(मागच्या भागात शीतल महेश ला फोन करून नकार देण्याचं कारण विचारते आणि स्वतःचा फोटो बघण्यास सांगून फोन ठेवते.)आता पुढे.......
महेश घरी येतो पण तो प्यायलेला असतो त्यामुळे आई आणि भाऊ जास्त काही बोलत नाहीत त्याच्याशी, कारण सकाळच्या लग्नाच्या विषयावरून तो रागातच बाहेर गेलेला असतो त्यात तो फोन.........म्हणून महेश जास्तच रागात असतो.आणि त्यात बरेच दिवसांनी प्यायल्यामुळे त्याला थोडीशी दारू पण जास्त झाली असते म्हणून महेश घरी जातो आणि न जेवता च झोपतो.
सकाळी महेश ला जाग येते आणि त्याला त्या फोन वरच बोलणं आठवत तशी तो लगेच आई ला हाक देतो आणि त्या फोटोबद्दल विचारतो. तेंव्हा फोटो त्याच्या खोलीत ड्रॉवर मध्ये ठेवला आहे असं आई सांगते तो जाऊन चेक करतो आणि...............आणि फोटो बघून त्याला आकाश ठेंगण होत कारण जिला तो शोधत असतो तिचाच फोटो बघून त्याला खूप आनंद होतो लागलीच तो बाहेर येतो थोड नॉर्मल होतो आणि लग्नाला त्याचा होकार आहे असं सांगतो. महेश ची आई मग शीतल च्या घरी फोन लावून तस कळवते आणि पुढची बोलणी कशी,कधी आणि कुठे करायची हे पण फोन वरच बोलून ठरवते.दोन दिवसांनी शीतल च्या घरी भेटण्याच ठरते कारण तिची आत्या गावी जाणार असते. पुढच्या दोन दिवसात महेश आणि त्याचं कुटुंब शीतल च्या घरी जातात. महेश छान अशी ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट घालून जातो आणि शीतल पण मरून रंगाची काठपदरी साडी नेसून हलकासा मेकअप करून येते. शीतल गोरी असल्यामुळे साडी तिच्यावर फारच खुलून दिसत होती.
लग्नाची बोलणी झाली आणि एका महिन्यानंतरचा मुहूर्त काढला कारण पत्रिका,खरेदी,बस्ता,नवरा नवरी चे कपडे या सगळ्यासाठी वेळ पाहीजे होता म्हणून एका महिन्यानंतरची तारीख काढली पण महेश ला काही राहवेना कारण त्याला हवी असलेली व्यक्ती त्याच्या आयुष्यात येणार असते म्हणून त्याला तयारी चा एक महिना सुद्धा नको असतो. तो काही तरी कामानिमित्त शीतल ला भेटायला जायचा तिच्या घरी.
दोघे ही खरेदी निमित्त भेटायचे थोड फिरायचे आणि मग महेश शीतल ला घरी सोडून स्वतः घरी यायचा.
शीतल सोबत बोलता यावं म्हणून त्यानी शीतल च्या घरच्या माणसांच्या परवानगीने शीतल ला एक फोन घेऊन दिला. आपला जावई आपल्या मुलीसाठी एवढं करतोय म्हंटल्यावर सगळेच फार खुश होते.
रोज रात्री तासनतास महेश आणि शीतल फोन वर बोलत असे. दोघांनाही ते क्षण फार आवडत होते लांब असून सुद्धा एकमेकांच्या जवळ असण्याची ओढ होती.
शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. देवाब्राम्हणाच्या साक्षीने,थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने आणि मित्रपरीवाराच्या सोबतीने महेश आणि शीतल ही दोघेही लग्नाच्या गोड बेडीत अडकले.
लग्न झालं......लग्नानंतरचे सगळे विधी आटोपले कुलदैवतेच दर्शन,सत्यनारायण,जागर गोंधळ हे सगळे कार्यक्रम झाले पाहुणे-रावणे सुद्धा आपापल्या घरी गेले.
शीतल आणि महेश च्या आई ने सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवल्या, दोघींनी मिळून सगळं घर आवरलं.
