नमस्कार मंडळी,
आपली आजची रास आहे, राशीचक्रातली नववी रास धनु रास
धनु रास ही राशीचक्रातली नववी रास गुरु हा या राशीचा स्वामी असतो. पुरुष आणि अग्नीतत्वाची रास आहे.
या राशीचे चिन्ह जरा वेगळेच आहे. एक “धनुर्धारी” म्हणजेच एक बाण रोखून धरलेला एक योद्धा, जो अर्धा मनुष्य आणि अर्धा घोडा आहे. हे प्रतीक या राशीच्या लोकांच्या लक्ष्यनिष्ठ, उत्साही आणि साहसी स्वभावाचे द्योतक आहे. अर्धा मनुष्य आणि अर्धा घोडा हे मिश्र स्वरूप बुद्धी आणि प्रवृत्ती यांचा समतोल दर्शवते. मनुष्याचा भाग म्हणजे विचारशीलता आणि ज्ञान, तर घोड्याचा भाग म्हणजे ऊर्जा, साहस आणि गती.
धनु राशीचा स्वामी गुरु आहे. गुरु म्हणजेच बृहस्पति हा ज्ञान, शहाणपण, धर्म आणि नैतिकतेचा कारक ग्रह आहे. त्यामुळे धनु राशीचे लोक विचारवंत, न्यायप्रिय आणि सखोल ज्ञान घेणारे असतात. हे लोक नेहमी नव्या गोष्टी शिकण्याची, प्रवास करण्याची आणि अनुभवातून वाढण्याची इच्छा बाळगतात.
हे लोक मोठ्यातल्या मोठ्या अडचणीतही सकारात्मक विचार करतात. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात नेहमी एक “hopeful energy” जाणवते.
धनु राशीचे लोक जीवनात धर्म, अध्यात्म, नैतिकता आणि तत्त्वज्ञान यांना महत्त्व देतात. गुरुचा प्रभाव असल्याने ते इतरांना शिकवण्यात, मार्गदर्शन करण्यात आणि प्रेरित करण्यात आनंद मानतात. धनु राशीचा स्वभाव अत्यंत उत्साही, स्वतंत्र आणि सकारात्मक असतो.
या राशीचे लोक मोकळ्या विचारांचे, प्रामाणिक आणि थेट बोलणारे असतात. कधी कधी त्यांची स्पष्टवक्तेपणा इतरांना कठोर वाटू शकतो, पण त्यांचा हेतू नेहमी चांगलाच असतो. जीवनात आशावाद आणि विनोदबुद्धी त्यांना पुढे नेते.
या राशीचे लोक आवेशपूर्ण, धाडसी आणि उदार असतात. त्यांना स्वातंत्र्य खूप प्रिय असते, कुणी त्यांना बंधनात ठेवले तर ते अस्वस्थ होतात. समाजात ते मार्गदर्शक, शिक्षक किंवा प्रेरणादायी व्यक्ती म्हणून ओळखले जातात.
हे आशावादी आणि सकारात्मक विचार करणारे असतात. ते प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगले पाहतात. अंधारातही प्रकाश शोधतात.
स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची आणि मुक्त जीवन जगण्याची इच्छा असते.
धनु राशीचा एक चांगला गुण म्हणजे यांना खोटं बोलायला आवडत नाही. ते नेहमीच सत्य बोलतात
इतरांच्या अडचणीत पुढे येतात. दयाळू स्वभावामुळे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. कोणाला काही हवे असल्यास हे मागचा पुढचा विचार न करता त्यांना ती गोष्ट देऊन टाकतात.
कुठलाही कामात यांना जोखीम घ्यायला आवडते. प्रवास, नव्या कल्पना आणि आव्हाने यांचा ते आनंद घेतात.
त्यांचा विनोदबुद्धीमुळे वातावरण हलकंफुलकं होतं. त्यांच्यामुळे समूहात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात असा उत्साह असतो की इतरांनाही ऊर्जा मिळते.
त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात असा उत्साह असतो की इतरांनाही ऊर्जा मिळते.
या राशीचे अधिक गुण जाणून घेण्याआधी आपण एक लघुकथा वाचूया.
योगेश घरी बसला होता. तेव्हा त्याचा मित्र सुहास त्याच्याकडे पैसे मागण्यासाठी आला. सुहासची आई हॉस्पिटलमध्ये होती आणि त्याला पैशांची खूप गरज होती.
" योगेश मला ५० हजार हवे होते. आई हॉस्पिटलमध्ये आहे. प्लीज, मला मदत कर ना."
सुहासची परिस्थिती योगेशला समजत होती
तो या अडचणीतून जात आहे, याची योगेशला दुःख वाटले.
" थांब योगेश, मी आणतो पैसे." असे म्हणत तो आत गेला.
आत त्याची बायको होती. तिने त्याला विचारले,
" तो का आला आहे?"
" त्याची आई आजारी आहे. या क्षणी त्याला पैशांची खूप गरज आहे."
" हा तोच आहे ना, जो परवा विनोद भाऊंना तुमच्याबद्दल वाईट सांगत होता."
तो या अडचणीतून जात आहे, याची योगेशला दुःख वाटले.
" थांब योगेश, मी आणतो पैसे." असे म्हणत तो आत गेला.
आत त्याची बायको होती. तिने त्याला विचारले,
" तो का आला आहे?"
" त्याची आई आजारी आहे. या क्षणी त्याला पैशांची खूप गरज आहे."
" हा तोच आहे ना, जो परवा विनोद भाऊंना तुमच्याबद्दल वाईट सांगत होता."
हे ऐकताच योगेशचा मूड बदलला. तो तर तसाच बाहेर आला.
" सुहास, मी घरात पाहिले. माझ्याकडे सध्या काहीच कॅश नाहीत. सॉरी मित्रा, मी तुला काहीच मदत करू शकत नाही."
हे वाचून तुम्हाला समजले असेल की, धनु राशीचे लोक खूपच मुडी असतात. त्यांचा मूड क्षणाक्षणाला बदलत राहतो.
धनु राशीत जसे चांगले गुण आहेत, तसेच काही दुर्गुणही आहेत.
ते त्यांना जे वाटते ते थेट बोलतात. पण कधी कधी त्यांचा हा स्वभाव इतरांना दुखावू शकतो, कारण ते बोलताना समोरच्याच्या भावना विसरतात.
उदाहरणार्थ: कुणाचे कपडे फाटले असेल किंवा मळलेले असेल, तर हे त्या माणसाला चारचौघातच सांगून टाकतात. ज्यामुळे कदाचित ती व्यक्ती दुखावू शकते.
नव्या गोष्टींची ओढ इतकी असते की एका गोष्टीत फार काळ टिकत नाहीत. सुरुवातीला उत्साही, पण शेवटी कंटाळा येतो.
जसे. यांनी जर एखादा नवा फोन घेतला, तर त्यांना तो पुढच्या सहा महिन्यातच outdated वाटायला लागतो. मग ते लगेच आपला फोन बदलतात.
यांचा स्वतःवर इतका विश्वास असतो, की कधी कधी अहंकार किंवा गर्वाची छटा दिसते. ते मानतात की ते नेहमी बरोबर आहेत.
आपल्या साहसी स्वभावामुळे ते जोखीम घेतात, पण कधी कधी विचार न करता घेतलेले निर्णय त्रासदायक ठरतात.
स्वातंत्र्यप्रिय असल्यामुळे नियम, बंधनं, शिस्त यांना फारसे गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे काही वेळा काम अपूर्ण राहते.
तर्क आणि सत्यावर जास्त भर देताना ते भावनांपासून दूर राहतात, त्यामुळे नात्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात.
स्वतःचे विचार मांडण्यात गुंग होतात, त्यामुळे समोरच्याचं ऐकणे विसरतात.
स्वतःकडून तसेच इतरांकडून हे लोक फार अपेक्षा ठेवतात, त्या पूर्ण न झाल्यास त्यांना निराशा येते.
धनु राशीच्या लोकांना स्नायू आणि मांड्या यांच्याशी संबंधित त्रास होतो. ही राशी शरीराच्या मांड्या, पाय आणि कंबरेचा भाग नियंत्रित करते. त्यामुळे या राशीतील लोकांना मांड्यांमध्ये वेदना, स्नायू दुखणे, गुडघ्याचा त्रास, किंवा चुकून पडून इजा होणे
अशा समस्या होऊ शकतात. गुरु हा “लिव्हर”शी संबंधित ग्रह मानला जातो. त्यामुळे पित्त वाढणे,
लिव्हरमध्ये चरबी साचणे (fatty liver), किंवा अति खाणे-पिणे यामुळे पचनावर परिणाम होणे
या गोष्टींकडे लक्ष द्यावे. हे लोक अति खाणे किंवा बाहेरचे अन्न खाण्याकडे झुकतात. त्यामुळे अपचन, आम्लपित्त, गॅस, आणि पोटफुगी यांसारख्या तक्रारी उद्भवतात.
उत्साही स्वभावामुळे सतत काहीतरी करण्याची सवय असते. पण विश्रांती न घेतल्यास थकवा, ताण, किंवा शरीरदुखी जाणवू शकते. जास्त उत्साह आणि धावपळ यामुळे काही वेळा ब्लड प्रेशर वाढणे किंवा श्वसनाशी संबंधित ताण जाणवू शकतो.
गुरु ग्रहामुळे शरीरावर वजन वाढण्याची प्रवृत्ती असते, विशेषतः वयानुसार. त्यामुळे नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक आहे.
गुरु ग्रहामुळे शरीरावर वजन वाढण्याची प्रवृत्ती असते, विशेषतः वयानुसार. त्यामुळे नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक आहे.
तर ही झाली धनु राशि विषयी काही माहिती.
तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.
पुढचा भाग: मकर