नमस्कार मंडळी.
Astro with सर्वेश च्या आजच्या भागात सर्वांचे स्वागत.
मंडळी, या सदराला तुम्हा सर्वांचा खूप उत्तम प्रतिसाद लाभत आहे, त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.
तर सुरू करूया आजच्या भागाला. आजची आपली राशी आहे तुळ राशी.
तुम्हाला सर्वांनाच तूळ राशीचे चिन्ह काय आहे ते माहित आहे. अर्थातच तराजू. तराजू म्हणजे समतोल, संतुलन आणि न्याय. या सर्व गोष्टी तुळ राशीच्या लोकांना बरोबर जुळतात. तूळ राशीचे लोक प्रत्येक गोष्ट तोलून पाहतात, कोण बरोबर, कोण चूक, हे ठरवताना ते नेहमीच निष्पक्ष असतात.
आजचा भाग सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे लघुकथा वाचूया.
दुपारची वेळ होती. स्वयंपाकघरात गडबड सुरू होती. आज मोठ्या थाटामाटात पाहुण्यांसाठी जेवण करायचे होते. सासूबाईंच्या हाताखाली दोन सुना स्वयंपाक करायला गुंतल्या होत्या.
मोठी सून, मनीषा आणि धाकटी सून कविता, जी नुकतीच लग्न करून घरात आली होती.
कविता म्हणजेच तूळ राशीची, अगदी शांत.
कविता म्हणजेच तूळ राशीची, अगदी शांत.
भाजीचा सुगंध दरवळत असतानाच अचानक सासूबाई ओरडल्या,
“हे काय? भाजी इतकी खारट का केली आहेस? पाहुणे काय म्हणतील आता?” तिने चिमटीभर भाजी चाखत असताना म्हटले.
“हे काय? भाजी इतकी खारट का केली आहेस? पाहुणे काय म्हणतील आता?” तिने चिमटीभर भाजी चाखत असताना म्हटले.
" काय भाजी खारट झाली आहे?" मोठ्या सुनेने म्हणजेच मनीषाने जरा घाबरलेल्या आवाजातच विचारले.
" हो, कोणी घातले होते मीठ?" सासूबाईंनी मोठ्या आवाजात विचारले.
" मीच सासूबाई." मनीषाने उत्तर दिले
मनीषाला वाईट वाटले , कारण तिला वाटले तिच्याकडून चुकून मीठ जास्त पडले असावे.
पण खरी चूक तिची नव्हती, भाजीत मीठ घातले आहे हे कविताला माहीत नव्हते. म्हणून तिने चुकून आणखी मीठ घातले होते.
कविता क्षणभर घाबरली, पण पुढच्याच क्षणी शांतपणे सासूबाईंना म्हणाली,
“आई, ही माझी चूक आहे. मनीषाचा काहीही दोष नाही. मला वाटते मनीच्याने मीठ घातलेले असताना चुकून मी पण मीठ घातले.”
“आई, ही माझी चूक आहे. मनीषाचा काहीही दोष नाही. मला वाटते मनीच्याने मीठ घातलेले असताना चुकून मी पण मीठ घातले.”
सासूबाईंच्या चेहऱ्यावर जरासे आश्चर्याचे भाव आले. त्या म्हणाल्या,
“ काय भाजीत दोन वेळा मीठ घातले?"
“ काय भाजीत दोन वेळा मीठ घातले?"
कविता नम्रपणे म्हणाली,
“आई, चुकती चुकत असते उगाच आपल्यामुळे दुसऱ्या कुणावर अन्याय होऊ नये असे मला वाटते.”
सासूबाई काही क्षण गप्प राहिल्या. मग हसत म्हणाल्या,
“गुणाची माझी सुन, चूक कबूल करणे एवढे सोपे नसते, पण तू केलेस, आता आपण लगेच दुसरी भाजी करु.”
“गुणाची माझी सुन, चूक कबूल करणे एवढे सोपे नसते, पण तू केलेस, आता आपण लगेच दुसरी भाजी करु.”
तर हा आहे तूळ राशीचा मूळ स्वभाव. या राशीला समतोल आणि ऊर्जावान राशी समजली जाते.
या राशीतील व्यक्तींना न्याय बुद्धीचे लोक समजले जातात, कारण हे लोक कोणावरही अन्याय व्हायला देत नाहीत. म्हणजे आपल्यावर सुद्धा अन्याय करून घेणार नाहीत आणि स्वतः दुसऱ्यावर करणार नाहीत. हे लोक नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहतात. वादविवाद झाल्यास हे लोक नेहमी दोन्ही बाजू ऐकतात आणि शांतपणे निर्णय घेतात. “कोण बरोबर, कोण चूक?” हे समजून घेण्याची त्यांची खास पद्धत असते.
तूळ राशीचे लोक अतिशय संयमी असतात.
या राशीचा स्वामी आहे शुक्र आहे, जो कला आणि सौंदर्य यांचा स्वामी आहे. शुक्र ग्रहामुळे त्यांना सुंदर वस्तू, सजावट, संगीत, कला, आणि नीटनेटकेपणा आवडतो. कपडे असोत, घर असो किंवा बोलण्याची शैली, यांचे सौंदर्य सर्वत्र दिसते. या राशीचे पुरुष असो किंवा स्त्री, ते सुंदर, आकर्षक असतात. त्यांच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर प्रसन्नता असते.
हे लोक लहानपणापासूनच अभ्यासाबरोबर कलेचेही शिक्षण घेत असतात. यांना फक्त प्रोत्साहन देण्याची गरज असते, जर यांना चांगला सपोर्ट मिळाला तर हे लोक कलेच्या क्षेत्रात खूप नाव कमावतात.
या राशीच्या लोकांचे पाय नेहमीच जमिनीवर असतात. हे लोक दुसऱ्याचा आदर करतात. त्यामुळे समाजात आणि मित्रपरिवारात सर्वांशी त्यांचे चांगले संबंध राहतात. त्यांचा आवाज, हावभाव, आणि वागण्याची पद्धत लोकांना आपल्याकडे खेचते. ते प्रेमाने आणि आपुलकीने सर्वांना जिंकतात.
कुठलेही काम करायला तुळ राशीचे लोक नकार देत नाहीत. पडेल ते काम करण्याची यांची तयारी असते. काही कामे हे लोक स्वतः पुढाकार घेऊन करतात.
त्यांच्या व्यक्तिमत्वात टापटिपपणा आणि शिस्त आढळते.
कुटुंबातील कोणताही वादविवाद ही मंडळी अत्यंत सहज पद्धतीने सोडवतात. सामाजिक किंवा कौटुंबिक मंडळी जेव्हा अडचणीत येतात तेव्हा तूळ राशीच्या व्यक्ती त्यांना सोडविण्यास जातात. त्यांना भांडणं, तणाव, आवाज आवडत नाही. ते शांततेने आणि प्रेमाने परिस्थिती हाताळतात. यांना सहवासाची खूप आवड असते.
कुटुंबातील कोणताही वादविवाद ही मंडळी अत्यंत सहज पद्धतीने सोडवतात. सामाजिक किंवा कौटुंबिक मंडळी जेव्हा अडचणीत येतात तेव्हा तूळ राशीच्या व्यक्ती त्यांना सोडविण्यास जातात. त्यांना भांडणं, तणाव, आवाज आवडत नाही. ते शांततेने आणि प्रेमाने परिस्थिती हाताळतात. यांना सहवासाची खूप आवड असते.
हे लोक सामाजिक कार्य, उत्सवामध्ये आवडीने समाविष्ट होतात.
यांना भडकपणा आणि दिखाऊपणा मुळीच आवडत नाही, त्यांच्या साधेपणातच त्यांचे सौंदर्य लपलेले असते.
नवनवीन विषय शिकायला नवनवीन गोष्टी समजून घ्यायला या नेहमीच तयार असतात.
या राशीच्या व्यक्ती व्यावहारिक असतात तसेच मित्रांमध्येही लाडक्या असतात. कोणताही व्यापार उद्योग यांनी जर सुरू केला तर त्यांना यश हमखास मिळतेच.
यांना ऐतिहासिक स्थळांचा प्रवास करणे आवडते. हे एक उत्तम पार्टनर असतात, मग ते वैवाहिक जीवन असो किंवा व्यावसायिक.
तुळ राशीचे लोक साहित्याशी संबंधित असतात. यांना गीत,संगीत, प्रवास इ. गोष्टींचे आवड असणारे लोक जास्त आवडतात.
तुळ राशीचे लोक साहित्याशी संबंधित असतात. यांना गीत,संगीत, प्रवास इ. गोष्टींचे आवड असणारे लोक जास्त आवडतात.
प्रत्येक राशीत जसे चांगले गुण असतात तसे काही वाईट गुणही असतातच.
तराजूसारख्या दोन्ही बाजू तोलताना हे लोक निर्णय घेण्यात काही वेळा खूप उशीर करतात. “हे करावं का ते?” यात ते बरेच वेळ घालवतात.
सर्वांशी गोड वागायचे, कोणाचे मन दुखवायचे नाही, या प्रयत्नात ते कधी कधी स्वतःचे मत हरवतात आणि ‘होकार देणारे’ बनतात.
तूळ राशीचे लोक तणाव टाळण्यासाठी काही वेळा चुकीच्या गोष्टींवरही गप्प राहतात. त्यामुळे इतरांना वाटते की ते दुर्बळ आहेत किंवा भूमिका घेत नाहीत.
त्यांचा स्वभाव प्रेमळ असल्याने ते पटकन भावनिक होतात. इतरांच्या बोलण्याचा किंवा वागण्याचा त्यांच्यावर खोल परिणाम होतो.
विचार करत बसण्यात वेळ जातो, त्यामुळे कृती उशिरा होते. “परफेक्ट करायचे आहे” या विचारात काही गोष्टी अर्धवट राहतात.
उदाहरण द्यायचे झाल्यास, समजा आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आहे, तर तुळची व्यक्ती समुहाच्या कथा पोस्ट करण्याआधी सर्वांचे व्याकरण तपासण्यासाठी बसणार. दुसऱ्यांच्या कथा परफेक्ट करण्याच्या नादात यांच्या स्वतःच्या कथा अर्धवट राहणार.
तूळ राशीचे मिथून राशी बरोबर जास्त जुळते. दोन्ही वायु तत्त्वाच्या राशी आहेत, त्यामुळे विचार, बोलणे आणि सामाजिकता यात त्यांचे उत्तम जुळते. दोन्ही राशीचे लोक हुशार, संवादप्रिय आणि सौम्य स्वभावाचे असतात. ते एकमेकांचे चांगले मित्र, सल्लागार आणि जोडीदार ठरतात.
आरोग्याच्या बाबतीत काही विशिष्ट तक्रारी उद्भवू शकतात. ही रास मूत्रपिंड, मूत्राशय आणि कंबर भागाशी संबंधित असल्याने मूत्रसंस्थेचे आजार, पाणी कमी पिण्यामुळे होणारे त्रास किंवा कंबरदुखी यांची शक्यता जास्त असते. शुक्र ग्रह हार्मोनल प्रणालीवर प्रभाव टाकतो म्हणून हार्मोनल असंतुलन, त्वचेवर पिंपल्स, तेलकटपणा किंवा अॅलर्जी यासारख्या समस्या दिसतात. संतुलन राखण्याच्या प्रयत्नात हे लोक भावनिक ताण अनुभवतात, ज्यामुळे रक्तदाब, निद्रानाश किंवा अपचनही होऊ शकते. योग्य प्रमाणात पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, योग-ध्यान करणं आणि मन शांत ठेवणं या सवयींनी तूळ राशीचे लोक निरोगी आणि प्रसन्न राहू शकतात.
शेवटी या दिवशीच्या लोकांना मी एवढेच सांगेन की,
तुम्ही जिथे जाता तिथे शांतता, प्रेम आणि सौंदर्य पसरवत असता. पण लक्षात ठेवा, सर्वांना खूश ठेवताना स्वतःचे मन विसरू नका. कधी कधी "नाही" म्हणणेही आवश्यक असते. तुमची गोड भाषा, न्यायप्रियता आणि समजूतदारपणा तुम्हाला नेहमी लोकांच्या मनात खास स्थान देतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, मन शांत ठेवा आणि जीवनाचा तोल स्वतःच्या आनंदाच्या दिशेने झुकू द्या.
तर हे झाले तुळ राशी विषयी छोटेसे विश्लेषण.
पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत प्रेम असू द्या
पुढची राशी: वृश्चिक