्या फे-या वाढू लागल्यात तशी गट्टी जमु लागली स्पर्धेसोबतच मग रंगू लागला सुख दुःखाचा पसारा ..कळू लागलीत मने ,व त्यातून घट्ट झाली आमच्या 'टिम सोनल "ची मैञी...

नऊ गोपिका त्यात एक कृष्णसखा,
संसारी बायकांची एक अनोखी नौका
गडबड , गोंगाट भारीच मज्जा,
एकट्याच दादाची कोंडी त्याच्यात....

ह्या ओळींप्रमाणे दादा फक्त आमचं गुर्पवरच बोलणं अनुभवू लागले.. स्पर्धा कमी व संसाराची गाथा रंगवत कधी स्पर्धा संपत आली कळलंच नाही..स्पर्धाही तशी रंगेलीच ,एक एक टास्क मज्जेदार होता..खरी मज्जा होती स्टॅण्ड अॅप काॅमेडीमध्ये कधी काॅमे-यासमोर न जाणारे आम्ही जिंकण्यासाठी धडपडू लागलो. नंतर आत्मचरित्र ह्या फेरीत तर सोबतीच्या सगळ्यांचे जीवनच उलगडून गेले...संघर्ष,जीवनातील वाटचाल व त्या व्यक्तीचे पैलू सहजच उलगडत मैञीची दोर अधिकच फक्की होऊ लागली..

आता पुन्हा नवी फेरी आली" संबंध सेतू "ही मैञीची ओळखपरेड हो ..!
एकाने एका ग्रुपमेंबरवर लिहिलंच..एक दम हटके बरं हा टास्क..आणि ह्यात मला संधी मिळाली ती आधीपासूनच ओळखीची माझी जिवलग चुलबुली सखी ,"अश्विनी डांगे"बद्दल लिहायची...

आशू बद्दल काय?बर लिहिणार मी ,माझ्या नजरेत तर आशू म्हणजे चैतन्याचा झराच हो...!
लेखनीतून मिळालेली ही सखी म्हणजे ज्ञानदाती ,"शिक्षिका"
.‌हि-याला पैलू पाडणाऱ्या कारागिरापेक्षा लहान लेकरांचे पैलू पाडणे सोपे थोडीच...पण आनंदी चेहे-याने त्या छोट्यांमध्ये रमणारी ही गोडूली..रायगड जिल्ह्यातील एका मराठी शाळेत शिकवते...गुणी" ज्ञानदा"ची गुणी माय ही ओळख तीला आधीच भेटलीय बरं..!
..घर संसार,पत्नीचे कर्तव्य सोबत मोठ्या मुलीच्या भुमिकेत रमतांना मैञीत किती बहराव व किती आनंद द्यावा ह्याच सुंदर रूप म्हणजे आशू..!

स्पर्धसोबत ह्या सखीच्या भेटीचाही योग आलाच हो..!
नटखट ही सहजच मनात घर करणारी, पटकन ताई ताई करत कुशीत शिरणारी आशू कधीच एकटी पडणार नाही अशीच...जीवला जीव देणारी ही सखी.. आपल्या व्यस्त व्यापातून मैञी जपणारी,स्पर्धेचे टास्क करतांना,"जमेल का? गं ताई मला "..असा प्रश्न विचारत सगळ्याच टास्कमध्ये बेस्ट देणारी आशू सगळ्यांना आपलसं करून गेली...

स्पर्धेत ती कोणत्याही टास्क मध्ये मागे हटली नाही..."करते हं ..!,मी ट्राय " म्हणतं आशु आगदी भरभरून स्पर्धा अनुभवू लागली...उत्तम लेखनशैली असणारी ही सखी तीच्या लेखणीची जादू आम्ही अनुभवत होतो.. चारोळी असो व्हिडिओ असो कविता असो कि कथा ..सार कस उत्तमोत्तम हो ...!
ह्या सोबत एक समंजसपणा व आपुलकीची भावना जोपासत ग्रुपसोबत चालण ही तीची खाशियत...

ज्ञानदाच्या संगोपनात व्यस्त असणा-या ह्या सखीने आपले शिक्षिकेचे कर्तव्य पार पाडत, ग्रुपला बेस्ट साहित्य व सहकार्य देत खेळीमेळीने स्पर्धे सहकार्य केलं..कोणतेही वाद नाहीत की कोणतेही आढेवेढे नाहीत..
तीची लेखनशैली जबरदस्त आहे बरं,आशू तुझ्या लेखणीची जादू अशीच सुरू ठेव त्यासाठी खुप साऱ्या शुभेच्छा ??

आता स्पर्धचा शेवट होतोय त्यातुन आमच्या सर्व मेंबर्सचे धागे जुळू लागलेत,एक शांत कॅप्टनच्या देखरेखीत आपली जबाबदारी प्रत्येक जण लिलया पार पाडत वाद विवाद न होता.. झालेल्या ह्या मैञीच्या ऋणानुबंधासाठी मी इतकच म्हणेल...

सोबतीने चालतांना,
गाठी जुळतातच सहवासाच्या
फुलत जातो मैञीचा मळा
मिळतात तारा ऋणानुबंधाच्या ....

ही नऊ गोपिका व एका कृष्णाची संग अशीच अबाधित राहो.. सगळ्यांच्या लेखणीची जादू वाचकांना कायमचं मोहीत करो हिच सदिच्छा...

धन्यवाद...

©® वैशाली देवरे