नमस्कार मंडळी,
Astro with सर्वेशच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत.
आजची आपली रास आहे, राशीचक्रातली सहावी रास, अर्थातच कन्या.
आजचा भाग सुरू करण्याआधी आपण कन्या राशीच्या चिन्हाचे जरासे विश्लेषण करूया.
या राशीचे चिन्हच राशीच्या स्वभावाबद्दल खूप काही सांगते.
‘कन्या’ हे चिन्ह शुद्ध, निर्मळ आणि व्यवस्थित राहणाऱ्या स्वभावाचे प्रतीक आहे. चित्रात एक मुलगी हातात धान्याचे कणीस धरलेली दाखवली जाते, हे मेहनत आणि सतत काहीतरी करत राहण्याचा स्वभाव दर्शविते.
‘कन्या’ हे चिन्ह शुद्ध, निर्मळ आणि व्यवस्थित राहणाऱ्या स्वभावाचे प्रतीक आहे. चित्रात एक मुलगी हातात धान्याचे कणीस धरलेली दाखवली जाते, हे मेहनत आणि सतत काहीतरी करत राहण्याचा स्वभाव दर्शविते.
या राशीबद्दल आणखी जाणून घेण्याआधी आपण नेहमीप्रमाणे एक लघुकथा वाचूया.
रात्रीचे आठ वाजले होते.
सागर ऑफिसमधून घरी आला. घरात एकदम शांतता होती. तो घरी आल्यावर नेहमी त्याचे टिफिन नेऊन स्वयंपाक घरात ठेवायला येणारी त्याची कन्या राशीची बायको, म्हणजे मृणाल त्याला दिसली नाही, म्हणून तो आश्चर्यचकित झाला. तो सरळ बेडरूम मध्ये गेला.
पाहतो तर काय मृणाल पलंगावर बसलेली होती, तिच्या हातात पाण्याचा ग्लास होता, चेहरा फिकट पडला होता.
“मृणाल, काय झाले? तब्येत बरी नाही का?”
सागरने तिच्यापाशी बसून तिची विचारपूस केली.
“सागर… मला वाटते मला काहीतरी गंभीर झाले आहे…”
सागरने तिच्यापाशी बसून तिची विचारपूस केली.
“सागर… मला वाटते मला काहीतरी गंभीर झाले आहे…”
सागर जरासा घाबरला.
“अगं काय बोलतेस तू? काय झाले आहे?”
“आज मी वर्तमानपत्रात एका रोगाबद्दल वाचले
त्याची सुरुवातीची जी लक्षणे आहेत ना, ती लक्षणे गेल्या काही दिवसांपासून मला माझ्यात दिसत आहेत. मी तुला सांगत होते, आठवते का तुला? मला तोच रोग झाला आहे सागर." मृणालने थरथरत्या आवाजात सांगितले
त्याची सुरुवातीची जी लक्षणे आहेत ना, ती लक्षणे गेल्या काही दिवसांपासून मला माझ्यात दिसत आहेत. मी तुला सांगत होते, आठवते का तुला? मला तोच रोग झाला आहे सागर." मृणालने थरथरत्या आवाजात सांगितले
यावर सागर मनातल्या मनात हसला. त्याला त्याच्या बायकोचा स्वभाव माहित होता. त्याची बायको एक चांगली गृहिणी होती, घर सुंदररित्या सांभाळत होती. पण अति विचार करत होती, प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करण्याचा तिचा स्वभाव होता.
तो तिच्यासमोर बसला, त्याने तिचा हात हातात घेतला.
“ मृणाल, फक्त बातम्या वाचून निर्णय घेऊ नकोस. तुला काहीही झालेले नाही. पाहिजे तर आपण उद्या डॉक्टर कडे जाऊ."
तर असा असतो कन्या राशीचा स्वभाव.
कन्या राशीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही रास चिकिस्तक आणि अभ्यासू वृत्तीची असते. या राशीचे लोक प्रत्येक गोष्टीचे सूक्ष्म निरीक्षण करतात. एखाद्या विषयाचा खोलात जाऊन माहिती घेण्याचा त्यांचा स्वभाव असतो. यांचे सतत कोणत्या ना कोणत्या विषयाचा अभ्यास करणे सुरूच असते.
म्हणजे सांगायचे झाले तर, वर्तमानपत्रे, पुस्तके, इंटरनेट इ. जिथून माहिती मिळवता येईल, तिथून हे लोक जास्तीत जास्त माहिती मिळवतात.
यावर एक किस्सा सांगतो.
संध्या नावाची मुलगी परवा कांतारा चित्रपट पाहून आली. त्यात एक गुलिगा म्हणून देव दाखवला आहे. तर आपली कन्या राशीची संध्या गेले दोन दिवस गुलिगा देवावर पीएचडीच करत आहे. युट्युब म्हणा, विकिपीडिया म्हणा, सगळीकडे गुलीगाच गुलीगा दिसत आहे. गुगलची सर्च हिस्ट्री तर गुलीगा देवाने भरुन गेली आहे.
तरीही लोक असे असतात.
या राशीतले लोक जबाबदारीने, नियोजनपूर्वक आणि शिस्तबद्ध वागतात. भावनेपेक्षा वास्तवावर जास्त विश्वास ठेवतात.
या राशीचा स्वामी आहे बुध ग्रह. जो अतिशय बुद्धिमान व्यवहारी कुशल मानला जातो. यामुळे या राशीच्या लोकांची बौद्धिक क्षमता खूपच उत्तम असते. यांची स्मरणशक्ती खूप तल्लख असते. ही मंडळी दुसऱ्यांना सल्ला देण्यास कधीही चूक करत नाहीत. यामुळे यांच्याकडून सल्ला घेणाऱ्यांना नेहमीच फायदा आणि लाभ होतो. हे लोक एकदम तर्कशुद्ध असतात.
या राशीचे लोक अत्यंत व्यवहारी असतात. तोलमोल करण्यात तर अतिशय हुशार. बाजारातली कुठलीच गोष्ट MRPवर हे लोक कधी आणणार नाहीत. त्यांना काटकसर करायला खूप आवडते. तसेच खर्चापेक्षा गुंतवणूक करण्याकडे यांचा जास्त कल असतो, पण असे असूनही यांना भविष्यापेक्षा वर्तमानात जगायला फार आवडते.
कन्या रास ही एक स्त्री राशी असल्याने या राशीत स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि सौंदर्याची आवड दिसते.
यांना स्वयंपाक करायला फार आवडतो. घरातल्या मंडळींना वेगवेगळे पदार्थ करून खायला देणे वगैरे गोष्टी हे लोक मनापासून करतात.
लोकांशी संबंध निर्माण करणे आणि ते व्यवस्थित सांभाळणे या लोकांना खूप सुंदररित्या जमते.
घरात आलेले पाहुणे, मित्रमंडळी, नातेवाईक यांची काळजी घेणे वगैरे हे लोक मन लावून करतात.
या राशीच्या घरात तुम्हाला कधीच केर-कचरा. अस्थावस्त पडलेल्या वस्तू वगैरे दिसणार नाहीत. नीटनेटके, स्वच्छता, व्यवस्थितपणा हा त्यांचा एक खूपच चांगला गुण आहे. त्यामुळे यांचे घर अत्यंत सुशोभीत, सुंदर आणि साफ असते. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये स्वच्छता ठेवायला फार आवडते
यांना घराची आणि कुटुंबाचे जबाबदारी घ्यायला आवडते.
एक ही पृथ्वी तत्वाची राशी आहे.
या राशीच्या व्यक्ती पटकन कोणावरही विश्वास ठेवत नाहीत.
याचे एक उदाहरण देतो.
सुषमाचा वाढदिवस होता. तिच्या नवऱ्याने तिला सरप्राईज देण्यासाठी एक बॉक्समध्ये एका डिलिव्हरी बॉयकडून केक पाठवला.
डिलिव्हरी बॉयने सांगितले की " हा केक एक तुमच्या नवऱ्याने पाठवला आहे."
पण सुषमाने तो केक घेतला नाही, उलट तो बॉक्स वरून खाली पर्यंत दहा-पंधरा मिनिटे तपासून पाहिला.
कारण तिने सकाळीच टिव्हीवर पाहिले होते की, एका बॉक्समध्ये बॉम्ब होता.
या राशीतले लोक स्वतःबद्दल आणि कामाबद्दल अत्यंत काटेकोर असतात. डॉक्युमेंटेशन वगैरे कामे ही मंडळी उत्तम करतात. त्यामुळे ऑफिसमध्ये ही मंडळी सर्वांनाच प्रिय असतात.
काही कागदपत्रे वगैरे तपासून चुका शोधण्यात ही मंडळी फार पटाईत असते. यांच्या नजरेतून खूपच कमी वेळ चुका सुटतात.
यांना प्रूफ रीडिंगचे वगैरे काम दिले, तर पुस्तकात एकही चूक राहणार नाही.
या झाल्या या राशीच्या चांगल्या बाजू. आता पाहूया यांचे काही दुर्गुण.
ही राशी वर्तमानात जगणारी असल्याने भविष्यकाळातील नियोजन करायला कमी पडते.
यांचा आणखी एक दुर्गुण म्हणजे, हे लोक सतत कुठल्या ना कुठल्या विचारात गुंतलेले असतात, त्याचा यांच्या मनावर परिणाम होतो. प्रत्येक गोष्टीचा हे लोक नकारात्मक विचार करतात आणि त्याच नकारात्मक विचारांचा प्रभाव यांना मानसिक त्रास देण्यास पुरेसा ठरतो.
जास्त विचार करण्याच्या स्वभावामुळे, एखादा निर्णय घेताना ही व्यक्ती चुकीचा निर्णय घेते आणि स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेते.
यांच्या अभ्यास करण्याच्या वृत्तीमुळे कधी कधी यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो, म्हणजे जसे पहिल्या कथेत सांगितले आहे तसे, जर यांनी कुठेतरी एखाद्या आजाराची किंवा रोगाची माहिती वाचली आणि काही दिवसांनी यांना तीच लक्षणे आपल्या दिसू लागली तर यांना उगाच भीती वाटायला लागते की आपल्याला पण तो रोग झाला की काय?
यांना टीका करण्याची सवय असते. स्वतःबद्दल आणि इतरांबद्दलही हे लोक खूपच काटेकोर असतात. त्यामुळे लहानसहान चुका सुद्धा लगेच लक्षात येतात आणि ते टीका करतात. या टीकेमुळे काही लोक दुखावले जाऊ शकतात.
प्रत्येक गोष्ट ठराविक पद्धतीने व्हावी असे वाटते, त्यामुळे अचानक बदल किंवा अनपेक्षित गोष्टी यांना सहन होत नाहीत.
हे झाले यांचे काही दुर्गुण.
वृषभ राशीबरोबर यांचे नाते मैत्रीपूर्ण असते.
तर ही झाली कन्या राशीची माहिती.
तुम्हाला हा भाग कसा वाटला ते जरूर कळवा.
पुढची रास: तुळ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा