मागील भागात.
तो दिवसही असाच सरला. संध्याकाळी लक्ष्मी पूजन करण्यात आले. शेजारी पाजारची मुल त्यांच्या घराचा प्रसाद द्यायला त्यांच्या घरी आले. तर लताने तिने बनवेला प्रसाद घरी आलेल्या मुलांना देत होती. रात्रीच जेवण झाल्यावर शेजारच्या लोकांच्या आग्रहास्तव ते दोघेही बिल्डींग खाली उतरून आले आणि सर्वांसोबत दिवाळीचे ते फुलबाजे, सुरुसरी उडवू लागले. सोबतच आताच्या त्या लेकरांना त्यांच्या मोठ्या माणसांची तिथली दिईवली रंगवून सांगू लागले. बाहेर कामाला असलेले बऱ्याच आई वडिलांचे मुल आज त्यांच्या घरी आली होती. ते बघून लताला परत भरून आल.
आता पूढे.
तिथे थोडावेळ थांबून ते दोघेही घरी परत आले.आधीच जेवण झाली असल्याने त्यांनी लगेच झोपण पसंत केल. असेच ते दोन दिवस सरले आणि भाऊबीजेचा दिवस आला. मागच्या दिवाळीच्या वेळेस किमान भाऊबिजेला तरी त्यांची दोन्ही मुल त्यांच्या घरी होती. पण ह्या वेळेस ती सोबत नाही म्हणून त्या दोघांची मन नाराज होती.
त्यांचा नेहमीप्रमाणे बाल्कनीत चहा नाश्ता चालू असताना त्यांच्या घराची बेल वाजली. ह्या वेळेस कोणीतरी बिल्डींगमधलच असेल म्हणून लता दार उघडायला गेली. दाराला असलेल्या होलमधून तिने पाहिलं तर ते कोणीतरी बंद केल होत. तशी लता जरा वैतागली आणि तिने लागलीच दार उघडल. तर समोर केशवच्या आत्याची मुलगी राधा तिचा मुलगा राजू आणि राजूची बायकोसोबत दिसली. तशी लता तिला बघतच बसली.
“वहिनी आत तर येऊ देना.” राधा मंद स्मित करत बोलली.
तस लताने लगेच तिला घरात घेतलं. ती इकडे येईल याची तिला कल्पना पण नव्हती. केशवने तिला पाहिलं तर त्यालाही खूप आनंद झाला. त्यांना सख्खी बहिण नव्हती. म्हणून ते दोघे भाऊ राधालाच खूप जीव लावत होते. लताने तिच्या सासरी जायचं कमी केल्याने राधाने देखील तिचं येण कमी करून टाकल होत. पण ह्या वेळेस ती मुद्दाम तिथे आली होती.
“बऱ्याच वर्षांनी आलीस.” राधा केशवच्या पाया पडायला जशी वाकली तस तो बोलला. “आता आठवण आली का?”
“हो,” राधा लटक्या रागात बोलली. “जसा काही तू दर वर्षी येतो. राजू बोलला की त्याला त्याच्या सर्व मामांना भेटायचं आहे आणि माझ्या सुनेची पण ओळख करून द्यायची होती म्हणून घेऊन आली. एकतर तुम्ही दोघे पण त्याचा लग्नाला नाही आलात.”
“बरं झाल ते तू त्यांना घेऊन आलीस.” लताने राजूला प्रेमाने जवळ घेतलं. “बसां तुम्हाला नाश्ता आणते.”
बाकीच्यांनी त्यांनी बसून घेतलं. तर राजूची बायको लागलीच लताला मदत करायला किचनमध्ये गेली. लताने नकार देऊनही तिने लताला मदत केलीच आणि त्या दोघी परत हॉलमध्ये येऊन बसल्या.
“मग कधी आलास मुंबईवरून?” केशवने राजूला विचारलं.
“लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी.” राजू हलकेच हसत बोलला. “माझ्यापेक्षा हिलाच जास्त घाई घरी जायची.” राजू त्याच्या बायकोकडे बघून बोलला. “जसा काही मी तिचा तिकडे जाचचं करायचो आणि आई तिचे लाड.”
तसा तिथे हलकाच हशा पिकला.
“वहिनी वैभव नाही आला?” राधा सहज बोलून गेली.
“अम्म नाही,” लताला आता काय बोलाव तेच समजत नव्हत. “सुट्टी नाही म्हणे.”
“अच्छा, पण एका दिवसाने काय फरक पडला असता.” राधा चहा पीत बोलली.
“जाऊदे आता.” केशव मधेच बोलले. “कामाची माणस ती.”
ते जरी हसत बोलले असले तर त्यांचा पडलेला चेहरा राधाला सगळ काही सांगून गेला. तिने राजूकडे पाहिलं. “राजू ते नारळ राहील बघ. तेवढ घेऊन ये.” नंतर ती राजूच्या बायकोकडे वळून बोलली. “तू पण जा गं त्याच्यासोबत.
तसे ते दोघेही उठून चालले गेले. मग राधाने बोलायला सुरवात केली.
“वैभव त्याच्या सासरी गेला आहे ना, चार दिवस झाले.” राधा
तस ते दोघेही चमकून बघायला लागले. तर लताचे डोळे लगेच भरून आले.
“वैभव त्याच्या सासरी गेला आहे ना, चार दिवस झाले.” राधा
तस ते दोघेही चमकून बघायला लागले. तर लताचे डोळे लगेच भरून आले.
“आजवर मी जे केल तेच माझ्या वाट्याला आला आणि मी ते आता स्वीकारलं आहे.” लता तिचे डोळे पुसत बोलली.
“मी पण कधी हिच्या पुढे बोललो नाही आणि आज माझा मुलगा देखील त्याच्या बायकोपुढे बोलत नाही.” केशव देखील दाटलेल्या गळ्याने बोलले.
“जे झाल ते जाऊद्या,” राधा हलकेच हसत बोलली. “आता पुन्हा नव्याने सुरवात करा.”
“आता कुठली सुरवात?” लता निराशाजनक बोलली.
“हीच ती.” राधाने दाराकडे तिचा हात केला.
तस दोघा नवरा बायकोने तिकडे पाहिलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण दारात वैभव त्याच्या बायकोसोबत उभा होता. त्यांच्या मागे केतकी पण तिच्या मुलीसोबत आलेली दिसली.
“आपण नकळत केलेली चूक जेव्हा आपल्यासोबतच होते तेव्हा कस वाटत? हे जाणवून देण्यासाठी हे मला कराव लागल.” राधा त्या दोघांकडे बघत बोलली. “परत कोणत्या आईपासून तिचा मुलगा दूर जाऊ नये म्हणून हा आटापिटा.”
लताचे डोळे वाहू लागले.
“माहेरची ओढ असतेच ना,” राधा “पण त्याला ही मर्यादा असावी. तू तुझ्या सुनेला तुझ सासर जास्त दाखवल नाहीस. म्हणून तुझी सून पण त्याच वाटेवर जायला निघाली होती. तिलाही मी ओरडली आहे हो.” राधा वैभवच्या बायकोकडे बघून नाटकी आवाजात बोलली. “नाहीतर बोलशील फक्त मलाच बोलली म्हणून.”
तशी वैभवची बायको पण खुदकन हसली.
तोपर्यंत दारातली मंडळी घरात येऊन बसली. तस लताने वैभव आणि तिच्या सुनेला मिठी मारली. तशी तिकडे केतकी पण तिच्या आईने तिला सोडून बाकीच्यांना मिठी मारली म्हणून गाल फुगवून लागलीच त्यांच्यात घुसली. त्यांच्यामागे राजू आणि त्याची बायको देखील घरात येऊन पोहोचले.
आज त्यांची भाऊबीज चांगलीच साजरी होणार होती. कारण राधाने केशवच्या लहान्या भावाला त्याच्या कुटुंबासह इकडे बोलावलं होत. तिने त्याचीही चांगलीच कान उघडणी केली होती.
काही वेळातच ते देखील तिथे येऊन पोहोचले. ते दोघे भाऊ लागलीच एकमेकांच्या गळ्यात पडले. तर त्यांची मुल देखील एकमेकांना गळा भेट करून भेटू लागली. आरतीच ताट सजल गेल. बऱ्याच वर्षांनी त्यांची भाऊबीज एकत्र साजरी केली गेली.
आज खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यात ह्या दिवाळीने त्यांच्या नात्यावर आलेल्या अंतरावर जाणीवेचा प्रकाश टाकून त्यांची ती दुरावलेली नाती परत जुळवून आणली होती.
समाप्त.
कशी वाटली कथा? कमेंट करून सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा