नमस्कार मंडळी,
Astro with 'सर्वेश' च्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत.
सगळ्यात आधी, तुम्ही देत असलेल्या प्रेमासाठी मनापासून आभार. फेसबुक आणि ईरावर तुमचे कॉमेंट, व्हॉट्सॲपवरचे मेसेज, हे सगळे मला लिहायला खूप प्रेरणा देत आहेत. तुमचे हे प्रेम असेच राहू द्या.
सगळ्यात आधी, तुम्ही देत असलेल्या प्रेमासाठी मनापासून आभार. फेसबुक आणि ईरावर तुमचे कॉमेंट, व्हॉट्सॲपवरचे मेसेज, हे सगळे मला लिहायला खूप प्रेरणा देत आहेत. तुमचे हे प्रेम असेच राहू द्या.
आता जास्त वेळ न घेता आजच्या भागाची सुरुवात करूया.
आजची रास आहे राशीचक्रातील तिसरी रास म्हणजेच, मिथुन रास.
एकदा मिथुन राशीच्या चिन्हाकडे बघा, तर तुम्हाला काय दिसते?
चित्रात दोन व्यक्ती आहेत, बरोबर ना?
आता मला सांगा, दोन व्यक्ती एकत्र आल्या तर काय होणार?
“दोन व्यक्ती” म्हणजे दोन बाजू. अर्थातच द्वैत (duality). त्यामुळे दोन विचारधारा, दोन प्रकारचे मूड, दोन भावनात्मक अवस्था. एकाने घेतलेला निर्णय दुसऱ्याला पटेलच असे नाही.

चिन्हामुळेच तुम्हाला समजले असेल की, मिथुन राशीची अवस्था काय असेल.
एका वाक्यात सांगायचे झाल्यास, ‘अस्थिरता आणि चंचलता.’
एका वाक्यात सांगायचे झाल्यास, ‘अस्थिरता आणि चंचलता.’
मिथुन राशीबद्दल अधिक जाणून घेण्याआधी, नेहमीप्रमाणे आपण एक कथा वाचूया. यामुळे आपल्याला मिथुन राशीचा basic स्वभाव कळेल.
मिथुन राशीची कावेरी आज खूप खुश होती. तिला तिच्या कादंबरीसाठी राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले होते. सर्वजण तिचे कौतुक करत होते.
"कावेरी, तुझी कादंबरी वाचली. कसे सुचते गं तुला हे सगळं! आमच्या डोक्यात बाई असे विचार आलेच नसते. ९०० पानांची कादंबरी तू लिहिली तरी कशी? आमच्याकडून बाई शंभर पानेसुद्धा लिहून होत नाहीत."
"काही नाही गं मीना, दिवसभर कुठे काय काम असते? हातात मोबाईल घेतला की पटापट लिहून होते. लिहिलं नाही तर मूड खराब होतो. आता सुद्धा माझ्या दोन कादंबऱ्यांचं लिखाण सुरू आहे."
"बरं आहे बाई तुझं."
तेव्हाच कावेरीची नजर कोपऱ्यात बसलेल्या एका लेखिकेकडे गेली. ती एकटीच बसली होती. दिसायला सोज्वळ आणि चांगल्या घरातली वाटत होती. कावेरी तिच्याजवळ गेली.
"तुम्ही इथे एकट्याच का बसला आहात? तिथे पुढे या ना."
"तुम्ही इथे एकट्याच का बसला आहात? तिथे पुढे या ना."
"नको, मी इथेच ठीक आहे."
"तुम्हाला काही पुरस्कार मिळाला आहे का?"
"हो, मला कवितेसाठी मिळाला आहे आणि तुमचं पण अभिनंदन. कादंबरीसाठी तुम्हाला मिळाला ना?"
तिने अभिनंदन करताच कावेरी खूप खुश झाली. आपल्या स्वभावाप्रमाणे तिने तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.
"मी खूप टेन्शनमध्ये आहे... मला वीस हजारांची मदत हवी होती. तुम्ही देऊ शकता का?" खूप गप्पा झाल्यानंतर त्या बाईंनी कावेरीला विचारले.
"हो देऊ शकते. थांबा हं, माझा मोबाईल घेऊन येते," असं म्हणून कावेरी डिजिटल पेमेंट करण्यासाठी मोबाईल आणायला गेली.
वाटेत तिला तिची मैत्रीण मीना भेटली.
"मीना, ती कोपऱ्यातली बाई ना, माझ्याकडे २० हजार मागते. काय करू गं, देऊ तिला?"
"नको कावेरी, अगं, तू तिला ओळखतसुद्धा नाहीस."
"अगं, ओळखते गं. तिने मला तिच्याबद्दल सगळं काही सांगितलं आहे."
"पण असं काही मिनिटांच्या भेटीत तू कसा विश्वास ठेवू शकतेस एखाद्यावर?"
"तिची परिस्थिती खूपच बिकट वाटते."
"हे बघ, मला माहित आहे शेवटी तू तुझ्या मनाला येईल तेच करणार. तुला जे बरोबर वाटतं ते कर."
कावेरीने तिला पैसे ट्रान्सफर केले. कावेरीचे आभार मानून ती बाई निघून गेली.
दुसऱ्या दिवशी कावेरीने तिला 'गुड मॉर्निंग' मेसेज केला, पण प्रत्युत्तर आलं नाही. तिने फोन करण्याचा प्रयत्न केला, पण नंबर बंद होता.
चार-पाच दिवस कावेरी प्रयत्न करत राहिली, तरी त्या बाईचा काहीच पत्ता लागला नाही. त्यात पती चिडणार म्हणून तिने पोलिसात तक्रारही केली नाही.

तर, असा आहे आपल्या मिथुन राशीच्या माणसांचा स्वभाव. त्यावर आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत.
मिथुन राशीचा स्वामी आहे बुध.
त्यामुळे मिथुनवाले अतिशय बुद्धिमान असतात. कुशाग्र बुद्धिमत्ता हे त्यांना एक वरदानच आहे. एकदम multi-talented! या लोकांची स्मरणशक्तीही खूप तल्लख असते. त्यामुळे बौद्धिक पातळीवर कोणत्याही गोष्टीत यांचा कोणी हात धरू शकत नाही.
मिथुन राशीच्या लेखकांकडे कधीही कथाबीजाची कमतरता नसते. त्यांची कल्पनाशक्ती इतकी तेजस्वी असते की त्यांना एकाच वेळी दहा-दहा, वीस-विस कथा सुचतात.
मिथुन राशीच्या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे, ही माणसं खूपच बोलकी असतात. म्हणजेच टॉकीटिव्ह. ही लोकं जास्त वेळ गप्प राहूच शकत नाहीत. संवादकुशल स्वभावामुळे यांचे मित्रमंडळ खूप मोठे असते.
तिसरी चांगली गोष्ट म्हणजे, हे लोक खूप जिज्ञासू असतात. त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. कुठलीही गोष्ट शिकायला हे लोक मागे राहत नाहीत.
मिथुनवाल्यांची आणखी एक कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे, हे लोक मल्टी-टास्किंग असतात, म्हणजे चार-पाच कामे एकाच वेळी करू शकतात, तीही व्यवस्थित.
उदाहरण द्यायचे झाले तर, आपल्या शिल्पा सुतार मॅडम मिथुन राशीच्या आहेत. त्यांना जर सांगितले की “तीन दीर्घ कथा एका बरोबर लिहा.” तर त्या तुम्हाला तिन्ही कथा सांगितलेल्या वेळेत लिहून देतील, तेही अगदी नीटनेटकेपणाने.
मिथुनवाल्यांची पुढची चांगली गोष्ट म्हणजे समयसूचकता. कोणत्या वेळी कोणते काम करायचे आणि कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे हे त्यांना पक्के माहीत असते, तेही अगदी तर्कशुद्ध पद्धतीने.
मिथुन राशीचे लोक संकटांना घाबरत नाहीत, कारण प्रत्येक संकटावर त्यांच्याकडे तोडगा असतो. थोडा विचार केल्यावर ते मार्ग काढतातच.
या राशीच्या व्यक्ती बौद्धिक क्षमतेमुळे साहित्य, इंजिनिअरिंग, पत्रकारिता या क्षेत्रांत उत्तम कामगिरी करतात. संवादकुशल स्वभावामुळे मार्केटिंग फील्डमध्येही हे यशस्वी होतात.
या राशीच्या स्त्रिया उत्तम गृहिणी असतात. एकदम टापटीप! स्वच्छता, घरगुती जबाबदाऱ्या त्या उत्तम पार पाडतात. प्रकृती नाजूक असल्याने त्यांना शारीरिक श्रम जास्त पेलवत नाहीत, पण सतत कामात राहण्याचा स्वभाव असल्याने संसाराची घडी उत्तम बसवतात.
नोकरी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यात आघाडीवर असतात. महागड्या वस्तू, फर्निचर, शॉपिंग, उंची वस्त्रे यांचा हव्यास नसतो. हिशोबीपणा असल्याने घराचे आर्थिक गणित कोलमडू देत नाहीत. आनंदी, उत्साही, बोलक्या असल्याने कुटुंबातील वातावरण हलके-फुलके आणि प्रसन्न असते. फक्त भावनिक दृष्ट्याने आधार देणे, कोणतीही जबाबदारी अंगावर घेऊन कर्तेपणाने ती एकट्याने पार पाडणे, हे त्यांना जमत नाही.

तर या झाल्या मिथुन राशीच्या चांगल्या गोष्टी.
आता प्रत्येक चांगल्या गोष्टीची दुसरी बाजू असतेच.
आता प्रत्येक चांगल्या गोष्टीची दुसरी बाजू असतेच.
मिथुनवाल्यांचा पहिला दुर्गुण म्हणजे, यांना नेहमी नावीन्य हवे असते. काही गोष्टी त्यांना लगेच outdated वाटतात.
दुसरी गोष्ट म्हणजे, कुठलाही निर्णय घेण्यास हे लोक खूप वेळ लावतात, आणि त्यामुळे कधी कधी त्यांना नुकसान होतं.
उदाहरण :
एका लेखिकेला एखाद्या पब्लिकेशनकडून फोन येतो.
"मॅडम, मला तुमच्या कथांचा एक कथासंग्रह बनवायचा आहे."
तर होकार देण्यासाठी मिथुन लेखिका खूप विचार करणार. ती दररोज एका-एका मैत्रिणीकडून opinion घेणार आणि शेवटी स्वतःला जे पटते तेच करणार.
आणि जेव्हा ती होकार द्यायला जाईल, तेव्हा वेळ गेलेली असेल. त्या प्रकाशकाने दुसऱ्याला ती संधी दिलेली असेल.

अस्थिर स्वभावामुळे हे लोक घेतलेल्या निर्णयावर ठाम राहत नाहीत.
जसे मी सुरुवातीच्या कथेत सांगितलं, तसे समोरच्या व्यक्तीवर हे लोक लगेच विश्वास ठेवतात. कोणीतरी यांना त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे अथवा कामामुळे आकर्षक वाटले की हे लोक लगेच भुलतात. यांच्या मनात काहीच वाईट नसते, पण समोरची व्यक्ती यांचा विश्वासाचा गैरफायदा घेते.
यांचे मन अस्थिर असल्यामुळे सतत चिडचिड होणे स्वाभाविक आहे.
हे लोक गप्पागोष्टींमध्ये खूप वेळ घालवतात आणि त्यामुळे काही कामे अर्धवट राहतात.
यावर एक विनोदी किस्सा सांगतो :
एक मिथुनवाली बाई स्पर्धेसाठी शेवटच्या क्षणी कथा लिहायला बसते. तेव्हाच तिच्या एका मैत्रिणीचा फोन येतो.
"अगं, तुझी कालची कथा वाचली. खूप उत्तम होती."
एक मिथुनवाली बाई स्पर्धेसाठी शेवटच्या क्षणी कथा लिहायला बसते. तेव्हाच तिच्या एका मैत्रिणीचा फोन येतो.
"अगं, तुझी कालची कथा वाचली. खूप उत्तम होती."
तर मिथुन लेखिका नुसते “धन्यवाद” म्हणून थांबणार नाही, तर ती कथा कुठून सुचली, सुरुवात कशी केली, कधी लिहीली, कुठे बसून लिहिली, कोणत्या पेनाने लिहिली, हे सगळे सांगण्यात अर्धा तास घालवणार
आणि त्यात ती जी स्पर्धेसाठी कथा लिहायला बसली होती, ती कथा तिथेच राहणार.
आणि त्यात ती जी स्पर्धेसाठी कथा लिहायला बसली होती, ती कथा तिथेच राहणार.
हे लोक शीघ्रकोपी असतात, म्हणजेच short-tempered. लहानसहान गोष्टींवर लगेच चिडतात, त्यामुळे कधीकधी नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो आणि यांच्या जास्त गप्पा मारण्याच्या स्वभावामुळे कधी कधी वादही निर्माण होऊ शकतात.
मिथुन राशीचं कुंभ राशीवाल्यांशी उत्तम जमते. दोन्ही राशींची विचारधारा आणि तत्वे सारखी असल्याने यांचे चांगले मैत्रीचे नाते तयार होते.
एकूण सांगायचं झालं तर, मिथुन राशीचे लोक खूप चांगले असतात, फक्त त्यांनी आपल्या अस्थिर मनावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.
तर मित्रांनो, या झाल्या मिथुन राशीविषयी basic गोष्टी.
आता भेटू उद्याच्या भागात.
तोपर्यंत, प्रेम असू द्या ?
आता भेटू उद्याच्या भागात.
तोपर्यंत, प्रेम असू द्या ?
पुढचा भाग : कर्क रास
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा