ह्या क्षणी वाटे मला...

Poem


ह्या क्षणी वाटे मला , झोकून दयावे जरा स्वतःला
या धावपळीच्या जगात "स्व" च अस्तित्व शोधण्यासाठी...
फुलू दयावे जरा स्वतःला "स्व" प्रेमाचा मृदगंध दरवळण्यासाठी...


ह्या क्षणी वाटे मला ,स्वप्नांना कवेत घेऊन
पंखांनी माझ्या उंच-उंच उडावे "स्व" क्षितिज पार करण्यासाठी...
माझ्यातल्या "मी" ने ही आकाशा गवसणी घालावी
"स्व" ला या उंचावण्यासाठी...


ह्या क्षणी वाटे मला सूर माझे व्हावे अन् मी सुरांची
"स्व" सूर गवसण्यासाठी...
वाटेवरी त्या नव्या मग मी गायिका व्हावे
"स्व" चेच सुरमय गीत गाण्यासाठी...


ह्या क्षणी वाटे मला मी फुलपाखरू व्हावे                          भिरभिरते होऊन रंगीबेरंगी फुलांवर मुक्त बागडण्यासाठी...      रंगांना त्या न्ह्याहाळून रंगात न्हाहावे "स्व" रंग शोधण्यासाठी...


ह्या क्षणी वाटे मला,लेखणी हाती घ्यावी
"स्व"ला व्यक्त करण्यासाठी...
शब्दा-शब्दांतून त्या "स्व" मांडण्यासाठी...


ह्या क्षणी वाटे मला,स्वतःवर प्रेम करावे                                "स्व"ला उमलवण्यासाठी...                                        आयुष्याच्या हिंदोळ्यावर आनंदाने झुलण्यासाठी...                  ह्या क्षणी वाटे मला!! 


- हर्षदा नंदकुमार पिंपळे