नमस्कार मंडळी,
Astro with सर्वेश'च्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत.
या सदराला तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ईरा, फेसबुक आणि पर्सनलीसुद्धा अभिनंदन करणारे खूप मेसेजेस येत आहेत, त्यासाठी मनापासून धन्यवाद.
या सदराला तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ईरा, फेसबुक आणि पर्सनलीसुद्धा अभिनंदन करणारे खूप मेसेजेस येत आहेत, त्यासाठी मनापासून धन्यवाद.
मंडळी, कालच्या भागात आपण मेष राशीबद्दल जाणून घेतले. आजच्या भागात आपण राशीचक्रातील दुसऱ्या राशीविषयी, म्हणजेच वृषभ राशीविषयी चर्चा करणार आहोत.
वृषभ राशीचे चिन्ह आहे, बैल. राशीचे चिन्हच या राशीबद्दल खूप काही सांगते.
खूपच शांत, स्थिर, मेहनती असा जमिनीवर राहणारा हा प्राणी, कुठलीही तक्रार न करता सांगितलेली कामे करतो. काम कितीही कठीण असले तरी, तो ते धैर्याने करू शकतो. आपले काम झाले की तो शांत बसतो. पण जर त्याला चिथावले, वारंवार टोचले किंवा त्रास दिला तर मात्र तो इतक्या जोरात उफाळून येतो की, त्याला थांबवणे जवळपास अशक्य असते.
वृषभ राशीबद्दल सविस्तर जाणून घेण्याआधी, मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो.
दिवाळीचा सण असल्याने वृषभ राशीची एक सून, उमा लवकरच उठली होती. सासूबाईंनी कालच सांगून ठेवलेली सगळी कामे तिने व्यवस्थितपणे पटापट करून टाकली.
आपली कामे संपविल्यावर तिने आपला मोबाईल हातात घेतला आणि ज्यांनी तिला दिवाळीचे संदेश पाठवले होते, त्यांना उत्तरे द्यायला सुरुवात केली.
तेव्हाच तिच्या सासूबाई तिथे आल्या.
“काय गं उमे, सणासुदीच्या दिवसातसुद्धा तुला हा मोबाईल हातात घ्यावा असे वाटते तरी कसे गं? अगं, दिवाळीचा सण आहे. दारात एक रांगोळी तरी काढ.”
“काय गं उमे, सणासुदीच्या दिवसातसुद्धा तुला हा मोबाईल हातात घ्यावा असे वाटते तरी कसे गं? अगं, दिवाळीचा सण आहे. दारात एक रांगोळी तरी काढ.”
सासूबाईंनी हुकूम देताच कुठलीही तक्रार न करता उमाने आपल्या हातातील मोबाईल खाली ठेवला आणि एक सुंदर, मोठी, नक्षीदार रांगोळी काढली.
उमाच्या नणंदेला मात्र तिला त्रास द्यायला खूप आवडत असे. उमाने रांगोळी काढली आहे हे पाहून ती मुद्दाम येऊन तिची रांगोळी पायाने जराशी पुसून टाकली. उमाला ते समजले तरी ती गप्प राहिली.
“सॉरी हं वहिनी, चुकून पाय लागला.” नणंदेने माफी मागण्याचे नाटक केले.
“काही हरकत नाही, मी करते दुरुस्त.” असे म्हणत उमाने पुसलेली रांगोळी परत नीट केली.
“काही हरकत नाही, मी करते दुरुस्त.” असे म्हणत उमाने पुसलेली रांगोळी परत नीट केली.
पण नणंदेचे मन अजून भरले नव्हते. उमाला आणखी सतावायचे म्हणून ती परत रांगोळी जवळ आली आणि पुन्हा एकदा ती रांगोळी पुसून टाकली.
उमाने ते पाहिले. नणंदेने पुन्हा खोटी माफी मागितली आणि उमाने पुन्हा रांगोळी दुरुस्त केली.
नणंद तरीही गप्प बसली नाही . तिने पुन्हा येऊन परत रांगोळी पुसली. हे पाहून उमा रागाने उठली आणि नणंदेच्या जोरात थोबाडीत मारली.
मंडळी, या गोष्टीवरून आणि वर सांगितलेल्या चिन्हाच्या माहितीनुसार तुम्हाला वृषभ राशीचा थोडाफार तरी स्वभाव कळलाच असेल.
वृषभ राशीच्या व्यक्ती शांत स्वभावाच्या असतात, पण जर समोरच्याने मर्यादा ओलांडली तर त्यांचा राग तीव्र आणि धोकादायक बनतो. हे तुम्हाला कथेत समजलेच असेल.
तर शांत स्वभावाचे हे वृषभ राशीचे लोक घाईघाईने कधीही निर्णय घेत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक, हळूहळू आणि योजनाबद्धपणे करतात. त्यांचे मन एकदम स्थिर असते, मग ते नात्यात असो, कामात असो किंवा नेहमीच्या जीवनशैलीत.
वृषभ राशीची पत्नी ९९% आपल्या पतीशी एकनिष्ठ असते.
पृथ्वी तत्व असलेली ही राशी, शांत, स्थिर, सहनशील असतेच, पण आपल्या जागी ठाम पण असते.
दुसरी एक गोष्ट म्हणजे, कुठलेही काम जर त्यांनी हातात घेतले तर ते पूर्ण केल्याशिवाय दुसरे काम हातात घेणार नाहीत.
याचे एक उदाहरण पाहूया.
सासूबाईंनी स्वयंपाकघरात असलेल्या उमाला सांगितले सांगितले,
“उमा, चुलीवर खीर शिजत आहे ना? तोपर्यंत पुऱ्या लाटायला घे.”
“हो सासूबाई, लगेच करते. ही खीर तयार होत आली आहे. आता ढवळणे बंद केले तर खीर खाली पातेल्याला लागणार. हे झाले की लगेच पुऱ्यांचे काम हातात घेते.”
“उमा, चुलीवर खीर शिजत आहे ना? तोपर्यंत पुऱ्या लाटायला घे.”
“हो सासूबाई, लगेच करते. ही खीर तयार होत आली आहे. आता ढवळणे बंद केले तर खीर खाली पातेल्याला लागणार. हे झाले की लगेच पुऱ्यांचे काम हातात घेते.”
म्हणजे या व्यक्ती नकार पण देत नाहीत आणि आपले काम मध्ये सोडत पण नाहीत. सगळे विचारपूर्वक, कामात कुठलाही हलगर्जीपणा नाही, एक-एक काम व्यवस्थित करायचे. एकाच वेळेला सगळीकडे हात घालायचा नाही. कामात ते पक्के आणि जबाबदार असतात, म्हणूनच त्यांच्यावर इतरांचा विश्वास बसतो.
हे लोक कमी बोलतात आणि जास्त करतात. एकदा काम हातात घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय ते शांत बसत नाहीत. वर जसे कथेत उमा करते, तसेच दिलेले काम जबाबदारीने, सातत्याने आणि प्रामाणिकपणे करणे या वृषभवाल्यांना आवडते.
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे.
शुक्र म्हणजे कला, प्रेम, ऐश्वर्य आणि सौंदर्याचा अधिपती.
म्हणूनच या लोकांना उत्तम कपडे, परफ्यूम्स, सजावट आणि स्वच्छता खूप आवडते. त्यांची आवड निवड नेहमी उच्च दर्जाची असते. साधी असू शकते, पण स्टायलिश असणारच.
समजा, जर यांना 'ईराच्या गेट-टुगेदर' ला जायचे असेल, तर हे लोक त्यासाठी स्पेशल खरेदी करणार. आपल्याकडे असलेल्या जुन्या वस्तू तिथे कधीच नेणार नाहीत.
त्यांच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक मोहकपणा असतो, त्यामुळे लोक त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होतात.
वृषभ राशीचे लोक मनाने अत्यंत प्रेमळ असतात. नात्यात सुद्धा ते प्रामाणिक, निष्ठावंत आणि खूप भावनिक असतात. ते गोड बोलतात, मायेने वागतात आणि सर्वांना जवळ करतात. त्यांच्या शब्दांमध्ये गोडवा असतो. कोणालाही आपलेसे वाटावे असे ते बोलतात.
त्यांना लोकांशी संवाद साधायला फार आवडते, पण फक्त विश्वासू लोकांशीच, बरं का.
वृषभ राशीचे लोक मनाने अत्यंत प्रेमळ असतात. नात्यात सुद्धा ते प्रामाणिक, निष्ठावंत आणि खूप भावनिक असतात. ते गोड बोलतात, मायेने वागतात आणि सर्वांना जवळ करतात. त्यांच्या शब्दांमध्ये गोडवा असतो. कोणालाही आपलेसे वाटावे असे ते बोलतात.
त्यांना लोकांशी संवाद साधायला फार आवडते, पण फक्त विश्वासू लोकांशीच, बरं का.
त्यांच्या स्वभावामुळेच त्यांचा मित्रपरिवार बराच मोठा असतो. यांना पदार्थ बनविण्याची आणि ते दुसऱ्याला खाऊ घालण्याची खूप आवड असते.
शुक्र ग्रह कलांचा कारक असल्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना संगीत, गायन, नृत्य, चित्रकला, फॅशन, अभिनय, पाककला किंवा लेखन यामध्ये रस असतो. त्यांच्यात नैसर्गिक कलात्मकता असते.
या राशीची व्यक्ती आरामदायी, सुंदर आणि सुखकर जीवनशैली पसंत करते. त्याला चांगले अन्न, आरामदायी घर आणि शांत वातावरण आवडते. त्यांच्यासाठी quality महत्त्वाची असते, quantity नव्हे.
तर मंडळी, आतापर्यंत आपण जाणून घेतले वृषभ राशीचे चांगले गुण, आता जरा त्यांचे दुर्गुणही पाहूया.
या राशीचे लोक प्रेमात फार स्थिर, भावनिक आणि निष्ठावंत असतात. पण जर त्यांना प्रेमात धोका मिळाला तर ते पूर्णपणे तुटून जातात. इतर राशींप्रमाणे वृषभ राशीचा माणूस रडून, बोलून, बाहेर फिरून किंवा नवीन नाते करून पुढे जात नाही. ते move on करू शकत नाहीत.
वृषभवाल्यांचा दुसरा दुर्गुण म्हणजे हट्टीपणा. हे लोक शांत असले तरी हट्टी असतात. त्यांनी मनात ठरवलेली गोष्ट ते सहसा बदलत नाही. त्यांना कोणीही सांगितले, “ते तसे करू नको, असे कर,” तर ते कधीही ऐकणार नाहीत.
तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना बदल आवडत नाहीत. जे पूर्वापार चालत आलेले आहे, रूढीपरंपरा जशा आहेत तशाच ठेवणे, यातच त्यांना धन्यता वाटते. त्यात काहीही बदल केले तर त्यांना ते पटत नाही. सांगायचे झाल्यास चाकोरी बाहेर जाऊन विचार करणे त्यांना आवडत नाही.
आपण जे करतो तेच योग्य आहे असा त्यांचा समज असतो. कधी कधी ते फक्त स्वतःचा दृष्टिकोन बघतात आणि दुसऱ्याच्या भावना दुर्लक्षित करतात.
हे लोक तात्काळ राग व्यक्त करत नाहीत, पण आतून सगळे साठवतात. ते बोलणार नाहीत, पण विसरणारही नाहीत.
शुक्र ग्रहामुळे त्यांना सुंदर वस्तू, पैसा आणि ऐश्वर्य यांचे आकर्षण असते. पण कधी कधी हे आकर्षण लोभ किंवा भोगविलास बनू शकते.
आणखी एक गोष्ट म्हणजे हे लोक खूप मेहनती असतात, कष्टही खूप करतात, दिलेली कामे बरोबर आणि व्यवस्थित करतात, पण त्यांना ही कामे करायला मुद्दाम ढकलावे लागते. नाहीतर ते आरामात आळशीपणा करत बसतात.
कन्या, मकर आणि कर्क या राशींबरोबर वृषभ राशीची जोडी चांगली जमू शकते.
प्रकृती स्वास्थ्य याबद्दल बोलायचे झाल्यास, वृषभ राशीचा अंमल गळा, स्वर आणि घशावर असतो.
त्यामुळे या माणसांना फळे, सरबते, शीतपेये व गोड पदार्थ यांची फार आवड असते. म्हणूनच या राशीच्या माणसांना घशाचे विकार, सर्दी, कफ, घसा बसणे, टॉन्सिल्स यासारखे आजार होऊ शकतात.
तर मित्रांनो, ही झाली वृषभ राशीची छोटीशी ओळख. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.
परत भेटूया, उद्याच्या भागात तोपर्यंत प्रेम असू द्या.
पुढची राशी: मिथुन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा