अतर्क्य ( भाग ११ )
-----------------------------------
कावेरीला विलासराव बेदम मारतो. आपल तोंड बंद करून ठेवायच अस बजावतो. सासू देखील शहरातून आल्यानंतर कावेरीला ऐकवते. कावेरी आता घरात नकोशी झाली होती. कारणही तसच होत विलासरावाच पितळ उघडं पडणार होते. पण कावेरी अजुनही विलासराव बाप बनू शकत नाही या सत्यापासून अज्ञात होती.
शंभू तर घरातून कायमचा जातो. जानकी ही मामीकडून परत येते. कावेरीला जीवे मारण्याचा कट रचला जातो जो अयशस्वी ठरतो. एके रात्री कावेरीच्या खोलीचे दार रात्री कोणीतरी उघडते. कावेरी गाढ झोपी गेली होती. येणारी ती व्यक्ति आत प्रवेश करताच हळूवार पणे पलंगाजवळ येते, अंधारात न दिसणारी ती व्यक्ति तोंडावर रुमाल बांधून आलेली होती. अंधार त्यात तोंडावर रुमाल अश्यात त्या व्यक्तिला ओळखणे फारच कठीण होते. ती व्यक्ति सावकाश पलंगा जवळ येऊन काही कळेल किंवा नाही इतक्यात तोंड दाबते हा कावेरी ला मारण्यास केलेला अजून एक प्रयत्न विलासरावाने रचलेला मात्र या वेळेस प्राण गमावतात ते रमाबाईचे . त्या रात्री जानकी कावेरीला आपल्या सोबत घेऊन झोपलेली होती. रमाबाई ह्या कावेरीच्या खोलीत जाऊन झोपलेल्या असतात त्याही तिला काहीच कल्पना न देता. रमाबाई खोलीत आल्या तेव्हा कावेरी नव्हती ती काही कामात असेल व येईलच झोपण्यास असा विचार करून त्या झोपी जातात. ती रात्र अखेर ची असेल त्यांची असा विचार चुकूनही केला नसावा रमाबाईंनी .
सूर्य उगवतो तो वाड्यावर अंधार घेऊन. विलासराव सकाळी सकाळी पिऊन घरी येतो. खोलीचे दार उघडतो व न पाहताच रडू लागतो कावेरी गेली का गं तुझ्या मुलाकडे ? प्रतिक पोरका झाला की गं . असा हंबरडा फोडलेला ऐकून जानकी व कावेरी दोघी पळत खोली जवळ येतात. पाहतात तर पलंगावर सासू निष्प्राण पडली होती मात्र विलासराव कावेरीच्या नावाने रडत होता. जसे विलासराव जानकी व कावेरी ला समोर पाहतो त्याची बोबडी वळते सर्व नशा एका सेकंदात उतरतो. "कावेरी तू जिवंत हायस ? " म्हणत विलासराव पलंगा जवळ जातो पाहतो तर रमाबाई हे पाहून त्याला धक्का बसतो. वाड्यातून बातमी बाहेर पडते गावातील लोक येतात. घरीच मृत्यू झाल्याने तो नैसर्गिक असावा असा समज गावकऱ्यांना होतो. अंत्यविधी केला जातो. सर्वजण घरी परततात . विलासरावाला कावेरी वर राग असतो. त्याच रागात आईच दुःख बाजूला ठेवून विलासराव १० दिवस सरताच एके रात्री कावेरीला मारण्याचा प्रयत्न करतो. पण हा प्रयत्न देखील अयशस्वी ठरतो. शंभूराजे मुळे कावेरी वाचते. जेव्हा हे विलासरावाला कळते तो शंभू ला घरातून जाण्यास प्रवृत्त करतो. विलासराव जानकीला सोडपत्र देतो कारण तो जानकी वर संशय घेत होता. जानकी ला ही मूल विलासरावाची नसून कोणाची व कशी याचा अंदाज आला होता. यात शंभू तिची बाहेर राहून मदत करतो. कावेरी ही चरित्रहीन नसून पिडीत असल्याचे कळते. या सर्वात रमाबाईचा हात होता का? हे मात्र तिला कळले नाही. यावर तिने भर देखील दिले नाही. कारण जी व्यक्ति आपल्यात नाहीच तिच्या बद्द्ल काय पुरावे शोधावे ? बरं या सर्वाची कल्पना देखील कावेरी ला नव्हती हे खूप मोठे नवलं होते. काही दिवसांनंतर या सर्व घटनांना प्रत्यक्षात कसे आणले गेले याचा सुगाव लागतो. घटस्फोट दिल्याने जानकीचे पुन्हा घरात येण्याची शक्यता शून्य होती. आता कावेरी त्या भल्या मोठ्या वाड्यात एकटी विलास रावासोबत राहात होती. काही काळ लोटला. शंभूने गावाची काहीच खबर घेतली नव्हती या काळात. तो बाहेर गावी गेला होता. मायदेशी परतल्यावर त्याची भेट जानकी सोबत होते. जानकी या दहा वर्षाच्या काळात मामाच्या घरी होती . शिक्षण पुन्हा सुरु करणे तिला जड वाटते म्हणून फक्त १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण होते. मामी होत्याच साथ द्यायला. शहरात आपली एक ओळख निर्माण केलेली जानकी जी शंभूला नेहमीच भावत होती. आज ती त्याच्या समोर उभी होती. ज्या घटना घडल्या त्यात शंभूने भूतकाळात आपल्याला मदत केली याची जाणीव जानकीला होतीच. शंभूनेही पूनर्विवाह चा प्रस्ताव जानकी समोर मांडला. जानकी ने भारतीय परंपरेचा आसरा घेत नकार दिला. शंभूने समजावले फार कारण जी स्त्री कधी आपल्या भावाची बायको झाली नाही, जिला एक सुहासिनीचा मान आपल्या भावाकडून मिळालाच नाही. जिला आता सोडले गेले होते. अशा स्त्री ला आपली बायको बनवण्यात त्यात काही गैर वाटत नव्हते. मामी देखील आपला होकार देतात. जानकी मात्र आपल्या नकारावर ठाम असते. तिला पुन्हा तो त्रासदायक भूतकाळ आठवतो. तिला परत कावेरी ची काळजी वाटू लागते.
-------------------------------
जानकी ने शंभू सोबत आपले संसार थाटावे का? यावर आपल मत काय नक्कीच कळवा.
-----------------------
क्रमश:
°°°°°°°°°°°°°°°°°
लेखिका : सौ . शगुफ्ता ईनामदार - मुल्ला
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा