अतरंगीरे एक प्रेमकथा १40

In marathi

अनघा घराबाहेर पडते पण विराज बद्दल विचार करून तिला खुप वाईट वाटत असत.. विराजपासुन लांब रहाण्याचा साधा विचार सुद्धा तिला करवत नव्हता.. चेहरा पाडतच ती आपल्या गाडीत बसली असते..

सर्वेश : आत्ता तरी मला कोणी सांगणार आहे का?? नक्की काय चाललंय ते?? मला जिजूंसोबत अस वागायला तुम्ही लोकांनी का सांगितलं ते..??

अनघा : तुझ्या जिजूंना चांगलं आणि वाईट ह्यातला फरक नाही कळत आहे.. नको त्या लोकांची सेवा करून श्रावण बाळ बनायला चाललाय तो.. म्हणुन हा सगळा खटाटोप करतोय आम्ही.. 

सर्वेश : म्हणजे??

गाथा : सर्वेश आपण घरी गेल्यावर ह्या सर्व विषयावर बोलुयात.. आत्ता असे प्रश्न करून दि ला त्रास नको देऊस तु.. दि इथुन पुढे जो मॅन हाय वे लागतो ना तिथे शौर्य तुझी वाट बघत उभा आहे..

म्हणजे दि तु आमच्यासोबत घरी नाही येत आहेस?? सर्वेश तोंड पाडतच अनघाला विचारतो..

अनघा : नाही.. मी माझ्या फेमिलीसोबत लोणावळ्याला जातेय.. आणि अस तोंड नको पाडुस.. नेक्स्ट मंथ तुझी एक्झाम आहे तेव्हा टु विक तुमच्या सोबत येऊन रहाणार आहे मी.. ओके..

सर्वेश : बट जिजूंना तर असच वाटलं असेल ना की दि आपल्या घरी येतेय.

गाथा : आपण पण जिजूंना फक्त अस दाखवत होतो ना की आपण त्यांच्यावर रागवलोय.. आणि रागातच दि ला घरी घेऊन जातोय.. बट दि घरी नाही येत आहे.. आणि ती अशी अचानक घरी आली की पप्पा आणि मम्मी दोघेही खुप टेन्शन घेतील.. ती तिच्या फॅमिली सोबतच रहाणार आहे.. आणि तिथे तिची गरज आहे..

सर्वेश : तुम्हा दोघींचं काय चालु आहे हे मला काही कळत नाही.

गाथा : नंतर सांगते बोलली ना मी तुला?? तु इथुनच कॉलेजला जा बघु..

ड्रायव्हर गाडी बाजुला घेतात.. आपल्या दि ला बाय करत सर्वेश तिथुनच कॉलेजला निघुन जातो..

शौर्य अनघाची वाट बघत पुढे हाय वे ला उभा असतो..

अनघा दिसताच शौर्य तिच्या गाडीजवळ जात तिची बेग घेतो..

तु पण येतेयस लोणावळ्याला?? गाथाकडे बघतच शौर्य तिला विचारतो..

गाथा : माझं कॉलेज आहे.. मी कॉलेजमध्ये चाललीय.. तु जे काही करतोयस ते विचार करून कर हे सांगायला मी इथे आलीय..

शौर्य : ते तर मी करेलच.. तु टेन्शन नको घेऊस.. आत्ता मी आणि वहिनी निघतो इथुन.. तु संभाळुन कॉलेजमध्ये जा.. आणि अभ्यासात लक्ष दे.. तुझ्याशी गप्पा मारत मी इथे बसलो की माझी फॅमिली तिथे फार्म हाऊस बाहेरच राहिल.. कारण फार्म हाऊसची किल्ली वहिनीकडे आहे.. वहिनी तु किल्ली आणलीस ना??

अनघा : हम्मम.. गाथा तु सांभाळुन जा कॉलेजला.. बाय... 

गाथा दोघांना बाय करून तिथुन आपल्या कॉलेजमध्ये जायला निघते..

अनघा शौर्य सोबत त्याच्या गाडीत जाऊन बसते.. तिच्या चेहऱ्यावरून तिला खुप टेन्शन आलंय अस सरळ सरळ दिसत होतं..

वहिनी.. असा चेहरा पाडत तु लोणावळ्याला येणार असशील तर राहु दे यायच.. तु जाऊन तुझ्या मोठ्या सासु सासऱ्यांसोबत त्यांच्या आदेशाच पालन करत घरीच रहा.. शौर्य गाडी ड्राईव्ह करतच अनघाला बोलतो..

अनघा : विराजची काळजी वाटतेय रे.. त्याला खुप त्रास होतोय.. जेवत नाही आहे तो नीट.. काल झोपला सुद्धा नाही आहे तो.. स्वतःला खुप त्रास करून घेतोय तो.. लास्ट टाईम तु बोलत नव्हता तेव्हा असच चालु होत त्याच.. नंतर किती आजारी पडला माहिती ना.. एक तर आपण कोणीच नाही आहोत तिथे.. सगळ्यांची आठवण येतेय त्याला.. आणि आपण जे वागतोय त्याने तो खुप हर्ट होतोय.. 

शौर्य : मग नको त्या गोष्टी करतोच कश्याला तो..?? आधीच लांब होते ना ती लोक..?? अस चोरून जाऊन त्या लोकांना भेटायची गरज होती का??  आणि तु पण अस नको त्या गोष्टीत त्याला सपोर्ट करतेस.. माझी गाथा जेव्हा मला नको त्या गोष्टीत सपोर्ट करते मग तिला बरोबर ओरडतेस.. आत्ता मी गाथालाच सांगतो तुला ओरडायला.. 

(शौर्य अस बोलताच अनघा त्याच्याकडे बघु लागते)

अस बघु नकोस माझ्याकडे.. मला तुझा खरच खुप राग आलाय.. नेहमी मला बोलतेस ना मग आज मी तुला बोलते.. विर त्या लोकांना भेटतो, त्यांच्यासोबत फोन वर बोलतो हे एकदा तुला मला पण सांगावस नाही वाटल का??

अनघा : विराज त्यांचात एवढा गुंतेल अस नव्हतं वाटलं रे मला.. आणि हे अस त्या लोकांना घरी वैगेरे ठेवेल ह्या गोष्टीचा तर मी विचारच नाही केलेला.. बट त्याला अस घरी एकट टाकुन येन मला नाही पटत आहे.. आणि लोणावळ्याच्या फार्म हाऊसचे पेपर्स आणि ही किल्ली..

शौर्य : थेंक्स..

अनघा : ह्या पेपर्सच काय करणार आहेस तु??

शौर्य : फार्म हाऊस मी माझ्या नावावर करून घेतोय ग..

अनघा : शौर्य मला पटेल अस बोल.. प्रोपर्टी मध्ये तुला आणि विराजला किती इंटरेस्ट आहे हे मला माहितीय..

शौर्य : विरला दाखवण्यासाठी ही प्रोपर्टी मी माझ्या नावावर करून घेतोय.. म्हणजे अस मी घेत नाही बट तस घेतोय.. (शौर्य अनघाला त्याचा पुढचा प्लॅन सांगतो)

अनघा : शौर्य मला हे खुप रिस्की वाटतंय रे.. म्हणजे नको वाटतंय हे सगळं.. विराज आणि माझा एक मित्र CBI आहे.. आपण त्याची मदत घेऊयात अस मला वाटत.. कारण हे सगळं करून काहीच साध्य नाही होणार आहे रे. आपण असे एकमेकांपासुन लांब राहतोय.. आणि ह्याचा त्रास फक्त नि फक्त आपल्याला होतोय.. तु तुझं USA ला जाऊन शिक्षण कम्प्लिट करायच सोडुन इथे अडकुन पडलायस, साक्षी स्कुल सोडुन इथे तिथे फिरतेय.. तिच्या नाजुक मनावर ह्या गोष्टी परिणाम करतायत ह्याचा विचार कर.. मम्मीना पण खुप त्रास होतोय. आधीच त्यांना बर नसत.. इथे विराज सुद्धा आतुन खुप दुःखी आहे.. आपण सगळेच आपले कामधंदे सोडुन हे अस नको ते करत बसलोय.. आपल्या सगळ्यांना आपल्या प्रत्येक कर्माची शिक्षा इथेच भोगायची असते शौर्य.. तसच मोठ्या पप्पांना पण भेटेल.. एवढा खटाटोप का करतोयस तु?? तुझ्या बाबाला न्याय आपण सगळेच मिळुन देऊयात पण तु जो मार्ग निवडलायस तो चुकीचा आहे.. त्यांना रस्त्यावर आणुन तु काय प्रूफ करणार मला हेच कळत नाही.. आणि अजुन एक तु त्यांची सगळी प्रोपर्टी अशी विकुन मोकळा होशील.. तुला पाहिजे ते सगळं काही करशील.. पण पुढे काय?? ते इतके हुशार आहेत कि ते विराजच्या कंपनीतुन त्यांचा हिस्सा मागायला कमी नाही करणार शौर्य.. आणि विराजच्या मनात नसताना त्याला त्यांना हिस्सा द्यावा लागणार.. मग विराजने परत अस काही केलं मग तुम्ही सगळेच परत विराजला ब्लेम करणार.. आणि जरी अस नाही करायचं ठरवलं मग तु ती कंपनी पण अस विकणार का?? तु एवढा हुशार असुन पुढच्या गोष्टींचा विचार नाही करत आहेस.. अस काही तरी कर ज्याला प्रॉपर एन्ड हवाय..

(अनघा अस बोलताच शौर्य गाडी बाजुला घेऊन स्टेरिंगवर डोकं ठेवुन विचार करू लागतो..)

शौर्य : काय करू मग मी???

अनघा : जे लास्ट टाईम विराजने करायला हवं होतं ते... 

शौर्य : म्हणजे?? 

अनघा तिने केलेला प्लॅन शौर्यला सांगते..

अनघा : ह्यात आपण माझ्या मित्राची मदत घेऊयात.. आणखी काही करता येईल का बघुयात.. तुला पटतय तर बघ..

शौर्य : पटत तर आहे.. बट USA वरून माझा मित्र इथे इंडियात येणासाठी निघाला सुद्धा आहे ग..  माझं जे ठरलंय ते मी आधी करेल.. म्हणजे त्या मोठ्या पप्पांची आहे नाही ती सगळी प्रोपर्टी मी विकणार आहे हे माझं ठरलंय ते मी करणार..  त्यानंतर तु बोलतेस तस काही तरी मी करायचा विचार करेल.. म्हणजे मला थोडा वेळ दे विचार करायला.. कारण मी जे करणार आहे त्यावरून विरला त्याचे मोठे पप्पा स्वतः त्यांच्या तोंडाने सांगतील की त्यांनी माझ्या बाबाचा एक्सिडेंट का घडवुन आणला ते..

अनघा : तस तु चुकीच काही करणार नाही मला माहिती आहे शौर्य.. बट मी हे अस कधी काही बघितल नाही रे म्हणुन मला खुप भीती वाटतेय.. आणि तुझी सुद्धा खुप काळजी वाटतेय रे.. लास्ट टाईम विरमुळे वाचलायस तु..

शौर्य : ए वहिनी कमॉन हा.. तो मॉगेम्बो माझ्या एका हाताचा पण नाही आहे हा.. त्याला एकच अशी दिली असती ना मी दहा दिवस जागेवरून उठला नसता तो.. उगाच तुझ्या नवऱ्याचा मोठे पणा नको करुस.. त्या मोगेम्बो पेक्षा मोठं मोठ्या टपोरी लोकांना मी तिथे USA मध्ये वरच्यावर धुत असतो.. तु त्या मोगेम्बोच काय घेऊन बसलीयस..

अनघा : मॉगेम्बो??

शौर्य : ते त्या मोठ्या पप्पाच पेट नेम आहे ग.. आणि मॅन गोष्ट तो जेव्हा मला मारत होता तेव्हा आपला घरचा मॅन गेट ऑपन होत असल्याचा आवाज मी ऐकला होता.. मम्मा त्या वेळेला घरी येईल अस मला वाटल नव्हतं.. असुन असुन कोण असणार तर आपला विर.. म्हणुन मी त्या मोगेम्बोला काही रिएक्शन देत नव्हतो.. त्यांना जे करायच होत ते करू देत होतो.. उगाच मी काही करायला गेलो असतो तर विरने मलाच ब्लेम केल असत.. म्हणुन जे काही करायचं ते विरलाच करू दे ह्या विचाराने मी शांत राहिलो.. बट विर माझ्या पेक्षा जास्त हुशार निघाला.. आपले मोठे पप्पा म्हणुन त्याने पोलिस कम्प्लेन्ट केली नाही आणि मम्माला सुद्धा करू नाही दिली.. 

अनघा : अस नाही आहे शौर्य.. लग्न तोंडावर होत म्हणुन त्याने जास्त इस्यु नाही केला..

शौर्य : कोणत्याही पुराव्या शिवाय मी कधीच काहीही बोलत नाही ग वहिनी.. मोठ्या पप्पांना वाचवण्यासाठीच त्याने पोलिस कम्प्लेन्ट केली नाही.. पुरावा तुला लोणावळ्याला गेल्यावर दाखवतो.. म्हणजे मला तेव्हा पण अस वाटलेलं की त्याचे मोठे पप्पा आहेत म्हणुनच त्याने पोलिस कम्प्लेन्ट नाही केली बट तुमच्या लग्नाच्या गडबडीत मी ते सगळं विसरून गेलो.. बट आधी त्या मॉगेम्बोकडे बघतो मग तुझ्या नवऱ्याकडे..

अनघा : अच्छा.. मग हे सगळं झालं तर मी पण तुझ्याकडे बघतेच.. USA जाऊन तुझ काय काय चालु असत ते हे गाथाकडुन कळत असत मला.. तस गाथा मला बोलली तुझा मोबाईल कसा फुटलेला ते.. म्हणजे ती मला तुला समजवायला बोलली बट विराज आधीच तुझ्यावर भडकलेला त्यात तुझं अस नको ते ऐकुन परत तुझ्यावर भडकेलं म्हणुन मी एवढे दिवस शांत होती.. 

शौर्य : वहिनी.. आपल्याला लोणावळ्याला पोहचायला उशीर होतोय अस वाटत नाही का तुला?? नको त्या टॉपिकवर तु डिस्कशन कसलं करत बसलीयस तु..

अनघा : अच्छा.. 

शौर्य : वहिनी हे सगळं बोलायची हि वेळ नाही ग.. आपण मिशन मॉगेम्बो वर काम करतोय.. डोन्ट फॉरगोट इट्स.. 

हो ना.. मी विसरलीच होती.. पण मिशन मॉगेम्बो झालं तर मिशन फाईटर शौर्यकडे मी माझा मोर्चा न्यायचा विचार करतोय.. अनघा तिरक्या नजरेने शौर्यकडे बघतच बोलते..

शौर्य : माय डिअर वहिनी.. मिशन मॉगेम्बो पुर्ण झालं तस मी मिशन USA कडे धाव घेईल ग.. बट वाया मिशन विर.. तुझं मिशन एक अपुर्ण मिशन म्हणुनच राहील..

अनघा : अच्छा?? (अनघा हसतच शौर्यकडे बघत बोलते)

गाडीत शौर्य आणि अनघाची एकमेकांसोबत मज्जा मस्ती चालु असते.. शौर्यने थोडा वेळ पुर्ती का होईना पण दोन दिवसांपासुन अनघाने घेतलेल्या स्ट्रेसमधून तिला जरा बाहेर काढलं होत.. 

विराज ऑफिसमध्ये जाण्याची तैयारी करत असतो.. आरश्यात बघत गळ्याभोवती टाय बांधत असतो.. तसाच हात आपल्या टायभोवती धरत तो अनघासोबतच्या आठवणीत हरवतो.. रोज अनघाच त्याला टाय बांधुन देते.. ती टाय बांधत असता विराज आणि तिची चालु असलेली मस्ती आठवुन हसु येत असत त्याला.. एका वेगळ्याच तंद्रीत तो हरवुन गेलेला असतो.. तोच मोठ्या पप्पांचा मोठ मोठ्याने ओरडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडतो.. गळ्या भोवतालची टाय तशीच बेडवर फेकत मोठे पप्पा कोणावर ओरडतायत हे बघायला त्यांच्या रूममध्ये जायला निघतो.. मोठ्या पप्पांच आपल्या माणसांवर फोनवर ओरडण चालु असत.. आपल्या रूमचा दरवाजा उघडा आहे ह्याकडे सुद्धा त्याच लक्ष नसत.. विराज मोठया पप्पांच्या रूम बाहेर उभं राहुन त्यांच फोनवरच बोलणं ऐकत असतो.. विराज आपल्या रुमबाहेर आहे ह्याकडे सुद्धा मोठ्या पप्पांच लक्षच नसत..

मोठे पप्पा : काहीच कामाचे नाहीत तुम्ही.. माझा फोन लागत नव्हता मग तिथेच मूर्खासारखं बसुन रहाणार का तुम्ही..??बसुन रहायचे पैसे देतो का मी तुम्हांला.. आत्ताच्या आत्ता तिथुन निघायच आणि मी सांगितलंय तिथे जायच.. त्या मुलाच काय करायचं हे...

विराज तु इथे?? मोठी मम्मी एका हातात ज्युसने भरलेला ग्लास पकडत आपला दुसरा हात विराजच्या खांद्यावर ठेवतच त्याला विचारते.. अचानक पाठुन मोठी मम्मी आली म्हणुन विराज थोडं घाबरतो.. मोठ्या पप्पांच लक्ष त्याच्याकडे जात.. 

त्या मुलाच काय करायच ते मी सांगतोच तुम्हांला.. तिथे पोहचल्यावर मला फोन करा.. आणि मी सांगेपर्यंत त्याला काहीही करायच नाही.. फक्त लक्ष ठेवा त्याच्यावर.. मोठे पप्पा रागातच फोन वर बोलत असतात आणि एका हाताने विराजला आत बोलवत असतात. विराज थोडं घाबरतच आत जातो..

तु अस माझ्या रूम बाहेर येऊन माझं बोलणं ऐकत होतास?? मोठे पप्पा रागातच त्याच्यावर ओरडतात??

विराज : तुमच्या रूम मधुन मोठं मोठ्याने आवाज येत होता म्हणुन मी इथे आलो होतो.. कोणत्या मुलावर लक्ष द्यायला सांगताय तुम्ही..

मोठे पप्पा : आहे एक.. आमच्याच गावातला.. मला धमकी देऊन गेलेला.. त्याच्याकडे बघायला सांगत होतो.. 

विराज कसला तरी विचार करत त्यांच्याकडे बघत असतो..

मोठे पप्पा : अस का बघतोयस??

तुमचं हे अस नकोत्या गोष्टी करणं कधी थांबणार आहे देव जाणे.. रागातच आपल्या मोठ्या पप्पांकडे बघत तो त्यांच्या रूममधुन बाहेर पडतो.. आणि आपल्या रूममध्ये येतो..

विराज अनघा घरी पोहचली की नाही हे बघायला तिला फोन लावतो.

अनघा : हम्मम बोल..

विराज : अजुन घरी नाही पोहचलीस का?? (आजु बाजुच्या येणाऱ्या गाड्यांच्या आवाजामुळे विराज अनघाला विचारतो)

अनघा : पोहचली.. 

विराज : मग एवढा गाड्यांचा आवाज??

अनघा : गाथा सोबत शॉपिंगसाठी बाहेर आलीय.. तु ब्रेकफास्ट केलास??

विराज अनघाच्या प्रश्नाच उत्तर न देता रागातच फोन कट करून टाकतो.. त्याच हे अस वागणं अनघाला अपेक्षित होत.. 

मोठी मम्मी विराजला चहा नाश्ता करण्यासाठी बोलवत असते.. 

नकोय मला.. रागातच तिला बोलत विराज घराबाहेर पडतो..

गाडीत बसल्यावर विराज मोठ्या पप्पांच्या बोलण्याचा विचार करू लागतो.. मोठे पप्पा शौर्यबद्दल तर बोलत नसतील ना?? तस पण त्यादिवशी शौर्य बोलत होता मोठे पप्पा त्याला धमकी देत होते म्हणुन.. मोठे पप्पा शौर्यला काही करणार तर नाही ना.. तो नाशिकला आहे हे माहितीय त्यांना.. लास्ट टाईम सारख त्यांनी माझ्या शौर्यला काही केलं तर?? मी का त्यांना इथे ठेवुन घेतल यार.. विराज स्वतःच्याच डोक्यात हात मारून घेत बोलतो..

विराज खिश्यातुन फोन काढत शौर्यला लावतो.. पण एज युजुअल शौर्य त्याचा फोन उचलत नसतो.. 

ऑफिस येई पर्यंत शौर्यला फोन लावणं त्याच चालु असत..

शौर्य आपली गाडी बाजुला घेतच विराजचा फोन उचलतो..

काय आहे?? शौर्य रागातच त्याच्यावर ओरडतो..

विराज : अस भडकत का बोलतोयस??

शौर्य : तुझ्यासोबत प्रेमाने बोलायला तेवढं तु माझं काही ठेवलं आहेस का??

विराज : शौर्य तु तीच गोष्ट नको ना धरून बसुस..

शौर्य : मी आत्ता खुप बिझी आहे.. गाडी ड्राईव्ह करतोय.. प्लिज मला डिस्टरब करू नकोस..

विराज : कुठे जातोयस??

शौर्य : कुठे तरी.

विराज : मला तुला भेटायचंय..

शौर्य : वहिनी घर सोडुन गेल्या गेल्या माझी आठवण आली का तुला?? 

विराज : तुला लगेच कळलं पण..

शौर्य : आत्ता माझी गाथा माझ्या पासुन हे सगळं लपवेल अस वाटतंय का तुला.. आणि आपल्या मोठ्या मम्मी पप्पांसोबत एन्जॉय करायचं सोडुन तु मला कसले कॉल करतोयस.. तुझ्यासोबत टाईम पास करायच्या मुड मध्ये मी नाही आहे आणि बोलायच्या मुड मध्ये तर अजिबात नाही.. मी खुप बिझी आहे आत्ता.. हा कॉल उचललाय पण ह्या नंतरचे कॉल उचलणार नाही.. भले कितीही कॉल केलेस तरी.. उद्या जर मला वेळ भेटला तर कदाचित मी तुझा कॉल उचलेल.. नाही तर नाही.. आत्ता गुड बाय.. 

विराजच काहीही ऐकुन न घेता शौर्य फोन कट करून टाकतो..

अनघा : तु विराज सोबत जास्तच रुडली वागतोयस??

शौर्य जास्त काहीही न बोलता मोबाईलमधल रेकॉर्डिंग ऑन करून आपला मोबाईल अनघाकडे देतो..

पुर्ण रेकॉर्डिंग ऐकताच अनघा गंभीर चेहरा करत शौर्यकडे बघते.. आणि त्याचा मोबाईल परत द्यायला आपला हात पुढे करते.

आत्ता कळलं अस का वागतोय मी त्याच्याशी?? अनघाला गोड अस स्माईल देत अनघाच्या हातातुन फोन काढुन घेतच तो तिला बोलतो..

गाडीत पुन्हा शांतता असते.. आणि फायनली अनघा आणि शौर्य लोणावळ्याला पोहचतात.. 

आपल्या वहिनीला बघुन साक्षीला खुप आनंद होतो.. जणु खुप वर्षांनी तिला ती दिसलीय इतका आनंद तिला होतो.. नेहमी प्रमाणे एक घट्ट मिठी मारतच ती त्याला भेटते..

विराज दादा?? प्रश्नार्थी चेहरा करत ती अनघाला विचारते..

अनघा : त्याला ऑफिसमध्ये खुप काम आहे.. तो उद्या नाही तर पर्वा येईल.. 

साक्षी : ओके.. 

अनघा : तुला जास्तच आठवण येतेय वाटत विराजची..

साक्षी : खुप म्हणजे खुप जास्त.. बाबा त्याला फोन करायला पण नाही देत...

अनघा शौर्यकडे बघत साक्षीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिच्या सोबत आत निघुन जाते.. 

शौर्य अनघाने सांगितलेल्या प्लॅनचा विचार करत स्विमिंगपुल जवळ बसुन असतो.. 

काका : इथे का बसलायस??

शौर्य : उद्या मी घरी जातोय.. 

काका : घरी जाऊन तुला त्या माणसाने काही केलं म्हणजे?? मी तुला घरी अजीबात सोडणार नाही..

शौर्य : त्याने काही तरी करावं म्हणुनच मी घरी जातोय.. वहिनीचा मित्र आहे एक.. तो CBI  आहे.. वहिनी त्याच्यासोबत बोलली आहे.. तो आपल्याला मदत करेल..

काका : काय करणार आहेस आत्ता..

शौर्य : ते वहिनीसोबत बोलल्यावरच कळेल तुला.. 

(काका शांत बसुन असतो..)

माझ्यामुळे खुप त्रास होतोय ना तुला??

काका : शौर्य तुझा त्रास मला आत्तापर्यंत कधीच झाला नाही आणि कधी होणार सुद्धा नाही.. तुला होणाऱ्या त्रासाचा मला त्रास होतोय रे.. तुझी काळजी वाटतेयरे खुप.. आत्ता पर्यंत किती काय सहन करत आला असशील ह्याचा विचार मी ह्या दोन दिवसांपासुन करतोय रे.. माझी मलाच लाज वाटु लागलीय.. दादा नंतर तु माझी जबाबदारी होतास आणि मी वहिनीवर असलेल्या रागामुळे तुला टाकुन निघुन गेलो.. माझ्या एवढ्याश्या जीवाने किती सहन केल असेल तेव्हा ह्याचा विचारच मला करवत नाही..

शौर्य : ए काका तु आत्ता रडु नकोस ना.. मला नाही काही त्रास झालाय.. तु नको ते विचार करतोयस.. तु चल बघु इथुन.. स्विमिंग पुल मध्ये आधीच भरपुर पाणी आहे.. तुला तुझ्या डोळ्यांतुन पाणी काढुन त्यात भर टाकायची गरज नाही रे...

(आपल्या काकाचे डोळे पुसतच शौर्य त्याला बोलतो)

आजचा पुर्ण दिवस मला माझ्या साक्षी सोबत स्पेन्ड करायचा आहे.. चल बघु तु इथुन.. आपण सगळे मस्तपैकी तिच्यासोबत काही तरी खेळुयात.. 

काकाचा हात पकडतच तो त्याला आत घेऊन जातो..

शौर्य आणि अनघा जमेल तेवढ आपल्या फॅमिलीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते..

इथे शौर्य आणि त्याचा परिवार नाशिकला सुद्धा नाही भेटत म्हणुन मोठ्या पप्पांची चिडचिड होत असते.. आपल्या सगळ्या माणसांना त्यांनी पूर्ण नाशिक पालथ घालुन त्या लोकांना शोधायला लावलं होत.. पण शेवटी पदरी निराशाच पडते..

विराज कामावर तर आला असतो पण त्याच लक्ष मात्र कामावर लागत नव्हत.. केबिनमध्ये बसुन आपण कस वागलोय ह्या गोष्टीचा विचार करत तो बसला.. संध्याकाळ होऊन जाते तरी त्याला घरी जावस वाटत नव्हतं..  कारण घरी वाट बघणारी त्याची माणस त्याला दिसणार नसतात.. पण शेवटी स्वतःची समजुत काढत तो ऑफिसबाहेर पडतो..

रात्री विराज आपल्या मोठ्या मम्मी पप्पांसोबत डायनींग टेबलवर बसुन असतो..

काका मला लाईम ज्युस बनवुन द्या.. मला जेवण नकोय..

बर नाही वाटत का?? मोठी मम्मी विराजच्या कपाळावर हात लावुन त्याला ताप वैगेरे आहे का हे बघते..

विराज : तब्येत आहे ग बरी बट मला आज जेवण नकोस वाटतंय.. म्हणुन ज्युसच पितोय..

बर.. अस बोलत मोठी मम्मी जेवु लागते..

विराजला त्या क्षणाला देशमुख फॅमिलीची आठवण येते.. अस काही झालं तर जो पर्यंत मी जेवत नाही तो पर्यंत कोणीच जेवत नाही.. शौर्य आणि त्याची मम्मा तर जबरदस्ती त्याच्या मागे लागत अगदी लहान मुलासारखं त्याला जेवण भरवतात.. काकी तर हे बनवु का ते बनवु अस विचारत सरळ किचनमध्येच घुसते.. आत्याच पण काही वेगळं नसत.. काकाचे सुद्धा हजार प्रश्न करणं चालु होत.. साक्षी तर जेवायचं सोडुन इनोसेंट असा चेहरा करत नुसतं बघतच रहाते.. ती खरी माझी माणस आहेत.. विराज एकटाच स्वतः सोबत बोलत असतो..

मोठे पप्पा : विराज नाशिकवरून कोणी फोन केला की नाही तुला?? 

(विराजच मोठे पप्पांच्या बोलण्याकडे लक्षच नसत.. तो आपल्या विचारांत हरवुन गेला असतो)

लक्ष कुठेय तुझं?? मोठे पप्पा त्याच तोंड आपल्याकडे करतच त्याला विचारतात..

विराज : काय झालं??

मोठे पप्पा : नाशिकवरून कोणी फोन केला की नाही तुला?? 

विराज : नाही..

मोठी मम्मी : त्यांनी नाही केला तर तु करायचाना फोन??

विराज : केलेला.. कोणी फोन उचलतच नाही.. खुप बिझी आहेत सगळे..

मोठे पप्पा : नक्की नाशिकलाच आहेत का..??

विराज : तुम्हांला आज पण असच वाटतंय का ती लोक लोणावळ्याला आहेत ते..

मोठे पप्पा : ती लोक लोणावळ्याला नाहीत ह्याची जशी खात्री झालीय तशी ती लोक नाशिकला सुद्धा नाहीत ह्याची सुद्धा खात्री झालीय..

विराज : तुमची खात्री झालीय म्हणजे??

(विराज संशयी नजरेनेच मोठ्या पप्पांकडे बघत त्यांना विचारतो..

मोठे पप्पा : तुला नाही कळायचं ते.. 

मोठे पप्पा उठुन आपल्या रूममध्ये जाऊ लागतात.. विराजच हृदय मात्र आत्ता जोर जोरात धडधड करू लागत.. सकाळच त्यांचं फोनवरच बोलणं त्याच्या कानात घुमू लागत.. ग्लासातील ज्युस संपवुन तो आपल्या रूममध्ये जातो.. आणि शौर्यला फोन लावतो.. शौर्य आपल्या गाथा सोबत गप्पा मारण्यात बिझी असतो.. तो वेटिंगवर दिसणारा त्याचा फोन उचलत नाही.. जास्त विचार न करता तो अनघाला फोन लावतो..

राग शांत झालेला दिसतोय तुझा?? विराजचा फोन उचलताच अनघा त्याला बोलते..

विराज : तुला काकाचा किंवा शौर्यचा फोन आलेला??

अनघा : का?? काय झालं??

विराज : आलेला की नाही तेवढं सांग..

अनघा : आलेला.. 

विराज : सगळे आहेत ना बरे??

अनघा : हो... काय झालं??

विराज : नाशिकलाच आहे ना ती लोक??

अनघा : हो विराज.. तु एवढे प्रश्न का करतोयस पण??

विराज : मला काळजी वाटतेय म्हणुन.. कोणीच माझा फोन उचलत नाही.. म्हणुन तुला फोन करून खात्री करून त्यांची विचारपुस करतोय..

अनघा : तु आहेस बरा..

विराज : अस एकट्याला सोडुन गेल्यावर कसा असणार आहे मी..

एवढं बोलुन विराज अनघाचा फोन कट करून टाकतो.. आणि बेडवर आडवा होत उशीत तोंड खुपसून तो रडु लागतो... रात्री कधी झोप लागते हे त्याच त्यालाच कळत नाही..

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे तो ऑफिसमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडतो.. कारमध्ये बसल्या बसल्या विराज शौर्यला फोन लावतो.. शौर्य त्याचा फोन सारखा सारखा कट करत असतो.. विराज पुन्हा त्याला फोन लावतो..

शौर्य : फोन उचलत नाही म्हणजे मी बिझी असेल एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का विर..?? (विराज जस ओरडतो त्याच सुरात शौर्य त्याला ओरडतो)

विराज : आज काल तु जास्तच माझ्यावर ओरडत असतोस अस वाटत नाही का तुला?? 

शौर्य : तु आत्तापर्यंत माझ्यावर असाच ओरडत आलायस अस तुला कधी वाटलं नाही का??

विराज : नाही वाटलं..

शौर्य : कस वाटेल..?? तस काही वाटायला तस काही असाव लागत रे माणसाकडे.. जे तुझ्याजवळ नाही आहे.. यु आर हार्ट लेस..

विराज : थँक्स..

शौर्य : यु आर अलवेज वेलकम ड्युड.. बट मी आत्ता खुप बिझी आहे.. बाय..

विराज : काल पासुन काय लावलस काय आहे तु?? नुसतं बिझी आहे.. बिझी आहे लावलयस..  एवढं काय करतोयस??

शौर्य : करतोय काही तरी.. तुझं काय काम आहे ते सांग मला..

विराज : मला आज तुला भेटायचंय... ते ही आत्ताच.. मी आत्ताच्या आत्ता नाशिकला यायला निघतोय..

शौर्य : मी मुंबईतच आहे..

विराज : तु मुंबईत आहेस??

शौर्य : ए हॅलो.. तुझ ट्युशन नाही घेत आहे हा मी.. जे मी बोलले तेच तु मला परत बोलुन दाखवतोयस..?

विराज : शौर्य मी विचारतोय तुला..

शौर्य : whatever it is.. तुझं काय काम आहे ते सांग मला..

विराज : तु अस इरिटेट होऊन का बोलतोयस यार..?? मला त्रास होतोय हा शौर्य तुझ्या अश्या वागण्याचा.. प्लिज नीट बोल.. आणि घरी ये मला तुझ्यासोबत बोलायचंय..

शौर्य : तुझ्या मोठया पप्पांसोबत मिळुन नवीन काही प्लॅन केलायस की काय?? जे मला घरी बोलवतोयस.. केला पण असशील.. तुझा काही भरोसा नाही यार.. 

विराज : माझ्यासोबत नीट बोलायच हा शौर्य.. तु माझ्याशी अस नको ते बोललेलं नाही आवडत मला.. आणि माझ्यावर नको ते आरोप करण थांबव..

शौर्य : आरोप नाही करत आहे रे माझ्या मनात शंका आली ती फक्त तुला विचारून क्लीअर करतोय मी.. तु का भेटायला बोलवतोयस हे मला सांगणार आहेस की मी फोन कट करू ते सांग. 

विराज : काम आहे.. अस फोन वर नाही सांगु शकत.. भेटल्यावर सांगतो..

शौर्य : आय नॉ तुझं काय काम असणार ते.. मी तुला आधीच सांगितलंय तो बंगला वैगेरे मी तुझ्या नावावर करून द्यायच्या भानगडीत अजिबात पडणार नाही.. जर तु त्यासाठी मला भेटायला बोलवत असशील तर अजिबात बोलवु नकोस.. कळलं??

विराज : परत तेच.. तु आज लावलस काय आहे?? का एक एक नको ते आरोप करतोयस माझ्यावर.. का त्रास देतोयस?? मला नकोय हा बंगला.. मला कोणतीच प्रोपर्टी नकोय.. मम्माने दिलेली ती पण.. माझा डॅड माझ्यासाठी ठेवुन गेलेला ती पण नकोय आणि मोठ्या पप्पांची प्रोपर्टी तर अजिबात नकोय.. कळलं तुला?? 

शौर्य : मला नको आहे अस बोलुन प्रोपर्टी कोण स्वतः जवळ ठेवत का विर..?? 

विराज : तुला बोलायच काय आहे??

शौर्य : मम्माने तुला दिलेली प्रोपर्टी मला माझ्या नावावर हवीय ते ही आत्ता.. आणि त्यासाठीच मी वकिलांकडे आलोय.. जर प्रोपर्टी तुला खरच नको असेल तर मी सांगेल तिथे यायच आणि सांगेल त्या पेपर्स वर सिग्नेचर करायची.. मगच मी समजेल की तु खरच मी जस तुझ्या बद्दल समजतोय तसा तु नाही आहेस.. 

विराज : शौर्य.. what wrong with you ?? तुला प्रॉपर्टीत कधी पासुन इंटरेस्ट येऊ लागलाय?? 

शौर्य : तुझे मोठे पप्पा ज्या दिवशी माझ्या बंगल्यात आलेत ना त्या दिवसापासून.. आणि तु अस बोलतोयस म्हणजे तु मी बोलतो तस काही करणार नाहीस.. म्हणजे तु प्रूफ करून दाखवलस तर तुला मम्माने दिलेल्या प्रोपर्टीत खुप इंटरेस्ट आहे ते.. सॉ बाय.. घेऊन बस सगळ्या प्रोपर्टी आणि सोबत तुझ्या त्या मोठ्या पप्पांना..

विराज : कुठे यायच ते बोल फक्त..??

शौर्य : इतर कोणता वेगळा विचार नाही तुझ्या डोक्यात..?? नाही म्हणजे तु अस रागात विचारतोयस ना म्हणुन थोडी खात्री करुन घेतोय मी..

शौर्य.. विराज रागातच शौर्यवर ओरडतो..

शौर्य : अस ओरडतोयस म्हणजे तुझ्या मनात तेच आहे.. थोडं नीट, शांत पणे आणि मॅन म्हणजे प्रेमाने विचारायच सोडुन अस रागात का ओरडतोयस.?? अस ओरडणार असशील तर मी अजिबात तुझ्यासोबत बोलणार नाही आणि तुला भेटणार तर अजिबातच येणार नाही..

विराज : शौर्य मी आत्ता नीट, शांत पणे आणि प्रेमानेच विचारतोय तुला.. कुठे यायचय तुला भेटायला.??

शौर्य : विर तु एवढं गोड बोलायला लागल्यावर मला डायबिटीस होईल यार..

विराज : शौर्य तुझी ओव्हरेकटिंग बंद कर हा.. कुठे येऊ भेटायला सांगशील?? प्लिज.. आय एम रिक्वेस्टिंग यु.. 

शौर्य : तुझ्यासोबत बोलता बोलता मी तुला व्हाट्सएपवर एड्रेस सेंट केलाय.. पण भेटायला येताना सोबत चाकु, कोयता किंवा गन काहीही घेऊन येऊन नकोस.. तुझा काही भरोसा नाही यार.. दोन दिवस तुझ्या मोठ्या पप्पांसोबत राहुन त्यांच्यासारख्या नकोत्या सवयी लागल्या असतील तुला म्हणुन बोलतोय.. बाकी काही नाही.. 

विराज : तुला भेटल्यावर तुझ्यासोबत आज बोलतोच मी.. ठेव आत्ता..

शौर्य : ओके... बट प्लिज अस नको ते घेऊन येऊन नकोस.. 

विराज पुढे काही न बोलता रागातच फोन कट करतो..

शौर्यला मात्र विराज सोबत अस वागुण खुप मज्जा येत असते.. शौर्य, नैतिक आणि रॉबिन ठरलेल्या ठिकाणी विराजची वाट बघत होते.. त्याच्यासोबत त्याचा USA चा मित्र, त्याचे वडील आणि त्यांचे बिझिनेस पार्टनर आणि सोबतच त्यांनी USA वरून आणलेले त्याचे फॅमिली वकिल सुद्धा होते..

विराज शौर्यला शोधतच मॉलमध्ये एंटर करतो..

ए विर.. रॉबिन आवाजा सोबत विराजला हात दाखवतच विराजला आपल्या जवळ बोलवतो..

विराज आल्या आल्या शौर्य त्याची सगळ्यांसोबत ओळख करून देतो..

विराज : कोण आहेत ही लोक??

शौर्य : आत्ताच ओळख करून दिली ना.. नको ते प्रश्न काय करतोयस??

विराज : आय नॉ.. बट इथे काय करतायत ही लोक.? इंडियात कश्याला आलेत??

शौर्य :  मी माझ्या कंपनीची ह्यांच्या कंपनीसोबत एक छोटीशी डिल करतोय.. 

विराज : मम्मा आणि काकाला माहितीय हे सगळं??

शौर्य : ऑफ कोर्स येस.. एवढा मोठा डिसीजन मी एकटा घ्यायला तुला  वेडा वाटलो का?? जर तुला विश्वास बसत नाही तर मम्मा नाही तर काकाला कॉल कर आणि खात्री करून घे..

विराज : खात्री करून घ्यायला माझा कॉल उचलतायत का ती लोक..

शौर्य : हा यार ते पण आहे. बट मी हे सगळं तुला का सांगतोय.. माझी ह्या लोकांसोबत मिटिंग चालु होती जस्ट संपली.. तु इथे ज्या कामासाठी आलायस ते काम कर.. 

विराज : मला तुझ्यासोबत बोलायचंय.. बोलुन झाल्यावर मगच मी साइन करेल..

आधी साइन.. मगच मी बोलेल.. 

(विराज समोर पेन आणि एक भली मोठी फाईल धरतच शौर्य बोलतो)

विराज : नुसता हट्टीपणा लावलायस.. 

विराज रागातच शौर्यच्या हातातुन पेन घेत जिथे फुल्ली मारली असते तिथे साइन करायला घेतो.. 

शौर्य : चुकुन बिझिनेस मॅन झालायस तु.. 

(शौर्य अस बोलताच विराज रागातच त्याच्याकडे बघतो..)

अस रागात का बघतोयस?? खर तेच बोलतोय मी.. माणसाने एकदा पेपर्स वाचावे आणि मग साईन करावी.. म्हणजे एकदा तु वाचुन सगळं चॅक करून घे आणि मगच साईन कर अस मला वाटतंय.. उगाच नंतर प्रॉब्लेम नको.. 

जे हवंय ते सोबत नाही माझ्या.. प्रोपर्टी वैगेरे सोबत ठेवुन काय करू मी?? तुला जास्तच इंटरेस्ट आहे प्रोपर्टी मध्ये मग तुच ठेव सगळी प्रोपर्टी.. तस पण मम्माला बोललो होतो मी तुझ्याच नावावर करायला.. बट तीच ऐकत नव्हती.. विराज एकही पेपर्स न वाचता सरळ त्यावर साइन करून टाकतो..

शौर्य रॉबिनकडे बघत आपली एक भुवई उडवत आपलं काम झालं असा इशारा करतो.. विराजने साइन करताच शौर्य सगळीकडे साइन झाल्यात का हे पुन्हा एकदा चॅक करतो..

प्लिज चॅक.. अस बोलत USA वरून आलेल्या वकिलांकडे तो ती फाईल देतो.. 

तु त्यांना का चॅक करायला सांगतोयस?? विराज संशयी नजरेने शौर्यकडे बघतच त्याला विचारतो.. 

रॉबिन : USA वरून स्पेसिअल लॉयर हायर केलाय रे त्याने.. त्यांना विचारूनच तो सगळं करणार..

शौर्य : Is there anything left besides this?

लॉयर : No..

रॉन : Thanks SD.. for such a great deal..

शौर्य : mention not dude.. This friend of mine will show you everything once again. Only after seeing everything do you make the payment.. Until then, these papers will remain with my friend.. After payment, he will give you all these papers.. Call if there is any emergency..

Thanks to Mr. Viraj.. for such nice property..  रॉनचे वडिल तिथुन उभं रहात विराज समोर हात करतच त्याला बोलतात.. विराज त्यांना हात मिळवत प्रश्नार्थी चेहरा करत शौर्यकडे बघतो.. पण शौर्य त्याच्याकडे बघुन न बघितल्या सारख करत असतो..

शौर्य : Ron I see you back when I come to USA..

(रॉनला मिठी मारतच शौर्य बोलतो.)

शौर्य त्यांना सोडायला हॉटेल बाहेर जातो.. विराज तिथेच बसुन शौर्य परत कधी येईल ह्याची वाट बघत असतो..

रॉबिन काही प्रॉब्लेम वाटला की मला कॉल कर.. हि कारची किल्ली.. वहिनीचा एकदम खास मित्र जो CBI आहे.. त्याचे काही मित्र तुमच्यासोबत अलिबागला असतील. तिथे काही प्रॉब्लेम नको म्हणुन..  ह्या रॉनला प्रोपर्टी नीट दाखव.. कोणालाही घाबरायची गरज नाही.. मॅन काम झालंय आपलं.. आत्ता काही घाई नाही.. बाहेर जाताच रॉबिन आणि नैतिकला शौर्य सूचना देतो..

रॉबिन : तु टेन्शन नको घेऊस.. तु फक्त विरला सांभाळ आणि तुझी काळजी घे. नंतर त्याला कळलं किती मोठा धक्का बसेल..

शौर्य : धक्का त्याला नाही रे मॉगेम्बो ला बसेल.. आणि ते मी बघतो रे..

शौर्य सगळ्यांना बाय करत विराज समोर येऊन बसतो..

शौर्य : काय बोलायचं होत तुला??

विराज : रॉबिन कुठली प्रोपर्टी त्यांना दाखवायला गेलाय.??

शौर्य : It's non of your business.. ही त्या प्रोपर्टीची फाईल आहे जी तु माझ्या नावावर केलीयस.. तुझ्या रेफेरेन्ससाठी तुझ्याजवळ ठेव.. 

तुला जे पाहिजे ते तुला भेटलं ना.. आत्ता मला सांग.. तुम्ही सगळ्यानी काय ठरवलंय ते?? विराज रागातच ती फाईल घेऊन टेबलवर आपटत शौर्यला विचारतो..

शौर्य : कुठे काय ठरवलंय??

विराज : शौर्य तु का अस वागतोयस यार माझ्याशी.. मला तुमच्या लोकांचं हे अस वागणं सहन नाही होत आहे.. मला त्रास होतोय यार खुप.. दोन दिवस झालेत मम्मा माझ्यासोबत बोलली नाही.. साक्षीची सवय झालीय त्या घरी ती दिसत नाही आहे.. काकीच्या हातच्या जेवना शिवाय मला जेवण जात नाही आहे.. काका आणि आत्यासोबत मस्ती केल्याशिवाय माझा दिवस जात नाही आहे.. आत्ता तर माझी अनु सुद्धा माझ्यासोबत रहात नाही.. मला नाही सहन होत आहे हे सगळ.. तुला भेटायला बोलवलं तर तुझ हे प्रोपर्टीला घेऊन नको ते चालु आहे. काय ठरवलंस काय आहे तु ते सांग.. मी खरच सावत्र आहे हे तुम्ही लोक मला दाखवुन देतायत आत्ता.. 

शौर्य : अलिबागला आम्हांला सोडुन जायला तुच निघाला होतास ना?? तिथे गेल्यावर तुला साक्षी दिसणार होती?? काकीच्या हातच जेवण जेवायला मिळणार होत?? काका किंवा आत्या तुझी मस्ती करायला तिथे येणार होते?? का माझी मम्मा तिथे येऊन तुझ्यासोबत गप्पा मारणार होती?? तेव्हा तुला त्रास नव्हता होणार का?? आम्ही तुझ्यासाठी इम्पोर्टटंट नाही हे तुच आम्हांला नेहमी नेहमी दाखवुन देतोस.. हे आत्ताच नाही आहे तुझं.. लहानपणापासून बघत आलोय तुला.. ती लोक आली की तुला आम्ही लोक दिसतच नाही.. आपल्या फॅमिली मेंम्बर पैकी कोणी एक सुद्धा जण तुला तु सावत्र आहेस अस बोललय किंवा कधी तरी तुला जाणवुन दिलंय का ते सांग मला.. माझे काका काकी माझे जेवढे लाड करतात तेवढेच तुझे पण करतात.. काकीला कामावरून येऊन जेवण करायला कधी कधी झपत पण नाही अस आत्या मला बोललीय बट माझा विराज मी जेवण केलं नाही तर नीट जेवणार नाही म्हणुन फक्त नि फक्त तुझ्यासाठी ती जेवण करते.. साक्षी तिथे विराज दादा, विराज दादा करत  रोज तुझी आठवण काढत बसतेय... पण मी सांगितलंय तिला अजिबात फोन करायचा नाही तुला त्याला तु नकोयस त्याला फक्त त्याचे मोठे पप्पा आणि मोठी मम्मी हवीय.. मम्माच तर तुला सांगायलाच नको.. हे सगळं सांगायचा मुद्दा हा आहे की सख्ख आणि सावत्र हे तु आणि तुझी कुलकर्णी फॅमिली आत्तापर्यंत माझ्यासोबत करत आलीय.. आणि तु त्यांना सपोर्ट करत आलायस.. आमच हक्काच घर असुन आम्हांलाच लपुन रहायची वेळ आणलीयस तु.. तुझ्या मोठ्या मम्मी पप्पांपुढे तु आमचा विचार कधी केलासच नाहीस रे विर.. बर आमचं सोड. आम्हाला सवय आहे ह्या सगळ्यांची.. वहिनीच काय??  निदान वहिनीचा तरी विचार करायचास ना?? तिला काय वाटत ते तरी बघ.. ती लोक आल्यावर तु तिला सुद्धा विसरलास??  

विराज : शौर्य मला त्यांच्यासोबत कस वागावं नाही कळत आहे यार.. मला त्या लोकांसोबत नाही आवडत आहे आत्ता.. त्यांच वागणं, बोलणं, त्यांची विचार करण्याची पद्धत काहीच पटत नाही आहे.. पण तरीही मला त्यांना सांभाळाव लागेल.. माझा प्रॉब्लेम तु नाही समजत आहे रे.. लहानपणी माझं खुप केलंय रे.. जस काकाने तुझ केलंय अगदी तस.. त्यानंतर पण तु बघितलस ना ते किती प्रेम करायचे माझ्यावर.. जे सांगितलं ते दुसऱ्यादिवशी माझ्या समोर हजर करायचे..

शौर्य : जर त्यांना स्वतःच मुलं असत तर ते तुझ्यासोबत पण तसेच वागले असते जस ते माझ्यासोबत वागलेत.. आणि माझ्या काकाच कँपेरिझन तुझ्या त्या मोठ्या पप्पांसोबत अजिबात करायचं नाही हा. माझा काका माझ्यावर निस्वार्थी पणाने प्रेम करतो.. त्याच्या माझ्याकडुन काहीच अपेक्षा नाहीत.. तुला जे तुझ्या मोठ्या पप्पांकडुन प्रेम मिळतय त्या मागे स्वार्थ आहे विर.. आणि मुळात त्यांचं तुझ्यापेक्षा पण जास्त प्रेम प्रोपर्टीवर आहे.. फक्त स्वतःच्याच नाही इतरांच्या पण. जरा अलिबागला जाऊन बघ किती मोठा गुंडा बनुन फिरतोय तुझा तो माणुस.. त्याला तु घरी घेऊन आलायस..

विराज : मी त्यांना अलिबागला जाऊन रहायला सांगतो.. बट प्लिज तुम्ही सगळे घरी या..

शौर्य काहीही न बोलता तिथुन उठुन जाऊ लागतो..

विराज : कुठे चाललायस??

शौर्य : मी घरी नाही येणार..

विराज : शौर्य मी बोलतोय ना आत्ता त्यांना घरी जायला सांगतो.. आणि मी तुला कुठेही सोडणार नाही.. तु माझ्यासोबत गप्प घरी येतोयस. मला नाही जमत आहे यार तुझ्याशिवाय रहायला. प्लिज चल.. तुला माझी शप्पथ आहे..

शौर्य एकटक विराजकडे बघत असतो.. त्याला पण खरं तर हेच हवं असत.. कारण सगळ काही त्याने ठरवलेल्या प्लॅन नुसार होत असत..

क्रमशः

©भावना विनेश भुतल

(आत्ता पुढे काय?? पाहुया पुढील भागात हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.. )

निवेदन 

ईरा ने ही कथा ही पोस्ट करण्यास संमती दिल्यामुळे ईराचे मनापासुन आभार

🎭 Series Post

View all