अस्तित्व भाग -3

Marathi Story
अस्तित्व भाग -3

मागच्या भागात आपण वाचले आकाश मनाली ला घेऊन येण्याचे आत्याला प्रॉमिस करतो आता पुढे.....


सकाळची आठ वाजताची वेळ होती. आकाश , माधवराव, मंजिरीताई सगळे नाष्टा करायला बसले होते.आकाश नाष्टा संपवून ऑफिसला निघाला तेवढ्यात

"लक्षात आहे ना तुझ्या...."
आत्याचा खणखणीत आवाज आला.

" हो आत्या....आज संध्याकाळी मनालीला घेऊन येतो."
असे म्हणून आकाश ऑफिस ला गेला.

"चला मी ही निघतो. मला यायला उशीर होईल त्यामुळे जेवणासाठी वाट पाहू नका."
माधवराव म्हणाले

" आज काय तो निर्णय घेऊन टाक जमिनीचा. उगाच लांबावत बसू नको विषय."
गावाकडे निघालेल्या माधवरावांना मंजिरी ताई म्हणाल्या.

"आता तिथली परिस्थिती बघून काय ते ठरवतो."
एवढं बोलून माधवराव गेले.
******
ऑफिस मध्ये पोहचल्यावर आकाशने आधी मनालीला फोन लावला

" हाय, आज ऑफिस च्या वेळेत कॉल केला काही इंपॉर्टन्ट काम आहे का?"
तिकडून एकदमच विचारणा झाली.

"हो असच समज. आज संध्याकाळी तयार रहा मी तुला न्यायला येतोय."

" कुठे जायचे आहे. "
मनाली ने आश्चर्याने विचारले.

" माझ्या घरी ....माझी आत्या आली आहे तिला तुला भेटायचे आहे. "
"ओके.....पण आकाश उद्या आले तर .."
मनलीचे बोलणे मध्येच थांबवत आकाश म्हणाला

"अजिबात नाही ....आजच भेटायचे आहे त्यांना तुला . सो रेडी रहा .मी येतो सहापर्यंत."

एवढं बोलून आकाशने कॉल कट केला.

मनालीला पुढे बोलायचे होते, ते राहून गेले . संध्याकाळी भेटून बोलू असा विचार करून तिने तिच्या निशा नावाच्या मैत्रिणीला कॉल लावला

"हाय मनू...झाली तयारी संध्याकाळची."......निशा

" अरे यार एक प्रॉब्लेम झाला आहे. आकाश चा कॉल आला होता तो संध्याकाळी मला न्यायला येतोय कोण त्याची आत्या की कोण आली आहे त्यांना भेटायला जायचे आहे."......मनाली

" तू सांगितले का नाही आपल्या प्रोग्राम विषयी".......निशा

"संगणाराच होते पण तोपर्यंत त्याने कॉल कट केला.".....मनाली

" मग आत्ता काय?".........निशा

" मी एक काम करते ...प्रोग्राम नऊ ला स्टार्ट होईल तोपर्यंत मी तिकडे डायरेक्ट पोहचते तुम्ही सगळे पुढे जा.".......मनाली

"ओके ... बट लवकर ये ...नाहीतर सगळी गडबड होईल.".......निशा

"साडेआठ पर्यंत पोहचते...काळजी करू नकोस."
"बाय बाय ".....
असे म्हणून मनालिने फोन ठेवला.

"आई , आई .......मनाली

"काय झाले ?".....कांचन ताई

मनालीने घडलेली हकीगत आईला सांगितली.

"असे कसे तुलाच फोन करून सांगितले. बाबांना तरी विचारायचे ना आधी त्यांनी."

"आता ते काय मला माहित नाही.संध्याकाळी येतो म्हणाले मला."

"ठीक आहे.आल्यावर मीच बोलते."
*******
संध्याकाळी बरोबर सहा वाजता आकाश मनालीला घ्यायला तिच्या घरी आला होता.मनाली तयार होती. आकाश ला चहा देत कांचन ताईंनी विचारले

" खूप घाईत बोलावले मनालीला. आत्या लगेच जाणार आहेत का ? नाही म्हणजे इकडेच बोलावले असते त्यांना आमची ही ओळख झाली असती."

हे एकूण आकाश शक्य तेवढ्या मृदू आवाजात म्हणाला

" आत्याला मनालीला बघायची घाई झाली होती. अजून एक दोन दिवस आहे आत्या इथे."

"बरं ठीक आहे पण मनलीचा आज एक संगीत कार्यक्रम आहे तिला तिकडे ही जायचे आहे . काय ग मनू बरोबर ना."

मनाली हातात पर्स घेत म्हणाली
"हो ..मी तिकडून तशीच जाणार आहे."
निघायचे आपण ...आकाशाकडे बघत म्हणाली ने विचारले.

"हो .....येतो." कांचंताईंचा निरोप घेऊन दोघेही घराबाहेर पडले.

आकाशने जातानाच मनालीला प्रोग्राम विषयी विचारले आणि तो तिला म्हणाला
" तू नाही गेले तर जमणार नाही का?"

"अजिबात नाही ...माझे दोन परफॉर्मन्स आहेत.त्यामुळे मला गेलेच पाहिजे."
हे एकूण आकाश च्या चेहऱ्यावर नाराजी पसरली.
दोघे घरी पोहचले.
मंजिरी ताई आणि शालिनी ताई हॉल मध्येच बसल्या होत्या.
गेल्यावर आकाशने मनाली ची ओळख करून दिली.
मनाली दोघींच्या ही पाया पडली.आत्याने तिला स्वतः शेजारी बसवले.
मनालीला एक - दोन प्रश्न विचारले तेवढ्यात शालिनी ताई
"मी चहा ठेवते ."
असे म्हणून किचन मध्ये जायला निघाल्या तर लगेच आत्याने त्यांना अडवले आणि म्हणाल्या

" तुझ्या हातचा चहा पिऊन कंटाळा आला आहे मला...बघू तरी होणारी सून चहा कसा बनवते."

हे एकूण मनाली ने त्यांच्याकडे बघत स्मितहास्य केले आणि

"आत्ता आणते करून "

म्हणत किचन मध्ये चहा करण्यासाठी गेली.बरोबर शालिनी ताई ही गेल्या.त्यांनी तिला लागणाऱ्या सर्व वस्तू काढून दिल्या. दहा मिनिटात चहा घेऊन मनाली बाहेर आली.
चहाच पहिलाच घोट घेत आत्त्या म्हणाल्या,

"छान झालाय हो चहा.आता चहाची चव बघितली जेवणही आज तुझ्याच हातचे खाऊ. तेवढाच शालिनीला आराम.काय म्हणते शालिनी".

"अग बाई.. बरच होईल की"
शालिनी ताईंनी दुजोरा दिला.

हे एकूण मनालीला जरा धक्का बसला
स्वतः ला सावरत ती म्हणाली
"मलाही आवडले असते पण आज ना आत्या माझा गाण्याचा प्रोग्राम आहे . मला तिकडे गेले पाहिजे. म्हणून मग आत्ता नाही जमणार."

पुढे लगेच ती म्हणाली,
"पण असं करा ना उद्या तुम्ही सगळेच घरी या ना जेवायला. तुमची आवडती डिश पण सांगा मी बनवेल."

हे एकूण आत्याच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या.

"नाही गेलीस कार्यक्रमाला तर.. "

"नाही असं करून नाही चालणारं"
मनाली ओशाळत म्हणाली.

लग्नानंतर पण तू जाणार का अशा कार्यक्रमाला

"हो....आमचा छान संगीत ग्रुप आहे. सरगम नाव आहे ग्रुप च. "
मनाली आनंदाने सांगू लागली

" ते ठीक आहे पण काय करायचं नंतर गाणं वगैरे गाऊन असे किती पैसे मिळतात."

"हो... आत्या आम्ही आत्ता नवीन आहोत म्हणून पैसे कमी मिळतात पण एकदा का आमचे नाव झाले की मग..."
मनालीला मध्येच थांबवत आत्या..

"ते नाव कधी होणार आणि मग पैसे मिळणार त्या पेक्षा घरचं काम बरं."

हे एकूण मनाली ने आकाश कडे बघितले.
आकाश नजर चोरून लगेच आत्याला म्हणाला,
"आत्या तू पण ना काहीही बोलत बसलीस.ते बघू आपण लग्नानंतर."

यावर मनाली लगेच म्हणाली
"हो पण मी हे आधीच सांगितले आहे की मी यात करियर करणार ."

"हो ...लक्षात आहे माझ्या". आकाश हसून म्हणाला आणि त्याने विषय बदलला.

पण मनाली आणि आत्या दोघींचे ही एकमेकांविषयी मनात अढी झाली.

त्यानंतर मोजकच बोलून मनाली तिथून निघाली.आकाश तिला सोडवायला गेला पण पूर्ण रस्ताभर ती काहीच बोलली नाही. आकाश एकटाच बोलत होता. तिथे सोडल्यावर आकाश मनालीला म्हणाला

" तू आत्यचे बोलणे उगाचच मनाला लावून घेतले आहे."

" मी त्यांचे बोलणे मनाला लावले नाही पण एकच परत एकदा सांगते, मी गाण्यात करियर करणार.मी गाणं सोडणार नाही."

"हो ग...माहित आहे मला आणि या गाण्यामुळे तर आपली ओळख झाली .विसरलीस का तू."
मनाली चा हात हातात घेत आकाश म्हणाला.

यावर मनाली नुसती हसली आणि त्याला निरोप देऊन कार्यक्रमात गेली.

क्रमशः

मनाली ची समजूत आकाश ने काढली पण आत्या ची समजूत तो कशी काढेल वाचू पुढील भागात.



🎭 Series Post

View all