नमस्कार मंडळी,
Astro with सर्वेशच्या नव्या भागात तुम्हा सर्वांचे स्वागत.
कसे आहात सगळे? मजेत ना? आपली ही सिरीज तुम्हाला आवडते की नाही? तसे म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया, संदेश मला मिळत आहेतच.
आपल्या चार राशी पूर्ण झाल्या आहेत. आजचा आपला हा भाग राशीचक्रातील पाचव्या राशीवर, म्हणजेच सिंह राशीवर आहे.
तर भाग सुरू करण्यापूर्वी आपण आधी लघुकथेकडे वळूया.
सिंह राशीचा अरुण आंघोळ करून बाहेर आला. आज त्याची खूप मोठी मीटिंग होती. आजच्या मीटिंगसाठी त्याने गेले आठ दिवस भरपूर तयारी आणि अभ्यास केला होता. जाण्याच्या तयारीत असतानाच त्याने बघितले की, बेडवर त्याचा पिवळा शर्ट इस्त्री करून ठेवला आहे. ते बघताच तो चिडला.
"अनघा... अनघा, इकडे ये."
त्याचा चिडलेला आवाज ऐकून त्याची कर्क राशीची बायको धावत आत आली.
"अहो, काय झाले?"
"हा शर्ट इस्त्री का करून ठेवला आहे?"
"अहो, आज सकाळी तुमची मोठी डील आहे ना?"
"मग?"
"तुमचे काम झटपट व्हावे म्हणून मी इस्त्री करून ठेवला."
"तुला हा शर्ट इस्त्री करायला सांगितला तरी कोणी? डील माझी आहे ना? मी मीटिंगमध्ये जाताना काय घालायचे ते आता तू ठरवणार?"
"अहो, माझ्या मनात तसा विचारही नव्हता. मी फक्त मदत करत होते."
"हे बघ, तुला हजार वेळा सांगितले आहे, मला असले नाटकी प्रकार आवडत नाहीत. आता इथे वेळ घालवू नको. लवकर नाश्ता तयार कर. आधीच उशीर झाला आहे."

त्याचा आदेश ऐकताच ती धावत नाश्ता तयार करायला गेली.
अरुण तयारी करून बाहेर आला. तो नाश्ता करत असताना त्याच्या बायकोने म्हटले,
"अहो, तुमचा हा शर्ट खूपच सुंदर दिसत आहे. कुठे घेतला तुम्ही हा शर्ट?"
ऐकताच इतका वेळ रागाने तांडव करणारा अरुण अचानक शांत झाला.
"हो ना, अगं, मी परवा दिल्लीला गेलो होतो ना, तेव्हा आणला आहे. खूप छान वाटतो ना?"
"खरंच सुंदर आहे."
"चल, मी निघतो आणि तू पण लवकर नाश्ता करून घे. दिवसभर काम करत बसू नकोस. थोडा आराम कर."

तर ही लघुकथा वाचून तुम्हाला सिंह राशीचा थोडाफार तरी अंदाज आलाच असेल.
सिंह रास.
नावाप्रमाणेच एकदम सिंहासारखी! सिंह म्हणजे जंगलाचा राजा. या राशीचे लोक राजासारखे दिमाखदार, आत्मविश्वासी आणि अधिकारप्रिय असतात. ते नैसर्गिक नेते असतात. कुठलाही धाडसी निर्णय घेण्यासाठी ते मागेपुढे पाहत नाहीत. लोकांचा आदर आणि प्रशंसा मिळवणे त्यांना आवडते.

ही एक स्थिर रास आहे. दुसरे म्हणजे एक पुरुष रास आहे. या राशीचे तत्व अग्नी, चिन्ह सिंह, आणि राशीचा स्वामी रवी, म्हणजेच सूर्य आहे.
असे गुण असताना या राशीत नाजूकता, सोज्वळता, सौम्यपणा वगैरे सापडण्याची शक्यता आहे का?
असे गुण असताना या राशीत नाजूकता, सोज्वळता, सौम्यपणा वगैरे सापडण्याची शक्यता आहे का?
सिंह रास ही “स्थिर रास” असल्यामुळे त्यांच्या विचारात, भावनेत आणि कृतींमध्ये एक स्थैर्य, सातत्य आणि ठामपणा असतो. अगदी नाकासमोर चालणारी आणि सगळ्या गोष्टी नियम व कायदा पाळून करणारी ही माणसे.
हे लोक कुठलेही काम करताना त्या कामाचा आधी पूर्ण अभ्यास करतात, ती गोष्ट व्यवस्थित समजून घेतात, तिची योग्य आखणी करतात आणि मगच ती गोष्ट करायला जातात. यामुळे त्यांना त्यांच्या कामात यश मिळते.
ही एक पुरुष रास असल्यामुळे, सिंह राशीचे लोक विचारांपेक्षा कृतीत जास्त विश्वास ठेवतात. ते “करून दाखवणारच” या वृत्तीचे असतात. कुठल्याही गोष्टीत स्वतः पुढाकार घेऊन नेतृत्व करणे, मार्गदर्शन करणे या गोष्टी या राशीच्या लोकांना आवडतात.
हे लोक दुसऱ्यांच्या यशाचा आणि आनंदाचा विचार करतात. कुटुंबातील व्यक्तींनी जर यांना मान दिला, तर हे आपल्या कुटुंबाप्रती अतिशय प्रेमळ आणि उदार मनाचे असतात. आपल्या प्रिय व्यक्तींसाठी ते भक्कम ढाल बनतात. पण त्यांच्या ह्या चांगल्या स्वभावाचा जर कोणी बाहेरची अथवा कुटुंबातील व्यक्ती गैरफायदा करून घेत आहे असे जर त्यांना वाटले, तर त्यांच्यासारखा क्रोधी माणूस दुसरा कोणी नसतो.
सिंह राशीचे तत्व अग्नी असल्यामुळे या राशीचे लोक उत्साही आणि ऊर्जावान स्वभावाचे असतात. ते नेहमीच जोशात असतात. हे लोक जिथे जातात तिथे लोकांचे लक्ष आपोआप त्यांच्याकडे खेचले जाते. ते आयुष्यात मोठी उद्दिष्टे ठेवतात आणि ती गाठण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतात.
यांना आपल्या कामात कोणाची लुडबूड आवडत नाही, पण त्यांना कोणाचाही सल्ला घेणे आवडते.
सिंह राशीच्या लोकांना खोटी माणसे आवडत नाहीत. खोट्या माणसांपासून हे लोक दूरच राहतात, उलट कधी कधी त्यांना धडा सुद्धा शिकवतात.
जी माणसे त्यांना मदत करतात किंवा त्यांच्या पाठीशी असतात, सिंह राशीची माणसे त्या माणसांच्या अडीअडचणींत प्राधान्य देऊन मदत करतात. समाजहिताच्या गोष्टींसाठी हे लोक नेहमीच पुढे असतात.
यांनी जर कोणाला वचन दिले, तर हे लोक ते शंभर टक्के पाळतात.
सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींमध्ये सूर्याचे गुण स्पष्ट दिसतात. हे लोक अत्यंत तेजस्वी आणि प्रतिभावंत असतात. यांची इच्छाशक्ती खूप प्रबळ असते, यामुळे हे लोक यशाच्या दिशेने आगेकूच करताना दिसतात.
आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी हे कसलेही बलिदान देतात. परिश्रम करून आपले ध्येय गाठण्याची क्षमता या सिंह राशीच्या लोकांकडे असते.
सिंह राशीचे लोक कलेपेक्षा क्रीडा क्षेत्र गाजवताना जास्त दिसतात.
पुढचा गुण सांगण्याआधी मी तुम्हाला एक किस्सा सांगतो.
एका सिंह राशीच्या पुरुषाचे नवीनच लग्न झाले होते. त्याची बायको वृश्चिक राशीची. तो बेडरूममध्ये बसलेला असतो. त्याची बायको पाठीमागून येते आणि त्याच्या मानेवर हळुवार आपली हनुवटी फिरवते आणि लाडात म्हणते,
"हे काय, तुमचे माझ्याकडे लक्षच नाही. चला, मी तुमच्याशी कट्टीच करते."
