मम्मा...... अगं मम्मा.......कुठे आहेस...अगं लवकर येना गं बाहेर....मम्मा......
स्वरा च्या हाकेने शीतल(स्वरा ची आई) ची तंद्री तुटते....आणि शीतल बाहेर येते.बाहेर येऊन बघते तर काय......दारासमोर व्हाईट कलर ची i20 उभी असते...ती पण छान सजवलेली आणि ड्रायव्हर च्या सीटवर स्वरा विराजमान झालेली असते.
स्वरा:- अगं मम्मा.....अशी काय बघतेस... आपलीच आहे ही.......मी काय लुटली नाही आहे..अस म्हणून स्वरा हसते...
शीतल:- अगं बाळा.....(शीतल च्या डोळ्यात पाणी येत)कारण जिला बोटं पकडून चालायला शिकवलं,हात धरून लिहायला शिकवलं ती स्वरा एवढी मोठी कधी झाली हे समजलंच नाही.कारण तिने आज स्वतःच्या कमाईतून चार चाकी गाडी घेतली होती.
स्वरा:- अगं मम्मा...चल ये.....लवकर बस......!!!
आता तू खूप आराम करायचा आहेस खूप कष्ट घेतले तू माझ्यासाठी, आता तू फक्त ऑर्डर द्यायची कारण आता मी घरकामाला पण एक बाई ठेवणार आहे आणि तुला फक्त आणि फक्त आयुष्य एन्जॉय करायचं आहे.खूप थकलीस तू......आता थोडं स्वतःसाठी पण जग.....(स्वरा डोळे मिचकावत शीतल च्या हातावर हात ठेवत म्हणते)
शीतल स्वरा ला मिठी मारून खूप रडते.
स्वरा वयाने लहान असली तरी तिला शीतलच्या भावना समजत असतात.स्वरा शीतल चे डोळे पुसते आणि तिला शांत करते.आणि दोघी लॉंग ड्राईव्ह ला जातात.वीसेक मिनिटानंतर गाडी एका पाच मजली इमारतीसमोर उभी राहते.स्वरा स्वतः खाली उतरून मागच्या सिटचा दरवाजा खोलते आणि पुन्हा तिच्या जागेवर येऊन ड्राईव्ह करते.समोरच्या आरशातून शीतल मागे बघते आणि टचकन तिच्या डोळ्यात पाणी तरळते......... ती कशीबशी डोळ्यातलं पाणी पुसते आणि खिडकीतून बाहेर बघत असते.तास दिडतासानी गाडी एका आलिशान हॉटेल जवळ येऊन थांबते,तशी स्वरा खाली उतरून शीतल आणि मागे बसणारी व्यक्ती या दोघांना खाली उतरण्याची खूण करते.तिघे ही आत हॉटेल मध्ये जातात स्वरा नी आधीच टेबल बुक केलेली असते आणि जेवणाची पण ऑर्डर देऊन ठेवलेली असते कारण तिला शीतल ची आणि तिच्या वडिलांची आवड माहीत असते.(हो.....वडीलच.....जी व्यक्ती मागच्या सीट वर बसलेली असते ती व्यक्ती म्हणजे स्वरा चे वडील आणि शीतल चा नवरा.....म्हणजेच महेश देसाई....)
स्वरा:-अगं मम्मा....... जाऊदे ना आता.....जे घडलं त्याला आता २७ वर्षे झाली. सहा महिन्यांनी माझं लग्न आहे. लग्न झाल्यावर तुझी सोय व्हावी म्हणून नाही सांगत आहे मी, माझ्या लग्नानंतर तू आमच्यासोबत राहिलीस तर मनीष ला आनंद च होईल कारण तो अनाथ आहे, पण मला तुझं दुःख, तुला होणार त्रास समजतो आणि नेहमी जाणवतो सुद्धा, मी रोज बघते अगं तुला.....तू वर वर जरी हसत असलीस ना तरी तुला आतून किती त्रास होतो ते....
जरी तुम्ही एकत्र राहत नसलात तरी तू पप्पांना किती मिस करतेस हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहीत असेल.....
(स्वरा च्या बोलण्याने शीतल च्या डोळ्यात पाणी येते...कारण तिच्या बोलण्यात तथ्य होत.)
शीतल डोळ्यातलं पाणी पुसून जेवणाची ऑर्डर कधी येईल मला खूप भूक लागली आहे असं बोलून विषयाची सारवासारव करते आणि स्वरा ला विषय थांबवायला सांगते. महेश पण नजरेनेच स्वरा ला खुणाऊन नेहमी सारख च शांत राहायला सांगतो.
जेवण आटोपत.....स्वरा बिल पेड करून निघायची तयारी करते.
तिघे ही हॉटेल बाहेर येतात. स्वरा गाडी पार्किंग मधून घेऊन येईपर्यंत शीतल आणि महेश तिथेच उभे राहतात.
स्वरा गाडी घेऊन येते तसे तिघे ही निघतात आणि स्वरा गाडी थांबवते ते लहानपणी च्या आईस्क्रीम च्या दुकानजवळ तिथे ती तिघांच्याही आवडीची आईस्क्रीम मागवते, आणि एकटीच बोलत असते तिच्या बोलण्याला महेश फक्त हो,नाही,हा, अशीच उत्तर देत असतो कारण त्याच सारं लक्ष शीतल कडे असतं.
स्वरा चा वाढदिवस हा एकमेव असा दिवस आहे ज्या दिवशी तो शीतल ला पूर्ण वर्षभरासाठी मनात साठवून घेत होता. स्वरा लहान असताना शीतल स्वरा चा वाढदिवस तिच्या मनाप्रमाणे करत होती पण स्वरा ला समज आल्यापासून पप्पा पण सोबत हवे असा हट्ट करायला लागली कारण तिच्या सगळ्या मैत्रिणींच्या वाढदिवशी त्यांचे आई बाबा दोघे ही असत व हिचा वाढदिवस फक्त दोघी मायलेकी मिळून च सेलिब्रेट करत होत्या. स्वरा आठ वर्षाची झाली आणि ही दोघे वर्षातून एकदा भेटू लागली. महेश शीतल सोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करायचा पण शीतल कधी पुढे आलीच नाही कारण.........!!!!
(शीतल च्या अश्या वागण्याचे कारण काय असेल हे आपण बघू पुढच्या भागात.)
क्रमशः........
सदर कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा फॉरवर्ड करताना लेखिकेच्या नावसहित करावी.
धन्यवाद....
श्रावणी लोखंडे....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा