Login

अस्तित्व भाग ११

श्रावणी लोखंडे

अस्तित्व भाग ११



(शीतल बाजारासाठी स्वरा सोबत मार्केट मध्ये जाते तर तिथे महेश उभा असतो.तो शीतल ला एकटक बघत असतो. स्वरा जेमतेम चौदा महिन्याची असेल जेंव्हा त्यांना भेटली होती.शीतल चा हात पकडून तिची आपली बोबडी बडबड चालू होती. महेश ला अस अचानक समोर बघून शीतल जरा घाबरतेच.तिला त्याने केलेला अत्याचार आठवतो आणि तिच्या काळजात धस्सस........होते.)आता पुढे



महेश शीतल च्या मागे मागे जातो आणि ती कुठे जाते ते बघतो.शीतल ला बंगल्यात जाताना बघतो. महेश ला वाटते शीतल ने दुसरं लग्न केलं आहे, आणि स्वरा पण तिला मम्मा बोलत असते त्यामुळे तर त्याची खात्रीच पटते. पण वेगळं न होता तिने दुसरं लग्न केलं याचा राग ही आलेला असतो. तो चार दिवसांनी तडक तिच्या घरात घुसतो आणि शीतल ला जाब विचारतो. शीतल चा क्लास चालू असतो. आजी आजोबा लगेच ओळखतात की हाच तो महेश आहे.कारण महेश मार्केट मध्ये दिसला होता आणि तो सलग चार दिवस तिचा पाठलाग करत होता हे शीतल आजी आजोबांना आधीच सांगते.महेश आणखी काही बोलायच्या आतच आजोबा त्याला बाजूला घेतात आणि सगळ्या जणी गेल्यावर बोलू अस म्हणतात, पण महेश ऐकून घ्यायच्या स्थितीत नसतो कारण तो नशेत असतो. आजोबांना त्याला आवरणं कठीण होत म्हणून ते बाजूच्या टेबल वरचा गुलदस्ता त्याच्या डोक्यात घालतात आणि काही वेळातच महेश ची शुद्ध हरपते.

महेश शुद्धीत येतो तेंव्हा बाजूला आजोबा आणि शीतल ला बघतो.शीतल लिंबू पाणी करून आणते आणि महेश ला देते.महेश लिंबू पाणी पितो तेंव्हा त्याला जरा बरं वाटते.एवढ्यात स्वरा बाहेरून आजी सोबत घरात येते.

"आपला कायद्याने घटस्फोट झाला नाही तरी तू दुसरं लग्न कस केलं आणि का??"महेश विचारतो

"कोणी सांगितलं मी दुसरं लग्न केलं ते"शीतल

"ही......ही मुलगी.......ही मुलगी कोणाची मग,तुला मम्मा कशी बोलते,ही काय आभाळातून आली का?"महेश

"नाही........आभाळातून नाही आली....... मी दत्तक घेतली आहे तिला, आणि मुळात तुम्हाला स्पष्टीकरण कशासाठी देऊ मी!!! काय नातं आहे आपलं जे तुम्ही मला जाब विचारताय?आणि राहत राहिला प्रश्न घटस्फोटाचा तर तुम्ही बाहेर येण्याचीच वाट बघत होते मी,म्हणचे सगळ्या गोष्टी समोरासमोर बोलता येतील."शीतल

"अगं.... पण का वेगळं व्हायचं आहे???मी नाही वागणार परत अस तुझी शपथ...... नको हा निर्णय घेऊ."महेश

"हे बघ मी काय निर्णय घ्यायचा ते माझं मी ठरवेन,तुम्ही मला सांगणारे कोण आणि मला अजून विषाची परीक्षा नाही घ्यायची."शीतल

"अहो तुम्ही मोठे आहात......तुम्ही तरी तिला समजावून सांगा ना!!"महेश आजोबांना बोलतो

"हे बघा.......खरं तर हा तुमचा घरगुती विषय आहे यात आम्ही बाहेरची माणसं बोलणं चुकीचं आहे पण समजवण्याचं बोलाल तर ते आम्ही तुम्हालाच सांगू..... जर ती नाही बोलते तर तुम्ही जबरदस्ती करू नका. एखाद नातं मनापासून स्वीकारलं तर ते फुलत जात. तडजोड करून काय साध्य होणार आहे,आणि तिच्या मनात नसताना जर तुम्ही तिला घेऊन गेलात तर नाही ती सुखी राहू शकणार आणि नाही तुम्हाला समाधान मिळणार, मग लोकांसाठी नातं कशाला पुढे न्यायचं."आजोबा

"मी करतोय की मनापासून स्वीकार या नात्याचा.....आणि तिने दत्तक घेतलेल्या मुलीला मी बाप म्हणून प्रेम देईनच त्यात कधी काही कमी पडू देणार नाही."महेश

"हो......पण मी नाही करत आहे ना!!!मला नको आहे या नात्याचं ओझं.......आणि केला स्वीकार तरी कशावरून तुम्ही स्वरा ला बापच प्रेम द्याल.उद्या तुमचं बाळ आलं तर तिला तुम्ही जवळ सुद्धा नाही घेणार आणि तुम्ही जरी असे नाही वागलात तरी घरात अशी वागणूक मिळू शकते.आणि मुख्य म्हणजे मला कुठल्या नात्यात पडायचचं नाही तर मी तरी का वाद घालते तुमच्याशी.हे बघा तुम्ही आल्या पावली परत जा.....मी घटस्फोटाची कागदपत्रे तुम्हाला आठवडाभरात पाठवते."शीतल

"ठीक आहे.......तुझा निर्णय झालाचं आहे मग मी तरी का बोलतोय. जाऊदे........चला येतो मी........"महेश

महेश निघून जातो. जातांना स्वरा ला जवळ घेतो कधी नव्हे ते महेश च्या डोळ्यात पाणी येते. तो स्वरा च्या डोक्यावरून हात फिरवतो तिचा पापा घेतो आणि निघून जातो.

शीतल बराच वेळ दरवाज्याकडे बघत असते.आजी येऊन तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात आणि तिला विचारतात.

"तुला जायचं आहे का बेटा....."आजी

"नाही आजी........त्या माणसाने खूप त्रास दिला आहे मला आणि मला आता पुन्हा पहिल्यासारखा वागता नाही येणार आणि मला खोटं वागता येत नाही मग कशाला  उगाच नको त्या गोष्टीत पडू. त्यात मी गेल्यावर हा परत अस काही वागणार नाही याची काय खात्री आहे....."दुधाने तोंड भाजल ना.... की ताक पण फुंकून पियावा" आणि मी तर माझं बाळ गमावलं आहे."शीतल

"बरं बाळा..... जशी तुझी इच्छा...तुझ्या मनाविरुद्ध आम्ही तुला कुठलाच निर्णय घ्यायला नाही सांगणार."आजी

"माझ्या घरातले सुद्धा तुमच्यासारखे असते तर किती बरं झालं असत ना.....माझ्या पाठीशी खंबीर उभं राहणारे आणि माझ्या निर्णयाचा आदर करणारे. त्यांना माझ्याशी काही घेणं देणं च नाही फक्त त्यांची चार लोकांमधली प्रतिष्ठा महत्वाची होती."शीतल

"अगं.......तुझ्या घरचे पण जर आमच्यासारखे असते तर एवढी गोड मुलगी कशी भेटली असती आम्हाला आणि सोबत एवढी सुंदर.....छोटी परिराणी......"आजी

शीतल आजींच्या कुशीत शिरून खूप रडते.....आणि काही वेळ एकटीच राहते आणि स्वतःचा निर्णय चुकीचा आहे की बरोबर हे ती आता स्वतःला विचारते कारण दुनिया खूप वाईट आहे एकट्या बाईला बघून त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.पण ती तिच्या निर्णयावर ठाम असते.

शीतल दुसऱ्याच दिवशी घटस्फोटाची कागदपत्रे बनवायला घेते आणि महेश ला नोटीस पाठवते.पोडगी तर तिने नाकारलेलीच असते कारण ज्याच्यासोबत राहायचं नाही.... त्याचे पैसे तरी कशाला हवेत म्हणून आणि पुढच्या सहा महिन्यातच त्यांचा कायद्याने घटस्फोट होतो. दोघे ही आपल्या आपल्या वाटेने जायला मोकळे झालेले असतात.

महेश खरचं सुधारलेला असतो.त्यांनी त्याचा पक्ष खूप वाढवलेला असतो तो नावारूपाला येतो त्याचं समाजसेवेच काम लोकांना मदत करणे,त्याचं ऑफिस,घर या सगळ्या गोष्टी तो खूप चांगल्या प्रकारे करत असतो.शीतल ने पण स्वतःची जागा घेऊन आता क्लास उघडलेला असतो. आजोबांना अर्धांगवायू चा झटका आल्याने ते अंथरुणालाचं खिळून असतात.आजींच्या सगळा वेळ आजोबांचं सगळं करण्यातच जातो.आजींचा त्रास कमी व्हावा म्हणून शीतल त्यांच्या हाताखाली एक बाई ठेवते.

अशातच पाच वर्षे होतात.आणि महेश पुन्हा शीतल ला भेटायला जातो. तिला पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात येणासाठी तिची मनधरणी करायला जातो.



(शीतल महेश चं ऐकेल का??ती त्याच्या सोबत जायला तयार होईल का??हे वाचण्यासाठी मला फॉलो करत राहा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे जरूर कळवा.शीतल ने काय निर्णय घ्यावा असे तुम्हाला वाटते ते नक्की सांगा..)

क्रमशः



(सदर कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा फॉरवर्ड करताना लेखिकेच्या नावसहित करावी.)

धन्यवाद....

श्रावणी लोखंडे.......