महेश सुट्टी वर होता आणि या सगळ्या समारंभात तो खूप थकला होता म्हणून आराम करत होता. संध्याकाळी सगळे लवकर जेऊन झोपायला गेले शीतल सगळं आवरत होती तोपर्यंत महेश त्यांची खोली सजवत होता कारण आज त्यांची पहिली रात्र होती.......मधुचंद्राची रात्र.....जी सगळ्यांच्याच आयुष्यात खूप खास असते.
शीतल येईपर्यंत महेश ने गुलाबाच्या पाकळ्यानी खोली छान सजवली होती. महेश गॅलरी मध्ये उभा राहून एकटक चंद्र बघत होता कारण आज त्याला तो चंद्र पण शीतल समोर फिका वाटत होता.महेश चंद्र बघण्यात मग्न होता एवढ्यात मागून शीतल येते आणि महेश च्या बाजूला येऊन उभी राहते.
"काय बघताय" शीतल
"हा चंद्र बघ ना किती निस्तेज दिसतोय"महेश
"निस्तेज चंद्र नाही दिसत......तुमच्या मनात माझं चित्र यापेक्षा सुंदर आहे म्हणून तस वाटतय" शीतल
"हो असेल असच काही"महेश
महेश चे हे शब्द ऐकून शीतल लाजते आणि महेश पासून थोडी दूर जाते.महेश तिच्या मागे जातो....... आपल्या दोन्ही हातांचा तिच्या भोवती वेढा घालतो आणि त्याची मान तिच्या खांद्यावर ठेवून तिला विचारतो........
"तुला कस माहीत चंद्रापेक्षा सुंदर तुझं चित्र आहे माझ्या मनात ते"महेश
"जेंव्हा तुम्ही त्या लग्नात माझ्या मागे फिरत होतात ना तेंव्हा".......शीतल
"हो का??"महेश
"हो.."शीतल
शीतल स्वतःला महेश च्या मिठीतुन सोडवण्यासाठी प्रयत्न करताना बोलत होती.
शीतल स्वतःला पुनः त्याच्या मिठीतुन सोडवून बेड च्या कडेला जाऊन उभी राहते.महेश पुन्हा मागवून येऊन शीतल चे दोन्ही हात घट्ट पकडतो आणि तिला स्वतःच्या जास्त जवळ घेतो. उजवा हाताने शीतल च्या डाव्या खांद्याला पकडून तिला स्वतःकडे फिरवून घेतो आणि घट्ट.........मिठी मारतो.शीतल सुद्धा तिचे दोन्ही हात त्याच्याभोवती रोवून त्याला घट्ट बिलगते. दोघेही मधुचंद्राच्या रात्रीचा भरगोस आनंद घेतात प्रणय सुख घेऊन दोघेही एकमेकांच्या कुशीत रात्र घालवतात.महेश आणि शीतल दोघांनाही पहाटेच डोळा लागतो पण शीतल ला उशीरा झोपून सुद्धा लवकर उठायची सवय असते म्हणून ती लवकर उठून सकाळी सगळी तयारी करते दिराचा टिफिन,नवऱ्याचा टिफिन,नाश्ता ही सगळी काम झाली आणि शीतल आंघोळ करून महेश ला उठवायला आली.
महेश पण उठला आंघोळ करून नाश्ता वैगरे करून झाला आणि कामावर जायला निघाला.
असच रुटीन चालू होतं.दोघांचा संसार गोडीगुलाबीने चालू होता.शीतल जॉब करायचं म्हणत होती पण महेश च नको म्हणाला तो दुखावला जाऊ नये म्हणून तिने जॉब न करण्याचा निर्णय घेतला. महेश ची आई,भाऊ आणि बहीण फार खुश होते कारण महेश जास्तीत जास्त वेळ घरी देत होता.
पण..........फक्त वर्षभर..........
एक दिवस फोन मधला बॅलन्स संपला म्हणून शीतल ने महेश चा फोन घेतला आणि त्याच्यावर एक मेसेज होता तो वाचून तर शीतल च्या पायाखालची जमीनच सरकली..........
(काय असेल तो मेसेज? हे वाचण्यासाठी मला फॉलो करत राहा आणि आपल्या प्रतिक्रिया कंमेंट द्वारे कळवत राहा.)
क्रमशः
सदर कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा फॉरवर्ड करताना लेखिकेच्या नावसहित करावी.
धन्यवाद....
श्रावणी लोखंडे....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा