("अगं...... महेश निघाला का तिकडून???अजून निघाला नसेल तर त्याला सांग माझ गुढगे दुःखी वरच औषध घेऊन ये...."महेश ची आई
"हो सांगते ,पण तुम्ही काळजी घ्या" शीतल
" हो बाळा.....तू पण आराम कर"महेश ची आई
दोघींचं बोलणं होत आणि शीतल फोन ठेवते.)
आता पुढे..........
शीतल घरच्यांना सासूची तब्बेत खराब आहे त्यांचे गुडघे फार दुखत आहेत मला जायला पाहिजे असं सांगून घरी जाण्याचा हट्ट करते.घरातले नाही म्हणत असून सुद्धा शीतल तिच्या हट्टाला पेटून उठते सगळ्यांचा नाईलाज होतो आणि मग शीतल चे काका शीतल ला सोडायला जातात.घरी जाताना शीतल सासूबाईंच गुडघे दुःखी वरच औषध घेऊन जाते.शीतल ला अस घरी बघून सासूबाई विचारतात.
"अगं......तू अशी अचानक.......आणि ते ही एवढ्या रात्री??" महेश ची आई
"अहो आई......हे कामासाठी बाहेर गेलेत यायला उशीर होईल म्हणून मीच आले औषध घेऊन.... आणि तुम्हाला किती त्रास होतो ते माहीत आहे म्हणूनच निघाले एवढ्या रात्री"शीतल
"अहो ताई .......शीतल ऐकतच नव्हती....म्हणे सोडा मला घरी म्हणून मग घेऊन आलो. चला.....आता निघतो मी फार उशीर नको."शीतल चे काका.(एवढंच बोलून ते शीतल चा आणि तिच्या सासूबाईंचा निरोप घेतात.)
शीतल रूम मध्ये जाऊन पुन्हा महेश ला फोन लावते.
"कुठे आहात"शीतल
"घरी आहे.....केला तर होता ना मगाशी फोन,पोचलो सांगायला"महेश
"आईंचा फोन आला होता मगाशी......त्यांना गुडघेदुखी च औषध पाहिजे ते सांगण्यासाठी......,तुमचा फोन नाही लागला म्हणून त्यांनी मला केला होता."शीतल
"अच्छा....... "महेश
"अच्छा काय? तुम्ही घरी नाही, तरी मला फोन करून पोचलो सांगितलं,मग आहात तरी कुठे आणि कोणाच्या घरी"शीतल
" हे बघ तुझं परत आपलं संशय घेणं चालू झाल ना....."महेश
"हे बघा विषय बदलू नका.....मी काय विचारते त्याच आधी उत्तर द्या.तुम्ही नक्की कुठे आणि कोणाच्या घरी आहात???"शीतल
"मी घरी च आहे आपल्या"महेश
"हो का" मग आईंना फोन द्या जरा....."शीतल
"आई झोपली असेल आता.आणि कशाला उगाच तुझ्या संशयामुळे तिला उठवू"महेश
"हे बघा खोट बोलू नका,कुठे आहेत ते सांगा.कारण मी इथे आपल्या घरी आली आहे आणि आपल्या बेडरूम मधून च बोलते आहे."शीतल
"ओहोहो......म्हणजे तुझी हेरगिरी चालू झाली का?नजर ठेवतेस का माझ्यावर?"महेश
"तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा"शीतल
"आहे मी बाहेर काय करणार आहेस....."महेश
"त्या नवरा सोडलेल्या बाई सोबत आहात ना तुम्ही?मी गरोदर आहे तुम्हाला शरीरसुख देऊ शकत नाही म्हणून गेलात का तिच्याकडे?की पैसे देऊन तिच्या सोबत झोपून तुमची भूक भागवताय?"शीतल
"हे बघ काही पण बोलू नको आणि शब्द आवर तुझे, आणि हा......आहे मी तिच्यासोबत काय करणार तू आणि काय करू शकतेस हा......ती बाई नवऱ्याला सोडून सुद्धा तिच्या जीवावर जगते आणि तू काय करतेस."महेश
"मी तिच्या सारखी दुसऱ्यांच्या नवऱ्यासोबत अंथरुणात जात नाही हीच गोष्ट खूप मोठी आहे समजलं ना..........आणि हो.......तिची माझी तुलना तर अजिबात करू नका कळल?"शीतल
"थांब तू येतो मी घरी......काय करणार आहेस ते बघतो मी आणि अंथरुणात काय करतात ना ते पण दाखवतो आज"महेश
महेश फोन ठेऊन देतो आणि शीतल मात्र खूप रडत असते गर्भात असलेलं बाळ पण शांत........होतं...... कारण जरी ते गर्भात असलं तरी आई च दुःख बाळाला समजत असतं.
थोड्यावेळाने महेश दारू पिऊन घरी जातो.शीतल दार उघडते तर महेश खूप पियालेला असल्यामुळे तिचा हात पटकन नाकाजवळ जातो तसा लगेच महेश तिला शिवीगाळ करतो आणि तिच्या केसांना धरून फरफटत बेडरूम मध्ये घेऊन जातो आणि दोन जीवांची शीतल महेश च्या राक्षस रुपाला बळी पडते.महेश अक्खी रात्र शीतल ला उपभोगत असतो शीतलने नाही म्हणून जेंव्हा जेंव्हा त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा तेव्हा महेशने शीतल च तोंड दाबून तिला बुक्क्यांचा मार दिला.शेवटी सकाळी पाच च्या सुमारास महेश झोपला आणि शीतल...........शीतल मात्र तिचे कपडे सावरत डोळ्यातील अश्रूंना वाट करत बाथरूम मध्ये गेली.थंड पाण्याची आंघोळ केली.शॉवर मधून अंगावर पडणाऱ्या प्रत्येक पाण्याच्या धारेमध्ये तिला रात्री होणार त्रास आणि महेश च ते भयानक रूप आठवत होत.हाच का तो महेश जो तिच्या वर जीव ओवाळून टाकत होता असा प्रश्न पडला.
महेश ला सकाळी दहा वाजता जाग आली आणि त्याने शीतल ला हाक मारली.
"शीतल.......एक कप चहा दे गं..."महेश
शीतल चहाचा ट्रे बेड च्या बाजूला टेबल वर ठेवते आणि निघणार तोच महेश तिला थांबवतो आणि झाल्याप्रकाराबद्दल तिची माफी मागतो.पण शीतल काही एक बोलत नाही तशीच निघून जाते कारण महेश तिच्या मनातून उतरलेला असतो तिला त्याची घृणा येऊ लागली होती किळस वाटत होती आणि कीव येत होती स्वतःचीच
रात्री झालेल्या गोष्टींचा त्रास शीतल ला दिवसभर जाणवत असतो.संध्याकाळी अचानक शीतल च्या पोटात दुखू लागते आणि रक्तस्राव होऊ लागतो म्हणून शीतल ला जवळच्याच खाजगी रुग्णालयात दाखल करतात.खूप जास्त रक्त गेल्यामुळे शीतल खूप कमजोर होते आणि त्यात डॉक्टर तिच्या अंगावरचे व्रण देखील बघतात आणि तिला काही घडलं का विचारता पण घरची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून ती "काही नाही" म्हणते.
शीतल ला कमजोरी असल्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नव्हती म्हणून तीच सिजर करतात पण...........पण तीच बाळ गर्भातच दगावत. या जगात येण्याआधीच तो या जगातून निघून गेलेला असतो.
महेश ला जेंव्हा हे समजत तेंव्हा तो या सगळ्यासाठी स्वतःला दोषी समजतो आणि खूप रडतो.शीतल मात्र निपचित त्या बेड वर पडलेली असते.महेश शीतल ला धीर द्यायला तिला समजवायला आत जातो आणि तिची हात जोडून माफी मागतो.
(महेश च बोलणं शीतल ऐकेल का?शीतल महेश ला माफ करेल का? हे वाचण्यासाठी मला फॉलो करत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेन्ट द्वारे कळवत राहा.)
क्रमशः
सदर कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा फॉरवर्ड करताना लेखिकेच्या नावसहित करावी.
धन्यवाद....
श्रावणी लोखंडे....