अतरंगीरे एक प्रेमकथा १३९

In marathi

जेवणाच्या टेबलवर अगदी शांतता पसरली असते. 

विराजला मात्र जेवण जातच नसत.. काकाने लावलेल्या सवयीमुळे ताटात घेतलेले जेवण तसच टाकुन रूममध्ये जायला त्याच्या जीवावर येत.. मोबाईल हातात घेत शौर्य सोडुन परत सगळ्यांना फोन लावतो.. पण कोणीच त्याचा फोन उचलत नाही.. मोठ्या पप्पांना इथे ठेवुन घेतलं म्हणुनच सगळे आपल्यासोबत अस तुटक वागतायत.. अस त्याला आत्ता वाटु लागलं.. शेवटी न राहवुन तो शौर्यला फोन लावतो.. पण शौर्य त्याचा फोन कट करून टाकतो.. थोड्याच वेळाने शौर्यचा मॅसेज त्याला येतो.. क्षणाचा विलंब न करता तो शौर्यने काय मॅसेज केलाय हे बघायला मोबाईल हातात घेतो.. 

【 If you are calling me to make that house in your name, please don't do it.. I will not do anything like that.. right now I am enjoying with my family.. Plz don't disturb me & my Deshmukh family.. You enjoy with your Kulkarni family..】

हातातील मोबाईल रागातच खाली आपटावा इतका त्याला शौर्यने केलेल्या मॅसेजचा राग आला असतो.. मोबाईल तसाच लांब ढकलत डोक्याला हात लावुन तो बसतो..

अनघा इशाऱ्यानेच त्याला काय झालं म्हणुन विचारते.. अनघासोबत काहीही न बोलता तो तिच्याकडे बघुन न बघितल्या सारख करत समोर असलेल्या ताटात बघत रहातो.. आणि ताटात घेतलेल्या जेवणासोबत चमच्याने खेळत बसलेला.. काकींच्या हातच्या जेवणाची सवय लागल्यामुळे त्याला ताटातील जेवण खर नकोस झालं होतं..

मोठी मम्मी : काय झालं?? जेवत का नाहीस??

विराज मानेनेच काही नाही बोलत जबरदस्ती ताटातील जेवण संपवु लागतो.. तोच अनघाला गाथाचा फोन येतो.. अनघाच तसही जेवुन झालं असत..  विराजला सोबत म्हणुन ती तिथे बसुन असते..

तुम्ही सगळे जेवा मला घरून फोन येतोय.. मी निघते.. अस बोलत विराजला इशारा करतच अनघा तिथुन जाते..

मोठी पप्पा : विराज तु किती दिवस आम्हाला अस लोकांच्या दारावर ठेवणार आहेस ते आज सांग मला.. आम्ही इथे आलेलं कोणालाच नाही आवडत.. आम्ही आलोय म्हणुन सगळे अस निघुन गेलेत इथुन.. 

विराज : अस नाही आहे.. तुम्ही उगाच...

असच आहे.. आणि तु त्यांची बाजु घेऊन आमच्याशी बोलणार हे माहितीच आहे मला.. (मोठे पप्पा विराजला मध्येच थांबवत बोलतात..) तसही आमच्यापेक्षा तुला ती लोकच महत्वाची आहेत.. आम्ही जगलो काय आणि मेलो काय तुला काहीच फरक पडत नाही..

विराज : आत्ता अस नको ते का बोलतायत?

मोठे पप्पा : खर तेच बोलतोय मी.. 

विराज : कालच बोललो ना मी.. तुम्ही सगळ्यात जास्त इंपोर्टटंट आहात माझ्यासाठी.. 

मोठे पप्पा : मग आमच्यासोबत अलिबागला रहायला कधी येतोस ते सांग.. का आम्हांला अस लोकाच्या दारावरच ठेवणार आहेस..

विराज : परत तेच तुमच.. मी हे सगळं सोडुन नाही येऊ शकत.. आणि जरी मी यायच ठरवलं तर अनु तिथे यायला तैयार नाही..

मोठी मम्मी : मी समजवते तिला मग तर झालं??

विराज काहीही न बोलता शांत बसुन असतो.. कारण त्याला माहित असत कितीही झालं तरी अनघा अलिबागला जायला तैयार होणारच नाही..

मोठे पप्पा : लोणावळ्यातील फार्म हाऊस अजुन तुझ्याच नावावर आहे ना.. का तुझ्या सावत्र आईने ह्या बंगल्यासारख तो पण स्वतःच्या मुलाच्या नावावर केलाय..?? नाही म्हणजे सुरज जिवंत असे पर्यंत तरी तुझ्याच नावावर होता.. सुरज गेल्यानंतर तिने तिचा निर्णय बदलला वैगेरे नाही ना?? 

(विराजचे मोठे पप्पा थोडे तोऱ्यातच विराजला विचारू लागले.. निदान त्या निमित्ताने तरी विराज आपणच सगळ्यांना लोणावळ्याला पाठवलंय हे सांगतोय का हे मोठ्या पप्पांना खरतर बघायच होत.. )

विराज : माझ्याच नावावर आहे..

मोठी मम्मी : मग कधी जातोस की नाही तिथे??

विराज : कामाच्या गडबडीत तुमच्याकडे यायला पण वेळ नसतो.. लोणावळ्याला कुठे जाऊ मी??

मोठे पप्पा : ते पण आहे म्हणा.. पण तुला आणि तुझ्या बायकोला अस एकट्याला टाकुन सगळे असे कसे लोणावळ्याला निघुन गेलेत..??

(विराज हातातील घास तसाच पकडत मोठ्या पप्पांकडे बघु लागतो)

 अस का बघतोयस..?? लोणावळ्यालाच गेलीत ना ती लोक??

विराज : मोठे पप्पा ती लोक नाशिकला गेलेत लोणावळ्याला नाही.. लोणावळ्याच्या फार्म हाऊसची किल्ली माझ्याकडे असताना ती लोक तिथे कशी जातील?? आणि आत्ता अनु ने तुमच्याच पुढ्यात सांगितलं ना नाशिकला आहेत ती लोक.. मग तुमचं लोणावळा कुठे आलं मध्येच..??

मोठे पप्पा : आत्ता तु एवढ बोलतोयस म्हणजे नाशिकलाच गेले असतील.. 

मोठी मम्मी : पण मी काय म्हणते.. एवढा मोठा बंगला तुला द्यायच सोडून एवढ्या लांब फार्म हाऊस घेऊन दिलंय.. जिथे कधी तुझं जाण नाही आणि येणं नाही.. 

मोठे पप्पा : सावत्र आई आहे शेवटी.. सगळं काही विचार करूनच करणार ती.. 

मोठी मम्मी : आत्ता पण कस वागली बघितलातना.. तुला आणि आमच्या सूनबाईला अस टाकुन नाशिकला बर निघुन गेली ते ही अस लपुन.. शेवटी तुम्हां दोघांना ते आपलं मानतच नाहीत अस म्हणावच लागेल आत्ता.. तस तुला तिने आपलं कधी मानलच नव्हतं.. पण तुला ते पटतच नाही.. आत्ता तरी पटतंय ना??

दोघांचही विराजला भडकवण चालु असत.. विराज शांत बसुन दोघांची। चालू असलेली बडबड ऐकत असतो.. 

तोच डॉक्टर सामंतचा त्याला फोन येतो..

हो लगेच येतो अस बोलत तो फोन कट करतो.. मला हॉस्पिटलमध्येही जावं लागेल.. हॉस्पिटलमधुन आल्यावर बोलतोच तुमच्याशी अस बोलत तो जेवणाच्या ताटावरून उठुन आपल्या रूममध्ये निघुन जातो..

हा मुलगा काही ऐकुन घेणाऱ्यातला नाही.. मला ह्याच्यावरच संशय वाटतोय.. नक्की हा सुरजचाच आहे की कुणा दुसऱ्याचा.. विराज तिथुन निघुन जाताच मोठे पप्पा मोठ्या मम्मीला बोलतात..

मोठी मम्मी : आत्ता नको ते का बोलताय तुम्ही..? 

मोठे पप्पा : किती खोटं बोलतोय तो आपल्यासोबत.. लोणावळ्याला स्वतःच पाठवलंय आणि अस दाखवतोय की ह्याला काही माहितीच नाही.. एक तर काल रात्रीच त्या शेखरच्या मुलाचा जीव घ्यावासा वाटत होता.. भिकारी कोण आहे हे कालच दाखवणार होतो मी त्याला.. 

मोठी मम्मी : तुम्ही शांत बसा बघु..

मोठे पप्पा : अजिबात शांत बसणार नाही मी.. त्याला जेव्हा त्याच्या बापाकडे पोहचवेल ना तेव्हाच शांत बसेल मी.. आत्ता सकाळ सकाळी त्याच्याकडुन कळलंच आहे तो लोणावळा आहे मग तिथुनच त्याला त्याच्या बापाकडे पाठवतो..

अस बोलत हातात मोबाईल घेत मोठे पप्पा त्यांच्या माणसांना शौर्यला मारण्यासाठी लोणावळ्याला असलेल्या विराजच्या फार्म हाऊसवर पाठवतात.. हॉलमध्ये लावलेला शौर्यचा फोटॉ आपल्या मोबाईलमध्ये काढत तो फोटॉ ते त्या माणसांना पाठवतात..

मोठी मम्मी : विराज हे घर स्वतःच्या नावावर करून घेईल अस मला तरी वाटत नाही.. मला अस वाटत सूनबाईंनाच ह्याला समजवायला सांगायला हवं.. ती बोलल्यावरच हे घर हा स्वतःच्या नावावर करून घ्यायच मनावर घेईल..

मोठे पप्पा : एकदाच हे घर विराजच्या नावावर झालं की शौर्यच्या सगळ्या कुटुंबाला धक्के मारून ह्या घरातुन बाहेर काढणार मी.. 

मोठे मम्मी : ह्यासाठी आधी हे घर आपल्या विराजच्या नावावर व्हायला हवं ना??

मोठे पप्पा : ते होईल तेव्हा होईल.. पण त्या शेखरच्या मुलाला मी आज संपवणारच.. तोच नसेल तर अनिता स्वतःहुन हे घर विराजच्या नावावर करेल..

मोठी मम्मी : आणि नाहीच केलं तर?? त्या शेखरचा भाऊ सुद्धा जिवंत आहे.. लक्ष्यात आहे ना?? शौर्यकडुन हे घर विराजच्या नावावर होऊ द्यात मग त्या शौर्यच तुम्हांला जे काही करायचं ते करा.. कारण शौर्य स्वतःहुन बोलला आहे ना तो हे घर आपल्या विराजच्या नावावर करायला तैयार आहे म्हणुन..

मोठ्या पप्पांना सुद्धा मोठ्या मम्मीच बोलणं पटत.. ते परत आपल्या माणसांना फोन करून शौर्यवर फक्त लक्ष ठेवायला सांगतात.. मी जोपर्यंत काही बोलत नाही तो पर्यंत त्याला काही करायचं नाही.. आणि तो जे काही करतोय ते मला कळवा अस देखील सांगतात..

विराज हॉस्पिटलमध्ये जातो.. डॉक्टर सांनंतच्या केबिनमध्ये जातो..

डॉ.सामंत : ये.. तुझीच वाट बघत होतो..

विराज : सगळं ठिक आहे ना??

डॉ. सामंत : हो सगळं ठिक आहे.. मी पुढील दोन आठवडे युरोप मध्ये असणार आहे.. म्हणुन तुला आज अस घाई घाईत बोलवुन घेतलं.. पेशन्ट एकदम ओके आहे.. काळजी करण्यासारख काहीच नाही.. त्याच्या डोक्याला म्हणजे मेंदुला जास्त स्ट्रेस पडेल अस वागु नका.. नुकतीच मोठी सर्जेरी झाल्यामुळे डोके दुःखी जाणवत राहील.. त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही.. हळुहळु ते सुद्धा कमी होईल.. 

विराज : डिस्टचार्ज कधी मिळेल??

डॉ सामंत : अजुन एक आठवडा किंवा त्याहुन थोडे जास्त दिवस लागतील.. पुर्ण आठवडा तो आमच्या म्हणजे डॉ वैद्य यांच्या ओब्जर्व्हेशन खाली असणार.. म्हणजे त्याचा मेंदू अगदी पहिल्यासारख काम करतो का हे ह्या दिवसात ते चॅक करणार आहोत.. जर सगळंच ओके वाटलं की मग डिस्टचार्ज देऊ.. डॉ वैद्य सोबत मी बोललोय.. तु त्यांच्यासोबत बोलुन फॉलोअप घेत रहा.. आणि काही इमरर्जेन्सी असेल तर माझा पर्सनल नंबर असेल तुझ्याकडे तु केव्हाही कॉल करू शकतो..

विराज : तुम्हांला जितक थेंक्स बोलेल तितक कमीच पडेल अस मला वाटत.. 

डॉक्टरांकडे वृषभ बद्दल इतर विचारपुस करत आणि सोबतच त्यांचे आभार मानत विराज वृषभला बघायला त्याच्या वोर्ड मध्ये जातो..

वृषभ आपल्या बहिणीसोबत आणि इतर मित्र मंडळींसोबत गप्पा मारत बसलेला असतो..

विराज : कस वाटतंय आत्ता??

वृषभ : बर वाटतंय.. 

ताई : बसा ना..

वृषभची बहीण उठुन विराजला बसायला सांगते..

विराज : नॉ.. इट्स ओके.. 

आत्ता बस ना.. किती फॉर्मेलिटी करतोयस तु.. प्रतीक जबरदस्ती विराजला चेअरवर बसवतच बोलतो..

महेश : तु उभा राहिलास तर वृषभचे पाय दुखतील.. हो ना वृषभ..??

प्रतीक : क्योंकी रिश्ते में तो तुम उसके बॉस लगते हो..

प्रतीक अस बोलताच सगळे हसु लागतात..

वृश्या मी बाहेर आहे.. घरी फोन करून येते.. अस बोलत वृषभची ताई बाहेर निघुन जाते..

वृषभ : डॉक्टरांना भेटुन आलोय मी.. तुला आज जनरल वोर्ड मध्ये शिफ्ट करतील.. जर त्यांना तु परफेक्ट वाटत असशील मग एक आठवड्याने घरी सोडतील किंवा त्याहुन जास्त दिवस पण लागतील..

वृषभ : एक आठवडा?? ( वृषभ तोंड पाडतच बोलतो)

प्रतीक : विर डॉक्टरांना सांगुन तु दोन आठवडे कर.. वृषभला इथे जास्त आवडतंय..

वृषभ : अजिबात नाही.. एक मिनिट सुद्धा नको वाटतंय इथे.. 

विराज : आत्ता फक्त एकच आठवडा मग घरीच असणार तु.. जेवढा आराम करायचा आहे तेवढा करून घे मग तुला असा आराम करायला काही मिळणार नाही.. ऑफिस परत जॉईंट करायचं की नाही.. 

विराजने ऑफिसच नाव काढताच वृषभचा चेहरा लगेच पडतो.. 

विराज : काय झालं?? ऑफिसमध्ये नाही यावस वाटत का??

वृषभ : ते पोलिस आलेले सकाळी.. त्यादिवशी काय झालेलं ते सगळं विचारत होते.. तु निखीलच्या अगेंन्स FIR नोंदवलीस ना??

विराज : इन्फ्युचर अस दुसऱ्या कुणासोबत होऊ नये म्हणुन मला अस करावं लागलय.. मला सुद्धा एवढ्या डिप जायच नव्हतं बट तुझी कंडिशन जी आम्ही सगळयांनी जवळुन बघितली त्यावरून मला तेवढं डिप जावं लागल.. 

प्रतीक : हा कॅस मागे घ्यायच बोलतोय..

(प्रतीक अस बोलताच वृषभ मान खाली घालुन बसतो...)

विराज : व्हॉट??

महेश : त्याला 10 वर्षाची शिक्षा होईल ना म्हणुन ह्याला टेन्शन आलंय??

विराज : वृषभ तुला कोण बोललं त्याला 10 वर्षांची शिक्षा होईल.??

वृषभ : ते मी पोलिसांना विचारलं.. तेव्हा ते बोलले.. 

विराज : म्हणुन तु कॅस मागे घेतोयस??

वृषभ : त्याच करिअर खराब होईल रे.. आणि एवढे दिवस जेल मध्ये राहुन थोडी समज त्याला आली असेल अस मला वाटत.. म्हणुन मी कॅस मागे घ्यायचा विचार करतोय. म्हणजे एक संधी देऊन बघायला काय हरकत आहे..

विराज : तुझ्याच सारखा विचार करून त्याला लास्ट टाईम सुधारायची एक संधी मी दिली.. बट तो नाही सुधारला.. उलट त्याने लास्ट टाईम पेक्षा मोठी चूक केली.. आठवतय ना तुझ्या बर्थडे दिवशी काय झालेलं ते.. जर त्याला सुधारायच असत तर लास्ट टाईम मी त्याला समज देऊन सोडलेलं त्या दिवसापासूनच तो सुधारायची सुरुवात केली असती.. आणि जर खरच काही सिरीयस नसतना तर मी स्वतः त्याच्यावर पोलिस कम्प्लेन्ट केलीच नसती.. मला तरी अस वाटत की तु ही कॅस मागे घेऊ नये.. पण शेवटी तु डिसाईड कर तुला काय करायचय ते...

वृषभ खुप वेळ शांत बसुन असतो.. 

प्रतीक : काय करायचं ठरवतोयस मग??

वृषभ : जे विर बोलेल तेच.. आत्ता पर्यंत त्याच सगळं ऐकत आलोय.. ह्या पुढे सुद्धा त्याचच ऐकेल..

विराज ओठांवर गोड हसु आणतच वृषभकडे बघु लागतो..

प्रतीक : SD कुठेय?? काल रात्री पासुन गायब आहे.. फोन पण उचलत नाही आहे तो..

वृषभ : रॉबिन आणि आर्यन पण नाही आलेत काल पासुन. 

विराज : शौर्य नाशिकला गेलाय..

वृषभ : अचानक?? म्हणजे काल इथेच होता.. अस काही बोलला नाही.

विराज : थोडं काम होत त्याच.. म्हणजे सगळी फॅमिलीच गेलीय नाशिकला..

वृषभ : USA कधी जातोय तो??

विराज : जेव्हा त्याला वाटेल तेव्हा.. एक काम कर तुच त्याला विचार आणि मग मला सांग.. एकदा इंडियात आल्यावर आपण USA मध्ये काही तरी शिकतोय हे विसरून जातो तो..

नेहमीच्या वेळेत पिऊ सुद्धा वृषभला भेटायला तिथे येते..

प्रतीक : चला आत्ता आपल्याला निघायला हवं.. वृषभला पर्सनल बोलायच असेल.. हो ना वृषभ..

प्रतीक पिऊकडे बघत वृषभला चिडवु लागतो..

वृषभ : तुला थांबायचं तर थांबु शकतोस तु..

प्रतीक : अस बोलतोस मग थांबतो मी..

महेश : प्रतीकला सोबत म्हणुन मी पण थांबतो.. चालेल ना वृषभ??

वृषभ गालातल्या गालात हसतच दोघांकडे बघत असतो.. पिऊच काही वेगळं नसत..ती सुद्धा गालातल्या गालात हसत वृषभकडे बघत थोडी लाजत असते.. तिच ते लाजण वृषभला अगदी घायाळ करत असत..

पिऊला बघुन विराजला काही तरी आठवत.. 

हे हॉस्पिटलमध्ये येता येता तु माझ्या हातात दिलेलंस.. लास्ट टाईम वृषभने दिलेलं किचॅन तो परत त्याच्याकडे देतो..

प्रतीक : हेच किचॅन तु आम्हांला शोधायला पाठवलेलंस ना??

वृषभ : हम्मम.. विर हे किचॅन तुला कुठे भेटलं??

विराज : तुला आठवत नाही का लास्ट टाईम तुच माझ्याकडे दिलेलंस ते??

वृषभ : नाही ना.. म्हणजे नेहमी मी हे माझ्या जवळच ठेवतो ना.. मला वाटलं माझ्याकडुनच हरवल असेल हे.. मी खुप आठवण्याचा प्रयत्न करत होतो बट आठवत नव्हतं काही.. ह्या लोकांना पण बोललो माझ्या ऑफिसच्या गेटजवळ पडलं असेल.. नाही तर जिथे मी लास्ट टाईम बसलेलो तिथे.

प्रतीक : आणि आम्ही जाऊन शोधुन पण आलो..

विराज : एवढं काय आहे ह्या किचॅन मध्ये..??

प्रतीक : ते.. खुप स्पेसिअल आहे रे विर.. हो ना पिऊ?? 

पिऊ वृषभकडे बघत हसतच आपली मान होकारार्थी हलवते..

महेश : तुझा दादा कुठेय??

पिऊ : तो सकाळीच अलिबागला गेलाय.. 

महेश : एकटा??

पिऊ : रॉबिन आणि नैतिक पण होता.. 

प्रतीक : आपल्याला टाकुन हे तिघ अलिबागला कसे काय जाऊ शकतात यार.

विराज : शौर्य पण होता काय??

पिऊ : नाही.. हा पण त्यानेच गाडी पाठवलेली.. त्याच्या गाडीतुनच तर गेलेत ती लोक अलिबागला..

महेश : लास्ट टाईम पण हे लोक लोणावळ्याला गेलेले.. तेव्हा पण आपल्याला अस टाकुन गेलेले.. आत्ता पण तेच.. ह्या लोकांकडे बघुयाच आत्ता..

वृषभ आम्ही बाहेर आहोत अस बोलत प्रतीक रॉबिनला फोन लावतच त्याच्या रूमबाहेर पडतो..

विराज सुद्धा त्यांच्यासोबत रूमबाहेर पडतो..

कुठेस रे तु?? रॉबिन ने फोन उचलल्या उचलल्या उचलल्या प्रतीक विचारतो..

फोन स्पिकरवर ठेव.. महेश इशाऱ्यानेच प्रतीकला फोन स्पिकरवर ठेवायला सांगतो..

रॉबिन : माझा फियांसी असल्यासारखे प्रश्न काय करतोयस तु मला..? आणि मॅन म्हणजे तुला असल्या नसत्या चौकश्या करायची एवढी वाईट सवय कधी पासुन लागली??

महेश : ए रॉबिन आम्हाला माहितीय ह्या वेळेला पण तुम्ही सगळे लपुन अलिबागला ट्रिप एन्जॉय करायला गेले आहात..

रॉबिन : क्या बात हे महेश.. तु मारलेला अंदाज पण अगदी करेक्ट निघाला..

प्रतीक : आम्हांला का नाही सांगितलंस अलिबागला जातायत ते..?

रॉबिन : ते माझा मुड नव्हता रे.. आणि जरी सांगितलं असत तर तिथे वृषभ सोबत कोण थांबल असत?? सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो यार.. आणि आत्ता पण तुमच्याशी बोलायच्या मुड मध्ये मी नाही.. खुप बिझी आहे रे मी. गाडी ड्राइव्ह करतोय.. DND..

शौर्य आहे का तिथे विचार ना त्याला... विराज हळुच प्रतीकला सांगतो..

प्रतीक : SD आहे ना तिथे??

रॉबिन : हा.. म्हणजे नाही.. 

प्रतीक : आहे की नाही आहे??

रॉबिन : नाही..

महेश : तु आर्यनला फोन दे बघु..

रॉबिन : पागल आहे काय?? माझा मोबाईल मी आर्यनला का देऊ?? हल्लीच नवीन घेतलाय मी.. अजुन वर्ष पण नाही झालंय..

प्रतीक : ए नोटंकी आर्यनला फोन दे ना गप्प.. 

रॉबिन : आर्यन माझ्यासोबत नाही आहे..

प्रतीक : खोट नको बोलुस.. आर्यन तुझ्यासोबतच आहे.. आम्हांला पिऊ बोलली..

रॉबिन : तुझी शप्पथ तुझा आर्यन माझ्यासोबत नाही रे मित्रा..

प्रतीक : ए रॉबिन माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे यार मी.. माझी खोटी शप्पथ कसली घेतोयस.. घ्यायची झाली तर तुझ्या ज्यो ची शप्पथ घेना..

रॉबिन : ए हाफ मॅड मी खरी शप्पथच घेतलीय.. माझ्यासोबत फक्त नैतिक आहे.. आर्यन शौर्य सोबत गेलाय.. आम्ही एका मिशनवर काम करतोय.. बट दोन वेगवेगळ्या टीम बनवुन.. सगळं तुला अस फोन वर नाही सांगु शकतरे मी.. 

महेश : कसलं मिशन?

रॉबिन : मिशन मॉगेम्बो.. 

रॉबिन अस बोलताच प्रतीक महेशला काही तरी इशारा करतच फोन कट करून टाकतो.. 

विराज : फोन का कट केलास??

प्रतीक : तो असच वेड्यासारखं काही तरी बोलेल म्हणुन.. मला नाही काही ऐकायचं..

विराज : मिशन मॉगेम्बो काय आहे हे??

दोघेही आपले ओठ वाकडे करत आम्हांला काही माहिती नाही अस दाखवतात.. विराज जास्त काही विचार न करता शौर्यला फोन लावत तिथेच एका बाकड्यावर बसून रहातो.. पण शौर्य त्याचा फोन उचलत नाही..

इथे अलिबागला चौघेही एका ठिकाणी भेटतात..

नैतिक : त्या मॉगेम्बोचा कसला भारी बंगला आहे यार.. तुझ्या बंगल्याला पण मागे काढेल असा बंगला त्याने बनवलाय..

रॉबिन : त्याच्या बंगल्याचा सिक्युरिटी गार्ड पण त्याच्या सारखाच आहे यार.. फोटॉ काढायला पण देत नव्हता.. हजार प्रश्न..

शौर्य : मग फोटॉ नाही काढले का??

नैतिक : फक्त फोटॉ नाही मित्रा.. व्हिडीओ काढलाय.. हा रॉबिन असताना कसलं टेन्शन घेतोयस तु.. 

आर्यन : आत्ता नवीन काय केलं ह्याने??

नैतिक : त्या सिक्युरिटी गार्डला बोलला आम्ही यशराज फिल्म मधुन आलोय.. शुटिंग साठी बंगला हवाय.. फक्त तेवढंच नाही त्याला पण पिच्चर मध्ये एक छोटा मोठा रॉल करायला घेऊ अस बोलल्यावर त्याने डायरेक्ट बंगल्यात नेऊन आम्हांला चहा पाणी सुद्धा ऑफर केली..

शौर्य : क्या बात हे रॉबिन..

रॉबिन : हे सगळं सोड.. हे आपण मॅनेज केलं.. पण पुर्ण गावात हा मॉगेम्बो मोठा गुंडा असल्यासारखं लोक त्याला घाबरतात.. त्याच्या घरचा एड्रेस विचारला तरी लोक घाबरत आमच्याकडे बघुन लांब पळुन जातात.. त्याची ही सगळी प्रोपर्टी कोणी विकत घेईल अस मला वाटत नाही.. विकुन विकुन विकणार कोणाला??

नैतिक : हो ना. इंडियात कोणीच त्याची प्रोपर्टी विकत नाही घेणार.. आणि जो कोणी घेईल तो नेक्स्ट डे ती प्रोपर्टी फुकट कोणाला तरी देऊन टाकेल एवढा डेंजर आहे तो.. 

शौर्य : पण इंडियात कुणाला प्रोपर्टी विकायचीच नाही आहे रे.. इंडिया बाहेर हि प्रोपर्टी विकायची.. अस बोलत शौर्य आपल्या खिश्यातुन मोबाईल काढतो..

म्हणजे?? तिघेही एकत्रच त्याला विचारतात..

शौर्य : ते सांगतो मी तुम्हांला.. आज विरला जास्तच आठवण येतेय माझी.. किती कॉल करतोय यार हा. 

रॉबिन : उचल ना मग.. 

अजिबात नाही.. शौर्य त्याच्या मोबाईलमध्ये विराजचा रिंगिंग होणारा कॉल कट करतच आपल्या USA मधील मित्राला फोन लावता.

शौर्य : A Hiee..Ron..whats ap man..

ए हिरॉ तुझं व्हॅटसप, फेसबुक इंस्टा जे काही आहे ते बाजुला ठेव आणि मॅन पॉईट वर ये. शौर्यच्या हातातुन मोबाईल खेचुन घेतच रॉबिन बोलतो..

आर्यन : हा ना.. SD डोन्ट वेस्ट टाईम

शौर्य :  Ron listen.. last time you have said that your dad is searching to buy a  property in India near by Sea.. still your dad looking property like this??
 
रॉन : off course yes.. Do you know of any such property as I told you?

शौर्य : yaa.. In my knowledge there is one excellent property available in India..  All the documents are legal also i have sent u property pic and all the property regarding papers on your whatsapp number.. Just tell your Dad go through this ..

रॉन : On whose name the property is registered?? I mean who is the owner of the property??

शौर्य : The property is on my brother's name. He have one buyer also.. who is interested in this same property.. But you are a very special friend of mine so I want you to buy this property.. it is to your advantage.. your dad can open a new branch of his company here in india.

रॉन : Thanks dude.. but I first will speak with my dad about its and by tomorrow will inform u. 

शौर्य :  If you are going to tell me your decision tomorrow, then forget everything I told you now .. I don't have that much time ..Because my brother has already got a good buyer for this property .. He is from England.. He will come from here day after tomorrow  to deal with this property.. If you are really interested in this property then you have to tell me your decision now and If you really want to buy a property, you have to come to India tomorrow only.

रॉन : Why are you in such a hurry man? 

शौर्य : I just told you why I'm in a hurry ..?? Then??

रॉन : Just give me two an hour. I show my dad the property papers that you just WhatsApped me and then tell you ..

शौर्य : two hour!!  Dude.. You're taking me too long, 

रॉन : It will take so much time to look at the property papers .. you are in a hurry then let it be ..
(रॉन थोडं भाव खातच बोलतो)

शौर्य : You won't find such a nice property near the sea all over India .. If you really don't want it then I call Joseph because he is also interested in similar property.. bye take care dude ..

रॉन : wait wait.. Give me at least half an hour

शौर्य : ok.. Just and only half an hour.. no more than that..

एवढं बोलुन शौर्य फोन कट करून टाकतो..

नैतिक : समोरच्याला कसली भारी हुल देतोस यार तु

शौर्य : दुसऱ्या कन्ट्रीत तसच रहावं लागत रे.. आत्ता मॅन गोष्ट ही फाईल्स (हातातील फाईल्स आपल्या मित्रांना दाखवत शौर्य बोलतो) ज्यांची जमीन त्या मोगेम्बोने ग्रेब (बळकावणे) केलीय.. त्यांची जमीन त्यांना परत करायची आहे.. मी आणि आर्यन ती सगळी जमीन बघुन आलोय.. 

आर्यन : विरचा हात दुखणार आहे एवढ्या पेपर्स वर साइन करून..

शौर्य : बट प्रॉब्लेम असा आहे त्या मॉगेम्बोच बँक अकाउंट कस खाली करायचं??

नैतिक : एवढी प्रोपर्टी त्याच्या हातातुन गेल्यावर तो खरच जिवंत राहील??  जे तु त्याच बॅंक अकाउंट पण खाली करायला चाललायस?? आय मीन हार्ट एटेक वैगेरे नाही का येणार त्याला??

शौर्य : अस नको बोलुस.. तो हार्ट एटेकने मेला मग मी एवढी मेहनत घेतोय त्याचा काय फायदा..??? 

शौर्य मोठ्या पप्पांच बँक अकाउंट कस खाली करायचं ह्याचा विचार करत तसाच बसला असतो..

तोच बरोबर अर्ध्या तासाने त्याचा USA चा मित्र त्याला फोन करून ती प्रोपर्टी घायला त्याचा डॅड इंटरेस्टेड आहे अस सांगतो शौर्य सुद्धा त्याला लगेच दुसऱ्यादिवशीच इंडियात बोलवुन घेतो..

एवढे फोन करून शौर्य आपला फोन उचलत नाही म्हणुन विराज खुप नाराज असतो.. कोणीच आपल्याला समजुन घेत नाही आहे अस त्याच झालं असत.. एटलिस्ट ह्या वेळेला अनघाने तरी समजुन घ्यायला हवं होतं बट ती सुद्धा मला समजुन नाही घेत.. एकाच वेळेला खुप सारे विचार त्याच्या डोक्यात घर करत होते.. डोक्यात घर करून बसलेल्या विचारांनी डोकं अगदी दुखू लागलं असत.. 

वृषभला जनरल वोर्ड मध्ये शिफ्ट करेपर्यंत 8 वाजतात.. तस वृषभला बाय करत तसाच तो घरी जायला निघतो..

साधारण संध्याकाळी साडे आठ वाजता तो घरी पोहचतो..

अनघा : विराज फोन करत होती मी तुला.. कँटीन्युअस तुझा फोन बिझी.. कोणाशी एवढं बोलत होतास.. हॉस्पिटलमध्ये गेलायस हे तुझ्याकडुन कळण्याऐवजी मोठ्या मम्मीकडुन कळतय मला.. वाजले किती?? एक फोन करू शकत होतास ना तु..

विराज : तु फोन वर बोलत बसलेलीस.. एकदा फोन वर बोलायला लागलीस की एक दोन तास फोन वरच असतेस तु.. कधी आणि कसं सांगु तुला.??

अनघा : एवढा वेळ मी कधीच फोन वर बोलत नाही हा विराज.. आणि अस चिडचीड करायला काय झालंय तुला..??

विराज शांत बसुन असतो.. अनघा त्याच्या जवळ जात प्रेमानेच त्याला काय झालं म्हणुन विचारते..

विराज : तुम्ही कोणीच मला समजुन नाही घेत आहात.. मम्माची परमिशन घेऊनच मी मोठ्या मम्मी पप्पांना इथे रहायला बोललो.. तरी मम्मा अस नंतर रागवते माझ्यावर.. मम्माच नाही तुम्ही सगळेच.. काल शौर्य पण हव नको ते बोलत होता त्याहुन जास्त तर नको नको ते आरोप माझ्यावर करत होता.. आत्ता पण मॅसेज करून नको ते बोलतोय.. मला त्रास होतोय सगळ्या गोष्टींचा.. प्रत्येकाचा विचार मिच करत बसलोय.. त्याच सोड तु तर बायको असुन तुझं काय..?? काल रात्री तु कशी वागत होतीस..?? इकडे इस्यु नको म्हणुन त्यांच्यासोबत जाऊन राहुयात अस बोलत होतो ना मी.. मम्माला आणि शौर्यला त्यांचा त्रास होतोय हे कळत होतं मला.. म्हणुन मिच निघुन जायच बोलत होतो पण तु सोबत यायला तैयार नाहीस.. का अस वागतेयस?? मोठे पप्पा आहे यार माझे.. डॅड चे मोठे भाऊ आहेत ते.. मी नाही सांभाळणार तर कोण सांभाळणार त्यांना?? त्यांना जर सांभाळणार कोणी असत तर मी त्यांना ह्या घरात कधीच आणलं नसत.. ते घरी आले म्हणुन सगळ्यांनाच त्रास होतोय अस सगळेच दाखवुन देतायत.. तसही मोठ्या पप्पांच इतर कोणासोबत रिलेशन नाही बट तुझ्यासोबत रिलेशन लागतंय ना त्यांच?? तुला पण त्यांचा त्रास होतोय.. काल तु जे काही वागलीस ते आठवुन मला त्रास होतोय.. आत्ता मला भीती वाटते.. परत तुला काही बोलायला गेलं की परत घरी बाबांना फोन करून न्यायला बोलवशील तु.. आणि अजुन एक तुला घरी जाऊन रहावस वाटत असेल तर तस बोल मला आणि जाऊन रहा.. बट इकडच्या गोष्टी तुझ्या माहेरी कळायला नकोत एवढंच मला वाटत.. इन फ्युचर तुझी बहिण माझ्या भावाची होणारी बायको आहे.. तु अश्या घरातील लहान सहान गोष्टी तुझ्या घरी सांगत बसलीस तर बाबा गाथाचा हाथ सहजासहजी शौर्यच्या हातात देतील अस मला नाही वाटत.. आणि हे सुद्धा माझ्यासाठी नाही शौर्यसाठी मी बोलतोय.. तस बघायला गेलं तर गाथापासुन इकडच्या गोष्टी लपुन रहाणार नाहीत कारण शौर्य तिच्यापासून काही लपवत असेल अस मला नाही वाटत.. पण गाथा असल्या गोष्टी घरी सांगत असेल अस पण मला नाही वाटत.. तु तिच्या पेक्षा मोठी आहेस पण तरीही मला तुला सांगावस लागतंय आणि परत एकदा सांगतोय इकडे जे काही चाललंय ते तु तुझ्या घरी सांगु नकोस..

(अनघा विराजला काही बोलणार तोच विराज तिला इशाऱ्यानेच थांब बोलतो)

मला ह्या विषयावर कोणासोबतच नाही बोलायच.. आणि मी कोणासोबतच काहीही बोलायच्या मुड मध्ये नाही आहे.. कोणासोबत म्हणजे कोणासोबतच.. कारण कोण माझा विचार करून बोलेल अस वाटत नाही.. तु तुझा विचार करणार.. ती देशमुख फॅमिली त्यांचा विचार करणार.. मोठे मम्मी पप्पा स्वतःचा विचार करणार.. म्हणुन मला कोणाशीच म्हणजे कोणाशीच नाही बोलायचंय..

अनघा : देशमुख फॅमिली?? हे कधी पासुन झालं??

विराज : आज पासुनच.. त्या लोकांनीच अस बोलायला भाग पाडलय..

अनघा काही बोलणार तोच मोठी मम्मी त्याला आवाज देत बोलवुन घेतात.. विराज जास्त काही न बोलता रूमबाहेर पडतो.. विराजच्या अश्या वागण्याने अनघाची सुद्धा आत्ता थोडी फार चिडचिड होत असते..

मोठी मम्मी नेहमीच्या प्रमाणे हातात घेतलेली तेलाची वाटी दाखवत विराजला दाखवत आपल्या पुढ्यात बसायला सांगते.. विराजच डोकं तसही दुखतच असत.. क्षणाचा विलंब न करता तो सरळ मोठ्या मम्मीच्या पुढ्यात जाऊन बसतो..

मोठी मम्मी : किती त्रास करून घेतोय.. इथे जा.. तिथे जा.. सगळ्यांच्या पाठी नुसती पळापळ करत असतोस..

मोठ्या मम्मीची एकटीची बडबड चालु असते.. विराजला त्याच्या लहानपणीचे एकएक किस्से सांगत ती त्याच्या डोक्यावर तेल घालुन मस्त अशी मालिश करत असते.. विराज मात्र गप्प तिच्या पुढ्यात बसुन असतो.. त्याच तिच्या बोलण्याकडे लक्षच नसत.. जास्त थकल्यावर आत्या असच त्याच्या डोक्यावर तेल घालत त्याच्याशी गप्पा मारत बसते हे त्याला आठवत असत.. एवढी काळजी घेणारी आपली आत्या पण आज आपला फोन नाही उचलत म्हणुन खुप वाईट वाटत असत त्याला.. आत्या सोबतची मस्ती आठवुन ओठांवर हलकच हसु येत असत त्याच्या.. मोठ्या मम्मीला अस वाटत की त्याच्या लहणपणीच्या गंमती जंमती ऐकुन तो हसतो आहे..

इथे शौर्य अलिबागच काम आटोपुन नाशिकला आपल्या घरी पोहचतो..

काका : किती रे उशीर?? बाकीची मित्र मंडळी कुठेत??

शौर्य : ती तिथुनच घरी गेली.. आपण उद्या सकाळीच इथुन निघुयात..

आत्या : पेकिंग करून ठेवलीय.. तु सांग तस निघुयात..

अनिता : शरू आपण आत्ताच लोणावळ्याला जाऊन राहिलो असतो ना..

शौर्य : आत्ता कुठे विरच्या मोठ्या पप्पांची माणसं मला शोधायला तिथे लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर पोहचली असतील ग.. फार्म हाऊस त्यांना बंद दिसेल म्हणुन ते मोठ्या पप्पांना फोन लावतील.. बट त्यांचा फोन काही लागणार नाही.. कारण माझी गॅंग त्यांना फोन करून त्रास देत असेल.. रागाच्या भरात ते फोन स्विच ऑफ करतील. त्यांची माणस बिचारी थंडीत तिथे लोणावळ्यातच कुडकुडत बसतील.. तोपर्यंत आपण आपली हि आजची रात्र मस्त पैकी एन्जॉय करूयात.. तस पणमाझ्या क्युट क्युट सिसॉला इथे खुप आवडत.. (साक्षीचे गाल खेचतच शौर्य बोलतो..)

साक्षी : मी तुझ्याशी बोलणार नाही आहे.. आज तु पुर्ण टाईम माझ्यासोबत स्पेन्ड करणार होतास ना?? मग??

शौर्य : मग आत्ता करतोना.. कुठे जाऊयात बोल..?? 

अनिता : आत्ता रात्रीच तुम्ही दोघे कुठेही जाणार नाही आहात.. उद्या लोणावळ्याला गेल्यावर जेवढी मज्जा मस्ती करायची तेवढी करा.. 

शौर्य : साक्षी आपण उद्या खुप धमाल करूयात.. उद्या वहिनी पण आपल्यासोबत येईल.. तु बोलशील ते करूयात चालेल??

हम्ममम... साक्षी आपली मान होकारार्थी हलवतच हो बोलते..

अनिता :  मला तर अस वाटतय ना आपण डायरेक्ट पोलिस कम्प्लेन्ट करावी.. आज तु घरात येईपर्यंत आमचा जीवात जीव नव्हता.. असलं घाबरत जगणं नकोस वाटतंय.. 

शौर्य :  पुरावे काय देणार तु पोलिसांना?? काही तरी पुरावे हवेत म्हणुन हे सगळं चालु आहे ना.. आणि घाबरतेस का अस?? मी तुम्हा कोणाला काहीही होऊ देणार नाही.. विश्वास आहे ना माझ्यावर..??

आत्या : दादा सारख तुला पण गमवू अशी भीती वाटतेय रे.. तुला एकट बाहेर सोडायला पण नको वाटतंय.. तु साक्षीला पण तुझ्यासोबत घेऊन USA निघुन जा.. मी आणि समीर सांभाळतो इथे सगळं..

आत्या डोळ्यांत पाणी आणतच शौर्यला बोलते..

शौर्य : आत्या.. यु आर माय बॅकबॉन.. तु अस बोललीस तर कस चालेल ग?? आत्ता कोणीही नको ते टेन्शन घेणार नाही आहे.. मला भुक लागलीय मी जेवण ऑर्डर करतोय. नाही तर आपण एक काम करूयात.. आज मस्त पैकी हॉटेलमध्ये जाऊन फॅमिली डिनर करूयात.. साक्षी काय बोलतेस तु..

आय एम रेडी.. नेहमी प्रमाणे शौर्यला टाळी देतच ती बोलते..

शौर्य सगळ्यांची समजुत काढत सगळ्यांना अपल्यासोबत घेऊन हॉटेलमध्ये जेवायला जातो.. 

इथे मुंबईत मात्र मोठ्या पप्पांच जेवता जेवता फोन वर मोठं मोठ्याने ओरडण चालु असत..

मला माझं घर वैगेरे नाही विकायचय. एकदा सांगुन कळत नाही का?? का सारख सारख फोन करतायत.. तुम्हांला नंबर कुठुन मिळाला?? 

वारंवार वाजणाऱ्या फोनवर त्यांची सॅमच प्रतिक्रिया असते..

कारण शौर्यने सांगितल्या प्रमाणे त्याची मित्र मंडळी आपआपल्या मोबाईलवरून आळीपाळीने त्यांना कॉल करून त्रास देत असतात.. 

विराज : काय झालं.??

मोठे पप्पा : मगासपासून नुसतं रोंग नंबरवरून फोन येतायत.. हे बघ परत तेच.. (हातातील मोबाईल विराजला दाखवतच मोठे पप्पा उचलतात)

अनघाला शौर्यची चालू असलेली ही करामत सगळी माहिती असते.. जेवता जेवता ती गालातल्या गालात हसतच जे काही चालु आहे त्याचा आनंद घेत असते..

अनघा : एक काम कराना.. मोबाईलच स्विच ऑफ करून टाका.. 

आत्ता मी तेच करणार होतो.. डोकं उठवलय माझं ह्या फोन ने.. अस बोलत मोबाईल स्विच ऑफ करून तिथे बाजुलाच ठेवुन देतात..

【done.. ????】 

अनघा आपला मोबाईल हातात घेत शौर्यला मॅसेज करते..

विराज जेवुन झाल्यावर रुममध्ये ये थोडं महत्वाच बोलायचंय.. अस बोलत मोठे पप्पा तिथुन निघुन जातात.. 

विराज जेवुन होताच आपल्या मोठ्या पप्पांच्या रूममध्ये जातो..

विराज इथे येऊन बस बघु.. विराज रूममध्ये येताच मोठे पप्पा त्याला प्रेमाने आपल्या पुढ्यात बसायला सांगतात..

विराज : काय झालं??

मोठे पप्पा : तुला आम्ही तुझ्यासोबत रहावं अस मनापासून वाटतंय ना?? 

विराज : आत्ता परत काय झालं?? अस अचानक का विचारतायत तुम्ही..??

मोठे पप्पा : एकदा खात्री करून घेतोय फक्त.. 

(विराज काहीही न बोलता मान खाली घालुन शांत बसुन असतो..)

कसला एवढा विचार करतोयस??

विराज : तुम्हांला इथे जास्त दिवस नाही रहाता येणार.. कारण हे माझं घर नाही.. 

मोठे पप्पा : म्हणजे आम्ही तुला नकोय असाच अर्थ होतोय ना..

विराज : माझं घर असत तर रहा म्हणुन बोललो असतो ना.. 

मोठे पप्पा : पुढे जाऊन हे अस काहीतरी होईल हे माहिती होत मला म्हणुनच आधीच तुझ्यामागे लागुन हे घर तुझ्या नावावर करून घे अस बोललो होतो ना.. पण तुला आमचं बोलणं कधी पटतच नाही.. काही बोलल की अस गप्प मान खाली घालुन बसतोस.. अलिबागला चल बोललो तर बायकोच ऐकुन तिथे पण यायच नाही बोलतोस.. आपल्या मोठ्या पप्पांच काहीही ऐकायचं नाही अस तु सुरुवातीपासुनच ठरवलंयस..

मोठे पप्पा एकटेच बोलत असतात.. विराज मात्र मोबाईलमध्ये शौर्यने त्याच्या स्टेटस मध्ये ठेवलेले फॅमिली डिनरचे फोटॉ बघत असतो.. 

लक्ष कुठेय तुझं?? मोठे पप्पा थोडं ओरडतच त्याला बोलतात..

माझं डोकं दुखतंय.. मला आत्ता कोणत्याच विषयावर नाही बोलायचंय.. 

विराज रागातच आपल्या रूममध्ये यायला निघतो.. रूममध्ये येऊन बघतो तर मोठी मम्मी अनघासोबत बोलत बसली असते.. विराजला रूममध्ये आलेलं बघुन काहीही न बोलता ती गप्प आपल्या रूममध्ये जायला निघते..

अनघा : उद्या सर्वेश आणि गाथा न्यायला येतेय मला.. मी घरी जातेय.. ह्या घरची माणसच आपल्यामुळे ह्या घरी रहाणार नसतील तर मी ह्या घरी रहाणार नाही.. 

विराज : म्हणुन मी काल इथुन निघ बोलत होतो ना?? 

अनघा : आणि कुठे नेणार होतास मला?? अलिबागला?? तुझ्या ह्या मोठ्या मम्मी पप्पांसोबत..?? 

विराज : थोडे दिवस त्यांच्यासोबत राहुच शकत होतो ना आपण..

अनघा : थोडे दिवस विराज?? एक दिवस पण त्यांच्यासोबत मला रहायला नाही जमणार.. आत्ता इथे येऊन तुझी मोठी मम्मी काय बोलत होती माहितीय मला.. तुझ्या नवऱ्याला हे घर त्याच्या नावावर करून घ्यायला सांग.. शौर्य आणि मम्मी चांगल्या नाहीत.. तुझा नवऱ्याला पण शौर्य आवडत नाही.. पहिलं त्याने पण त्याला मारून टाकायचा प्रयत्न केलेला पण तो वाचला.. काहीही करून एकदाच हे घर विराजच्या नावावर करून घे.. मग आपण सगळे मिळुन नकोत्या लोकांना ह्या घराबाहेर करू.. अस खुप काही बोलत होत्या त्या.. मला माहिती त्या जे काही बोलल्यात तस तु वागला नसणार पण अस नको ते आपल्या नवऱ्याबद्दल ऐकुन कस वाटतंय तुच सांग.. त्या लोकांना इथे ठेवुन तु खुप मोठी चुक केली आहेस.. तुझे मोठे पप्पा आहेत तुच त्यांच्यासोबत रहा.. जो पर्यंत ती लोक ह्या घरी आहेत तो पर्यंत मी इथे नाही राहु शकत.. आय एम सॉरी.. 

विराज : अनु तुझ्याशिवाय मी एकटा कसा राहु हा तरी विचार कर.. 

अनघा : माझ्याशिवाय विराज?? ती लोक आली तस तु घरातील इतर मंडळींना पण विसरून गेलायस.. मी तुझी बायको असुन तु मला विसरून गेलास.. दिवसभर तु लॅपटॉपमध्ये असतोस उरलेला वेळ त्यांच्या रूममध्ये..  तुझा एकट रहाण्याचा प्रश्नच नाही येत आहे.. एकट मला राहावं लागतंय ह्या घरी म्हणुन मी माझ्या घरी जातेय.. आणि घाबरू नकोस घरी काही नाही सांगत आहे मी.. पण तु माझ्या घरी मला न्यायला आलास मग मात्र मला घरी सगळं खर खर सांगाव लागेल.. 

विराज डोक्याला हात लावुन तसाच बेडवर बसुन रहातो..

काल शौर्यने रडतच मला एक प्रश्न केलेला.. जर त्याच्या जागी स्वराज असता तरी विरने त्या माणसांना ह्या घरात ठेवलं असत का?? माझ्याकडे त्याच्या ह्या प्रश्नाच उत्तर नव्हतं विराज.. तुझ्याकडे असेल तर सांग मला..  आणि रातोरात तुला न सांगता सगळे नाशिकला का पळाले, तुझाफोन का नाही उचलत  ह्याचापण विचार कर.. 

जास्त काहीही न बोलता अनघा गप्प पणे आपली बेग भरते.. रूमची लाईट बंद करत गप्प बेडवर आडवी पडते.. विराज मात्र तिने त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधत असतो... त्याचा डोळा कधी लागतो हे त्याच त्यालाच कळत नाही..

सकाळी जाग येते तेव्हा अनघा रुममध्ये नसते.. खरच गेली की काय.. असा विचार करत तो रूम बाहेर पडतो.. हॉलमध्ये सर्वेश आणि गाथा त्याला दिसतात.. सर्वेशने अनघाची बेग पकडली असते..

विराज अनघाला आवाज देतच एक एक जिने उतरत असतो.. 

विराज : तु खरच चाललीस??

अनघा : काल तुला बोलली ना मी..?? 

सर्वेश : दि मी बाहेर आपल्या गाडीत आहे.. तुझी बेग गाडीत ठेवली.

विराज : सर्वेश आज कॉलेज नाही तुझं??

दि साठी सुट्टी घेतली.. विराजकडे न बघताच सर्वेश त्याला बोलतो..

नेहमी प्रमाणे जिजु जिजु करणारा सर्वेश आज विराजला थोडा वेगळाच वाटतो..

विराज गाथाकडे बघतो.. गाथासुद्धा विराजसोबत काहीही न बोलता घराबाहेर पडते..

विराज : काय झालंय ह्यांना??

अनघा : जे मला झालंय.. बाय.. 

विराज : अनु प्लिज.. नको ना जाऊस.. (विराज अनघाचा हात पकडत तिला रिक्वेस्ट करतच बोलतो)

अनघा : मी त्या लोकांसोबत नाही राहु शकत विराज.. बाय..

विराजच्या हातातुन आपला हात सोडवतच अनघा त्याला बोलते.. विराज हॉल मधील सोफ्यावर बसत अनघाला तिथुन जाताना फक्त बघत रहातो.. आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे आपण खुप जणांना आपल्यापासून लांब केलं अस विराजला सुद्धा कुठे तरी वाटु लागलं असत.. सगळं काही कळतंय पण वळत नाही अस काहीस त्याच झालं असत..

क्रमशः 

(आत्ता पुढे काय?? पाहुया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. )

निवेदन

ह्या पुढे अतरंगीरे एक प्रेमकथा ह्या कथेचे पुढील भाग ईरावर पोस्ट होणार नाही.. कृपया सगळयांनी ह्याची नोंद घ्यावी.. ईरा ने घेतलेल्या नवीन निर्णयाच आपण सर्वांनी पालन करूयात असे मला वाटते.. कथा कॉपी पेस्ट होऊ नये म्हणुन मी ती ईराच्या फेसबुक पेजवर डायरेक्टली पब्लिश करु शकत नाही.. हिच कथा की प्रतिलिपीवर सुद्धा पोस्ट केली आहे.. ज्यांना खरच कथेत पूढे काही घडेल हे जाणुन घ्यायचे असेल तर त्यांनी ह्या कथेचे नाव म्हणजेच अतरंगीरे एक प्रेमकथा असे गूगल वर टाकले तरी प्रतिलिपीवर हि कथा मिळून जाईल.. ईरा ने एक लेखक म्हणुन मला स्वतःची ओळख दिली त्याबद्दल ईराचे मनापासुन आभार.. मानधनाची कोणतीही अपेक्षा नसता ईरावर कथा पोस्ट करता येत नाही ह्याचे वाईट वाटते. बाकी माझ्या ईरा वाचकांचे मनापासून आभार की त्यांनी कथेला खुप छान प्रतिसाद दिला.. 

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all