अति तिथे माती भाग 2
©️®️शिल्पा सुतार
.........
.........
अलका ताईं मुळे प्रिया खूप कंटाळली होती. "विवेक मी काय म्हणते, आईंची ही काय विचारायची पद्धत झाली का ? कस वाटत ते. त्या का अस आपल्या मधे मधे करतात?"
" जावू दे आई आहे ती माझी."
"म्हणून काय झाल. आपल्याला काही प्रायव्हसी आहे की नाही?" प्रिया चिडली.
" प्रिया तू आता मूड घालवू नको."
"नाही, मला आता हे सहन होत नाही. तू आईंशी बोल. त्यांना सांगा सगळी कडे सदोदीत माझ्या बद्दल बोलायच नाही. बर त्यांना काही समजत ही नाही की कोणाला काय सांगाव आणि काय नाही. आता पर्यंत मी प्रेग्नंट नाही हे सगळ्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सांगून ही झाल असेल. मला अगदी लाजल्यासारखं होत." प्रिया खूप चिडली होती.
"नाही, मला आता हे सहन होत नाही. तू आईंशी बोल. त्यांना सांगा सगळी कडे सदोदीत माझ्या बद्दल बोलायच नाही. बर त्यांना काही समजत ही नाही की कोणाला काय सांगाव आणि काय नाही. आता पर्यंत मी प्रेग्नंट नाही हे सगळ्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सांगून ही झाल असेल. मला अगदी लाजल्यासारखं होत." प्रिया खूप चिडली होती.
" मी आईला काही बोलणार नाही. ती एकटी आहे. तीच मन कस दुखावणार. काही बोलली नसेल ती. प्रिया तू अति करू नकोस. " विवेक बोलला.
" विवेक मी काही तुला त्यांच्याशी भांडायला सांगत नाही. फक्त माझ्या पीरेड्सच्या तारखा, अगदी खाजगी गोष्टी कोणाला बोलू नका अस म्हणते आहे . अति बाळ बाळ नको ना. "
" करू दे तिला बाळ बाळ. मुल जेव्हा व्हायच तेव्हा होणार ना. तू टेंशन घेवू नकोस. "
" पण त्या मला दर महिन्यात किती त्रास देत आहेत तुला काही कल्पना नाही. मला अगदी नको नकोस झाल आहे. "
" प्रिया शांत हो. "
" ठीक आहे तुला नाही समजणार या गोष्टी. तू डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहेस. हा तुझा निर्णय असेल तर या पुढे मी आहे त्या आहेत. मला तुझा सपोर्ट नाही तर मी बघेन काय करायच ते." प्रिया रागारागाने बोलली.
"प्रिया एवढ टोकाच बोलण्या सारख काय आहे. जरा शांततेत घे. "
" तुला समजत नाही पण आता हल्ली आई अति करतात. काहीही बोलतात. नुसत आपल बाळ बाळ. मला खूप टेंशन येत अस. त्यांच्या वागण्याचा त्रास होतो. मला हार्मोन्स इम्बॅलन्सचा त्रास आहे. अस केल तर मूल व्हायला अजून उशीर होईल ."
विवेक रागात होता. तो आत आवरायला गेला. तसा ऑफिसला निघून गेला. तिथे तो प्रिया काय म्हटली याचा विचार करत होता.
प्रिया पण तयार होवुन ऑफिस मधे गेली. तीच खूप डोक दुखत होत.
" काय झालं प्रिया?" नीता विचारत होती.
"काही नाही विवेक सोबत भांडण झालं ."
" कश्या मुळे? "
" आमच दोघांच पटत ग. फक्त सासुबाईं वरून भांडण होत. घरच्या वातावरणाचा खूप कंटाळा आला आहे ."
" काय झालं आता?"
" तेच ग आमच्या दोघात काय आहे. माझे पीरेड्स कधी येतात. सगळं सासुबाईंना जाणून घ्यायच असत. आणि ते सगळ्यांना सांगायच असत."
" काही खर नाही. "
" हो ना खूप कंटाळा आला आहे. "
" विवेक काय म्हटला?"
"त्याला या गोष्टीच काहीच वाटत नाही. मला ना या दोघांचा खूप राग येतो आहे. माझ काही चुकलं का नीता? अस तर नाही ना मी अति करते. "
" नाही ग होत अस. "
" अग अस वाटत ना माझी प्रेग्नन्सी म्हणजे एक आनंद नसून टार्गेट पूर्ण केल्यासारख आहे. त्यांना हव म्हणून आम्ही मुल जन्मला घालायच. आता बघ हे पाच दिवस झाले की मला कस करतील सासुबाई. जा विवेक सोबत रहा. अगदी सकाळी विचारायला करतात काही झाल का तुमच्यात? "
" कठिण आहे."
" हो ना. मी कंटाळले काय करू. विवेकला हे कस सांगू. "
" तू ना जास्त बोलू नकोस त्यांच्याशी. काही सांगू नकोस ."
" तेच कराव लागेल." प्रिया विचार करत होती.
ती घरी आली.
सासुबाई फिरायला निघत होत्या. स्वयंपाक काय हवं त्या सांगत होत्या.
" आई तुम्ही जा ना. मी ठरवेल काय करायच ते आणि मी एक बोलू का तुम्ही ना आता या सगळ्यातून थोड अंग बाहेर काढून घ्या. तुमच्या अति मधे मधे करण्यामुळे मला खूप त्रास होतो."
" काय झालं प्रिया? अग विवेकला उसळ आवडते म्हणून म्हटली मी उसळ कर."
" ते ठीक आहे आई पण हे घर माझ ही आहे ना? "
हो.
" मग मला काय आवडत ते कधी करु या? सगळ तुम्हाला दोघांना आवडत तेच होत. विवेक म्हणतो आईला हे हव ते कर. तुम्ही म्हणता विवेकची आवडती भाजी कर. माझ काय? मी कोण आहे. आणि बाळा साठी तुम्ही का माझ्या मागे लागला आहात. आम्ही नवरा बायको ठरवू ना काय करायच ते. मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतो."
आज ती अलका ताईंना खूप बोलली. तिला माहिती होत या लगेच विवेकला सांगतील. तरी पण तिने धाडस केल.
आणि झाल तस. त्या जेवणाच्या वेळी फुगून बसल्या होत्या. विवेक सारख विचारात होता." काय झालं आई?"
त्यांनी प्रिया कडे बघितल.
विवेक चिडला होता.