अतरंगीरे एक प्रेमकथा १४१

In marathi

शौर्य प्लिज.. चल घरी.. विराज केविलवाणा चेहरा करतच शौर्यला बोलतो..

भुक लागलीय.. काही तरी ऑर्डर कर.. शौर्य नेहमी प्रमाणे थोडा एटिट्युड दाखवतच विराजला बोलतो..

तुला जे खावस वाटत ते तुझ्यासाठी ऑर्डर कर.. मला भुक नाही.. समोर असलेलं मेनु कार्ड शौर्यकडे करतच विराज दोन्ही हात डोक्याला लावतच बोलतो.. 

भुक तुला लागलीय मला नाही.. जाऊ दे.. तु एवढ बोलतोय तर मीच ब्रेकफास्ट ऑर्डर करतो.  अस बोलत विराजने त्याच्या हातात दिलेल्या मेनू कार्ड मध्ये न बघताच ते बाजुला करत इशाऱ्यानेच वेटरला आपल्याजवळ बोलवतो..

वन स्वीट लाईम ज्युस एन्ड चिज मैसुर मसाला डोसा.. विराजकडे बघत शौर्य वेटरला ऑर्डर देतो..

शौर्यने आपल्या आवडीचा मेनु ऑर्डर केलाय हे बघताच विराज आपल्या डोळ्यांसमोरील हात बाजुला करतो.. आणि त्याच्याकडे बघतो.. 

वेटर : एनिथिंग एल्स सर..

शौर्य : नॉ थेंक्स..

वेटर तिथुन निघुन जातो.. विराज मात्र थोडा प्रश्नार्थी चेहरा करतच विराजकडे बघतो..

शौर्य आपल्या दोन्ही भुवया उडवतच त्याला काय झालं म्हणुन विचारतो..

विराज : एकच डोसा का ऑर्डर केलास??

तुला खुप जास्तच भुक लागलीय वाटत.. wait I will order one more... अस बोलत वेटरला परत आवाज देत शौर्य तिथे बोलवतो..

विराज : तु स्वतःला आवडत ते ऑर्डर का करत नाही अस बोलायच होत मला.. आणि मला तु माझ्यासाठी ऑर्डर केलेला डोसा पण नकोय..

विराज एवढं बोलेपर्यंत वेटर त्यांच्याजवळ येतो सुद्धा.. 

एक डोसा नक्की बस होईल तुला?? विराजकडे बघतच शौर्य त्याला विचारतो..

विराज : जास्त होईल अस बोललास तरी चालेल.

शौर्य : वन कप टी.. 

ओके सर.. अस बोलुन वेटर तिथुन निघुन जातो..

विराज : नुसताच चहा घेणार.. ब्रेकफास्ट नाही करणार का??

शौर्य : तु येण्याआधी माझा चहा नाश्ता करून झालाय.. 

विराज : मग परत चहा कोणासाठी ऑर्डर करतोयस..??

शौर्य : माझ्यासाठीच..

विराज : आत्ता चहा घेतलास ना तु??

शौर्य : हा मग..??

विराज : परत चहा घेणार तु??

शौर्य : तुला पण हवाय का चहा??

विराज : मी चहा घेतो का शौर्य??

शौर्य : मग नको ते प्रश्न का करतोयस..?? तुझ्यासाठी ज्युस केलाय ना ऑर्डर तु तो पी... नको ते प्रश्न नको करुस.. मला पण नको ते प्रश्न केलेलं आवडत नाहीत..

विराज : माझे डायलॉग मलाच बोलुन दाखवतोयस... आणि जास्तच चहा घेतोस अस नाही वाटत का तुला??

शौर्य :  अजिबात नाही.. अजुन दोन कप चहा मिळाला तरी चालेल.. मला खुप झोप येतेय.. 

एका हाताने आपलं डोकं धरतच तो विराजला बोलतो..

विराज : रात्री झोपला नाहीस का??

शौर्य मानेनेच नाही बोलतो..

विराज : का??

शौर्य : मुव्ही बघत होतो.. मुव्ही संपेपर्यंत एक वाजला.. बट तरी साक्षीला झोप येत नव्हती.. म्हणजे आम्हां सगळ्यांनाच फक्त मम्मा आणि आजीला सोडुन.. मग मम्मा आणि आजी सोडुन आम्ही सगळे उनो खेळत बसलो. तो गेम खेळेपर्यंत अडीच सहज वाजले असतील.. साक्षी मॅडम खेळता खेळता झोपल्या.. मग मी इथे यायला निघालो.. म्हणजे USA वरून माझा मित्र इथे येणार होता.. आत्ता भेटलास ना त्याला.. तोच.. 

विराज : म्हणजे तु रात्रभर जागा होतास??

शौर्य : हा म्हणजे तस पण मला त्या टाईमला झोप नाही येत.. आत्ता झोप येतेय.. USA मध्ये आत्ता रात्र झाली असेलना..

विराज : मम्मा बरी आहे??

शौर्य : तुझ्यापासुन लांब असल्यावर ती बरी असेल अस तुला वाटत का??

विराज : मग का गेली सोडून?? 

शौर्य : जर तु तिला सोडुन अलिबागला गेला असतास तर तिला आत्ता जेवढा त्रास होतोय त्यापेक्षा थोडा जास्त.. थोडा जास्त बोलण्यापेक्षा खुप म्हणजे खूपच जास्त त्रास झाला असता.. त्यापेक्षा तिच तुझ्यापासुन लांब झाली.. आणि तस पण तुला तुझी माणस भेटल्यावर आम्हांला होणारा त्रास तुला कधी दिसतो का?? जे तुला आत्ता दिसेल..? आणि मला तुझ्या अश्या वागण्याची खुप आधीपासून सवय आधीपासून आहेरे.. तस मम्माला पण आहे बट माझी मम्मा पहिल्यासारखी स्ट्रॉंग राहिलेली नाही.. हे तुला पण माहितीय बट गोष्ट कळुन न केल्यासारखं करतोस तु.

विराज : अस नाही आहे..

असच आहे.. शौर्य जोरातच आपले हात टेबलवर आपटत विराजला थोडा राग दाखवतच तो बोलतो.. विराज त्याला काही बोलणार तोच त्याचा मोबाईल रिंग होतो.. ऑफिसमधुन कार्तिकचा फोन येत असतो त्याला..

विराज : Yes kartik..

कार्तिक : Sir we were going to have a discussion about the meeting right ?? Clients will come till eleven o'clock .. When should we sit for discussion ??

विराज : Ohhh shut.. I forgot about its.. Did you make the report ??

कार्तिक : Yess sir. all reports are ready.. and I have mailed it to you.

विराज : Good ! I come to the office by ten o'clock. (हातातील घड्याळात बघतच विराज कार्तिकला बोलतो) coordinate with the front office team.. take base data to them.. and start to make PPT on that.. Vrushabh and Nikhil are not there now you have to see all this..

कार्तिक : ok sir..

विराज : Call if you have any doubts..

एवढं बोलुन विराज फोन कट करून टाकतो..

विराज : एक इंपोर्टटंट मिटिंग आहे मला ऑफिसमध्ये जावं लागेल..

शौर्य : मी कुठे अडवलय तुला?? तु जा ऑफिसमध्ये..  तस पण मला सुद्धा काम आहे.. 

विराज : काय काम आहे??

थोडी पर्सनल काम आहेत.. नाही सांगु शकत.. (शौर्य मोबाईलमध्ये काही तरी करतच विराजला बोलतो.. विराज पण त्याला जास्त फोर्स नाही करत.. तो कोणत्या तरी वेगळ्याच विचारात असतो)

वेटर दोघांसमोर त्यांनी ऑर्डर केलेला ब्रेकफास्ट आणुन ठेवतो.. शौर्य आपल्या मुंबई गेंगसोबत मोबाईल मध्ये चॅटिंग करण्यात बिझी असतो.. अधुन मधुन विराजवर आपली नजर तो फिरवत असतो.. विराज नाश्ता काही करत नसतो.. आपल्या मोठ्या मम्मी पप्पांना काय सांगुन ह्या घरातुन जायला सांगु ह्याचा विचार तो करत असतो. मी अस अचानक त्यांना घरातुन जायला सांगितलं तर खुप वाईट वाटेल त्यांना.. काय करू मी? हा विचार विराज करत बसला असतो.. 

शौर्यला त्याच्या मनात चालु असलेली घालमेल कळत असते.. तो त्याच्या समोरच उठुन त्याच्या बाजुच्या चेअरवर उठुन बसतो.. मोबाईल आपला तसाच आपल्या समोर ठेवत आपल्या हाताने त्याला त्याच्या आवडीचा डोसा भरवायला घेतो.. शौर्यने समोर धरलेला घास बघुन विराजला थोडं भरून येत. 

शौर्य : ज्या गोष्टीच टेन्शन घेतोयस त्या गोष्टीच टेंशन घेणं आत्ताच्या आत्ता थांबव.. आणि पटापट नाश्ता संपव.. नाही तर दहा इथेच वाजतील

(एका हाताने आपल्या भावाचे डोळे पुसतच शौर्य विराजला बोलतो)

विराज : मला नाही कळत आहे मी त्या लोकांना काय सांगु..

शौर्य : तुला काही सांगायची गरज नाही त्यांचं तेच जातील.. ते पण स्पेसिअल ठिकाणी..

विराज : म्हणजे??

शौर्य : म्हणजे जिथे त्यांना खुप आधी जायला हवं होत तिथे रे.. 

विराज : काय बोलतोयस??

शौर्य : तुला जे कळणार नाही ते बोलतोय मी..

विराज : तेच सांगतोय.. मला कळेल अस बोल..

शौर्य : ते सांगितलं तरी तुला नाही कळणार.. म्हणजे आत्ता पण तुला सगळं कळतंय बट तुला ते पटत नाही.. ज्या माणसाने तुझ्या मम्मीला सुसाईड करायला मजबूर केलं तु त्याला इंपोर्टटंट देतोयस विर.. 

विराज : शौर्य मम्मीने नक्की का सुसाईड केलं हे रिझन आपल्या कुणालाच माहिती नाही.. मम्माला पण नीट काही गोष्टी नाही माहिती.. 

शौर्य : बट काही गोष्टी ज्या मम्माला माहिती होत्या ज्या तुझ्या मम्मी थ्रू कळल्या त्या तरी आहेत ना लक्ष्यात?? तु विसरला असशील तर रेकॉर्डिंग आहे माझ्या मोबाईलमध्ये ऐकवु का तुला?? 

(विराज शांत बसुन असतो..)

तोच शौर्यचा मोबाईल रिंग होतो.. रोहनच नाव बघुन तो फोन कट करून टाकतो..  रोहन पुन्हा त्याला फोन करतो.. शौर्य पुन्हा त्याचा फोन कट करून टाकतो..

विराज : त्याचा फोन रिसिव्ह का नाही करत आहेस??? अस कट का करतोयस??

शौर्य : असच.. 

शौर्यचा पुन्हा फोन वाजतो.. ह्या वेळेला शौर्यच्या मोबाईल स्क्रिनवर दिसणार समीराच नाव बघत विराज प्रश्नार्थी चेहरा करत शौर्यकडे बघतो.. 

शौर्य त्याच्याकडे न बघताच तिथे बसुन त्याच्या समोरच समीराचा फोन उचलतो..

शौर्य : हा समीरा बोल.. व्हॉट?? (मोठ्यानेच फोनवर तो ओरडतो) एक मिनिट.. (समीराला फोनवर थांबायला सांगत तो जागेवरून उठतो)

विर तु ब्रेकफास्ट कर मी आलोच.. अस बोलत तो हॉटेल बाहेर पडतो.. हॉटेल मधुन बाहेर येत तो समीरासोबत बोलतो.. 

शौर्य : रोहन कुठेय..?? जरा दे बघु त्याला फोन..

समीरा : प्लिज भडकु नकोस ना त्याच्यावर..

शौर्य : तु त्याला फोन देतेयस की मी त्याच्या मोबाईलवर कॉल करू..??

समीरा जास्त काही न बोलता रोहनला फोन देते..

रोहन : हाय शौर्य.

शौर्य : आधीच प्रॉब्लेम कमी आहेत जे तु इथे येऊन अजुन प्रॉब्लेम क्रिएट करतोयस..?? तुला बोललेला ना इथे वृषभला त्रास द्यायला नाही यायच म्हणुन.. आणि वृषभला तुला भेटायचं नाही आहे.. कळत नाही का तुला एकदा सांगितलेलं.. नेहमी स्वतःच तेच का खर करतोस तु??

रोहन : शौर्य आय एम सॉरी ना.. मी अजुन लांब नाही राहु शकत वृषभ शिवाय यार.. त्याला काही झालंय हे कळल्यावर मलाच खुप त्रास होतोय.. एवढे दिवस कस बस कंट्रोल केलंय यार मी स्वतःवर.. आत्ता अजुन नाही होत.. त्यात तु इथे आहेस हे कळल्यावर मी स्वतःला इथे येण्यापासून नाही थांबवु शकलो.. बिकॉज आय रिअली लव्ह बोथ ऑफ एन्ड यु नॉ देट.. आय नॉ मी चुकलोय.. तुला जेवढा राग काढायचाय येऊन काढ इथे.. मारायच तर मार जे काही करायचं ते कर बट प्लिज मला वृषभला एकदा भेटायला दे.. प्लिज.. जो पर्यंत तु भेट बोलत नाहीस तो पर्यंत मी नाही भेटणार त्याला.. तु बोलशील ते करतो बट प्लिज राग सोड ना यार.. निदान तु तरी.. खरच चुकलो मी.. प्लिज एकदा भेट मला..

शौर्य : मला तुला भेटायला यायला खरच वेळ नाही आहे.. 

रोहन : ए शौर्य.. तु मला जोपर्यंत स्वतःहुन भेटायला येत नाहीस तोपर्यंत मी इथेच हॉस्पिटलबाहेर बसुन रहाणार.. आणि मी बोलतो ते करतोच हे तुला पण माहितीय.. तुच ठरव तुला यायच की नाही ते..

शौर्य : ब्लॅकमेल करतोयस मला??

रोहन : तुला हि ब्लॅकमेलगिरी वाटतेय..?

शौर्य : अजुन नाही तर काय.. प्रत्येक गोष्ट तु तुला पाहिजे तशीच करतोस.. आत्ता पण बघ.. मुंबईत नाही यायच बोललो तरी तु मुंबईत आलायस.. कोणी काही सांगत त्यामागे काही तरी कारण असेल एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का?? आणि एक मिनिट आत्ता तु समीरासोबत आहेस म्हणजे परत दोघांची सेटिंग लावुन द्यायचा विचार दितस तुझा..

रोहन : का सारख तेच तेच बोलुन दाखवतोयस तु.. सॉरी बोललो ना मी तुला.

शौर्य : तुझ्या ह्या सॉरीची खुप आधीपासून सवय आहे यार मला.. कुठे तरी एन्ड आहे का नाही तुझ्या ह्या सॉरीला?? स्वभाव कधी बदलणार आहेस तु तुझा?? का आयुष्यभर आपल्या मित्रांना अस त्रास देऊन सॉरी बोलतच बसणार आहेस..?? एवढं वाईट कोण वागत रोहन..?? एवढ बेकार डोकं तुझं चालतच कस मला तेच कळत नाही.. जिथे चालायला हवं तिथे कधी चालवत नाही.. नको तिथे एकदम परफेक्टली चालत..

रोहन : अस फोनवरूनच ओरडणार आहेस का?? प्लिज इथे ये.. मी वाट बघतोय तुझी.. प्लिज

शौर्य फोनवर शांत बसुन असतो..

रोहन : प्लिज ना शौर्य.. मी वाट बघतोय यार तुझी.. तु मुंबईत आहेस हे कळल्यावर दिल्लीवरून आलोय यार.. प्लिज शौर्य..

आलो.. एवढं बोलुन शौर्य फोन कट करून टाकतो.. आणि विराज जवळ जाऊन बसतो..

शौर्य : मी निघु??

विराज : कुठे चाललास.??

शौर्य : हॉस्पिटलमध्ये.. रोहन आलाय.. त्याला भेटायला..

विराज : तु खरच रोहनला भेटायला जातोयस ना शौर्य??

शौर्य : तु ऑफिसला जातोयस.. सिटी हॉस्पिटल त्याच वे ला आहे.. मला हॉस्पिटलजवळ ड्रॉप कर.. म्हणजे तुझी खात्री पण होईल की मी रोहनलाच भेटायला जातोय.. 

विराज जास्त काही न बोलता त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जायला निघतो.. गाडी हॉस्पिटलबाहेर जशी थांबते तस दोघेही गाडीतुन उतरतात..

हॉस्पिटलच्या मॅन गेटजवळ समीरा आणि रोहन विराजला दिसतात.. रोहनला बघुन विराजची खात्री होते की शौर्य रोहनलाच भेटायला आलाय.. 

विराज : शौर्य मी इथुनच निघतो.. मला उशीर होतोय..

शौर्य : ओके बाय..

विराज शौर्यला बाय करतच ऑफिसमध्ये निघुन जातो..

शौर्य रागातच रोहनकडे बघत त्याच्याजवळ जातो..

रोहन नेहमीप्रमाणे कानाला हात लावतच शौर्यकडे बघतो.. 

शौर्य हाताची घडी घालुन त्याच्याकडे बघत असतो..

समीरा : शौर्य मला माहिती तो चुकला आहे.. बट इट्स ओके.. आणि कोण चुक कोण बरोबर हे आपण कोण ठरवणारे.. हे तुच बोललेलास ना मला एकदा.. मी माफ केलंय त्याला.. मग तु का माफ नाही करत आहेस त्याला??

शौर्य : मी ह्याला कधीच माफ केलंय.. बट वृषभला ह्याला नाही भेटायचंय.. त्याला जास्त स्ट्रेस होईल अस डॉक्टरांनी वागायला नाही सांगितलंय.. ह्याला बघुन त्याला त्रास होईल.. 

समीरा : वृषभला मी समजवते मग तर झालं..

शौर्य : ओके... बाय..

समीरा आणि रोहन एकमेकांकडे बघत शौर्यकडे बघतात..

रोहन : ए शौर्य तु मला अस न भेटताच जाणार काय??

शौर्य काही बोलणार तोच आर्यनचा त्याला फोन येतो.. शौर्य रोहनला इशाऱ्यानेच थांबयला सांगुन आर्यनचा फोन उचलतो..

शौर्य : हा आर्यन बोल..

आर्यन : SD स्पाय कॅमेरा रेडी आहेत.. बट लावायचे कुठेयत??

शौर्य : एक हॉलमध्ये आणि एक विरच्या रूममध्ये.. जमलास माझ्या रूममध्ये पण लावुन टाक.. तशी गरज नाही लागणार बट लाव तु..

आर्यन : ओके.. बट SD ते कॅमेरा आम्ही लावु रे बट ते मॉगेम्बोच्या रूममध्ये जाऊन तु जे काम सांगतोयस ते करणं रिस्की आहे यार.. 

शौर्य : काय रिस्की आहे..?? फक्त त्याचे सगळे डॉक्युमेंट आणि गन खिडकी बाहेर फेकायचेत.. ज्यो खिडकी खाली उभी असेल ती कॅच करेल.. 

आर्यन : तु अस बोलतोयस जस काय आम्ही ह्या आधी असली काम केलीत.. आणि त्याच्या रुममध्ये जाण सोड अलिबागला जाऊन आल्यापासुन त्याच्या जवळ जायला पण भीती वाटतेय यार.. म्हणजे माझे हात तर आत्ताच थरथरतायत.. 

शौर्य : एक नंबरचा घाबरा आहेस यार तू.. तुलाच अलिबागला पाठवायला हवं होत आणि त्या रॉबिन नाही तर नैतिकला इथे ठेवायला हवं होतं..  मी प्रतीकला फोन करतो.. 

आर्यन : सगळी गॅंग इथेच आहे.. आम्ही ज्योच्या घरी आहोत.. फोन स्पिकर वर आहे.. आणि मॅन म्हणजे मॉगेम्बो रूममध्ये जायला आम्ही सगळेच घाबरतोय यार.. प्रतीक तूच बोल ह्याला..

प्रतीक : SD कॅमेऱ्याच आम्ही करतो मॅनेज.. ते मॉगेम्बोच्या रूममध्ये जाण म्हणजे खरच रिस्की आहे रे.. तो अचानक रूममध्ये आला तर?? काय करेल यार तो आमचं..

शौर्य : महेश आणि रोहन बिझी ठेवतील ना त्याला.. का घाबरतोयस..??

प्रतीक : तरी पण यार.  ह्या आर्यन ने त्याबद्दल एक एक किस्से सांगून आम्हांला घाबरवलय रे..

शौर्य : ह्या आर्यनकडे बघतोच मी तिथे येऊन..नको ते उद्योग का करतो.. आणि तुम्ही अस ऐन टाईमला घाबरायला लागले तर कस होणार यार.. माझी फॅमिली पण इथे यायला निघालीय.. सगळी गडबड होणार आत्ता.. 

ज्योसलीन : तु इथे ये ना आपण बसुन बोलूयात.. म्हणजे काही नवीन प्लॅन करायला जमतो का ते बघुयात..

शौर्य : आत्ता ऐन टाईमला??

प्रतीक : तु इथे ये तरी आधी..

शौर्य : हम्मम.. 15 मिनिटांत आलो..

(शौर्य फोन कट करून डोक्याला हात लावत आत्ता काय करायच ह्याचा विचार करत रहातो..)

रोहन : काही प्रॉब्लेम आहे का?? मी काही मदत करू का??

(रोहन अस बोलताच शौर्य त्याच्याकडे बघतच रहातो..)

अस का बघतोयस..??

शौर्य : मगाशी मला अस वाटत होतं तु नको त्या टाईमवर आलायस बट आत्ता खरच अस वाटतय की तु एकदम करेक्ट टाईमवर आलायस.. चल लवकर.. 

समीरा : कुठे चाललायास त्याला घेऊन..??

शौर्य : आत्ता मला तुम्हा लोकांना सगळं समजवुन सांगत बसायला वेळ नाही.. रोहन ज्यो च्या घरी सगळे आपली वाट बघतायत.. समीरा वृषभ सोबत मी नंतर बोलतो.. आत्ता मी घाईत आहे.. आपण नंतर भेटु.. रोहन पण तुला नंतर भेटेल.. रोहन चल इथुन लवकर.. 

रोहन : कुठे नेतोयस ते तरी सांग..

शौर्य : तु चल तरी इथुन सगळं सांगतो मी तुला.

रोहनचा हात पकडत शौर्य पळतच त्याला तिथुन घेऊन जातो.. एका टेक्सीला हात दाखवत दोघेही गाडीत बसतात.. आणि ज्योसलीनच्या घरी जातात.. 

आर्यन : अरे रोहन.. कसा आहेस?? 

रोहन दिसल्यावर आर्यन त्याला मिठी मारून भेटतो..

बाकीची इतर गेंग पण रोहनला मिठी मारून भेटते.. सगळ्यांच एकमेकांना भेटुन होताच शौर्य रोहनला त्याच्या घरी जाऊन काय करायचं ते सांगतो..

शौर्य : जमेल का तुला??

(सगळे आत्ता रोहनकडे बघतात.. रोहन खुप वेळ शांत बसुन रहातो.. सगळ्यांच हृदय अगदी धडधड करत असत.. सगळ्यात जास्त शौर्यच..)

तुला काही होणार नाही यार.. तुझा फोन चालुच असणार... इन केज जर काही झालं समज जर तो मॉगेम्बो अचानक रूममध्ये आला तर मी दुसऱ्या क्षणाला तिथे तुझ्याजवळ हजर असेल.. तुला काहीही होऊ देणार नाही.. माझ्यासाठी एवढ करशील का??

रोहन : तुझ्यासाठी काही पण...

थेंक्स यार.. शौर्य रोहनला मिठी मारतच बोलतो..

आर्यन : रोहन त्याच्याकडे गन पण आहे..

रोहन : हा मग??

आर्यन : खुप डेंजर आहे तो.. विचार कर..

आत्ता तु त्याला कश्याला घाबरवतोयस..?? प्रतीक आर्यनच्या डोक्यात मारतच बोलतो..

आर्यन : ते मी त्याला थोडं सावध करतोय रे..

शौर्य : ए आर्यन तो तुझ्यासारखा घाबरा नाही आहे.. त्या मॉगेम्बोला तिकडेच दोन तीन लावुन देईल तो.. आणि आत्ता डिस्कशन नकोय.. आपल्या ठरलेल्या प्लॅनिंग नुसार कामाला लागा यार.. तो रॉबिन तिथे अलिबागला पोहचेल पण.. 

सगळेच शौर्यच्या घरी जायला निघतात.. 

विराजचे मोठे पप्पा डायनिंग टेबलवर न्युज पेपर वाचत बसले असतात.. मोठी मम्मी तिथेच बसुन त्यांच्यासोबत एकटीच बोलत बसली असते..

काय हवंय..?? आणि काही हवं असेल तर रात्री यायच.. घरी कोणी नाही.. मुंबई गँगला बघुन मोठे पप्पा रागातच त्यांना बोलतात..

सगळेच एकमेकांकडे बघतात..

मोठ्या पप्पांचा आवाज ऐकुन आर्यनचे हात तर अगदी थरथर कापु लागले असतात.  जास्त काही न बोलता तसच थरथरत्या हाताने विराजला फोन लावतो.. आणि फोन स्पिकरवर ठेवतो..

विराज : हा आर्यन बोल..

आर्यन : विर ते SD ने एक पार्सल मागवलेलं रे.. ह्या प्रतीकच्या घरी आलय..

विराज : शौर्य ने त्याच्या घरी का पार्सल मागवलं??

आर्यन : ते SD च तुला सांगेल.. तु त्यालाच विचार... आम्ही ते पार्सल घेऊन तुझ्या घरी आलोय.. SD च्या रुममध्ये जाऊन ठेवु का?? आणि प्रतीकला त्याचा पेन ड्राईव्ह हवाय.. म्हणजे SD बोलला त्याच्या रूम मध्ये जाऊन घ्यायला..

विराज : शौर्य बोललाय घ्यायला मग मला कश्याला विचारतोयस.. ??

आर्यन : शौर्य ठेव बोलला रे.. आणि पेनड्राईव्ह पण घे बोललाय बट तुमच्या घरी जी पावणे मंडळी आलीत ते आम्हांला जाऊ देत नाहीत..

विराज : त्यांना सांग मी जा बोललोय.. 

आर्यन : ओके.. 

आर्यन फोन कट करतच मोठ्या पप्पांकडे बघत प्रतीक आणि रोहनला घेऊन वर्ती रूममध्ये जायला निघतो..

आम्ही इथेच बसतो.. सगळे जण जायची काही गरज नाही आहे.. अस बोलत मुंबईचा रोहन आणि महेश तिथेच उभं रहातात.. महेशच्या आड लपुन मुंबईचा रोहन हॉलमध्ये असलेल्या फ्लॉवरपॉट मध्ये स्पाय कॅमेरा लावतो.. कॅमेरा लावुन होताच दोघेही हॉलमध्येच असलेल्या सोफ्यावर बसतात..

रूममध्ये गेल्या गेल्या प्रतीक कॅमेरा लावायला विराजच्या रूममध्ये शिरतो.. आर्यन शौर्यच्या रूममध्ये शिरतो.. आणि रोहन सगळ्यात महत्वाच काम करायला मोठ्या पप्पांच्या खोलीत शिरतो..

रोहनने कानात इयरबड्स घातले असतात.. शौर्य त्याला फोनवरून सगळं काही सांगत असतो..

रोहन : ए शौर्य कपाट लॉक आहेरे.. कि कुठे असेल??

शौर्य : बेडवर पिलॉ असेल ना त्या पिलॉ खाली बघ.. 

रोहन पिलॉ उचलतो तस त्याला किल्ली भेटते. 

रोहन पटकन कपाट उघडुन काही भेटत का बघतो.. खुप वेळ शोधाशोध केल्यावर एक बेग त्याला भेटते.. फोनवर शौर्यला तो जे काही करतोय ते सगळं सांगत असतो..

बेग ओपन करून बघतो तर त्यात कपडे असतात.. 

रोहन : ह्यात कपडेच आहेत यार.  

शौर्य : नीट बघ रे.. वरच्यावर शोधुन लगेच बोलु नकोस..

रोहन बेगेतील कपडे खाली वर करून बघतो बट त्यात त्याला काही भेटत नाही..

नॉ यार.  काहीच नाही ह्यात.. रोहन बेग जशी होती तशी बंद करून परत ठेवतो.. 

शौर्य : ड्रॉवर ऑपन करून बघ..

रोहन : हो बघतोय..

शौर्य : जरा फास्ट कर यार..

रोहन : तेच करतोय रे..

इथे मोठे पप्पा पेपरची व्यवस्थित घडी करून पेपर डायनिंग टेबलवर ठेवतात..

महेश आणि मुंबईतील रोहन एकमेकांकडे बघत काही तरी इशारा करतात..

महेश : अरे यार हे लोक किती वेळ लावतायत.. मला उशीर होतोय.. म्हणुन मी येत नव्हतो.. एकतर सकाळीच दमुन आलोय मी..

रोहन : अरे हां तु अलिबागला गेलेलास ना?? आमच्यासाठी काही घेऊन आलास की नाही..

महेश : आलोयना..

अलिबाग... गाव आहे का तुझं?? महेशने अलिबागच नाव काढताच मोठे पप्पा त्याला विचारतात..

महेश रोहनकडे बघतच मोठ्या पप्पांकडे बघतो..

महेश : हो..

मोठे पप्पा : अलिबागमध्ये कुठे??

महेश आपला तळ हात उघडुन शौर्यने त्याच्या हातावर ज्या लोकेशनच नाव लिहुन दिलं असत ते मोठ्या पप्पांना सांगतो..

मोठी मम्मी : आम्ही पण तिथेच रहातो..

मोठे पप्पा : तुझं कोण रहात तिथे??

महेश शौर्यने जस त्याला बोलायला सांगितलं असत अगदी तसच त्यांच्यासोबत बोलतो.. महेश आणि रोहनने मिळुन मोठ्या मम्मी पप्पांना आपल्या बोलण्यात अगदी व्यस्त करून ठेवल असत..

इथे रोहनने संपुर्ण कपाट शोधुन काढलं असत.. पण त्याला काही भेटतच नसत.. 

रोहन : ए शौर्य काही नाही आहे यार इथे..

शौर्य : ओके.. मे बी त्यांनी अलिबागलाच सर्व काही ठेवलं असेल. मी रॉबिनला सांगतो मग बघायला.. तु कपाट होत तस लॉक कर.. आणि कि ज्या पिलॉ खालुन काढली तिथेच ठेव..

रोहन पटकन कपाट लॉक करतो.. किल्ली पिलॉ खाली ठेवणार तस त्याच लक्ष बेड बाजुला असलेल्या ड्रॉवर कडे जात..

रोहन : शौर्य बेडच्या बाजुला जो ड्रॉवर आहे तो कसला आहे..??

शौर्य : ऑपन कर.. बघ त्याच्यात काही भेटत का?

रोहन पटकन ड्रॉव्हर ऑपन करतो.. तस त्याला समोरच ठेवलेली गन दिसते.. 

शौर्य गन भेटली.. रोहन गन हातात पकडतच शौर्यला बोलतो..

शौर्य : गुड.. अजुन बघ काय भेटत का??

कसला तरी फोल्डर आहे रे.. मे बी ह्यात त्यांचे डॉक्युमेंट आहेत..

तोच दरवाजा ऑपन करून कोणी तरी आत येतंय अस रोहनला जाणवत.. 

शौर्य कोणी तरी रूममध्ये येतंय यार.. अस बोलत रोहन कपाटाच डॉर तसच बंद करत तिथुन घाबरतच उठुन दरवाजा आड लपतो.

शौर्य : घाबरू नकोस तो मॉगेम्बोच असेल मी लगेच येतो तिथे.. 

रोहन शांत बसुन रहातो.. त्याच्या ह्रदय अगदी दुप्पट वेगाने पळत असत त्याच.. 

हळुच दरवाजा उघडुन आर्यन आत येतो..

रोहन.. (आर्यन रोहनला अगदी हळु आवाज देत रूममध्ये शिरतो).

आर्यनला बघुन रोहन दरवाजा मागचा बाहेर येतो..

रोहन : तु इथे का आलायस..? घाबरलो ना मी..

शौर्य : कोण आहे??

रोहन : हा आर्यन.. 

आर्यन : तुला मदत म्हणुन आलोय..

रोहन : अस घाबरवून तु मला मदत करणार होतास..??

आर्यन : शौर्य तर बोलला तु माझ्यासारखा घाबरा नाहीस.. 

रोहन : अस अचानक आलास तर घाबरणारच ना मी??

आर्यन : म्हणजे तु घाबरा आहेस तर..

रोहन : ए मुंबईकर तु जेवढा घाबरा आहेस तेवढा मी घाबरा नाही.. 

आर्यन : अच्छा म्हणुनच आत्ता मला घाबरलास..

रोहन : तु.. (रोहन पुढे काही बोलणार तोच शौर्य त्याला थांबवतो)

शौर्य : ए रोहन.. त्या आर्यन सोबत नंतर गप्पा मार यार.. तुला आणखी काही भेटता का बघ.. रूमच्या खिडकी खाली ज्यो उभी आहे.. तिच्याकडे तुला जे काही डॉक्युमेंट भेटतात ते फेक कपाट जस होत तस लॉक कर आणि निघा तिथुन दोघांनी..

रोहन कपाट उघडतो जे काही डॉक्युमेंट भेटतात ते खाली ज्यो कडे फेकतो.. 

आर्यन : अरे गन पण घे ती..

रोहन : गन राहु दे तिथेच.. ती काही कामाची नाही..

शौर्य : ए मॅड.. गन पण घे.. (शौर्य फोन वरून ओरडत असतो. बट रोहन ऐकुन न ऐकल्या सारख करत रूम बाहेर पडतो)

तिघेही खाली येताच महेश आणि रोहन मोठ्या पप्पांच्या समोरून उठतात.. 

सगळेच ज्यो च्या घरी जातात..

गन कुठेय?? शौर्य रोहनजवळ येतच त्याला विचारतो..

आर्यन : मी बोललो ह्याला बट ह्याने नाही घेतली.. आणि मला पण नाही घेऊ दिली..

शौर्य पुढे काही बोलणार तस रोहन आपल्या हाताची मुठ खोलुन आपला तळ हात शौर्य समोर धरतो.. आणि आपल्या भुवया उडवत हसतच तो शौर्यकडे बघतो..

शौर्य : तुला बंदुकीतुन गोळ्या वैगेरे पण काढता येतात??

रोहन : हा मग.. माझ्या डॅडकडे पण गन आहे..

प्रतीक : तुझा डॅड पण त्या मॉगेम्बो सारखा आहे का??

रोहन : माझा डॅड मोठा बिझिनेस मॅन आहे.. जी गन आहे ती विथ लायसन्स आहे.. सेफ्टी साठी सोबत ठेवावी लागते.. तुम्ही समजताय तस माझा डॅड डॉन वैगेरे नाही.. 

शौर्य : त्याच्याकडे दुसऱ्या गोळ्या असतील तर..  तु गनच आणायला हवी होतीस.. नको तिथे नको ते डोकं लावतोस.. रागाच्या भरात माझ्या विरला गोळी मारली तर.. 

रोहन : दुसऱ्या गोळ्या असत्या तर जिथे गन होती तिथेच ठेवल्या असत्याना.. तु पण जिथे डोक लावायला हवं तिथे अजिबात लावत नाहीस..

सगळेच शांत बसून रहातात.. थोडयाच वेळात शौर्यची फॅमिली येते.. सोबत अनघाचा जो मित्र CBI असतो तो सुद्धा त्याच्या टिम सोबत हजर असतो.

तु बरा आहेस ना?? अनिता शौर्य जवळ येत शौर्यला प्रेमाने आपल्याजवळ घेत विचारते..

शौर्य : हो ग.. तु टेन्शन का घेतेयस एवढं..

काका : एवढ्या रात्रीच घराबाहेर पडलायस मग टेन्शन नाही का येणार??

शौर्य :टेन्शन घेऊ नका हे बोलुन घराबाहेर पडलो ना मी.. 

अनघा : सगळं ओके आहेना शौर्य??

शौर्य : सांगितल्या प्रमाणे सगळ रेडी आहे.. थोड्याच वेळात रॉबिन सुद्धा अलिबागला पोहचेल.. आणि विर सुद्धा घरी यायला निघेल..

CBI : गुड.. बाकी पुढे आम्ही बघतोच..

शौर्य : विरला काही होणार नाही ना?? मला अस वाटत की मी त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये थांबतो..

अनघा : शौर्य ती लोक विराजला काहीच करणार नाहीत.. विराजचा त्या लोकांना कधीच राग येत नाही.. जर तस असत तर तो एवढं बोलुन सुद्धा ते लोक इथे आलेच नसतेना.. तुझ्यासाठी तिथे जाण सॅफ नाही.. विजय (CBI) तुला जा बोलेल तेव्हाच तु तिथे जाशील.. कळलं तुला??

शौर्य : हम्मम..

सगळेच आत्ता विराज कधी घरी येतोय ह्याची वाट बघत असतात..

इथे मिटिंग आटोपताच विराज शौर्यला फोन लावतो..

शौर्य : मिटिंग झाली तुझी??

विराज : जस्ट.. कुठेयस तु??

शौर्य : नाशिकला..

विराज : शौर्य मी तुला माझी शप्पथ घातलेलीना तु नाशिकला जाणार नाहीस म्हणुन.  तु माझ्यासोबतच रहाणार बोललो होतो ना मी तुला.. का निघुन गेलास नाशिकला.. का त्रास देतोयस??आत्ता घरी जाऊन मोठ्या पप्पांना घरी जावा म्हणुन बोलणारच होतो मी.. 

ए विर तु लगेच रडुबाई सारख रडायला काय लागतोयस.. (मध्येच विराजला थांबवतच शौर्य त्याला बोलतो). नाशिकला जायचा विचार करत होतो मी अस मला बोलायच होत.. बट तु असच रडशील म्हणुन नाही गेलो मी..

विराज : मग नीट नाही सांगु शकत का? 

शौर्य : निटच सांगत होतो मी.. तुच बोलायला नाही दिलंस मला..

विराज : आहेस कुठे?? मी तुला पिक अप करायला येतोय..

शौर्य : माझं मी येतो.. तु घरी जाऊन तुझ्या परमपूज्य अश्या मोठ्या मम्मी पप्पांना घराबाहेर काढ.. ते जसे घराबाहेर पडतील तस मला फोन कर.. तुझा फोन आल्या आल्या दुसऱ्या क्षणी मी तुझ्यासमोर प्रकट राहील माय डिअर ब्रो..

विराज : आज जास्तच मोठमोठे डायलॉग तु माझ्यासमोर मारतोयस अस नाही वाटत का तुला..

शौर्य : तुझ्या नेहमीच्या सवयी प्रमाणे प्रश्न पण तुझाच आणि तुझ्या प्रश्नात लपलेलं उत्तर सुद्धा तुझंच.. नाही वाटत..

विराज : कुठेयस??

शौर्य : जिथे मी असायला हवं तिथेच आहे रे.. आणि आत्ता थोडं बिझी आहे.. सॉ बाय.. तुला बेस्ट ऑफ लक.. आणि तुझ्या मोठ्या मम्मी पप्पांना  हॅप्पी जर्णी.. आणि हो... त्यांना मी दिलेलं सरप्राईज कसं वाटलं ते विचारून सांग मला..

विराज : कसलं सरप्राईज?? 

शौर्य : घरी गेल्यावर कळेल तुला.. पण वेळेला तुला फक्त कळणार नाही तर तुझ्या डोक्यात वळेल पण.. सॉ क्रॉस युअर फिंगर ड्युड.. एन्ड बाय.. लव्ह यु लॉट..

एवढ बोलून शौर्य फोन कट करून टाकतो..

विराज शौर्यच्या बोलण्याचा विचार करत असतो.. थोडा वेळ पुर्ती शौर्य बाबत डोक्यात येत असणारे विचार तो बाजूला ठेवतो आणि मोठ्या मम्मी पप्पांसोबत काय बोलु ह्याचा विचार करत तो गाडीत बसतो.. गाडी घराबाहेर थांबताच आपल्या हातातील लॅपटॉप ठेवायला तो आपल्या रूममध्ये शिरतो..

आपल्या रूममध्ये येऊन बघतो तर मोठ्या मम्मी पप्पांनी संपुर्ण कपाट रिकामी करून पुर्ण रूम भर पसारा केला असतो..

(इथे ज्यो च्या घरी बसुन सगळेच विराजच्या रूममध्ये जे काही चाललंय ते बघत असतात)

तुम्हां दोघांच काय चालु आहे ??? आणि मला न विचारता माझ्या रूममध्ये येऊन माझ्या कपाटाला अस हात कस लावु शकता तुम्ही?? विराज रागातच दोघांवर ओरडतो..

मोठे पप्पा हातात असलेली बेग खाली फेकत रागातच विराज जवळ येत त्याची कॉलर धरतात..

मोठे पप्पा : मला न विचारता प्रोपर्टी सगळी विकुन झालास तु.. तुझ्या नावावर सगळं करून चुक केली मी.. त्या मुलाच्या नादाला लागुन आपल्या मोठ्या पप्पाला भिकारी बनवायला चाललायस तु..?

विराज : काय बोलताय तुम्ही..??

मोठी मम्मी : अलिबागला होत नव्हतं आमचं सगळं विकुन तु मोकळा झालास विराज.. अस काही करताना एकदा आम्हांला विचारावस नाही वाटलं का तुला??

विराज : मी तुमची प्रोपर्टी वैगेरे विकली नाही.. तस पण तुमच्या प्रोपर्टीत मला काहीच इंटरेस्ट नाही आहे हे मी तुम्हांला त्यादिवशीच बोललो ज्या दिवशी तुम्ही मला ती प्रोपर्टीची फाईल दिली..

मोठे पप्पा : मग मी दिलेल्या प्रोपर्टीच्या पेपर्सची फाईल कुठेय??

विराज दोघांना बाजुला करत कपाटाजवळ येऊन बघतो तर संपुर्ण कपाट रिकामी असत.. 

मोठी मम्मी : कुठेय फाईल.. ??

विराज : तुम्हां दोघांच्या पुढ्यातच तर मी फाईल इथे ठेवलेली.. 

मोठे पप्पा : फाईल इथे नाही आहे.. 

हातात असणारा मोठ्या पप्पांचा फोन रिंग होतो.. फोनवर बोलुन होताच ते व्हाट्सएवर पाठवलेलं प्रोपर्टीचे पेपर्स बघतात..

हि तुझीच सिग्नेचर आहे ना??

मोबाईलमध्ये व्हाट्सएवर आलेले प्रोपर्टी पेपरचे फोटॉ विराजला दाखवतच मोठे पप्पा त्याला विचारतात..

हा माझीच आहे.. पण मी प्रोपर्टी विकली न.. विराज अर्धवट बोलतच थांबतो.. सकाळी शौर्यने ज्या पेपर्सवर आपल्याला सिग्नेचर करायला लावलेली ते सगळे अलिबागच्या प्रोपर्टीचे पेपर्स होते..?? हेच त्याच सरप्राईज होत??, स्वतःच्याच मनाला तो प्रश्न करतो आणि थोडं घाबरतच मोठ्या पप्पांकडे बघतो..

मोठे पप्पा : विकलीस ना??

विराज : ते मी.. म्हणजे मला नव्हतं माहिती ते अलिबागच्या प्रोपर्टीचे पेपर्स आहेत.. लोणावळ्याच्या प्रोपर्टीचे पेपर्स आहेत अस समजुन मी पेपर्स न वाचताच सिग्नेचर केली..

मोठे पप्पा उजव्या हाताने आपल्या डाव्या हाताच्या दंडाला धरत तिथेच बेडवर बसतात.. विराजच्या तोंडुन अस काही ऐकताच मोठा धक्का त्यांना बसतो..

काय होतंय तुम्हांला..?? मोठी मम्मी त्यांच्याजवळ जातच त्यांना विचारते..

विराज बाजुलाच टीपॉयवर ठेवलेला पाण्याने भरलेला ग्लास घेऊन मोठ्या पप्पांना पाणी द्यायला जातो..

मोठे पप्पा पाणी घ्या.. बोलत तो ग्लास त्यांच्याजवळ धरतो..

मोठ्या पप्पांच दोघांच्याही बोलण्याकडे लक्ष नसत.. शौर्यच बोलणं त्यांना आठवत असत.. तो बोलल्या प्रमाणे त्याने त्यांची प्रोपर्टी विकुन त्याला बऱ्यापैकी रस्त्यावर आणलंच होत.. त्यात विराजची त्याला साथ आहे हे माहिती असुन सुद्धा आपण विराजवर विश्वास ठेवला म्हणुन विराजचा खुप राग येत होता त्यांना.. रागातच ते विराजकडे बघत असतात.. 

तुझ्या आईशी सारखाच निघालास तु पण.. ती पण त्याच्या बापाच्या नादी लागुन मला पोलिसांची भीती दाखवत होती आणि तु त्याच्या मुलाच्या नादी लागुन मला भिकारी बनवायला निघालास.. खुप प्रेम करतो तुझ्यावर म्हणुन हात उचलायला नाही जमत तुझ्यावर.. तुझ्या जागी जर इतर कोणी असतना विराज तर त्याचा मी जीव घेतला असता.. पुढचा मागचा विचार न करता प्रोपर्टी विकुन मोकळा झालास तु.. रागातच त्याच्यावर ओरडतात ते..

विराज : मी तुमची प्रोपर्टी का विकेल?? तुम्ही समजतायत तस काहीही करत नव्हतो मी.. मला खरच माहिती नव्हतं ते तुमच्या प्रोपर्टीचे पेपर्स आहेत ते.. 

मोठे पप्पा काहीही न बोलता शांत बसुन रहातात..

विराज मोबाईल हातात घेत शौर्यला फोन लावतो..

कुठेस तु?? विराज रागातच शौर्यवर ओरडतो..

शौर्य : ज्यो कडे बसलोय रे.. एक लाईव्ह शॉ बघतोय..  बाय दि वे सरप्राईज आवडलं का तुझ्या मोठया पप्पांना.. आय नॉ खुपच आवडलं असेल..  

विराज : शौर्य आत्ताच्या आत्ता ज्यो च्या घरून निघायचं नि सरळ आपल्या घरी यायच.. जर पाच मिनिटांत तु मला इथे दिसला नाहीस तर मी तुला न्यायला ज्यो च्या घरी येईल.. आणि मी तिथे आलो तर मी तुझं काय करेल ह्याचा विचारच तु करू नकोस..

(शौर्यच पुढच बोलणं न ऐकताच विराज फोन कट करून टाकतो..)

विराज : पप्पा मी त्याच्याशी बोलतो आणि तुमचे पेपर्स त्याला परत द्यायला सांगतो.. तो येईलच..

मोठे पप्पा त्याला लांब ढकलतच हातातील मोबाईल घेऊन आपल्या माणसांना इथे मुंबईत बोलवुन घेतात..

विराज : काय करताय तुम्ही??

मोठे पप्पा : जे मुंबईत येण्याआधी मला करायला हवं होतं.. तुझ्याकडे बघुन मी शांत होतो आत्ता अजुन शांत नाही बसु शकत मी.. माझ्यासोबत अस वागायची हिंमतच कशी झाली त्याची.. त्याच पण तेच होईल जे त्याच्या बापाच झालं.. नाही सोडणार ह्याला पण..

विराज : शौर्यच्या बाबाला तुम्ही....???

(विराज घाबरतच मोठ्या पप्पांना विचारतो)

मोठे पप्पा मोठं मोठ्याने श्वास घेत शांत बसुन असतात.

विराज : का मारलं त्यांना??

मोठे पप्पा अजुनही शांत बसुन असतात..

का मारलं त्यांना..?? विराज जोरातच त्यांच्यावर ओरडतो..

मोठे पप्पा : तुझ्या डॅडमुळे.. स्वराज आणि विनिता सोडुन गेल्यावर वेड्यासारखंच वागायला लागलेला तो.. त्यात तु पण आजारी होतास.. माझा भाऊ एकटा पडलेला.. त्याला फक्त अनिता हवी होती.. आपले काम धंदे सोडुन तो तिच्याच मागे लागलेला.. खुप समजवल पण समजतच नव्हता.. फक्त हाच नाही ती अनिता पण.. तो शेखर त्याच्या मुलाला सोडणार नव्हता.. अनिता त्याच्या मुलाला सोडुन सुरज सोबत यायला तैयार नव्हती.. आणि सुरज तिच्या शिवाय रहायला तैयार नव्हता.. हा ऐकत नाही म्हणुन मीच शेखरला बाहेरच्या बाहेर भेटुन शांतपणे समजवण्याचा प्रयत्न केला. मुलाला आणि बायकोला सोडायसाठी तो जी काही रक्कम माझ्याकडे मागेल ती रक्कम मी त्याला द्यायला तैयार होतो फक्त नि फक्त सुरजसाठी.. पण तो माझ्यासोबत काही बोलायलाच तैयार नव्हता.. रागातच माझ्याकडे बघुन तो तिथुन जायला निघाला.. ज्या मुलाला स्वतःच मुलं बोलतोयस ते मुलं माझ्या भावाच आहे.. निदान अस ऐकुन तरी तो मुलाला आणि बायकोला सोडायला तैयार होईल अस मला वाटल.. पण त्याने हॉटेलमध्ये सगळ्यांसमोर माझ्यावर हात उचलला.. आत्ता पर्यंत कोणाचीच माझ्यावर हात उचलायची हिंमत झाली नव्हती जी त्या शेखरने केलेली.. वर मला संपुर्ण रेस्टोरंट मध्ये धमकावत होता.. तुझ्या भावाने तुझ्या नादाला लागुन स्वतःचा सोन्यासारखा संसार उध्वस्त केला.. आणि आत्ता माझ्या बायकोला माझ्या बद्दल भडकवुन माझ्यापासुन लांब करायला बघतो.. बट मी जिवंत असे पर्यंत तिला कधीच तुझ्या भावाची होऊ देणार नाही.. आणि माझा माझ्या बायकोवर विश्वास आहे.. तुझ्या भावासारखा नाही मी जे बायकोच्या चारित्र्यावर संशय घेईल.. 【मोठ्या पप्पांकडुन शेखर बद्दल अस बोलणं ऐकुन अनिताच्या डोळ्यांतुन पाणी येत.. अनघा तिच्या खांद्यावर हात टाकत तिला धीर देत असते】परत माझ्या मुलाला आणि माझ्या बायकोला माझ्यापासुन लांब करायची वार्ता माझ्या पुढ्यात केलीस तर आत्ता जस तुला सोडुन देतोय तस तुला सोडुन नाही देणार आणि जाऊन सांग तुझ्या भावाला माझा मुलगा एक वेळ माझ्या बायकोशिवाय राहील पण माझ्याशिवाय एक दिवस सुद्धा तो नाही रहाणार.. आणि माझी बायको एक वेळ माझ्याशिवाय राहिल पण माझ्या मुलाशिवाय एक दिवस सुद्धा नाही रहाणार.. सॉ माझ्या फेमिलीपासून लांब रहायच.. नाही तर माझ्या सारख वाईट कोण नसेल.  तुझ्याच भावाला माहितीच आहे मी कसा आहे ते.. आणि खुप काही तो बोलत होता.. मला ते सहनच होत नव्हतं.. तो कुठे काय काय करायचा हे मला सुरज कडुन कळायच.. खुप आधीच त्याला मारणार होतो मी पण नशिब चांगलं निघालं त्याच जे प्रत्येक वेळेला वाचला तो.. पण पुणे हाय वे ला मात्र माझ्याच माणसांना सांगुन त्याचा तो एक्सिडेंट करवुन आणला.. पण तेव्हा मात्र नाही वाचला तो..

विराज : एवढ्याश्या कारणामुळे तुम्ही त्यांचा जीव घेतला मोठे पप्पा??

मोठे पप्पा : एवढस कारण?? माझ्यावर हात उचललेला त्याने.. आणि आत्ता त्याचा मुलगा.  माझी प्रोपर्टी विकुन मला भिकारी बनवायला चाललाय पण त्याच सुद्धा तेच होईल जे त्याच्या बापाच झालंय.. तो मुंबईत आहे हे मला आधीच कळलेलं.. तुझ्यासोबत बोलेपर्यंत माझ्या माणसांनी आत्तापर्यंत त्याला त्याच्या ह्याच घरात त्याला संपवलं पण असेल.. 

माझ्या भावाला काही झालना तर मी तुम्हाला जिवंत नाही सोडणार.. विराज रागातच मोठ्या पप्पांना बोलतो आणि पळतच आपल्या रूम बाहेर पडतो.. शौर्यला आवाज देतच तो त्याच्या रूममध्ये जातो.. पण तो रूममध्ये नसतो.  एक एक जिने उतरत तो आपल एक एक पाऊल खाली टाकत असतो.. हॉल मध्ये दिसणार दृश्य बघुन त्याचे हात पाय गळुन पडले असतात.. 
 
(काय घडलं असेल हॉल मध्ये?? पाहुया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा..)

निवेदन :

कथेचा हा भाग काहींना छोटा वाटेल.. तुम्ही सगळेच पुढील भागाची आतुरतेने वाट बघत असाल म्हणुन जेवढा भाग लिहुन झाला तेवढा पोस्ट केला.. ह्या पुढे कथा ही नेहमी प्रमाणे एक दिवसा आड पोस्ट केली जाईल.. धन्यवाद..

🎭 Series Post

View all