"सकाळी उठल्यापासून यांना खायला करून घाला,कपडे धुवा,भांडी घासा हेच सुरू आहे. खूप वैताग आलाय त्या लॉकडाऊनचा. त्यात भाजीपाला आणायचा असेल तर सकाळी सहा ला जाव लागत कारण सात वाजेपर्यंत सगळ बंद होत. म्हंटल तुम्हाला फोन करून खुशाली विचारावी."सीमा तिची कर्म कहाणी ऐकवत बोलली.
"कसली खुशाली विचारतेस! इथे तर सकाळी पाच वाजल्यापासूनच लाईटी लागतात.संध्याकाळचे पाच वाजलेत असे सगळे चहासाठी येऊन बसतात सकाळी सकाळी. एवढ्या सकाळी मी उठत नाही पण तरी सातच्या आता तर उठाव लागत ना. त्यात होळी होऊन गेली तरी थंडी काही जाईना. दिवसाला दोन किलो साखर संपत असेल एवढी चहा ठेवायला लागते. दिवसभर गॅस वर तापून तापून चहाचा टोप पण वैतागत असेल. आठला चहा बिस्कट खातील परत तासाभरात भाकऱ्या करा भाज्या बनवा त्या वाढा.. भांडी..कपडे.. केर- कचरा.. त्यात वाळवणाचा घाट...दुपारी जरा म्हणून अंग टाकायची सोय नाही. जीव अगदी मेटाकुटीला येतो माझा. कधी रात्र होते अस वाटत. घरात माणस तर एवढी जेवायला असतात जस काय कुणाचं लग्न आहे. रोज नुसत्या पार्ट्या..अग चार दिवसात इतक्या वेळा चिकन वडे बनवले ना की आता ते चिकन बघावं पण वाटत नाही.सगळ्यांसाठी बनवून वाढेपर्यंत उशीर होतो आणि मग जेवायची इच्छा पण राहत नाही आणि पुरुषांच्या आधी जेवायचं म्हंटल तरी यांच्या इकडे ते चालत नाही. त्यात सकाळी सकाळी उंबरठा लागला करंगळीला... इतका त्रास होत होता तरी कुणाच्या तोंडून चौकिशीचे शब्द नाही आले. वर सासूबाई बोलतात एवढस लागलं तरी तुम्ही आजकालच्या पोरी लगेच आईग करता. आमच्या वेळी असता तर काय केलं असत? अशी चीड आली होती की काय सांगू पण गप्प बसले. गीताचं गीता पुराण काही केल्या संपेना...अस झालंय बघ माझ.." थकलेल्या आवाजात गीता बोलत होती.
"गीता... तीन कप चहा आण ग जरा...मामा आलेत आणि माझ्यासाठी पण आण जरा." महेश आतूनच आवाज देत बोलला.
"बघ.. ऐकलस.. हे अस.. दिवसभर असच चालू असत. नवऱ्याला काळजी नाही तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार. नुसती चहा हवी ढोसायला. एवढी चिडचिड होते ना माझी की काय सांगू. मरुदे सगळ अस वाटते. रडायला येत ग खूप.. एवढी थकते.. पण कोणाला म्हणून काही वाटत नाही. जरा म्हणून मदतीला येत नाही कोणी." गीता रडवेली होत बोलते.
"वहिनी.. काय करणार आपण? इकडे पण तीच गत आहे. करून करून थकते. दुपारी जरा अंग टाकावं म्हंटल तर केंव्हाही चहा हवा असतो. नको झालंय मला पण, डोक्यात नुसत एकच वाक्य घुमत असत.. \" अस्स सासर नको ग बाई! " सीमा बोलते.
"नाहीतर काय! चल जाते आता, नाहीतर परत आवाज देतील. गरम गरम चहाच घालते यांच्या घश्यात.."गीताने एवढं बोलून ठेवला.
समाप्त...
(बऱ्याच स्त्रियांची परिस्थिती अशीच होती लॉकडाऊन मधे. कुठे कोणी बाईला समजून घेतलं तर कुणी कामवाली सारखं कामाला जुंपल. सुनेला मदत का करावी..वहिनीला कशाला मदतीची गरज किंवा आपल्यापेक्षा लहान असलेल्या जावेला कशाला हवी सोबत असा विचार करण्यापेक्षा एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्री ला समजून घेऊन तिला आधार द्या..तिला सोबत करा. तिलाही बर वाटेल.)
@श्रावणी लोखंडे
(बऱ्याच स्त्रियांची परिस्थिती अशीच होती लॉकडाऊन मधे. कुठे कोणी बाईला समजून घेतलं तर कुणी कामवाली सारखं कामाला जुंपल. सुनेला मदत का करावी..वहिनीला कशाला मदतीची गरज किंवा आपल्यापेक्षा लहान असलेल्या जावेला कशाला हवी सोबत असा विचार करण्यापेक्षा एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्री ला समजून घेऊन तिला आधार द्या..तिला सोबत करा. तिलाही बर वाटेल.)
@श्रावणी लोखंडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा