अति तिथे माती भाग 3
©️®️शिल्पा सुतार
.........
.........
प्रियाला माहिती होत आता काय होईल. विवेक मलाच बोलेल. तिने शांत रहायचं ठरवल.
ती पोळ्या घेवून आली. ताट केले. "आई पोळी घ्या."
त्यानी उत्तर दिल नाही.
विवेक शांत होता. तो प्रियाला काही बोलत नाही हे बघून अलका ताईंनी परत प्रयत्न केला. "प्रिया आज मला खूप बोलली." त्यांनी विवेकला सांगितल.
"प्रिया काय बोलली तू आईला? " त्याने हळूच विचारल.
"काही नाही त्यांना म्हटलं तुमच्या आवडीच्या भाज्या होतात रोज. माझ्या आवडीच काय?"
"बस इतक बोललीस तू प्रिया?" अलका ताई बोलल्या. "ही मला बोलली माझा त्रास होतो हिला. माझ्या मुलाच लग्न झालं तर मला वाटत नातवंड व्हावे. त्यात माझ काय चुकलं."
"आई तुमच काही चुकलं नाही. फक्त तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अति मागोवा घेतात. त्याने मला टेंशन येत. नको नको होत. अस मी म्हटले. काय चुकलं. मुल जन्मला घालण एक टार्गेट वाटत आहे. आम्हाला मोकळ सोडा ना. आपोआप होऊ द्या गोष्टी. एखाद्या गोष्टीच्या मागे अति लागलं तर ती गोष्ट आपल्या पासुन लांब पळते. "
आता विवेक ही अलका ताई ही गप्प होत्या.
विवेक विचार करत होता प्रिया बरोबर बोलते आहे. पण आईला कस बोलणार. एक तर बाबा गेल्या पासून ती हळवी झाली होती. त्यात तिला वाटत होत घरात बाळ यायला हव. या साठी ती प्रियाच्या मागे लागली होती. पण आपण प्रियाचा विचार करायला हवा. तिला शांततेची गरज आहे.
त्याने दुसर्या दिवशी ऑफिस मधून बहिणीला सानवीला फोन केला. "थोडे दिवस आईला बोलव ना तिकडे."
"काय झालं दादा?"
तो सांगत होता.
"कठिण आहे. आई का अस करते?"
"मी तिला प्रिया समोर काही बोलू शकत नाही. प्रियाला मला थोडा वेळ हवा आहे."
ठीक आहे.
तिने संध्याकाळी फोन केला. "आई तुझी खूप आठवण येते आहे. ये ना थोडे दिवस इकडे."
" अग पण मी तिकडे आले तर इकडे विवेकच कस होईल? ती प्रिया काही करत नाही. साधा स्वयंपाक ही जमत नाही तिला. आता तुला कालची गोष्ट सांगते..... "
" आई सोड ना त्यांच. तु ये इकडे. करतील ते बरोबर. काही लहान नाही." सानवी बोलली.
अलका ताई रात्री विवेक सोबत बोलत होत्या." मी थोडे दिवस जाते सानु कडे तिला माझी गरज आहे. "
" ठीक आहे आई. पण लवकर ये." विवेक बोलत होता.
प्रिया आतून ऐकत होती. ती खुश होती. सासुबाई शनिवारी गावी गेल्या. विवेक गाडीत बसवून आला.
संध्याकाळी प्रिया ऑफिस मधून आली. ती गप्प होती. माझ्या मुळे तर नाही गेल्या ना आई गावाला? विवेक बोलेल का मला? ती घाबरली होती.
तो चहा बनवून रेडी होता. दोघांनी चहा घेतला. विवेक खूप प्रेमाने वागत होता. प्रियाला कसतरी झाल. "सॉरी विवेक आई माझ्यामुळे गेल्या का गावाला?"
"नाही. जावू दे थोड दिवस. आपल्याला बदल होतो. या पुढे आपण अस करु. थोडे दिवस सानवी सांभाळेल तिला थोडे दिवस आपण. आता काही बोलायच नाही दुसर. फक्त तू आणि मी." विवेकने तिला जवळ घेतल.
प्रिया खूप खुश होती. दोघ छान लांब पर्यंत फिरून आले. आल्यावर जेवून घेतल. विशेष काम नव्हत. डोक ही शांत होत. दोघांनी छान सोबत वेळ घालवला.
प्रिया ऑफिस मधे आली. खूप छान वाटत होत. पूर्वीचे विवेक बरोबरचे दिवस आठवले. ती विवेक दिवस भर एकमेकांना मेसेज करायचे. तिने विवेकला "हाय" पाठवल.
थोड्या वेळाने त्याच्या मेसेज आला. दोघ पूर्वी सारखे एकमेकांना मेसेज करत होते.
संध्याकाळी प्रिया लवकर घरी आली. स्वयंपाक करून विवेकची वाट बघत होती. दोघांच छान जेवण झालं. दोघ मजेत होते. शांततेत सोबत रहात होते. महिना झाला.
"प्रिया आई येणार आहे पुढच्या आठवड्यात." विवेक बोलला.
प्रिया गप्प होती. तिला टेंशन आल होत. परत पूर्वी सारख टेंशन, कटकट. काय यार नेहमी फक्त मी आणि विवेक का नाही सोबत. आमच्यात अस कधी भांडण होत नाही. पण सासुबाईं मुळे वाद होतात.
"प्रिया एक प्रॉमीस कर आपण अस सोबत रहायच. कोणा मुळे आपल्यात काही फरक पडू द्यायचा नाही. तू चीडायच नाही. " विवेक बोलला.
"ठीक आहे विवेक पण आता मी सासुबाईंना प्रत्येक गोष्ट सांगणार नाही."
"हो बरोबर आहे. थोड अंतर हव."
"विवेक मला तुझ्या सपोर्टची गरज आहे. आपण आपल्या प्रायव्हेट गोष्टी आईंना समजू द्यायच्या नाहीत. "
" हो बरोबर. पण मला आई सोबत प्रेमाने रहाव लागेल. "
" काही प्रॉब्लेम नाही. रहा तुम्ही दोघ प्रेमाने. फक्त सगळ्या गोष्टी सगळे मिळून अति बोलू नका. काही प्रायव्हसी ठेवा."
हो.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा