अति तिथे माती भाग 1

अति तिथे माती

अति तिथे माती भाग 1

©️®️शिल्पा सुतार
.........

प्रिया ऑफिसहून येतांना भाजी घेवून घरी आली. अलका ताई फिरायला गेल्या होत्या. घरात तीन माणस होते, ती विवेक आणि सासुबाई अलका ताई. घराला कुलूप होत. तिने आवरल, चहा ठेवला. टीव्ही लावला. पालक निवडायला घेतला.

अलका ताई फिरून आल्या. "प्रिया बर झाल तु लवकर आलीस. मला तुझ्याशी महत्वाच बोलायच आहे. आमच्या सोबत फिरायला येतात त्या संध्याताई त्यांची सून डॉक्टर आहे. मी त्यांना सांगितल तुझी पाळी चुकली ते. आपण उद्या जावू त्यांच्या कडे."

"आई काय आहे हे? तुम्ही घरातल्या गोष्टी बाहेर का सांगता आहात? मुळात तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीकडे इतक लक्ष का देत आहात." प्रिया चिडली.

"घरात बाळ आल तर किती छान होईल. मला खूप आनंद झाला आहे. त्यात काय लाजण्यासारखं. " अलका ताई बोलल्या.

"आई पण मला अस काही वाटत नाही. माझी पाळी रेग्युलर नाही. हे माहिती आहे तुम्हाला. येईल आज उद्या मधे. तुम्ही सगळीकडे जाहिरात नका करत जावू. " प्रिया वैतागली. ती आत आली स्वयंपाकाला लागली.

विवेक आज उशिरा घरी आला. तिघांच जेवण झालं. त्याचा कॉल सुरू होता. मधे दोनदा अलका ताई त्याच्या जवळ जावून बसल्या. त्याने कॉल म्युट केला." आई काही बोलायच का? "

" हो अरे ते प्रिया बरोबर बोलून घे. तिला डॉक्टरांकडे न्याव लागणार आहे ." त्या सांगत होत्या.

"काय झालं प्रियाला? ओह माय गॉड. प्रिया इकडे ये. तुला बर नाही का? सांगायच ना ." तो पॅनीक झाला होता.

"मी ठीक आहे. एकदम परफेक्ट आहे. काय झालं?" प्रिया बाहेर येवून बोलली.

"आई सांगते आहे तुला डॉक्टरकडे घेवून जायला."

तिने डोक्याला हात लावला. ती आत निघून गेली.

" हे अस आहे. माझ कोणी ऐकत नाही." अलका ताई रूम मधे निघून गेल्या. विवेकचा कॉल संपला. तो पर्यंत प्रिया झोपली होती. तो विचार करत होता काय झालं नेमक? सकाळी बोलू.

प्रिया सकाळी स्वयंपाक करत होती. विवेक उठून आला. " काय झालं प्रिया? आई काय म्हणत होती ते डॉक्टर वगैरे?"

"अरे त्यांना वाटत मी प्रेग्नंट आहे."

"मग आता? "

" अस काही नाही. आले पीरेड्स. आता त्या परत नाराज होतील. " प्रिया बोलली.

" आई पण ना अति करते. आताशी दोन वर्ष झाले आपल्या लग्नाला." विवेक तिला मदत करत होता.

" हो ना त्यात दीड वर्ष आपल प्लॅनिंग होत. "

" होईल आपोआप एवढी घाई काय आहे?"

" तेच तर मला कळत नाही. आई रोज तेच तेच बोलतात." प्रिया चिडली होती. विवेक पुढे पेपर वाचत बसला. प्रिया चहा घेवून आली. ते दोघ चहा घेत होते.

अलका ताई फिरून आल्या. त्या दोघांजवळ बसल्या. " गुड मॉर्निंग आई. चल चहा घे. "

" अरे वाह विवेक, छान वाटल. तू असा वेळ दे प्रियाला. आज दोघ ऑफिसहून लवकर या . डॉक्टर कडे जायच ना."

"नाही त्याची काही गरज नाही." प्रिया बोलली.

"का काय झालं? काय ग आली का पाळी." त्यांनी अस जोरात विचारल्यामुळे प्रिया विवेक दोघ एकमेकांकडे बघत होते.

हो. ती म्हटली.

त्या तोंड वाकड करून आत गेल्या." काय आहे देवाच्या मनात काही समजत नाही. कधी मला नातवंडच सुख मिळेल काय माहिती? "

प्रियाचा मूड गेला. विवेक तिला समजावत होता.

अलका ताई एक वर्षा पासुन गुड न्यूजची वाट बघत होत्या. प्रत्येक घरात होत तेच इथे ही सुरू होत. त्या तंतोतंत तारखा लक्ष्यात ठेवत होत्या. अगदी दोघांना त्रासून सोडल होत. विवेकला काही वाटत नव्हत तो प्रक्टीकल होता. दुर्लक्ष करत होता. पण प्रिया कंटाळून गेली होती.