अस्तित्व भाग 10

अस्तित्व-मराठी कथा

अस्तित्व भाग 10

मागच्या भागात आपण पाहिले मनालीला एक अन्नोन नंबर वरून कॉल येतो त्याबद्दल ती आकाशला सांगते आता पुढे....

दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश घाईघाईने नाष्टा करून ऑफिसला जाण्याच्या तयारीत होता. त्याला असं घाई घाईने नाश्ता करताना पाहून शालिनीताई म्हणाल्या,
"आकाश, अरे जरा हळू खा ठसका लागेल. एवढी घाई का करतोय?"

"आई बास मला. आज जरा लवकर ऑफिसला जायचंय."
एवढ बोलून आकाश उठला
शालिनीताईंना पुढे काही म्हणायच्या आत तो बॅग घेऊन घराच्या बाहेरही पडला.

ऑफिसमध्ये पोहोचल्या पोहोचल्या त्याची नजर आदित्यला शोधत होती. आदित्य, त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारा त्याचा एक सहकारी. आदित्य त्याच्या अजून एका सहकाऱ्यांबरोबर ऑफिसमध्ये गप्पा मारताना आकाशला दिसला. त्याला बघितल्याबरोबर रागातच आकाश त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या हाताला धरून त्याला आपल्याकडे खेचलं आणि म्हणाला,
"आदित्य, तुझी हिम्मत कशी झाली मनालीला फोन करून असं बोलण्याची."

अचानक आकाशने असं खेचल्यामुळे सुरुवातीला सगळ्या सहकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ झाला. आपल्याला असं ओढल्यामुळे आदित्य चिडला होता तो आकाशला म्हणाला,
"आकाश आधी हात सोड."

आकाश ने त्याचा हात झटकला आणि म्हणाला
"मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवय?"

"तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तू काय माझा बॉस नाही. अजून एक मी जर कोणाशी बेट लावली ना तर ती प्रामाणिकपणे जिंकतो; तुझ्यासारखा कोणाला फसवून नाही. तिला जर सांगायचं असतं ना तर प्रत्यक्षात जाऊन सांगितलं असतं. असं लपून-छपून फोन केला नसता."

आदित्यचे हे बोलणे ऐकून आकाश विचारात पडला. त्याला विचारात पडलेले पाहून आदित्य म्हणाला,
"चेहऱ्यावर बारा वाजलेत तुझ्या. तुझं लग्न मोडलं का? म्हणजे मी अजूनही पैंज हरलेलो नाहीये तर..."

"डोन्ट वरी आदित्य लग्नाची पहिली पत्रिका तुलाच देईल."

आकाश तिथून निघाला आणि थेट ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये जाऊन बसला.
कॉफी घेत असताना त्याच्या डोक्यात एकच विचार चालू होता,
"आदित्य नाही मग कोणी केला असेल कॉल. ऑफिसमधला दुसरा कोणी असेल का? पण कोण?"
दोन मिनिट त्याने डोळे मिटले आणि पुन्हा एकदा स्वतःशीच बोलला
'नाही माझा फोकस दुसरीकडे जातोय.. मनालीला तर मी समजावलं आहे.मला वाटत नाही आता काही प्रॉब्लेम येईल. आत्ता सध्या मला प्रोजेक्ट वर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे.'
आपल्या डोक्यातले विचार बाजूला सारून आकाश त्याच्या कामाला लागला.

इकडे मनालीची ही बाहेर जाण्याची तयारी चालू होती.
"आई ,आज यायला जरा उशीर होईल ग."

"काय आज कुठे दौरा?"
कांचन ताईंनी मनालीला विचारले.

"अगं माझ्या त्या संगीताच्या गायकवाड सरांना भेटायचे आहे आणि संध्याकाळी आमचा सरगम ग्रुप भेटणार आहे. राकेश पण ऑफिस वरून तिकडेच येणार आहे. मी येताना त्याच्याबरोबरच येईल."

"ठीक आहे . जेवणाच तसं कळव आणि सावकाश जा."

क्रमशः
कोण असेल फोन करणारा,आकाशला समजेल का?
आदित्य आणि आकाश मधील बेट बद्दल मनालीला समजू शकेल? वाचू पुढील भागात
सुजाता इथापे



🎭 Series Post

View all