अति रागा भीक मागा – कोणीही अतिराग करू नये, त्याने मनुष्य भिकेला लागतो.
भाग -1
" अजुन किती घेणार आहेस ? बसं कर वाजले बघ किती ?" राधिका विराजला बोलतं असते.
रात्रीचे अकरा वाजलेले असतात, विराज दारू पियत बाल्कनीत बसलेला असतो.
" हे असं दारू पियुन काय होणार आहे ? दारू पिण्याने प्रश्न नाही सुटत. आणि जर सुटत असता तर सगळेच दारू पियत तुझ्यासारखे बसले असते. " राधिका त्याला समजावत असते.
तरीसुद्धा विराज दारूचा घोट घेतंच होता, " मला समजावण्या पेक्षा स्वतः काय करते ते पहा, आणि मग मला बोल. " विराज बोलतो.
राधिका एक उत्तम अभिनेत्री होती आणि विराज सुद्धा अभिनेता होता पण त्याला सक्सेस खुप कमी येतं होता.
राधिका त्याच्या पेक्षा वरचढ होती आणि त्यामुळेच विराज दिवस रात्र पियत होता.
राधिका त्याच्या पेक्षा वरचढ होती आणि त्यामुळेच विराज दिवस रात्र पियत होता.
दोघ ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहत होते, विराज आणि राधिका ने मुंबईत एक फ्लॅट घेतला होता आणि त्यात ते दोघे राहत होते.
" तुला माहित आहे, माझ्या ह्या दारू पिण्याच काय कारण आहे ते ? कदाचित नसेल ही माहित तरी सांगतो तु आहेस, तुझ्यामुळे मि दारू पितोय. " विराज राधिका कडे रागाने पाहतो त्याच्या डोळ्यात राधिका बद्दलचा राग तीव्रतेने दिसत होता.
" माझ्या मुळे ? " विराजच बोलणं राधिकाला खुपत. तिच्या डोळ्यांत पाणी येतं.
" तुझं डोकं ठिकाण्यावर नाही आहे, तुला चढली आहे. बाकी काही नाही!" आणि राधिका चिडून बेडरूम मध्ये निघुन जाते.
सकाळ होते, राधिका मोर्निंग वॉल्क वरून घरी येते. ती फ्रेश होऊन विराज ला पहायला जाते. तर विराज बाल्कनीतच आडवा पडलेला असतो.
त्याला शुद्धचं नसते, ती आजूबाजूला पसरेलला पसारा आवरते आणि ती विराजला उठवते," विराज.... विराज.. "
" अरे उठ वाजले बघ किती..? " राधिका त्याला उठवते.
" अरे उठ वाजले बघ किती..? " राधिका त्याला उठवते.
विराज चं डोकं धरलं होतं, " आई गं आई.. " विराजचं डोकं जाम झालं होतं.
राधिका किचनमध्ये जाते, लिंबू पाणी बनवते आणि विराजला देते, " हे घे लिंबुपाणी, डोकं उतरेल. " आणि त्याला ग्लास पुढ्यात देते.
" नकोय मला.. " विराज बोलतो.
" असं कसं नकोय, घे म्हणजे बरं वाटेल. " आणि ती त्याला जबरदस्ती प्यायला देते..
विराज लिंबू पाणी पियुन, तिथेच पुन्हा पडून राहतो. राधिका आवरा आवर करून शूट साठी निघते.
" मि शूट ला जातेय, तु फ्रेश होऊन मला भेट मि वाट पाहतेय. " राधिका बोलते.
" मि शूट ला जातेय, तु फ्रेश होऊन मला भेट मि वाट पाहतेय. " राधिका बोलते.
" कशाला भेटायचं आहे ? तु शूट ला जातेय ना. मग जा की मला भेटायला कशाला बोलतेस ? " विराज राधिकाला तोडून बोलतो.
" अरे कशाला म्हणजे, तुला काम भेटत आहे मग नको का यायला ? " राधिका बोलते.
" नकोय मला, तु तुझं पाह. " विराज रागाच्या भरात बोलतो.
" का नको ? आता काल तर तु म्हणालास काम नाही टेन्शन मुळे मि दारू पितो. मग आता का नाही म्हणतोयस ? " राधिका त्याला विचारते.
विराज अधिकच भडकतो, " तु मला नको शिकवूस, आणि तुझ्याजीवावर मला काम नको. " आणि विराज तवातवा ने बेडरूम मध्ये जातो आणि धाडकन दार लावतो..
राधिका दारू ची बाटली घेते आणि बेडरूम मध्ये जाते, ती बॉटल त्याच्या समोर आदळत, " मग एक कर, ही बॉटल घे आणि पियत बस कळलं ! नाहीतर तुला येतच काय ? " आणि ती रागारागा ने शूट साठी निघते.
इथे पाठक तिची शूटवर वाट पाहत असतो, पाठक म्हणजे डायरेक्टर. ज्याने राधिकाला शूट साठी नेमल आहे.
राधिका वैतागत आत येते आणि पाठकच्या कॅबिनमध्ये जाऊन बसते.
राधिका वैतागत आत येते आणि पाठकच्या कॅबिनमध्ये जाऊन बसते.
पाठक आत येतो," काय झालं ? इतकी वैतागली का आहेस ? " पाठक तिला विचारतो.
" मग अजुन काय करू सांग ? माझ्या नशिबाला दोष देतेय मि बाकी काही करत नाही.. " आणि ती डोक्याला हात लावून बसते.
पाठक तिच्या जवळ जातो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो, " मला माहित आहे तुझ्या वैतागण्याचं कारण ! विराज मुळे तु आजकाल डिस्टब असते. बरोबर ना ? " पाठक तिला बोलुन दाखवतो.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा