जलद कथा
विषय :- नात्यातले अंतर
हेलो,” आई लताने तिच्या लेकाला फोन लावला होता. “येत आहेस ना दिवाळीसाठी?”
“अम्म,” वैभव जरा विचार करत बोलला. “ह्या वेळेस जरा सुट्टी कमी मिळाली आहे तर हिच्या माहेरी जाऊन आम्ही परत येऊ. पुढच्या महिन्यात येणार आहोत घरी.”
तशी लता नाराज झाली. तिने सरळ फोन ठेवून दिला. मागच्या दिवाळीत देखील तो फक्त दोन दिवस थांबला होता. त्याच्या सासरी मात्र चार दिवस मुक्काम होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये देखील वैभवची बायको आणि त्याची मुल पंधरा दिवस तिच्या माहेरी राहिली होती. सुट्टी संपायला जेव्हा दोन दिवस बाकी होते तेव्हा ती पाहुण्यासारखी येऊन लगेच त्यांच्या कामावर परतली होती.
“काय झाल?” केशव सुस्कारा टाकत बोलले. “नाही येत ना तो?”
“काय झाल?” केशव सुस्कारा टाकत बोलले. “नाही येत ना तो?”
“त्याला त्याच सासर जास्त आवडायला लागल आहे.” लता जरा चिडून बोलली. “इकडे राहायला जास्त मागतच नाही तो. ती बोलली का तसा तो लगेच तिकडे जातो.”
“आता तो ही काय करेल म्हणा?” केशव “त्याला तिचं पण ऐकण भाग आहे ना?”
“पण मी आई आहे त्याची.” लता बोलून सरळ त्यांच्या खोलीत निघून गेली.
इकडे केशव पण दीर्घ श्वास घेत टीव्ही लावून बसले. जिकडे तिकडे दिवाळीची तयारी चालू होती. फराळाचा सुगंध जिकडे तिकडे नुसताच दरवळत होता. झाडून खरेदी चालू होती. हे दोघ नवरा बायको मात्र घरात बसून होते. नाही त्यांच्यात कोणताही उत्साह होता आणि नाही कोणती इच्छा राहिली होती.
दिवाळीला दोन दिवस बाकी होते. घरात किमान दिवे तरी लावावे म्हणून केशव आणि लता खरेदीला बाहेर पडल्या. ह्या वेळेस त्यांनी दिवाळीचा फराळ बनवायला जमला नसल्याने त्यांनी बाजारातूनच तयार फळाळ खरेदी करण्याचं ठरवलं.
संध्याकाळी ते दोघे नवरा बायको बाजारात जायला निघाले. दिवाळीसाठी जे साहित्य लागत ते त्यांनी घेतल आणि त्या दिवशी रात्रीच जेवण बाहेरच करून ते उशिरा घरी परतले होते. रात्री झोपण्याआधी लताने तिच्या मुलीला म्हणजेच केतकीला फोन केला. किमान ती तरी येणार आहे का? ते तिला विचाराच होत. जस वैभव त्याच्या बायकोच्या मागे जातो तसच त्यांची मुलगी तिच्या नवऱ्याला घेऊन इथे तिच्या माहेरी येते का? ते त्यांना बघायचं होत.
पहिले तर केतकीने फोन उचललाच नाही. ती कामात असेल म्हणून लताने तिला परत काही फोन लावला नाही. नंतर थोड्याचवेळात तिनेच लताला फोन केला.
“काय गं कशी आहेस?” लता आनंदाने विचारू लागली. “तेव्हा कामात होतीस का?”
“हो गं आई,” केतकी दमलेली असूनही आनंदाने बोलली. “आजवर वेळ नव्हता म्हणून घराची सफाई झाली नव्हती. आज घरातले सगळेच होते तर सगळ्यांनी मिळून एका दिवसात घर साफ करून घेतलं. फराळ तर आधीच आईंनी बनवला होता. माझ्यासाठी फक्त बेसनचे लाडू बनवायचे ठेवले. तेही घरात सगळ्यांना माझ्या हाताचे आवडतात म्हणून. नाहीतर आईंनी ते पण करून टाकले असते.”
“बर चांगल आहे.” लता कसनुस हसत बोलली. स्वतःच्या आईपेक्षा सासूचे केलेले कौतुक लताला सहनच झाल नाही. “इकडे कधी येणार आहेस? ते सांग.”
“बर चांगल आहे.” लता कसनुस हसत बोलली. स्वतःच्या आईपेक्षा सासूचे केलेले कौतुक लताला सहनच झाल नाही. “इकडे कधी येणार आहेस? ते सांग.”
“अम्म आई,” केतकी “किती वेळ मिळतो त्यावर आहे. भाऊबिजेला तर येणारच आहे ना.”
“पण थांबशील की नाही?” लता
“बघते आई. आता ठेव, मी नंतर करते.” केतकी जरा घाईतच बोलली. “तेवढे लाडू करून घेते पटकन. दादा आला का?”
“नाही ना,” लताचा लगेच नाराजीचा सूर लागला. “म्हणे ह्या वेळेस जमणार नाही. तर तो त्याच्या सासरी जाणार आहे.”
“मग मी कधी ओवाळू त्याला?” केतकी
“बघ बाई तूच फोन करून त्याला.” लता पुढे काही बोलणार तोच केतकीने ठीक आहे बोलत तो फोन ठेवून दिला.
“बघितलं लेकीला बोलायला जरा वेळ नाही.” लता
“मग एवढा वेळ काय झिम्मा फुगडी खेळत होती का?” केशव मिश्कील होत बोलले.
“तुम्हाला तर कुठेही गम्मतच सुचते.” लता तिचं नाक मुरडत बोलली. “चला झोपूया. उद्या परत लवकर उठायचं आहे.”
मग ते दोघेही झोपी गेले. केशव तर झोपी गेले होते. पण लताच्या डोळ्यावरची झोप उडून गेली होती. लग्नाआधी पहिले समोर आईला बघायला मिळाव म्हणून पहाटे लवकर उठून आधी तिला बघणारा वैभव, आता आधीच सगळ विसरून गेला का? हा प्रश्न तिला पडला. तिच्या प्रेमात काही कमी पडली का? हा विचार करून तिचं डोक दुखायला लागल होत. तिचं मन लागलीच भूतकाळात हरवल. जेव्हा की वैभवचं लग्न ठरवलं जात होत.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा