अस्तित्व भाग 5

Marathi Story
अस्तित्व भाग 5

मागच्या भागात आपण वाचले मनाली लग्नाविषयी शंका उपस्थित करते आता पुढे

"मी उद्या सकाळी माधवरावंशी बोलतो.तू टेन्शन घेऊ नको.उशीर झाला आहे. झोपा आता सगळे."
दिलीपराव लेकीला समजावत म्हणाले.
*******
दुसऱ्या दिवशी सकाळी
" कालच्या प्रकारामुळे रात्री काही झोप लागली नाही. किती नाही म्हटले तरी सारखे तेच तेच विचार मनात येत होते."
कांजन ताई नाष्टा बनव असताना दिलीप रावांना म्हणाल्या.

"माझंही तेच झालं. कधी एकदा माधवरावांना फोन लावून बोलतो असं झालय मला.आज रविवार असल्यामुळे आकाशही घरीच असतील.
आजच काय तो निर्णय झालेला बरा."

"फोन लावण्या आधी परत एकदा मनुशी बोलायचे का ?"

"कशाबद्दल बोलायचे माझ्याशी?"
आईचे बोलणे एकूण मनू म्हणाली.

"उठलीस. बाबा माधवरावांना फोन लावणार आहेत.लावायचा ना"

मनुच्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह होते.

"हे बघ मनू शंका आलीये तर त्याबद्दल बोलनेच उत्तम."
मनुच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून दिलीपराव म्हणाले.

"ठीक आहे बोलून घ्या मग बघू काय करायचे ते."
मनूने एक सुस्कारा सोडला.
******
इकडे माधवराव, आकाश आणि आत्या सकाळचा नाश्टा करत होते. तेवढ्यात माधवरावांच्या मोबाईलची रिंग वाजली.
" दिलीप रावांचा सकाळी सकाळी फोन."
मोबाईलच्या स्क्रीनवर नाव बघून माधवराव म्हणाले.
" काल सुनबाई येऊन गेल्या सगळं काही ठीक आहे ना."
तिघांकडे बघत माधवरावांनी विचारले.

"आधी फोन घे ."
मंजिरी ताई म्हणाल्या.

आकाश ने फोन स्पीकरवर टाकायला सांगितला.
" नमस्कार दिलीपराव आज सकाळी सकाळी कशी काय आठवण काढलीत आमची."

"जरा बोलायचं होतं तुमच्याशी वेळ आहे ना तुम्हाला."

"हो बोला ना."

"माधवराव मला वाटतं आपण परत एकदा या नात्याचा विचार करावा."

"म्हणजे मला समजलं नाही काय म्हणायचे तुम्हाला स्पष्ट बोला."

"हे बघा गैरसमज करून घेऊ नका पण काल मनाली तुमच्या घरी आली होती. एकंदरीत तुमच्या घरच्यांकडून असे कळले की तुम्हाला तिचे गाने गाणं पसंत नाही. आणि माझ्या मुलीला तर यातच करिअर करायचे आहे. नंतर प्रॉब्लेम होण्यापेक्षा याचा विचार आपण आधीच केलेला बरे ना."

हे ऐकून माधवराव जरा गोंधळले होते. त्यांना घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच माहित नव्हते. एकीकडे आकाशने डोक्यावर हात मारला. तर आत्या आणि शालिनीताई एकमेकींकडे बघून यावर नाराजी व्यक्त करत होत्या.

"दिलीपराव असं कसं बोलताय तुम्ही अहो त्यांच्या लग्नाची बातमी मी आता सगळ्या नातेवाईकांमध्ये सांगितले आहे. लग्न मोडण्याचे कारण काय सांगणार आणि एवढं सोप्या असतात का ह्या सगळ्या गोष्टी."

"माधवराव तुमचे बरोबर आहे पण मुलांच्या आयुष्यापेक्षा या गोष्टी तर आपल्याला महत्त्वाच्या नाहीत ना."

यावरून दिलीपराव त्यांच्या म्हणण्यावर ठाम असल्याचे जाणवत होते. हे ऐकून आकाशने मोबाईल त्याच्या हातात घेतला आणि म्हणाला

" बाबा मी आकाश बोलतोय. एकंदरीत काल मनाली चा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. एक तासाभरात मी घरी येतो आपण समोरासमोर व्यवस्थित सगळं बोलूयात. मग तुम्हाला हवं ते ठरवा."

हे ऐकून दिलीपराव एक-दोन सेकंद शांत बसले. नंतर विचार करून म्हणाले
"ठीक आहे मी वाट बघतो."

दिलीप रावांचे हे उत्तर ऐकून आकाशने फोन कट केला.
त्याने फोन ठेवल्या बरोबर त्याच्यावर एका मागून एक प्रश्नांची सरबती सुरू झाली

" अरे काय चालले आहे हे? मला कुणी काही सांगेल का?
माधवराव चिडून म्हणाले.

"तू का त्या मुलीच्या एवढ्या मागे लागलाय मोडत असले तर मोडू दे ना लग्न."
शालिनीताईंचाही पारा चढला होता.

"तू माझा भाचा आकाशच आहेस ना."
आत्याने प्रश्नार्थक नजरेने आकाश कडे बघत विचारले.

"आई ,बाबा ,आत्या तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो
या क्षणी मला हे लग्न मोडायचे नाही. याला माझे काही वैयक्तिक कारण आहेत.तुमच्या ज्या शंका कुशंका आहे याचे उत्तर मी तुम्हाला वेळ आल्यावर देईल. माझ्यावर विश्वास ठेवा. मी येतोच दिलीप रावांना भेटून."

एवढ बोलून आकाश मनाली कडे जाण्यासाठी निघाला.

"काय झालंय या मुलाला काही कळत नाही."
शालिनीताई डोक्याला हात लावत म्हणाल्या.

"तुला तरी काही सांगितले का चिरंजीवाने."
दिलीपराव आपल्या बहिणीकडे बघत म्हणाले.

"नाही स्पष्ट तर काही सांगितले नाही पण एकंदरीत सरळ सरळ जे दिसतंय तसं काही नाहीये. वेळ आल्यावर सांगू म्हणालाय ना वेळेची वाट पाहू."
मंजिरीताईंनी उत्तर दिले.

"मी तर म्हणते हे लग्न मोडलं तर बरं होईल."
शालिनीताई म्हणाल्या.

"शालिनी कशाला उगाच आता डोक्याला ताप करून घेते."
त्यापुढे म्हणाल्या
"उगाच लग्न बिग्न मोडल तर तुझा मुलगाच तन तन करत बसल."

"एकाहून एक श्रीमंत च्या मुली विचारून येत होत्या याला
पण नाही, कोणाचे काही ऐकायचे नाही."

"दुसऱ्या श्रीमंताच्या मुली काय घेऊन बसला इथे माझ्याच घरचे घोड्यावर बसले होते पण तू लग्न जमल्याचा निरोप पाठवला आणि सगळ्यांच्या इच्छांवर विरजण टाकले."
मंजिरी ताई म्हणाल्या.

"म्हणजे ?मी समजलो नाही."

" अरे माझी पुतणी श्वेता. तिचं आणि आकाश चं लग्न व्हावं ही तिच्या आई वडिलांची इच्छा होती. मीही म्हटलं घरच स्थळ आहे आपलं. वेळ आली की बोलेल तुझ्याशी. पण हे वेगळच घडलं."

"अरे देवा ताई आधी हे नाही सांगायचं का? अजूनही वेळ गेली नाही.आहो आकाशला फोन करा. नको जुळवून घेऊ म्हणा मोडत असल तर मोडू दे."

" शालिनी जरा शांततेत घे. बघितलं नाही का तुझा मुलगा कसा तंतनत गेलाय. त्याला त्याच मुलीशी लग्न करायचे आहे. उगाच आता भांडण नको.जे घडेल ते तुझे नशीब समज."
मंजिरी ताई म्हणाल्या.

"नशीबच दुसरं काय आता."
असे म्हणत माधवराव पेपर वाचत बसले.

क्रमशः
काय होईल पुढे...आकाश समजावू शकेल का मनाली आणि दिलीप रावांना. का सर्व शालिनीताईंनच्या मनासारखं घडेल. वाचू पुढील भागात


🎭 Series Post

View all