अस्तित्व-भाग 1

Marathi Story

अस्तित्व-भाग 1

( सदर ची कथा पुर्णतः काल्पनिक आहे.)

"आई, आई.... मस्त्त स्टाँग कॉफी दे ना."
मनाली बाहेरून येत सोफ्यावर हातातली पर्स फेकत म्हणाली.

"अग हो ...घरात तर ये आधी, जरा फ्रेश हो.'

'होते ग... आधी कॉफी दे बरं."

"घे..घे . मजा मारून घे आईच्या जीवावर ...इथे करते आहे आई.., आई ..पण दोन महिन्याने समजेल तुला."
कांचन ताई ( मनालीची आई ) किचन मध्ये जात म्हणाल्या.

" मलाही चालेल स्ट्राँग कॉफी."
पेपर मध्ये डोक घातलेले मनाली चे बाबा दिलीपराव म्हणाले.

"हो..हो..तुम्हाला तर काय कधीही चालेल."
कांचन ताई कपाळावर आठ्या पाडत म्हणाल्या.

"काय मग मनाली मॅडम तुम्ही तर शॉपिंग ला गेल्या होत्या ना...पण आणलेले तर काहीच दिसत नाही.काय केले काय चार तास."
दिलीप रावांनी मनालीला विचारले.

" विंडो शॉपिंग"

डोक्यावरचा गॉगल बाजूला ठेवत मनाली.

"विंडो शॉपिंग....चार तास."

तेवढ्यात घरात प्रवेश करत असलेल्या राकेश( मनालीचा लहान भाऊ) ने हे एकले आणि म्हणाला

"रिकामटेकड्या लोकांना कामचं काय असते बाबा."

" तुला कोणी विचारले होते का?आणि रिकामटेकडा तू असशील."

" तुझ्यासारखा चार तास विंडो शॉपिंग करत फिरत नव्हतो."

"ये तु जरा गप्प बस....नाहीतर.."

"नाहीतर काय.."

"अरे काय चालले आहे तुमचे..लहान मुलांसारखे भांडतायेत...आणि तुम्ही काय ओ..काहीच म्हणत नाही दोघांना"
कॉफीचा मग मनालीच्या हातात देत कांचन ताई म्हणाल्या.

" लहान मुलांसारखे भांडत जरी असेल तरी ते दोघं काही लहान नाहीत मी काही म्हणायला."
कॉफीचा मग हातात घेत दिलीपराव.

तोपर्यंत इकडे मनाली चे आणि राकेश चे हातवारे करत भांडण चालूच होते.

"अरे राकेश गप्प बस ...दोनच महिने आहे ती इथे."
दिलीपराव कॉफीचा घोट घेत म्हणाले.

"बाबा माझे सासर याच शहरात आहे जरी लग्न झाले तरी मी इथे रोज येणार आहे."

"ये अजिबात यायचं नाही हां ..लग्न झाल्यावर तू तुझ्याच घरी राहायचं."

"तू बोलूच नको. लग्नानंतर ते ही आणि हे ही माझाच घर असणार. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी कुठेही राहील."

" अरे याला काय अर्थ आहे का बाबा."

"तू रोज येशील ग पण तुझ्या सासूने येऊ दिले पाहिजे ना."
कांचन ताईं डोळे मिचकवत म्हणाल्या.

"झालं इकडे गाडी वळली सासू वर"
दिलीपराव हळू आवाजात म्हणाले.

" त्या कशाला काही म्हणतील मला.".......मनाली

"वा ग वा.... म्हणे कशाला काय म्हणतील.आई आणि सासू मधला फरक लवकरच समजेल तुला.

"उगाच काहीतरी बोलू नको कांचन"....दिलीपराव

"उगाच काय ...... खर ते सांगते आहे तिला.सासरी गेल्यावर तेच घर आपलं होतं.आधी तिथला विचार करावा लागतो."

"बरं ठीक आहे मी नाही येणार सारखे इकडे ..मग तर झाले".
कांचन ताईंचे बोलणे मध्येच थांबवत मनाली म्हणाली.

" आत्ता कसं बरोबर बोललीस."

एवढं बोलून राकेश मनालीच्या डोक्यात टपली मारून आपल्या रूम मध्ये पळाला तर तो गेल्या नंतर मनालीला त्याच्या बोलण्याचा रोख समजला आणि दिलीप रावांकडे बघत ती म्हणाली,

" बाबा याचे जरा अतीच होतय."

यावर शांत बसनच योग्य असा विचार करून दिलीपराव काहीच बोलले नाही.

काही दिवसांपूर्वी आकाश जाधव या मुलाशी मनालीचे लग्न ठरले होते.
आकाश हा शालिनीताई आणि माधवराव जाधव यांचा एकुलता एक मुलगा होता. हुशार,एका मोठ्या आयटी कंपनीत जॉबला होता. तर मनाली बिनधास्त, लाडात वाढलेली कांचन ताई आणि दिलीप देसाई यांची मोठी मुलगी. मनालीला लहान पणापासून गाण्याची आवड होती त्यामुळे तिने संगीतात एम. ए. केले होते.शहरात होणाऱ्या बऱ्याच गाण्याच्या कार्यक्रमासाठी मनाली न चुकता जात असे कधी स्वतः गाण्यासाठी तर कधी ऐकण्यासाठी.
अशाच एका संगीत कार्यक्रमांतर्गत आकाश आणि मनाली एकमेकांना भेटले होते.आकाशला पाहता क्षणी मनाली आवडली होती. त्याने आपल्या आईवडिलांशी बोलून मनालीला लग्नाची मागणी घातली होती.मनालीच्या आई-वडिलांना ही आकाश आवडला होता. त्यामुळे त्यांनीही लग्नाला लगेचच होकार दिला. घरची चांगली आर्थिक परिस्थिती ,चांगल्या पदावरची नोकरी आणि मुलगाही दिसायला चांगला म्हणून मनाली ही खुश होती.

क्रमशः

मनाली आणि तिच्या आईवडिलांना तर आपण भेटलो आता आकाश आणि त्याच्या आईवडिलांना भेटू पुढील भागात ...

🎭 Series Post

View all