अस्तित्व भाग - 4

Marathi Story
अस्तित्व भाग - 4

मागच्या भागात आपण वाचले, आत्याच्या बोलण्यामुळे मनाली नाराज होते तर आत्या ही मनालीच्या गाण्यामध्ये करियर करणार या निर्णयावर नाक मुरडतात.आता पुढे

आकाशने सोडल्यावर मनाली ने मागे देखील बघितले नाही. ती सरळ कार्यक्रमाच्या ठिकाणी गेली. तिची नजर तिथे तिच्या ग्रुपला शोधत होती. तेवढ्यात मागून मनाली असा एक ओळखीचा आवाज आला.मनालीने आवाजाच्या दिशेने बघितले तर समीर होता. ती त्याच्यादिशेने गेली.
समीर सरगम ग्रुप मधील एक मेंबर.तो आणि मनाली त्या ग्रुपमधील मेन गायक होते.
समीर हा मनाली चा भाऊ राकेश चा सुद्धा मित्र होता.निशा आणि रवी हे दोघेही गायक होते.बाकीचे वाद्य वाजवणारे चार - पाच जण.राकेश लाही गिटार वाजवला आवडायची त्यामुळे तो ही या ग्रुपचा एक भाग झाला होता.असे एकूण दहा - बारा जणांचा ग्रुप होता.

घडलेल्या प्रकारामुळे मनाली नाराज होती.ते तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते. निशा आणि समीरच्या ते लक्षात आले.

" काय आज गाण्याचे टेन्शन आले आहे का तुला."
समीर ने विचारले.

" नाही रे "
मनाली एवढेच उत्तर दिले.

"मग तुझा चेहरा का असा पडलाय.आकाश काही म्हणाला का? "
निशा म्हणाली.

"नाही ग..काही नाही झाले.चल सगळे सेट झाले का बघू.
आणि समीर तो तुझा मित्र कधी येणार आहे.जरा फोन कर त्याला. "

"काही गरज नाही.मी इथे आहे."
राकेश तिथे आला होता.

चला मग ...
कार्यक्रम सुरू झाला.
********
इकडे आकाश घरी पोहचला. शालिनी ताई किचन मध्ये होत्या आणि आत्या हॉल मध्ये बसल्या होत्या.
आकाश ला आलेले बघून शालिनी ताई म्हणाल्या

"बघितले ना ताईसाहेब आताच सांगितलेली गोष्ट ऐकली नाही तर उद्या लग्न झाल्यावर काय होणार."

"काय होणार आई. उगीचच काहीही बोलू नको."

"बघितलं आत्ताच बायकोची बाजू घेतोय."

"बाजु - बिजू काही घेत नाही .खर तर माझच चुकलं मी तिला रात्रीचं कॉल करायला पाहिजे होता म्हणजे तिने तिचा प्रोग्राम कॅन्सल केला असता. वेळेवर ते जमणार नव्हते."
आकाश आत्या आणि आईला समजवण्याचा प्रयत्न करत होता.

"अरे आत्ताचे ठीक आहे पण तू एकल ना ती काय म्हणाली
मी गाण्यात करियर करणार त्याचे काय"
एवढा वेळ शांत बसलेल्या मंजिरी ताई म्हणाल्या.

"आत्या लग्नानंतर जांचे करियर एकदम सेट आहे अशा लेडिजला सुद्धा घरी बसलेले मी बघितले आहे . इथे तर अजून सुरूच नाही तर काय घेऊन बसलीस तू."

आकाश चे हे बोलणे एकूण शालिनी ताई हात झटकत
"घ्या ...आता काय बोलणार" म्हणून किचन मध्ये गेल्या.

मंजिरी ताई आणि आकाश एकमेकांकडे बघत होते जणू काही ते डोळ्यांनीच एकमेकांशी बोलत होते.
यानंतर आत्याने आकाश कडे बघत आश्वासक पद्धतीने मान हलवली आणि म्हणाल्या

" जा तू आराम कर ..जेवायला झाले का तुला बोलावते."
आकाश आपल्या रूम मध्ये गेला.
******
सरगम ग्रुपचा परफॉर्मन्स छान झाला होता. त्यांना बरेच जन ओळखू लागले होते.सगळ्यांमध्ये मनाली चा गोड आवाज सगळ्यांच्या हृदयाचा ठाव घेत होता.पण आज मनाली मात्र चांगल्या परफॉर्मन्स नंतरही खुश नव्हती. ग्रुप मधील सगळे मस्ती करत होते पण मनाली मात्र शांत होती. तिची ही शांतता समीर आणि राकेश च्या लक्षात आली. दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि समीर राकेश ला म्हणाला

"ही त्या आकाश च्या घरी जाऊन आल्यापासून शांतच आहे तो काही म्हणाला असेल का?"

"डोन्ट नो?" घरी जाऊनच बोलतो.
असे म्हणून त्याने मनालीला आवाज दिला
"मनू निघायचे"

"हो."
*****
घरी पोहचल्यावर ही मनू शांतच होती.
दिलीपराव तिला कार्यक्रमाविषयी विचारत होते. एरवी अति उत्साहात सांगणारी मनाली आज शांत होती.
राकेशने डोळ्यांनीच आईला खुणवले.
कांचंताईंच्या लक्षात आले.
त्यांनी सरळ विषयाला हात घातला.
"मनू काय झालं तू आकाशच्या त्याला भेटायला गेली होतीस तिथे काही झाले आहे का?"

हे ऐकून एवढा वेळ मनातच कुढणारी मनालीआईच्या गळ्यात पडून रडू लागली.

"अग काय झाले सांग तरी"

"तुला कोणी काही म्हणाले का तिथे आत्ता फोन लावतो त्या आकाशला"
राकेश चिडून म्हणाला.

"अरे थांब जरा थोड.आधी तिला तर बोलू दे."
दिलीपराव म्हणाले.

मनालीने डोळे पुसत घडलेला प्रकार सांगितला.

"अग एवढंच ना ..आणि तसही त्याच्या आत्या ने हे विचारले. त्यांना गाण्याचा प्रॉब्लेम असू शकतो पण त्या कुठे राहणार आहे इथे. लग्नानंतर जातील त्यांच्या घरी."
दिलीपराव मनाली ला समजावत म्हणाले.

"नाही बाबा यावर आकाश ही स्पष्टपणे बोलला नाही.त्याने विषय बदलला."

"ठीक आहे मग आपण उद्याच त्याला भेटून स्पष्ट विचारू याबद्दल."
राकेश म्हणाला.

"राकेश या गोष्टी चिडून बोलायच्या नसतात.कायम चा मनामध्ये राग राहून जातो यामुळे"
कांचन ताई म्हणाल्या.

"बाबा मला वाटतं आपण घाई केली होकार द्यायला."
मनाली हुंदका देत म्हणाली.

"मग तुला नाही करायचे का लग्न.मी माधवरावांशी बोलू का तसे."

क्रमशः

काय असेल मनालीचा निर्णय ? ती लग्नाला नकार देईल का? वाचू पुढील भागात.


🎭 Series Post

View all