Login

अतिओढ भाग ३

त्यांच्या दिवसाची सुरवात झाली. आज तर नाही त्यांचा मुलगा येणार होता आणि नाही त्यांची मुलगी. मग आज ते दोघेच घरी असणार होते. एकमेकांना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. लताने चहा नाश्ता बनवला आणि ते दोघीही त्यांच्या घराच्या बाल्कनीत एकत्रच ते घेत बसले. चहाचे घोट घेता घेता बिल्डींगमध्ये मुलांचा तो चाललेला धुमाकूळ ते बघत होते.
मागील भागात.

सुरवातीला स्वतःहून स्थळ घेऊन येणारे मध्यस्त आणि नातेवाईक लताचे हे कारण बघून नंतर नंतर त्यांना स्थळ सुचविण्यास कंटाळा करू लागले. कारण त्यांनी सुचविलेल्या काही मुली ह्या खरच संस्कारी आणि चांगल्या वळणाच्या होत्या. त्यातली एक मुलगी जी दोन वर्षापूर्वी दाखवली होती. तिचं तर तर वर्षभरापूर्वी लग्न होऊन दिल्या घरी ती सुखाने संसार करत होती. तिचा पायगुण की काय तिच्या नवऱ्यालाही लगेच प्रमोशन मिळाल होत. हे ऐकूनही लताने मात्र तिचं नाक मुरडलं होत.

आता पूढे.

आज मात्र घरात बरीच गडबड आणि गोंधळ चालू होता. लता आणि केशव हे दोघेही खूपच आनंदात होते. आज त्यांच्या मुलासाठी मुलगी बघायला जाणार होते. आज जे स्थळ बघायला जाणार होते. ते लताने स्वतःहून शोधल होत. त्यामुळे कोणालाही काहीही न कळवता ते थेट मुलीच्या घरी जायला निघाले होते. त्यांच्या सोबत लताचे भाऊ होतेच. लता तिच्या माहेरी मात्र काहीच लपवत नव्हती. जे काही निर्णय घेत होती. ते सगळेच तिच्या माहेरचं ऐकूनच घेत होती. आजवर तिने केशवच्या घरी म्हणजेच तिच्या सासरी जास्त काही संबंध ठेवला नव्हता. मग त्यांनीही त्यांच्या संसारात जास्त ढवळाढवळ केली नव्हती.

सकाळी लवकरच उठून लता तिच्या भावाची यायची वाट बघत बसली होती. वैभवला सुट्टी टाकायला नको म्हणून हा सगळा घाट रविवारच्या दिवशीच घातला गेला होता. आठ वाजता येणारा लताचा भाऊ साडेनऊ वाजता लताच्या घरी पोहोचला. त्याच्यासोबत त्याची बायको होतीच. त्यांचा चहा पाणी केल्यावर ते सगळेच मुलीच्या घरी जायला निघाले.

मुलगी पहिली, पसंती पडली आणि लताने लागलीच सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करायचे ठरवले. पण त्या वेळेस मुलीच्या वडिलांनी त्यांच्या घरची इतर मंडळीबद्दल विचारणा केली. पण ते तर कोणीही सोबत नव्हते. त्यामुळे तो कार्यक्रम तेथेच थांबवल गेला. मग मात्र लताला तिच्या सासरकडच्या मंडळींना सांगाव लागल. आता अस काम आहे म्हणून कस सांगाव? म्हणून तिने वैभवच्या सासरकडील माणसाचं कौतुक करायला घेतलं.

त्यांच्या घरची श्रीमंती किती आहे? मुलगी किती सुंदर आहे, आणखी बरचं काही ती तिच्या सासरकडील माणसांन वर्णन करून सांगू लागली. त्यांनीच घाई केली म्हणून मुलीला पाहून आलो अशी बतावणी करायला देखील ती विसरली नव्हती.

आता मात्र यापूर्वी स्थळ आणलेल्या मुलींना लताने का नकार दिला? हे सर्वांना समजले होते. कारण आता जी मुलगी त्यांनी पहिली होती ती वैभवच्या मानाने उंचीला कमीच होती आणि वयानेही चार वर्षाने लहान होती.

या आधीची स्थळ याच कारणामुळे नाकारणारी लता, ह्या वेळेस त्या मुलीच्या श्रीमंतीला बघून तिने होकार दिला होता. हे बाकीच्यांना समजायला वेळ लागला नाही.

या नंतरही लताने वैभवच्या लग्नाच्या विधी तिच्या सासरी विचारायच्या सोडून तिच्या माहेरच्या माणसांना विचारून करू लागली. तिच्या ह्या वागण्याला वैभव आणि केतकी सुद्धा वैतागले होते. सूरवातीला तिला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पण ती ऐकताच नाही म्हटल्यावर त्यांनी देखील तिला काही सांगणे सोडून दिले होते.

यथावकाश लग्न पार पडल. सासरकडील माणसांनी मदत केली नाही म्हणून लताने परत तिच्या माहेरच्या माणसाचं कौतुक करायला सुरवात केली. बाकीच्यांना ह्या गोष्टीची सवय झाल्याने त्यांनी लताच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले.

सुरवातीला गोड गोड बोलून राहणारी वैभवची बायको देखील तिच्या सासूच्या माहेरच्या पुरणाला वैतागून गेली. तिने देखील वैभवला तिच्या बोलण्यात गुंतवून त्याला त्याच्या कामाच्या ठिकाणी राहण्यास सांगितले. नाहीतर तो त्याच ऑफिस सुटल की लांबचा प्रवास करून त्याच्या घरीच येत होता. त्या प्रवासात पैसाही बराच खर्च होत होता. त्यात वेळ जायचा तो वेगळाच. पावसाळ्यात तर कधी कधी भरती आल्याने त्याला घरी यायला रात्री बराच उशीर व्हायचा. हीच कारण पुढे करत वैभवच्या बायकोने त्याला कामाच्या शहरात राहायला घेऊन गेली. या नंतर तो कधी त्याच्या घरापेक्षा त्याच्या सासरी जाऊ लागला हे लताला कधीच समजल नाही.

ते म्हणतात ना हिस्ट्री रिपीट, अगदी तसच लतासोबत झाल होत.

(वर्तमान काळ.)

ह्या सगळ्या विचारात कधी सकाळ झाली हे लताला देखील समजल नाही. पहाटेचा अलार्म वाजला आणि ती उठली. आज लक्ष्मी पूजन होत. म्हणून तिने स्वतःच आवरून घेतल आणि केशवला देखील उठवल. तिने सर्व दारात, घरात दिवे लावले. बाहेर फटाक्यांचा आवाज येत होता. त्यांच्या बिल्डींगमधले लहान मुल फुलबाजे, भुईचक्र, सुरसुरी पेटवत होते. हे सगळ पाहून तिला तिचा लहानपणीचे वैभव आणि केतकी आठवले.

रात्रीच्या विचारात तिला तिच्याकडून झालेली चूक समजून आली होती. पण आता वेळ निघून गेली होती. तिचा मुलगा त्याच्या बायकोच्या मुठीत गेला होता. आज पहाटे देव पूजा करत असताना तिने देवाला त्याबद्दल माफी पण मागितली होती.

त्यांच्या दिवसाची सुरवात झाली. आज तर नाही त्यांचा मुलगा येणार होता आणि नाही त्यांची मुलगी. मग आज ते दोघेच घरी असणार होते. एकमेकांना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. लताने चहा नाश्ता बनवला आणि ते दोघीही त्यांच्या घराच्या बाल्कनीत एकत्रच ते घेत बसले. चहाचे घोट घेता घेता बिल्डींगमध्ये मुलांचा तो चाललेला धुमाकूळ ते बघत होते.

तो दिवसही असाच सरला. संध्याकाळी लक्ष्मी पूजन करण्यात आले. शेजारी पाजारची मुल त्यांच्या घराचा प्रसाद द्यायला त्यांच्या घरी आले. तर लताने तिने बनवेला प्रसाद घरी आलेल्या मुलांना देत होती. रात्रीच जेवण झाल्यावर शेजारच्या लोकांच्या आग्रहास्तव ते दोघेही बिल्डींग खाली उतरून आले आणि सर्वांसोबत दिवाळीचे ते फुलबाजे, सुरुसरी उडवू लागले. सोबतच आताच्या त्या लेकरांना त्यांच्या मोठ्या माणसांची तिथली दिवाळी रंगवून सांगू लागले. बाहेर कामाला असलेले बऱ्याच आई वडिलांचे मुल आज त्यांच्या घरी आली होती. ते बघून लताला परत भरून आल.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.

0

🎭 Series Post

View all