Login

आता रडायच नाही लढायच...१

कथामलिका
रडायच नाही लढायच १

"हे काय निधी आजही तुला घरी येण्यास वेळ झाला आहे.‌ मी काही दिवसांपासून बघतेय तुझ वागणं बदललं आहे."

"मग मी काय करू? माझा घरी नीट अभ्यासच होत नाही. त्यामुळे मी लेक्चर झाल्यानंतर लायब्ररीत जाऊन बसते आणि अभ्यास करते. आई, माझं बारावीच महत्वाचं वर्षं आहे. आता मेहनत घेतली तर पुढच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळेल मला."

"का ? आपलं घर आहे ना अभ्यासासाठी. हल्ली रात्री सुध्दा तू मैत्रिणी कडे अभ्यासाला जाते. आधी विवेक घरी नसायचा आणि आता तू सुध्दा."

"हो खरच. हे आपलं घर आहे का? माझा इथे श्वास कोंडतो. मला माहिती आहे ना आई . दिवसभर घरी काय चाललं असतं. दिवसभरच नाही तर रात्री सुध्दा..."

"निधी..."

"मी आणि तुझे बाबा इतक्या मेहनतीने तुम्हा दोघांना शिकवत आहे. तुमच्यासाठी एवढे कष्ट करत आहे. ते नाही दिसत तुला आणि वर तोंड करून बोलतेस. "

" हो मला माहित आहे ना! किती कष्ट करता तुम्ही. सकाळी बाहेर गेलेला बाप रात्री उशीरा घरी येतो. त्यातही तो दारू ढोसून तुला मारहाण करतो. पैशासाठी नको ते काम करण्यासाठी भाग पाडतो. त्यामुळे आपल्या घरी दिवसा सुद्धा माणसांची ये जा वाढली आहे. तुझ्या सोबत तू माझं सुध्दा आयुष्य पणाला लावत आहेस. "

"काय बोलतेस निधी? मी काय केल?"

"जाऊ दे ना मला या विषयावर तुझ्याशी बोलायच नाही. "

"हे बघ निधी. जे काय बोलायच आहे ते स्पष्टपणे बोल. "

"आई, मला खरंच सांग. तू हे काम का करते? तू कुठे जाते? अशी रात्री अपरात्री उशीरा येते? एवढा पैसा , एवढे खर्च कसे करते? माझ्या बाबांचा पगार तर एवढा नाही. मग.."

"निधी, तू काय बोलत आहे ? हे सगळं तुमच्यासाठीच तर करतो . "

"मग नको ना करू. अगं बाहेर लोक काय काय बोलतात तुला नाही माहिती."

"मला सगळं माहीत आहे. तू कोणत्या लोकांच्या म्हणण्यानुसार बोलत आहे ते. बास करा आता. आता तुझं लग्न करून देण्याची वेळ आली आहे. म्हणजे मी मोकळी."

'का? मी जड झालेय का आता तुला ?"

"अगं तसं नाही. माझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा झालाच आहे. पण तुझ्या आयुष्याशी मी कोणालाही खेळू देणार नाही. "

" हो ना आई. कळत ना ! मग सोड ना हे काम. का करतेस? "

संध्याचा राग अनावर होतो आणि संध्या तिच्या कानफटात मारते. निधी रडायला लागते.

रडत रडत निधी सरळ मागच्या अंगणात निघून जाते.
"आपलं कुटुंब कसं असावं ?आपले आई- बाबा... कसे असावे ? आपलं सुरक्षित ठिकाण म्हणजे आपलं घर असतं आणि हेच घर आज अपवित्र झाले आहे. छी! मला तर नुसत ऐकूनच किळस येत आहे. कधी कधी वाटतं असलं अपमानास्पद आयुष्य जगण्यापेक्षा मृत्यू केव्हाही बरा." निधीच्या डोळ्यातले पाणी थांबतच नव्हते.

विचारांचे चक्र तिच्या डोक्यात चालू होतेच.

"निधी जेवायला ये बर. विवेक सुध्दा आला आहे आणि तुझे बाबा पण येत असलीच."

"आई, मला भुक नाही. मी मैत्रिणी कडे चालली आहे. तिथेच झोपणार आहे. "

"ताई, थोडस जेवून घेऊ आणि सोबतच जाऊ. मी सुध्दा मित्राकडे जाणार आहे."

आपली दोन्ही मुले तिच्या पासून दूर होत चालली होती. हे तिला कळत होते. आज ती अशा वळणावर उभी होती की त्यांचा हा वर्तमान काळ त्यांच्या भविष्यातही पाठ सोडणारा नव्हता. पण संध्या पोटासाठी आणि पैशासाठी ती हे सगळे उद्योग करत होती.

तिने जरा रागातच दोघांना जेवायला दिले. दोघेही शांतपणे जेवण करत होतेच. की संध्याचा नवरा सुभानराव आला.

"ए, सटवे वाढ मला जेवायला."

संध्याने एका आज्ञाधारक बायकोप्रमाणे लगेच ताट वाढले. तो जेवायला बसला आणि नेहमी प्रमाणेच की त्याची किट किट सुरू झाली. आज भाजी पाणचट झाली, तर कधी खारट, तरी कधी तिखट. नेहमीप्रमाणे तो आजही संध्या सोबत भांडू लागला. त्याने संध्याला मारझोड करायला सुरुवात केली. आईला सोडवण्यासाठी निधी आणि विवेक मध्ये पडले. पण त्याच्या शक्ती पुढे ते दोघेही कमजोर पडले. त्याचा तो अवतार बघून ते घाबरले. कारण आज ते दोघेही त्याच्या माराला बळी पडले होते. त्यामुळे ते आतल्या खोलीत गेले आणि अभ्यासाची पुस्तके घेऊन ते आपापल्या मित्र मैत्रिणी कडे निघून गेले. त्यांना आपल्या आईला अशा अवतारात बघणे अस्वस्थ करून जात होते.

"ए तयार हो आणि या पत्त्यावर जा लवकर."

"आज नाही जाणार मी. आज माझी तब्येत बरी नाही. "

"काय म्हणतेस? नाही जाणार. हे एवढे पैसे घेतले आहे. काही कळत का तुला. त्याने तिला जबरदस्तीने तयार व्हायला सांगितले."

खरंतर आज तिचं मन तिला खात होते. आपल्या मुलांसमोर आपली काहीच इज्जत नाही. हे तिला कळून चुकले होते. तिच मन दुखावले गेले होते.
नको नको म्हणत असताना सुद्धा तिला जावेच लागले. मुलांच्या समोर ती कोणतेही वाईट काम करत नाही. असे भासवत असली तरी आता मुलांना कळून चुकले होते. पण त्यामागची कथा आणि व्यथा ती बोलू शकत नव्हती. ती पुरती अडकली होती.

काय असेल तिच्या मनात... मुलं तिला समजून घेईल की नाही.....

🎭 Series Post

View all