अस्तित्व

it is about how women become alone at some point in her life and how she can overcome from this situation

                                                           अस्तित्व

 आटपाट  नागरातलत्या एका  स्त्री ला तिचं  अस्तित्व काय आहे असं प्रश्न पडला .स्त्री च्या अस्तित्वाचा प्रश्न कुठल्याही नगरात जा ,कुठल्याही देशात जा आयुष्यात एका वळणावर हा प्रश्न स्त्री ला पडतोच . काय आहे माझं अस्तित्व ? इथे मी का आहे ?माझ्या इथे असण्याने किंवा नसण्याने  कोणाला काही फरक पडतोय का ? आणि मग तिच्या लक्षात येत कि हा फरक इतका आहे कि आज जेवणात वरण केले नसले तर किती फरक पडतो तेव्हढाच कारण हलली रस्सा  भात  जास्त आवडतो सर्वांना. हाच वरण  भात लहानपणी किती महत्वाचा असतो .बाळ ६ महिन्यांचं झालं कि त्याला हेच वरण पहिल्यांदा दिली जातं . आणि इवलेसे बाळ चवीने मटामटा हे वरणाचे पाणी पीत आणि आपलं पोट भरतं . आता बाळ मोठं झालं आता त्याला वरण आवडेनासे झालंय . आता  वरण नसलं तरी चालतं.

जेवणातल्या वरणासारखी कहाणी झालीय स्त्री ची . एका वेळे नंतर हि स्त्री सर्वांना नकोशी होते . तिचं  अस्तित्व लुडबुड वाटू लागते . आई ,बायको,बहीण ,आजी ,अश्या अनेक भूमिका साकारते . तरी ती एक वळणावर येऊन एकटी पडते . या सगळ्या प्रवासात शेवटी ती एकटी का पडते याचा विचार मी करतेय नक्की गणित कुठे चुकतंय ?एकेकाळी तिच्याशिवाय पान  सुद्धा न हलणारी त्याच लोकांना तिची चक्क अडचण वाटते . आणि असं दुःख वाट्याला आलेल्या स्त्री ने काय करावं ?कुठे जावं?विचार करून अंगावर काटा येतो माझ्या . आयुष्यात आलेल्या या एकटेपणाचा एकटीने सामना कसा करायचा . किती मनात घालमेल होत असेल जीवाची जेव्हा कळतं कि मी ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्यांचे सर्वांचे दरवाजे आता बंद झालेत . किंवा उघडले तरी ते तात्पुरतेच. आपल्याच घरी आपण पाहुणे होतानाचा प्रवास फार भयानक असतो .

याचा दोष कोणाला द्यायचा ?तर त्या स्त्री लाच .होय तिला एक फार घाणेरडी सवय असते . ते म्हणजे स्वतः वर ती प्रेम करत नाही .

स्वतः पेक्षा दुसऱ्याचा विचार करून  निर्णय घेते . नेहमी आपलं  सगळं जे आहे ते दुसऱ्या साठी असे करण्यात तिला फार मोठेपणा वाटतो . हाच मोठेपणा तिला संपवून टाकतो आणि तेव्हा तिचा अस्तित्व निर्माण होण्या आधीच संपुष्टात येते . पानी  तेरा रंग कैसा ? जिसमे मिळाया वैसा .. अरे काय फालतुगिरी आहे .

पाणी नसेल तर मृत्यू निश्चित आहे .या पाण्याला कमी लेखू नका . एक सुनामी सर्व जगाचा नाश करू शकते .. सांगायचं मुद्दा असा कि दुसऱ्यावर १००% अवलंबून राहू नका . नवरा काय ? मुलगा काय?किंवा वडील काय? ते तुम्हाला आयुष्यभर सोबत नाही देऊ शकत .त्यांच्या शिवाय मी कोण आहे ?त्यांच्या शिवाय मी  काय करू शकते ?त्यांच्या शिवाय माझं काय जग आहे ? या प्रश्नांची उत्तरे स्वःताला विचारा . आणि जर  या प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर ती शोधून काढा पटापट .Its never too late .. याचा अर्थ असा नाही कि सर्वाना सोडून स्वार्थी बनून स्वतः  पुरते जगायचं . आपण सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास घडवतो पण स्वतः त्यात हरवतो . आणि इथेच रंगाचा बेरंग होतो . आपला असा एक रंग असला पाहिजे कि जो बाकी कोणाला नको असला तरी स्वतः पुरता असला पाहिजे . भावनिक गुंतवणूक इतकी होते कि आपण च त्यांच्यात हरवतो आणि मग सामोच्याला त्याची किंमत राहत नाही . कशाला एवढ प्रेम करायचं कि ते प्रेम समोर्च्याला नकोस वाटेल .

      दुसरं एक महत्वाच नवरा बायको यांच्यामध्ये पण स्पष्ठता असली पाहिजे कि खरंच का मी तुला पसंत आहे ?खरंच तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ?हे प्रश दोघांनी एकमेकांना स्पष्ठपणे विचारले पाहिजेत किंवा वदवून घेतले पाहिजेत . आज मुलींच्या आयुष्यात जे काही प्रश्न ते केवळ ह्या ची स्पष्टता नसल्याने आहेत

     नवरीला नवरा पसंत नसतो पण आई वडिलांच्या पुढे काही चाललं नाही म्हणून लग्नाला  होकार देतात आणि मग बिचार्या नवऱ्याची वाताहत सुरु होते . किंवा त्याला ती पसंत नसत्ते आणि तिच्या आयुष्याची वाट लागते . कशासाठी ?वेळेत  नकार देणे फार महत्वाचे आहे नाही तर दोघांच्या हि आयुष्याची ससेहोलपट होते .. एक आपलाच नवरा आहे जातोय कुठं असे म्हणून त्याच्यात हरवतात स्वतः पाण्यात साखर मिसळावी तश्या विरघळतात आणि या स्त्री ला एक वळणावर कळते कि मी एकटीच आहे आणि मग हे एकटेपण नैराश्येत रूपांतर होते . पाण्यात विरघळलेल्या साखरेला कुठे माहितेय माझं अस्तित्व नाहीसे होतंय .. ती मात्र तिचा गोडवा मागे सोडून अस्तित्व घालवून बसते .