आठवी माळ: देवी महागौरी
“या देवी सर्वभूतेषु ना महागौरीरूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।“
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।“
नवरात्रीच्या आठव्या माळेला दुर्गा अष्टमी असे देखील म्हटले जाते. देवी महागौरी अत्यंत दयाळू आहे. पण, कठोर तपश्चर्या करुन वैभव प्राप्त केले आहे.महागौरीच्या एका हातात त्रिशूळ, दुसर्या हातात डमरु आहे. तिसर्या हातात अभय मुद्रा व चौथ्या वरमुद्रा आहे.
सत्याचा विजय व असत्याचा नाश ही देवी महागौरीची शिकवणूक तंतोतंत पाळत आजच्या जगातील देवीचे प्रतिक म्हणजे पॅरा बॅडमिंटनपटू तुलसीमति मुरुगेसन होय.
कठोर तपश्चर्येची शिडी चढत पॅरालिम्पिक्समध्ये तुलसीमतिने रौप्य पदकाचे सिंहासन मिळविले. व अशी विजयी पताका रोवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
डाव्या हाताच्या अंगठ्यापासून वंचित राहणं हे एकमेव आव्हान नसुन एका अपघाताने देखील चा डाव हात बहुतांशी निकामा केला. पण हार मानेल ती तुलसीमति कशी ना. देवी महागौरीप्रमाणे एका हातात असंख्य अडचणींवर मात करायला त्रिशूळ तर दुसर्या हातात मिळणार्या यशाची जाणीव करून द्यायला डमरु.
“गुरुविण कोण दाखविल वाट” असे म्हणत तुलसीमतिने सायना नेहवाल ला गुरुस्थानी मानले व पुलेला गोपीचंद अकादमीमध्ये एकलव्याप्रमाणे घोर साधनेला सुरुवात केली. अनंत व अचानक उद्भवलेल्या अडचणी व आव्हानांना गुंडाळून यशाच्या हिमशिखरावर आरूढ होऊन बसली.
या युवा पॅराबॅडमिंटन पटूला यशाची अनेक शिखरे पादाक्रांत होण्याची शक्ती मिळो हिच देवी महागौरी चरणी प्रार्थना.
“अष्टमीला देवी महागौरीची पूजा
तुलसीमति रोवो अनेक विजयी पताका.”
प्राजक्ता जोशी सुपेकर
१०|१०|२०२४
तुलसीमति रोवो अनेक विजयी पताका.”
प्राजक्ता जोशी सुपेकर
१०|१०|२०२४
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा