Login

अतिओढ भाग २

पुढचे दोन वर्ष त्यांचा हा शोध चालू राहीला. लताच्या माहेरून काही चांगली स्थळ येत नसलेली पाहून मग तिने तिच्या सासरी मुली बघण्याबद्दल सांगितले. केशवच्या लहान्या भावाने तर ऐकून न ऐकल्यासारखे केले होते. कारण त्याने त्याच्या ह्या वहिनीचे फक्त त्यांच्या माहेरच असणार कौतुक पहिले होत.
मागील भागात.

मग ते दोघेही झोपी गेले. केशव तर झोपी गेले होते. पण लताच्या डोळ्यावरची झोप उडून गेली होती. लग्नाआधी पहिले समोर आईला बघायला मिळाव म्हणून पहाटे लवकर उठून आधी तिला बघणारा वैभव आता आधीच सगळ विसरून गेला का? हा प्रश्न तिला पडला. तिच्या प्रेमात काही कमी पडली का? हा विचार करून तिचं डोक दुखायला लागल होत. तिचं मन लागलीच भूतकाळात हरवल. जेव्हा की वैभवच लग्न ठरवल जात होत.

आता पूढे.

(भूतकाळ.)

वैभव सकाळीच उठला आणि सगळ काही आवरून हॉलमध्ये आला. आज त्याची एका मोठ्या कंपनीत नोकरीसाठीची मुलाखत होती. कॉम्पुटरच्या क्षेत्रात चांगल्या मार्काने इंजिनिअरची पदवी घेऊन तो बाहेर पडला होता.

एक महिनाभर तो मुलाखत देत फिरत होता. पण त्याला नोकरी मिळवण्यात काही यश मिळत नव्हत. आजवर पहिल्या प्रयन्तात यश मिळवलेला वैभव ह्या एका महिन्याच्या अपयशान लगेच खचून चालला होता. तेव्हा लताने त्याला प्रेमाने समजावून परत जगण्यासाठी उभारी दिली होती. त्यातूनच उभा राहून तो आज परत एका ठिकाणी मुलाखतीला चालला होता.

यथावकाश घरात सगळ्यांचा चहा नाश्ता झाला आणि वैभवने मुलाखतीला जाण्यासाठी आई वडीलांच्या चरणाला स्पर्श केला.

“अरे आधी देवाच्या पाया पड ना.” लताने त्याला दटावले.

“माझे पहिले देव तुम्ही.” वैभव केशवच्याही पाया पडत बोलला.

तोपर्यंत केतकी दही साखर घेऊन आली. “आजची नोकरी तुला लगेच लागू दे. म्हणजे पुढच्या रक्षाबंधन आणि भाऊबिजेला तू स्वतः मला महागातलं गिफ्ट देशील.” तिने हसतच ती दही साखरेची वाटी लताकडे दिली.

“किती लबाड असाव ना माणसाने.” वैभवने नेहमीप्रमाणेच तिचे केस ओढले.

“हो, असच असाव लागत.” केतकी तोंड वाकड करत बोलली.
तर इकडे लताने त्याला दही साखर चारली

“मला उशीर झाला तर मी काकांकडे थांबतो.” वैभव खाता खाता बोलला.

“नको,” लता एकदम बोलून गेली. “म्हणजे अश्या गोष्टी लगेच कोणाला सांगायच्या नसतात.” तिने लगेच स्वतःला सावरून घेतलं. “मुलाखत झाली की सरळ घरी ये.”

“पण उशीर झाला आणि माझी शेवटची पण गाडी चुकली तर?” वैभव विचार करत बोलला.

“काय दिवसभर थोडीच मुलाखत असेल?” लता आता जरा वैतागून बोलली.

इकडे वैभवने त्याचे डोळे फिरवले आणि मुलाखतीसाठी निघून गेला.

“एकदा का त्याला ही नोकरी लागली की त्याच लग्नच पण बघावं लागेल ना.” लता मंद स्मित करत बोलली.

“आधी माझ्या लग्नच कर्ज फिटलं का ते सांगा,” केतकी लगेच भावूक होत बोलली. “ते त्याला माहित पण नाही. आता लगेच त्याच लग्न म्हटलं की तो तयार होईल का?”

“ते मी बघते ना.” लता डोळे मिचकावत बोलली.

“म्हणजे त्याला पण इमोशनल ब्लॅकमेल करणार.” केतकी तिचे डोळे फिरवत बोलली. “चला मी पण निघते. त्यांची मिटिंग झाली असेल.

“अगं मग त्यांना इथेच बोलावलं असत ना.” लता गोंधळून बोलली.

“घरी आई बाबा एकटेच आहेत.” केतकी “घरात करायला दुसर कोणीही नाही.”

“बर.” लता

मग केतकी देखील तिच्या सासरी निघून गेली. तर दुसरीकडे वैभवची मुलाखत चांगली गेली होती आणि दोनच दिवसात त्याची निवड झाल्याचा मेल त्याच्या मोबाईलवर येऊन धडकला.

घरात आनंदाला उधाण आले. केशवने लागलीच पेढे आणून त्यांच्या शेजारी पाजारी वाटले. त्याला चांगल्या पगाराच पॅकेज मिळाल होत.

“ते म्हणतात ना चांगल व्हायचं असेल तर थोडी वाट बघावी लागते.” लताने वैभवच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.

वैभव दोन दिवसात त्या कंपनीला कामाला जायला लागला. तस लताने त्याच्या लग्नाच मनावर घेतल. तिच्या सासरकडच्या माणसांकडून वैभवच्या लग्नाबद्दल विचारणा व्हायची. पण लता त्या कोणालाच कसलीही कल्पना लागू द्यायची नाही. तिच्या माहेरी मात्र तिने तिच्या भावाला आणि बहिणीला वैभवसाठी स्थळ बघायला लावली होती. ही गोष्ट केशवच्या लहान भावाला दुसरीकडून माहिती झाली. तसा त्याने लगेच त्याच्या ह्या मोठ्या भावाला फोन लावून त्या बद्दल विचारलं. तर केशवने देखील त्याच्या लहान भावाला तो लहान आहे सांगून उडवा उडवीची उत्तर दिली. मग त्याच्या लहान्या भावाने त्यात पडण्याच सोडून दिल.

पुढचे दोन वर्ष त्यांचा हा शोध चालू राहीला. लताच्या माहेरून काही चांगली स्थळ येत नसलेली पाहून मग तिने तिच्या सासरी मुली बघण्याबद्दल सांगितले. केशवच्या लहान्या भावाने तर ऐकून न ऐकल्यासारखे केले होते. कारण त्याने त्याच्या ह्या वहिनीचे फक्त त्यांच्या माहेरच असणार कौतुक पहिले होत. पण बाकी नातेवाईकांनी मात्र त्यांना स्थळ सुचवायला सुरवात केली होती.

पण प्रत्येक वेळेस ती मुलगी छोटी दिसते, तिचं नाक व्यवस्थित नाही, रंगाने सावळी आहे, तब्येतीने बारीकच आहे अशी एक ना अनेक कारण सांगून लताने अनेक स्थळ नाकारली होती. त्यांचा मुलगा वैभव यानेही सगळ काही त्याच्या आई वडिलांवर सोडलं होत. त्यामुळे तो काही इकडे लक्ष देत नव्हता. तो भला आणि त्याचा तो जॉब भला यातच तो गुंतलेला होता.

सुरवातीला स्वतःहून स्थळ घेऊन येणारे मध्यस्त आणि नातेवाईक लताची ही कारण बघून नंतर नंतर त्यांना स्थळ सुचविण्यास कंटाळा करू लागले. कारण त्यांनी सुचविलेल्या काही मुली ह्या खरच संस्कारी आणि चांगल्या वळणाच्या होत्या.

त्यातली एक मुलगी जी दोन वर्षापूर्वी दाखवली होती. तिचं तर वर्षभरापूर्वी लग्न होऊन दिल्या घरी ती सुखाने संसार करत होती. तिचा पायगुण की काय तिच्या नवऱ्यालाही लगेच प्रमोशन मिळाल होत. हे ऐकूनही लताने मात्र तिचं नाक मुरडलं होत.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.

0

🎭 Series Post

View all