"ए गप बस! काय चालवलं आहे हे? हे असले नखरे माझ्यासमोर करायचे नाही, हं!"
"हे काय, तुमचे माझ्याकडे लक्षच नाही. चला, मी तुमच्याशी कट्टीच करते."
"ए गप बस! काय चालवलं आहे हे? हे असले नखरे माझ्यासमोर करायचे नाही, हं!"
तर हा सिंह राशीचा आणखी एक गुण, यांना रोमान्स वगैरे कळत नाही. त्यांना कृत्रिमपणा मुळीच आवडत नाही.
हे झाले सिंह राशीचे चांगले गुण, आता या राशीतील थोडेफार दुर्गुण पाहू.
हे लोक त्यांच्या “हो ला हो” करणाऱ्या कोणावरही लगेच प्रभावित होतात आणि मागचा पुढचा विचार न करता आपले सगळे काढून त्या माणसाला देतात.
त्यांच्या पुढे पुढे करणारे लोक यांना फार आवडतात, पण यांचे जर कोणी ऐकले नाही तर यांचा मूड लगेच बिघडतो.
यांना शांत स्वभावाचे आणि गोड बोलणारे लोक आवडतात. त्या लोकांना हे सहज वश होतात.
त्यांच्या पुढे पुढे करणारे लोक यांना फार आवडतात, पण यांचे जर कोणी ऐकले नाही तर यांचा मूड लगेच बिघडतो.
यांना शांत स्वभावाचे आणि गोड बोलणारे लोक आवडतात. त्या लोकांना हे सहज वश होतात.
कधीकधी आपल्या अहंकार आणि अधिपत्य गाजवण्याच्या प्रवृत्तीमुळे ते वेगळे पडतात.
जेव्हा सूर्यग्रह अशुभ होतो, तेव्हा हे खोटा मोठेपणा मिरवतात. वेळप्रसंगी कर्ज काढून सुद्धा मोठेपणा दाखवतात. त्यांच्या अशा सवयीमुळे कधी कधी त्यांचे सगे-सोयरे सुद्धा दूर जाऊ शकतात.
आपल्या कर्मठ स्वभावामुळे हे लोक कधीही कोणापुढे नमत नाहीत.
सिंह राशीच्या व्यक्तीने आपल्या राशीच्या व्यक्तीशी कधीही लग्न करू नये. दोघांचाही स्वभाव सारखाच असल्याने कोणीच कमीपणा घ्यायला तयार नसतो, त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन कमी सुखी असते. जसे आपण कथेत पाहिले, लहान लहान कारणांवरून आपल्या पत्नीशी ते वाद घालतात.
चाळीशी ओलांडली की हे लोक नेहमीच आजारी असतात. यांना हृदयविकार, पाठीच्या कण्याला इजा, पित्तविकार, डोळ्यांचे आजार असे त्रास होतात.
सिंह राशीच्या व्यक्ती फार लोकप्रिय होत नाहीत. कारण दुसऱ्याचे गोड बोलून खोटे सांत्वन करण्यापेक्षा, हिताच्या चार गोष्टी परखडपणे सांगून त्यांचे डोळे उघडण्याकडे यांचा कल असतो. हेतू शुद्ध पण पद्धत रुक्ष. सिंह राशीच्या तेजस्वी व्यक्तीला बोटचेपेपणा, खुशामत करणे, वशिलेबाजी, खोटे बोलणे, आपली पत विसरून खालच्या पातळीवर येऊन बसणे मुळीच जमत नाही.
"मोडेन पण वाकणार नाही" हा त्यांचा बाणा असणारी सिंह रास रुक्ष वाटली तरी हानिकारक मुळीच नाही.
"मोडेन पण वाकणार नाही" हा त्यांचा बाणा असणारी सिंह रास रुक्ष वाटली तरी हानिकारक मुळीच नाही.
अशी ही सिंह राशी.
तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते जरूर कळवा.
पुढील रास: कन्या
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा