अतर्क्य ( भाग ६)
-------------------------------------
मामी जानकीचे हाव भाव पाहता होकार देऊन दुसऱ्या दिवशी अजून एका डॉक्टरकडे जाण्यास होकार देतात. रात्री सर्व काम व सकाळची तयारी करून लवकर झोपतात. जानकिच्या मामांना याची काहीच कल्पना दोन्ही पैकी कोणीच देत नाही. जानकी ने मामींना अट घातली होती तशी. मामी खुप समंजस असल्याने त्या इथल्या कानाच तिथे कळू देत नाहीत. मामींना तर अनेक प्रश्न डोक्यात घोंगावत होते 'कावेरी ला मुल कशी झाली ?, नेमक कोण चुकतय ? डॉक्टर तर हुशार व विश्वासू आहे , मग रिपोर्ट कोणा दुसऱ्याचे तर नाहीत ? का नाव चुकलय रिपोर्ट वर ?' काहीच कळेना म्हणत मामी हुश्श्श करतात. मामांच लक्ष अचानक वळत त्यांच्याकडे आणि मग ते विचारतात "सर्व ठिक आहे ना शारदा ? घरी आल्यापासून तू जरा विचारात असल्या सारखी वाटतेय मला. "
" काही नाही ओ तस ते जानकी च" मामी बोलता बोलता थांबतात दीर्घ श्वास घेतात .
" काय झाल तिला ठिक आहे ना ? का सांगितल नाही मला ? काय बोललेत डॉक्टर?" मामा.
मामी उशीर न करता लगेच उत्तरतात " काळजी च काही नाही ते अजून डॉक्टर संपूर्ण इलाज होई पर्यंत जाऊ नका म्हंटलेत".
" अच्छा! अच्छा ठीक आहे तर आणि हो जानकी ला मुल होत नसल्याच सांग बर डॉक्टर ना. मीच येणार होतो पण रोजच्या व्यापात त्या पोरीकडे लक्ष द्यायच होईना अग " . मामा मामींना बोलतात.
" काळजी नका करू तुम्ही , उद्या जायच आहे परत चेक अप आहे फक्त". एवढ बोलून मामी झोपी जातात.
दुसऱ्या खोलीत जानकी कूस बदलत झोपण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या मनात वारंवार एकच विचार येत होता, एकच प्रश्न तिला सतावत होता. कावेरी च्या मुलांचा बाप कोण ? जानकिला कावेरिच्या चारित्र्यावर संशय येत होता. तिचे मन मात्र हे मानण्यास तयार नव्हते पण पुढ्यात जे होत त्यावरून कोणाताच तर्क लावणे तिला अशक्य वाटत होते. कावेरी चारित्र्यहीन आहे हे ती मानण्यास तयार नव्हती, मग विलासरावांना मुल होत नाही हे जर सत्य आहे मग कोण काय लपवतय ? तिला आठवत ती जेव्हा दवाखान्यात जाण्यास निघत असे तेव्हा विलासराव टाळाटाळ करायचा , तिला डॉक्टरांशी बोलू देत नव्हता. मधेच आठवत शंभूराजे म्हणजे जानकीच्या दिराचे बोलणे कावेरी दवाखान्यात असताना चे " पण मला वाटतय ना की तू पण आई व्हावी" शंभूराजे च हे बोलण जस डोक्यात येत लगेच जानकी शंभू वर संशय घेते. तिला विचार करूनच किळस येतो. तशी ती छी ! छी ! करत उठते . ही वेळ अशी असते की तिने कोणालाही दोषी ठरवता येत नाही. काय तो सोक्ष मोक्ष लावायचाच हे मात्र तिने ठाम निर्णय घेतलेले असते. सकाळापासून तिचे डोके विचारांच्या भोवऱ्यातून तिला बाहेर येवू देत नव्हते. तिचा सर्व ठिकाणी झालेला अपमान , लोकांची टोमणी, दुय्यम स्थान, तिने आजवर पचवलेले दुःख तेही फक्त या कारणासाठी की तिला मुल नाही . नियतीने मांडलेल्या या खेळात ती पूर्ती बुडाली होती. यातून बाहेर पडण्यासाठी आता जे काही करावे लागेल ती तयार होती. स्वतःची मानसिक तयारी तिने केलेली असते.
विलासराव याला मुल होऊ शकत नाही ही रिपोर्ट चुक की बरोबर , बरोबर आहे मग कावेरी ची पोटात वाढणारे मुल कोणाचे ? कावेरी चरित्रहीन तर नाही मग शंभूराजे चे बोलणे त्याचा अर्थ काय ? या सर्व अतर्क्य परिस्थितीची तर्कशुद्ध उत्तर काय असतील ? जानकी ला न्याय मिळेल ना ?
तुम्हाला काय वाटत ? आपल मत नक्कीच कमेंट करा . भेटूया पुढच्या भागात तो पर्यंत तुम्ही वाचत रहा अतर्क्य , शेअर , कमेंट , लाईक विसरू नका.
-----------------------------------------
लेखिका : शगुफ्ता ईनामदार( मुल्ला)
____________________
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा