चॅम्पियन ट्रॉफी
आत्म्याचं ग्रंथालय भाग 3
सुशांतच्या कानात कोणीतरी बोललं म्हणालं
“तू आला शेवटी. “
आई हे ऐकून मी दचकलो. मी इकडे तिकडे बघू लागलो तर मला कोणीच दिसलं नाही. मग मी विचारलं कोण बोललं? तर पुन्हा कानात आवाज आला.
“ तू आला शेवटी! तू येणारच होतास!”
या सगळ्या वाक्यांचा मला अर्थ लागत नव्हता. मी खूप प्रयत्न केला पण माझे पाय जागेवरून उचलतच नव्हते. पाय जमिनीला चिकटल्या सारखे झाले होते. आई मी ते पुस्तक सेल्फवर ठेवायला जाणार तर तिथे कुणाचातरी हसण्याचा आवाज आला.
मला समजेना कोण हसतय? इथे तर कोणीच दिसत नाही. मी ते पुस्तक ठेवताच ते आपोआप एकेक पान उलटायला लागलं. एक एक पान उलटत गेलं आणि मध्ये मध्ये त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. मला दिसलं पण समजलं नाही. मी आजूबाजूला बघून घाबरून म्हटलं
“कोण आहे इथे? मला सोडा तुम्ही मला जाऊ द्या. “
तेव्हा पुन्हा माझ्या कानाशी आवाज आला की,
“तुला आमच्यातच यायचं होतं. म्हणूनच तर तुला इच्छा झाली आमच्या ग्रंथालयात येण्याची.”
आई तो आवाज असा काहीतरी विचित्र घोगरा होता. तो ऐकताना आई मी खरच खूप घाबरलो आणि मी बाहेर पडायचं कसं याचा विचार करू लागलो. यावर आणखीन पुन्हा कोणीतरी बोललं,
“बाहेर जायला तुला मार्ग नाही. बाहेर जाऊ नको. आता तू पण आमच्यातलंच एक पुस्तक बनवून राहणार.”
मी हे ऐकल्यावर इतका घाबरलो इतका घाबरलो की त्यावेळ मला फक्त आई तू , ताई आणि बाबा आठवले ग. ताई माझी इतकी चेष्टा करते. मी तेव्हा रागवतो पण आता मला तिची तीव्र आठवण यायला लागली होती. बाबा रागावतात म्हणून मी चिडतो पण बाबांची आठवण आली. बाबांचं मला यातून सोडवतील असं वाटलं. मी स्वतःशीव ‘राम राम’ जोरात म्हणायला लागलो तशी सगळीकडे जोरात हसण्याचे आवाज यायला लागले.”
मी हे ऐकल्यावर इतका घाबरलो इतका घाबरलो की त्यावेळ मला फक्त आई तू , ताई आणि बाबा आठवले ग. ताई माझी इतकी चेष्टा करते. मी तेव्हा रागवतो पण आता मला तिची तीव्र आठवण यायला लागली होती. बाबा रागावतात म्हणून मी चिडतो पण बाबांची आठवण आली. बाबांचं मला यातून सोडवतील असं वाटलं. मी स्वतःशीव ‘राम राम’ जोरात म्हणायला लागलो तशी सगळीकडे जोरात हसण्याचे आवाज यायला लागले.”
बोलता बोलता थोडा वेळ सुशांत शांत बसला तसं आईच्या मनात आलं,
'खरंच विचित्र स्वप्न आहे. असं स्वप्न कधी ऐकलं नव्हतं. म्हणून सुशांत घाबरला असेल.'
तिने पुन्हा विचारलं,
तिने पुन्हा विचारलं,
“ सुशांत पुढे काय झालं?
“मी इथे फक्त वाचनासाठी आलोय. मला सोडा मला. पकडू नका. मला घाबरवू नका. असं मी म्हटलं तर आई सगळीकडे नुसता जोरजोरात बोलण्याचा आवाज यायला लागला. खूप गोंगट सुरू झाला. सगळे पुस्तकांचे शेल्फ हळूहळू माझ्याकडे येऊ लागले. त्यांना माझ्याकडे येताना पाहून मी घाबरलो आणि बाजूला असलेल्या जिन्यावरून धावत वरच्या मजल्यावर गेलो. तिथे गेल्यावर मला असं वाटलं की मी आता वाचलो. हे अदृश्य आत्मे मला त्रास देणार नाहीत”
“सुशांत पुढे काय झालं?”
आईने विचारलं.
"आई मी वरच्या मजल्यावर गेलो तिथे पण सगळी पुस्तकांचीच शेल्फ होती. मी तिथे जवळ जाऊन बघितलं तर तिथे एका फळ्यावर लिहिलं होतं.
१) रमेश जोशी आठ वर्षांपूर्वी गायब झाला अजून सापडला नाही त्याचं हे पुस्तक.
२) शशिकला जी पाण्यात वाहून गेली ती अजून सापडले नाही तिचं हे पुस्तक.
२) शशिकला जी पाण्यात वाहून गेली ती अजून सापडले नाही तिचं हे पुस्तक.
३) मंदार रघोस्ती. हा नऊ वर्षाचा मुलगा झाडावर चढला आणि नाहीसा झाला. त्याचे हे पुस्तक.
आई हे सगळं वाचल्यावर ना माझं डोकं गरगरायला लागलं. हे काय आहे? हा गायब झाला, तो गायब झाला आणि त्याची ही पुस्तकं. अशी बरीच नाव त्या फळ्यावर लिहिली होती ती पुढे वाचणं मला कठीण गेलं. मला काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात माझ्या कानाशी पुन्हा आवाज आला,
“ तुझं पण असं पुस्तक एखाद दिवशी निघणार आहे. तुझा विश्वास नसेल तर तू थोडा वेळ इथेच थांब. तुझं पुस्तक निघेल.”
आई मला दरदरून घाम सुटला मी कसा इथून निघून जाऊ हेच मला कळत नव्हतं.”
“ तिथून निघण्यासाठी तू काय प्रयत्न केलेस? पुढे काय झालं?”
आईने विचारलं.
“आई मी तिथून सुटण्यासाठी एवढा धडपडत होतो. जोरजोराने पाय हलवत होतो. मला का पाय हलवता येत नाही हे कळत नव्हतं पण मी काहीतरी तोडायचा प्रयत्न करतोय असं लक्षात आलं. माझ्या अवतीभवती काहीतरी बांधलेलं होतं पण ते दिसत नव्हतं. मी खूप प्रयत्न करत होतो. जे माझ्या भोवती बांधलं आहे ते तोडण्याचा प्रयत्न करत होतो. ते इतकं कठीण होतं की माझे हात रक्तबंबाळ झाले होते. शेवटी मी खूप घाबरलो. शेवटी मी इतका घाबरलो इतका घाबरलो आणि मी उठलो.मला जाग आली .कितीतरी वेळाने लक्षात आलं की मी माझ्या खोलीत आहे आणि मला जे पडलं होतं ते स्वप्न होतं.”
सुशांतची छाती अजूनही धपापत होती. अजूनही चेहरा घाबरलेला होता. आई म्हणाली,
सुशांतची छाती अजूनही धपापत होती. अजूनही चेहरा घाबरलेला होता. आई म्हणाली,
“ सुशांत आता जरा फ्रेश हो. जे होतं ते स्वप्न होतं ना ? त्यामुळे आता त्यावर फार विचार करू नको. पटकन तयार हो आणि खाली नाश्त्याला ये.”
आई खाली गेली. सुशांतने कसंबसं स्वतःला सावरलं पण अजूनही त्याच्या छातीची धडधड कमी झाली नव्हती. पायात अजून थरथर होती.
आत्मा हा शब्द उच्चारला तरी आपण घाबरतो. सुशांतने तर स्वप्नच आत्म्याचे बघीतले होते.
त्या स्वप्नातून सुशांतला बाहेर यायला वेळ लागेल तेवढा वेळ देऊ या.
—---------------------------------------
समाप्त
लेखिका मीनाक्षी वैद्य
—---------------------------------------
समाप्त
लेखिका मीनाक्षी वैद्य