Login

अतर्क्य ( भाग ५)

अतर्क्य ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. स्त्री जीवनात येणारे चढ उतार यात दर्शविण्याचा प्रयत्न के?

अतर्क्य ( भाग :५) 
--------------------------------
 जानकी ला डॉक्टर तपासतात . सर्व काही नॉर्मल असल्याचे कळते . डॉक्टर जानकी ला अजून अर्धा तास बाहेर थांबण्यास सांगतात . कारण डॉक्टरांना तिला काही प्रश्न विचारून तिला योग्य मार्गदर्शन करायचे असते. डॉक्टर मॅडम जानकीच्या मामा मामीच्या ओळखीच्या असल्याने त्या जानकी ला रिक्वेस्ट करतात . डॉक्टरांना याची कल्पना असते कि जर आता योग्य समुपदेशन नाही झाल्यास जानकी अजून नैराश्यात जाणार . जानकी व  मामी अर्धा पाऊण तास कॅबिन बाहेर बसतात. 
   पेशंट्स झाल्यानंतर डॉ. वृंदा जानकी ला आत बोलावतात. जानकी व तिची मामी कॅबिन मध्ये जातात . 
 " या बसा शारदा ताई ( जानकीची मामी), जानकी बस" डॉ. वृंदा .
जानकी व शारदा मामी बसतात.
" मॅडम, जानकी ला लग्नाच्या इतक्या वर्षात ही मूल नाही. रिपोर्ट काढलेत पण दोष आमच्या मुलीतच आहे. इतक्या वर्षात हा योग आला नाही कि जानकी चा इलाज करावा. सासरच्या लोकांनी विलासरावांच दुसर लग्न लावून दिल तिला झालीत ३ मुल , मग तर नक्कीच दोष आमच्या पोरीचा . त्या लोकांनी हिचा ईलाज देखील केला नाही कि करू दिला नाही " शारदा मामी डॉक्टरांना बोलू लागल्या. 

डॉ. वृंदा :" जानकीला ईलाजाची गरज नाहीए शारदाताई . तुम्ही ईतक्या वर्षापासून येत आहात मग मी काही लपवण्याचा प्रश्न मुळीच  नाही".

जानकी हे ऐकून चकीत होऊन विचारते 
" म्हणजे काय ?"
जानकिच्या मामी देखील चकीत होतात ऐकून. 

" होय , जानकीला गरज नाही इलाजाची कारण ; दोष तिच्यात नाहीच" डॉ. वृंदा बोलतात .

एवढे ऐकताच जानकी व मामीला धक्काच बसतो. जानकी स्तब्ध होऊन एक टक डॉक्टरांकडे पाहते. डोळ्यात पाणी साचते ती तशीच हुंदका गिळते. काय बोलाव तिला कळतच नव्हत. बोलणार तरी काय ? ती बिचारी आजवर वांझोटी म्हणून शिक्का कपाळावर घेऊन फिरणारी तिला भानच उरत नाही काही. तिला दवाखान्यात नेले का जात नाही? का डॉक्टरांशी बोलू देत नाही? इलाजा करिता रिपोर्ट काढल्यावर दोन्ही वेळेस डॉक्टरांकडे विलासराव व त्याची आईच का जात होती या अनेक प्रश्नांची उत्तरे तिला मिळाली.

जानकिची मामी तिला बोलू लागते "जानकी अग मग कावेरी ला कशी बरी झाली मुल ?" 
जानकी निशब्दच बसते फक्त एका हाताने माहिती नसल्याच सांगते ".

डॉ. वृंदा : " पाहा निराश होऊ नका होईल बाळं फक्त इलाज योग्य व्यक्तीचा करावा लागेल ".
 " जानकी ! विलास येथे येऊ शकतो का?" 

जानकी नकारार्थी मान हलवते. 

" बरं , तरी होईल सर्व नीट ४-६ महिन्याचा वेळ लागेल आजापासून इलाज केला तर" डॉ. वृंदा .
 जानकी काहीच बोलत नाही. मामी जानकी समोर पाण्याचा ग्लास देत " जानकी हे बघ काळजी नको करू अग घे पाणी पी आणि तु बोल आम्हाला काय कराव ते काढू आपण मार्ग". 
   जानकी अगदी हळू आवाजात "ठीक आहे " इतकच म्हणते. पाणी पिऊन जानकी दीर्घ श्वास घेते व डॉ. वृंदा ला विचारते " डॉक्टर मला १० दिवसाचा वेळ मिळेल का?" 
 " हो .. हो का नाही नक्कीच तु विचार कर " डॉ . वृंदा .

जानकी " मग आम्ही निघू शकतो ना मॅडम आता ?" 
 डॉ. हो म्हणताच जानकी टेबल वरील फाईल उचलून मामी सोबत कॅबिन बाहेर येते व लगेच त्या दोघी घराकडे निघतात प्रवासात शांतता होती जानकी काहीच बोलत नाही . जसे ते घरी पोहचतात घरात प्रवेश करताच जानकी धायमोकळून रडते आजवर तिने सहन केलेल्या प्रत्येक प्रसंगांना अश्रू वाटे वाट मोकळी करून जानकी एकदाच रडून घेते. मामी तिला समजावतात थोड्या वेळाने ती शांत होते व बाथरूम मधे जाऊन थंडगार पाण्याने हात पाय तोंड धुते . मामींना देखील तिचे दुःख पाहवेना से झाले होते.
मामींच्या डोक्यात एक प्रश्न घोळत असतो तो म्हणजे ' दोष जर विलासरावात असेल मग , कावेरी ला कसे बरे मुल झाले ?'
 जानकी तोंड हात - पाय धुवून टॉवेलने हात पाय पुसत किचन कडे वळते काहीच न बोलता ती  चहा ठेवते. मामी व जानकी दोघी मिळून वाफाळता चहा घेतात. मग जानकी मामींना बोलते 
 " मामी ही कागद घेवून आपण उद्या दुसऱ्या डॉक्टर कडे एकदा दाखवू ". 
" का बरं? या मॅडम पण खुप हुशार आहेत" , मामी जानकी ला . 
" होय हुशार तर आहे, तरीही एकदा " जानकी .

मामी जानकीचे हाव भाव पाहात हो म्हणतात. दुसऱ्या दिवशी अजून एक डॉक्टर कडे जायचा निर्णय घेतात .

_____________________
क्रमशः 


लेखिका : शगुफ्ता ईनामदार

0