अतरंगीरे एक प्रेमकथा १४२

In marathi

विराज एक एक जिने उतरत आपल एक एक पाऊल खाली टाकत असतो.. हॉल मध्ये दिसणार दृश्य बघुन त्याचे हात पाय गळुन पडले असतात.. 

हॉल मधील सामान अगदी अस्ता व्यस्त अवस्थेत पडलं असतं.. चार पाच माणसं रक्तबंबाळ होऊन आपले हात पाय धरत कळवळतच जमिनीवर लोळत पडली असतात.. तोच एक माणुस दरवाजा उघडुन घरात शिरतो.. हातात चाकू पकडत शौर्य समोर येत त्याला मारायला बघतो.. शौर्य थोडं घाबरतच त्याच्या हातातील चाकूकडे बघत एक एक पाऊल आपले मागे टाकत असतो..

【अचानक तो माणुस आल्यामुळे इथे शौर्यच्या घरचे पण सगळे घाबरून जातात..

आत्या : शौर्यला काही केलं तर ह्याने??

अनघा : नाही काही होणार.. शौर्य सॅफ आहे तिथे..

काका : त्या माणसाच्या हातात चाकु आहे अनघा.. 

अनघा : काका विजय आहे ना तो करेल मॅनेज.. आणि विराज पण आहे तिथेच.. नका घाबरू.. शौर्यला काहीच होणार नाही..

आर्यन : ह्याचा वाईट टाईम चालु आहे वाटत.. 

(आर्यन अस बोलताच सगळे त्याच्याकडे बघु लागतात..)

रोहन : शौर्यचा??

आर्यन : SD चा नाही रे.. त्याच्या समोर जो हातात चाकू घेऊन आहे त्याचा.. SD इतक्या सहजासहजी काही सोडणार नाही ह्याला..

ज्योसलीन : May God give him the strength to endure the same pain

आर्यन : I feel the same.. 

प्रतीक : आर्यन अँड ज्यो what you think.. SD काय तोडेल ह्याच?? हात की पाय??

महेश : मला वाटत हातच तोडेल..

आर्यन : मला तर वाटलं त्याला पुर्णच तोडेल.. अस तोडेल ना कि परत कधीच जोडला जाणार नाही.. विर यायच्या थोडं थोडा आधी आला असता तर निदान SD पासुन वाचला असता..

बेड लक बिचाऱ्याच.. शौर्यचे सगळे मित्र मंडळी एकत्रच बोलतात..

काका : काय चालु आहे तुमच..??

ज्योसलीन : ते पुढे बघितल्यावर कळेलच तुला..

काका आणि आत्या ज्योसलीनकडे बघतच एकमेकांकडे बघतात..

आर्यन : पण SD आज घाबरतोय अस नाही का वाटत तुम्हांला..

रोहन : मला तर नाही वाटत.. त्याच्या हातात चाकू आहे म्हणुन तो स्वतःला थोडं सॅफ करतोय.. आणि आर्यन तुला सगळे तुझ्यासारखेच वाटतात का?? शौर्य तुझ्या सारखा घाबरा नाही.. सॉरी.. तुम्हां लोकांसारखा घाबरा नाही अस बोलायच होत मला.

रोहन अस काही बोलताच प्रतीक आणि आर्यन एकमेकांना इशारे करत आपल्या हाताची घडी घालत रोहनच्या समोर जाऊन उभं रहातात..

रोहन त्यांच्याकडे बघत असतो.. आर्यन आपला उजवा हात रागातच त्याच्या समोर धरतो.. 

आर्यन : 2000 रुपयांची लावतोस बिट..??

रोहन : कश्याबद्दल??

प्रतीक : SD ला घाबरवुन दाखवतो आम्ही.. ते ही मिशन मॉगेम्बो संपल्यावर लगेचंच.. जर तो घाबरला तर 2000 रुपये तु आम्हांला देणार.. तो नाही घाबरला तर 2000 रुपये आम्ही तुला देऊ..

तुम्हांला हरायची हौस आलीय मग होऊन जाऊ दे.. रोहन आर्यनच्या हातात उजवा हात देतच बोलतो..

ज्योसलीन : ए गाईज लुक इय एट हिअर..

 ज्योसलीन अस बोलताच सगळे धडधडत्या हृदयाने अगदी आपला श्वास रोखुन लॅपटॉपमध्ये दिसणार शौर्यच्या घरातील हॉल मधलं लाईव्ह व्हिडीओ क्लिप बघत असते.. 】

शौर्य.. विराज घाबरतच मोठ्याने ओरडत भरभर जिने उतरत शौर्य जवळ जाऊ लागतो.. तस हातात चाकू घेऊन उभा असलेला माणुस विराजकडे बघतो.. शौर्य ह्याच संधीचा फायदा घेत मोठी अशी उडी घेत गोल फिरत एक हुक किक त्याच्या समोर हातात चाकू घेऊन असल्या माणसाच्या तोंडावर मारतो.. किक इतकी जोरात असते की हातात चाकू घेऊन असलेल्याची मान एका बाजुलाच अवघडून रहाते आणि त्याच्या हातातली चाकू सुद्धा खाली पडतो.. तरी त्यातल्या त्यात एका हाताने आपली मान धरत दुसऱ्या हाताने चाकू उचलायला जाणार असतो तोपर्यंत शौर्य त्याच्या हातावर जोरातच आपला पाय देत त्याच्या पुढ्यात असलेला चाकु उचलुन जोरातच त्याच्या हातात खुपसतो.. हातात चाकू खुपसल्यावर तो माणुस वेदनेने अगदी कळवळू लागतो.. 

【महेश : बोललो होतो ना हात तोडेल म्हणुन..

आर्यन : अस काय करतोस मित्रा मान पण मोडलीना त्याची.. तु फक्त हातच बघत होतास का.?

प्रतीक : SD आज मुड मध्ये नाही यार नाही तर आर्यन बोलतो तस सगळंच मोडल असत त्याच..

आर्यन : बघ तर.. SD ने पुर्ण मुड ऑफ केला यार..

ज्योसलीन : काका आत्ता कळलं तुला.. आमचं काय चालु होतं ते.??

काका : हम्मम..

आत्या : आपला शौर्य डेंजर आहे समीर..

काका : तेच बघतोय मी..】

इथे शौर्य सगळ्यांवर आपली नजर फिरवतो.. आत्ता कोणीच उठणार नाही ह्याची त्याला खात्री होते तस तो विराजकडे बघतो..

शौर्य : काय यार विर.. तुझ्या मोठ्या पप्पांनी ह्या लोकांना नीट ट्रेनिंग दिलेली दिसत नाही यार.. बजेट खुप कमी आहे हा तुझ्या मोठ्या पप्पांचा.. मला मारायला मोजुन फक्त पाचंच माणसं पाठवली त्यांनी.. ते पण हि अशी... एका मिनिटांत सगळ्यांना शांत केलं मी.. (आपल्या हाताचे पंजे एकमेकांवर झाडतच शौर्य विराजला बोलतो)

विराज शौर्य समोर येऊन उभ रहातो.. खाली कळवळत लोळत पडलेल्या मोठ्या पप्पांच्या माणसांकडे विराज बघतच राहतो.. 

विराज : तु बरा आहेस ना??

शौर्य विराजच्या प्रश्नाच उत्तर न देता रागातच त्याच्याकडे बघत असतो..

विराज : अस का बघतोयस..??

शौर्य : ह्याच्यासाठीच मला एवढ्या घाईत इथे बोलवलसना.. ?? 

विराज : मी अस काही करेल का शौर्य?? मला हे सगळं काय चाललंय काहीच कळत नाही आहे रे.. एक एक नवीन ऐकुन आणि नको ते बघुन डोकं ब्लेंक होत चाललंय माझं.. 

शौर्य : डोकं आहे तरी का तुला?? 

विराज : आय नॉ माझ्या पेक्षा जास्त डोकं तर तुलाच आहे.. म्हणुन नको ते उपद्व्याप करत बसतोयस.. त्यांना इथुन जायला बोलणार होतो ना मी.. काय गरज होती त्यांची प्रोपर्टी वैगेरे विकायची..?? खोटं बोलुन सिग्नेचर करून घेतलीस तु माझ्याकडुन.. 

शौर्य : पेपर्स वाचुन सिग्नेचर कर बोललो होतो ना तुला.. बोललो होतो की नव्हतो?? जरा डोक्याचा भाग असता तर पेपर्स न वाचता सिग्नेचर केलीच नसतीस ना तु.. आणि तसही तुझ्याकडे मी नंतर बघणारच आहे.. तुझे परमपूज्य मोठे मम्मी पप्पा कुठे आहेत..?? त्यांना बोलव इथे.. अजुन खुप सरप्राईज बाकी आहेत त्यांना द्यायची.

विराज : शौर्य का अस वागतोयस तु.. प्लिज स्टॉप कर हे सगळं.. मला भीती वाटतेय यार.. ते खुप डेंजर आहेत रे.. हे बघतोयस ना.. ते शांत नाही बसणार..

(विराज शौर्यची समजुत काढतच त्याला बोलतो)

शौर्य : शांत तर मी पण नाही बसणार.. त्यांच्या पेक्षा मी थोडा जास्त डेंजर आहे अस बोललास तर ते बेटर राहील.. माझ्या बाबाला माझ्यापासुन लांब करून ह्या सगळ्याची सुरुवात त्यांनी केलीय मग ह्या सगळ्याचा एन्ड मिच करणार ते ही मला पाहिजे तसाच.. तु जर आमच्या मध्ये बोललास तर तु आहेस आणि मी आहे एवढं लक्ष्यात ठेव..

विराज : तुला माहिती होत तुझ्या बाबाचा एक्सिडेंट मोठ्या पप्पांनी घडवुन आणलेला ते??

शौर्य : तु अस बोलतोयस म्हणजे तुला पण माहिती होत ना??

विराज : तुझी शप्पथ मला ह्यातलं खरच काही माहिती नव्हत रे.. मला जस्ट तु इथे येण्याआधीच मोठ्या पप्पांकडुन कळलंय हे सगळं.. 

शौर्य : तुला माहिती असत तरी तु काय केलं असतस.. त्यांनाच सपोर्ट केला असतास.. कारण कितीही काही झालं तरी तुला ती लोकच इंपोर्टटंट आहेत..

विराज : मला नाही माहित मी काय केलं असत बट तु समजतोस तस मी काहीही केलं नसत.. 

शौर्य : राहु दे रे विर.. मी नंतर तुझ्यासोबत पर्सनली ह्या विषयावर बोलणारच आहेच.. फक्त एकट्यात भेटच तु मला.. मग बघतोच तुझ्याकडे.. पण त्या आधी तुझ्या ह्या मोठ्या पप्पांकडे बघतो मी..

विराज पुढे काही बोलणार तोच मोठे पप्पा जिने उतरत खाली येतात.. सोबत मोठी मम्मी सुद्धा असते.. 

खाली रक्तबंबाळ होऊन पडलेल्या आपल्या माणसांकडे बघत ते रागातच शौर्य जवळ जात त्याची कॉलर धरतात..

जास्तच हुशार समजतोस तु स्वतःला?? हिंमत कशी झाली तुझी माझ्यासोबत अस वागायची.. शौर्यची कॉलर ओढतच त्याला थोडा राग दाखवतच ते बोलतात..

शौर्य जास्त काही न बोलता रागातच त्यांच्याकडे बघत एका हाताने त्यांचा गळा धरतो.. शौर्यच्या कॉलर भोवती धरलेली पकड सोडुन मोठे पप्पा त्याने आपल्या गळ्याभोवती धरलेला हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतात.. 

शौर्य सोड त्यांना.. काय करतोयस यार तु..?? विराजसुद्धा शौर्यला समजवत त्याच्या हाताची पकड सोडण्याचा प्रयत्न करत असतो.. पण शौर्य त्या क्षणाला त्याच काही ऐकत नसतो.. शौर्यच्या हाताची पकड सोडवायला विराजला सुद्धा जमत नव्हतं.. 

शौर्य प्लिज लिव्ह देम.. दे विल डाय शौर्य.. प्लिज लिव्ह... विराज रिक्वेस्ट करतच शौर्यला बोलत असतो.. पण शौर्यपर्यंत त्याच्या आवाज पोहचतच नसतो.. शौर्यच्या नजरेसमोरून त्याच्या बाबा सोबतचा तो शेवटचा क्षण जात असतो.. आपल्या बाबाची आपल्या भोवती खिळून राहिलेली नजर त्याला दिसत असते.. त्याच्या बाबाला शेवटच्या क्षणाला होणारा त्रास आठवत असतो.. आणि त्याच्या तोंडुन अर्धवट राहिलेले ते शब्द.. आणि सोबतच खुप साऱ्या वेदना लपवुन आपल्या चॅम्पसाठी हसत ठेवणारा तो चेहरा.. आपल्याला सोडुन कायमच लांब जाताना एक वेगळाच त्रास त्याच्या बाबाला होत होता.. जस जस एक एक गोष्ट त्याला त्याच्या बाबाची आठवत होती तस तस शौर्यची मोठ्या पप्पांच्या गळ्या भोवतालची पकड अजुन घट्ट होत होती.. 

【इथे शौर्यच्या घरचे सुद्धा घाबरून जातात.. उगाच शौर्यने कायदा हातात घेऊ नये अस त्यांना वाटत.. काका सगळं सोडुन तिथुन पळतच घरी यायला निघतो..

अनघा : काका विजय आहे तिथे तो करेल सगळं मॅनेज. शौर्य अस नको ते काहीच करणार नाही.. तुम्ही नका घाबरू.. 

अनघा काकाला विनंती करतच तिथे थांबवुन घेते..

शौर्यच अस वागणं बघुन अनिताला संपुर्ण जग आपल्या भोवती फिरतय अस झालेलं.. हात पाय अगदी थरथरू लागलेले तिचे.. काकी तिला धीर देत तिच्या बाजुलाच बसते】

शौर्य सोड... विराज मोठ्यानेच ओरडतो तस शौर्य भानावर येतो.. आणि मोठ्या पप्पांना जोरातच मागे ढकलुन देतो.. 

हिंमत कशी झाली तुमची माझी कॉलर धरायची.. ह्या पुढे कॉलर नाही हा धरायची माझी.. तेवढी तुमची लायकी नाही आहे.. मोठ्या पप्पांकडे रागात बघत आपल्या शर्टाची कॉलर नीट एका हाताने टिचकी वाजवतच मोठ्या पप्पांना दम देतच शौर्य बोलतो..

विराजला कोणाला काय बोलावं ते कळत नसत.. शौर्यचा हात पकडत तो त्याला शांत करत त्याच्यासोबतच उभा असतो.. त्या क्षणाला आपल्या मोठ्या पप्पांकडे जावस त्याला वाटत नसत.. त्याला सुद्धा खुप राग येत असतो..

मोठे पप्पा आपल्या गळ्याभोवती हात धरत खालीच बसुन रहातात.. मोठी मम्मी त्यांना सावरत त्यांच्या बाजुलाच बसुन असते..

शौर्य : बोललो होतो ना तुम्हांला... भिकारी म्हणुन माझ्या घरी आलात.. तसच भिकारी म्हणुनच ह्या घराबाहेर पडाल.. सी... द गेम इज ओव्हर.. शौर्य शेखर देशमुख आहे मी.. जे बोलतो ते करून दाखवतोच.. तुम्ही मला मारायला पाठवलेल्या तुमच्या ह्या माणसांची जशी अवस्था केलीय ना मी त्याहुन बेकार तर तुमची अवस्था करणार होतो.. जसा त्रास माझ्या बाबाला झाला असेल ना त्याहुन बेकार त्रास मला तुम्हांला द्यायचा होता.. पण आपण आत्तापर्यंत कमवलेल सगळं एका दिवसात गमवलय हे कळल्यावर तुम्हांला मी विचार केलेला त्याहुन खुप म्हणजे खुप बेकार त्रास होतोय हे तुमच्याकडे बघुनच दिसतंय मला.. म्हणुन अशी अवस्था मी तुमची न करण्याचा विचार करतोय.. नाही तर एकच अशी दिली असती ना हॉस्पिटलमध्ये एडमीट करायची वेळ आली असती तुमच्यावर.. बट हॉस्पिटलच बिल पॅड करायला पण पैसे लागतातना. परत तुमच्या बायकोला इथुन तिथुन भिक मागुन एक एक रुपया गोळा करून हॉस्पिटलच बिल भराव लागेल.. म्हणुन जाऊ दे बोलतोय मी.. कारण थोडी दया येतेय मला तुमच्यावर.. तस दया करण्याच्या लायकीचे तुम्ही दोघेही अजिबात नाही आहात बट कसं आहे ना ह्या बाबतीत मी माझ्या बाबावर गेलोय.. त्याने पण तुमच्या सारख्या नीच माणसाला असच सोडुन देऊन तुमच्यावर दया केली.. तेव्हाच तुमची जागा त्याने तुम्हां दोघांना दाखवायला हवी होती..

मोठ्या  मम्मीचा आधार घेत मोठे पप्पा उभं रहातात..

मोठे पप्पा : जास्तच तोंड चालतय तुझं.. अगदी तुझ्या बापासारखच.. तु जस मला काहीतरी बोलला होतास तस मी पण तुला काहीतरी बोललो होतो.. (मिश्किल हसु ओठांवर आणत शौर्यकडे बघतच ते त्याला बोलतात) तुला तुझ्या बापाकडे पोहचवणार बोललो होतो ना मी तुला?? शशिकांत कुलकर्णी बोलतात मला... मी सुद्धा जे बोलतो ते करून दाखवतोच.. (आपल्या मागे पँटीच्या खिश्यात खुपसुन ठेवलेली गन बाहेर काढुन शौर्यवर रोखुन धरतच ते बोलतात)

मोठे पप्पा काय करतायत तुम्ही.. प्लिज ती गन खाली ठेवा.. तुम्ही अस काहीही करणार नाही.. शौर्यला आपल्या मागे लपवतच विराज त्यांना बोलतो..

मोठी मम्मी : तुझ्या मोठ्या पप्पांना हवं नको ते बोलतोय वर त्यांचा गळा धरतोय तो मुलगा तरी तुला त्याचा पुळका येतोय विराज.. जरा काही वाटत नाही तुला..

विराज : तुम्ही दोघ चुकीच वागत आलात आत्तापर्यंत.. मम्मा लास्ट टाईम बोलली होती मला.. माझ्या मम्मीने सुसाईड करायच्या मागे तुमचा हात आहे बट मी ती गोष्ट सिरियसली नाही घेतली कारण मम्माला सुद्धा पुर्ण काही माहिती नव्हती.. बट तुम्ही काहीही करू शकता हे आज मला कळलं.. छोट्याश्या कारणावरून ह्याच्या बाबाचा जीव घेतला तुम्ही.. मग माझ्या मम्मीला पण किती त्रास दिला असाल तुम्ही दोघांनी मिळुन.. काय मिळतंय अस वागुण तुम्हांला.. एवढं चुकुन पण आत्ता तुम्ही माझ्या भावाचा जीव घ्यायला निघाले?? अस कस वागु शकता तुम्ही..??

शौर्य : हि लोक कसही वागु शकतात.. तुझ्या मम्मीकडे घाणेरड्या नजरेने बघायचा हा माणुस.. शारीरिक आणि मानसिक रित्या तर खुप त्रास द्यायचा तिला.. तुझ्या मम्मीने माझ्या बाबासोबत अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन ह्या माणसा विरोधात FIR पण नोंदवलेली.. बट तुझ्या डॅडच्या टॉर्चर मुळे तिने ती मागे घेतली.. बरोबर बोलतोय ना मी मिस्टर शशिकांत कुलकर्णी?? तुमची सगळी हिस्ट्री मिळवलीय मी ह्या दोन दिवसात..   

विराज : दोन कुटुंब उध्वस्त केलात तुम्ही दोघांनी.. आणि मोठी मम्मी तुला हे सगळं काही माहिती असुन तु ह्यांना सपोर्ट करत आलीस.. का नाही अडवलस ह्यांना अस काही करताना.. ह्याला त्याच्या बाबापासुन वेगळं केलं. मला माझ्या मम्मी आणि भावापासून वेगळं केलं तुम्ही.. काय मिळालं अस करून?? मोठे पप्पा खुप प्रेम करतो मी तुमच्यावर म्हणुन तुमच्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टी मी ऐकुन न ऐकल्यासारखं करत आत्तापर्यंत इग्नोर करत आलोय.. तुम्हांला माझाच आधार आहे म्हणुन माझ्या ह्या फेमिलीच्या अगेंस्ट जाऊन मी तुम्हांला ह्या घरात ठेवलं.. पण आत्ता तर तुमच्या बद्दल नको नको ते ऐकायला मिळतंय.. तुम्ही सुधरतच नाही.. हि अशी गुंड माझ्या भावाला मारायला पाठवुन तुम्ही त्याचा जीव घ्यायला निघाले?? अजुन किती पाप करणार आहात?? प्लिज थांबवा हे सगळं आणि ती गन खाली ठेवा प्लिज..

मोठे पप्पा : जो पर्यंत ह्याला संपवत नाही तो पर्यंत मी शांत बसणार नाही.. तु बाजुला हो.. 

तुम्हांला नीट सांगितलेलं कळत नाही का?? ठेवा ती गन खाली.. विराज मोठ्यानेच ओरडतो..

मोठे पप्पा : ह्याला त्याच्या बापाकडे पोहचवल्या शिवाय मी काही शांत बसणार नाही.. विराज जर तु मध्ये आलास तर तुला सुद्धा मी तुझ्या आईकडे पोचवायला मागे पुढे बघणार नाही..

विराज : तुम्हाला जे करायचं ते करा.. मी माझ्या भावाला काहीही होऊ देणार नाही.. 

मोठे पप्पा : विराज बाजुला हो..

विराज : तुम्ही माझं ऐकत नाही तर मी तुमचं पण ऐकणार नाही.. 

मोठे पप्पा : विराज मी शेवटच सांगतोय बाजुला हो..

विर तु बाजुला हो.. (शौर्य विराजच्या दंडाला पडतच त्याला बाजुला ढकलतो) नाव्ह शुट मी.. दोन्ही हात आपल्यापासून लांब करतच मोठ्या पप्पांना आपल्यावर गोळी मारायला प्रोत्साहित करतो ..

मोठे पप्पा मिश्किल अस हसु ओठांवर आणत त्याच्यावर निशाना साधतच गन चालवतात.. विराज शौर्यला वाचवायला म्हणुन पुन्हा शौर्य समोर येऊन उभा रहातो..
 
बंदुकीच्या गोळीचा आवाज संपुर्ण घरात घुमतो..

विर.. शौर्य मोठ्याने ओरडतो.. आणि पाठून विराजला घट्ट अशी मिठी मारत त्याच्या भोवती बिलगतो..  काही सेकंद कोणालाच तिथे काय घडतंय हे कळत नव्हतं..

बंदुकीतल्या गोळ्या तर रोहनने काढल्या होत्या मग बंदुकीत गोळी आली कुठुन.. म्हणजे दुसऱ्या गोळ्या होत्या त्यांच्याकडे.. तरी रोहनला बोललो होतो गन घेऊन ये म्हणुन.. शौर्यच्या घाबरलेल्या मनात त्या क्षणाला अनेक विचार येऊ लागतात.. येणाऱ्या विचारांनी आणि घाबरलेल्या मनामुळे काही क्षणांपुर्ती संपुर्ण डोकं त्याच डोकं सुद्धा सुन्न पडलं होतं..  त्यातल्या त्यात स्वतःला सावरत तो विराजच्या हाताला पकडत त्याच तोंड आपल्याकडे वळवतो.. विराजने दोन्ही हाताने आपले कान बंद करून डोळे अगदी घट्ट मिटले असतात.. तो सुद्धा खुप घाबरून गेला असतो.. शौर्य घाबरलेल्या नजरेनेच विराजवर नजर फिरवतो.. विराजला कुठे लागलं का ते बघतो.. पण विराजला कुठेच काहीही लागलं नसत..  

शौर्य : तु ठिक आहेस ना??

विराज मानेनेच हो बोलतो..

शौर्य : त्यांच्या गन मध्ये गोळी कुठुन आली??

प्रश्नार्थी चेहरा करत थोडं घाबरतच विराजला प्रश्न करत तो बाजुला करत मोठ्या पप्पांकडे बघतो.. त्यांच्या हातातील गन खाली पडली असते.. आणि हातातुन रक्त येत येत असत त्यांच्या.. त्यांची आत्तापर्यंतची सगळी पाप भरली असतात.. कारण किचनमध्ये लपलेल्या CBI ने मोठ्या पप्पांच्या हातावर गोळी झाडली असते.. मोठे पप्पा हात धरून खाली बसले असतात.. मोठे पप्पा असे खाली बसताच त्याच घरात CBI ची लपलेली माणस बाहेर येतात.. एक पोलिस कॉन्स्टेबल त्यांच्यावर गन रोखुन धरत मोठ्या पप्पांच्या समोर पडलेली गन त्याच्याजवळील रुमालाने उचलतो..

इथे दरवाज्यात शौर्यची सगळी फॅमिलीसुद्धा आणि मित्र मंडळीसुद्धा हजर असते.. 

अनिता पळतच शौर्य आणि विराजजवळ येते.. विराज आणि शौर्य दोघांच्याही चेहऱ्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवत दोघेही बरे आहेत ना हे ती बघते.. 

शौर्य आपल्या मम्माला बाजुला करत मोठ्या पप्पांजवळ जातो..

शौर्य : तुम्ही जेल मधुन इतक्या सहजासहजी सुटणार तर नाहीत पण समजा इन फ्युचर जरी तुम्ही जेलमधून सुटलातना तरी रहायला घर नसणार तुमच्याकडे.. कारण होती नव्हती सगळी प्रोपर्टी मी तुमची विकुन टाकलीय.. जो पैसा मिळाला तो मी अनाथ आश्रम आणि छोट्या मोठ्या ट्रस्टी मध्ये दान करून टाकला.. तेवढीच तुम्ही केलेल्या पापात पुण्यायीची भर.. आणि मॅन म्हणजे तुमची स्वतःची अशी ओळखच नाही आहे आत्ता.. कारण मी सगळं काही संपवलय.. होते नव्हते सगळे डॉक्युमेंट म्हणजे तुमचं आधारकार्ड म्हणा नाही तर  पेन कार्ड म्हणजे A टु Z.. ज्याच्या ज्याच्यावर तुमच नाव होतं ते सगळं.. सगळं म्हणजे सगळं जाळून राख केलंय मी.. जेलमधून सुटल्यावर हे सगळं तुम्ही परत बनवु शकाल अस मला तर नाही वाटत.. 

काका : पण हा माणुस जेलमधुन कधीच बाहेर येणार नाही ह्याची जबाबदारी मी घेईलच शौर्य.. आज माझ्या दादाचा आत्मा खऱ्या अर्थाने शांत झाला असेल.. 

CBI ची माणस मोठ्या मम्मी पप्पांना तिथुन घेऊन जाऊ लागली..

(मोठे पप्पा आणि मम्मी रडतच विराजला आवाज देत असतात.. सगळेच विराजकडे बघत असतात.. विराज एक खोल श्वास घेत स्वतःच मन थोडं स्ट्रॉंग करतो..)

घरातील सगळी मंडळी त्या दोघांना तिथुन घेऊन जाताना बघत रहातात..

विराज : विजय तु इथे??

(विराजच लक्ष त्याच्या मित्राकडे जात)

विजय : मी माझी ड्युटी करत होतो रे.. अनघाला विचार ती सांगेल तुला सगळं.. 

अनघा : थेंक्यु विजय.. तुला जितक थेंक्स बोलेल तेवढ कमीच पडेल..

शौर्य : माझ्याकडुन पण खुप सार थेंक्स तुला..

विराज : तुम्ही दोघांनी लावलं काय आहे.. मी माझं कामच करत होतो.. थेंक्यु वैगेरे अजिबात नकोय मला..

शौर्य : तरी पण थेंक्स.. काल पासुन तु आमच्यासोबत आहेस.. विर तुझा मित्र पण रात्रभर झोपला नाही.. माझ्या सोबत हा पण 2 वाजता इथे मुंबईत यायला निघाला.. मी ह्याला घेऊनच अंधेरी पोलिस स्टेशनला गेलेलो.. म्हणजे तुझ्या मम्मीने नक्की सुसाईड का केलं ह्या बद्दल काही कळत का ते बघायला.. जे कळायला पाहिजे ते नाही कळलं बट नको ते कळलं.. म्हणजे तुझ्या मम्मीने तुझ्या मोठ्या पप्पांविरोधात अशी काही तक्रार केलीय हे कळलं.. तिथे एक जुने कॉन्स्टेबल होते ते माझ्या बाबाचे खास मित्र निघाले.. त्यांना मी माझा बाबाच वाटलो.. त्यांच्या कडुन मला कळलं की माझा बाबा तुझ्या मम्मीला घेऊन एकदा पोलीस स्टेशनमध्ये गेलेला.. आणि तुझ्या मोठ्या मम्मी पप्पांची थोडी फार हिस्ट्री पण कळली.. मम्मा जे बोलली ते सगळं खरं आहे.. तुझे मोठे मम्मी पप्पा तुझ्या मम्मीला खुप त्रास द्यायचे.. 

विराज : तुम्ही एवढा मोठा प्लॅनिंग माझ्या मागे करत होता.. एकदा मला सांगावस नाही वाटलं.. 

विजय : तुला सांगितलं अस तर हा प्लॅन सक्सेस झाला नसता..

शौर्य : आम्ही तुझ्या मोठ्या मम्मी पप्पांसोबत अस काही करतोय हे तुला कळल्यावर तु आम्हांला सपोर्ट करायचं सोडुन त्यांनाच सपोर्ट केला असतास..

विराज : मी अस काही नसतं केलं..

शौर्य : रिअली??

विराज काहीही न बोलता शांत बसुन असतो..

ह्या सगळयांना पण इथुन घेऊन जावा.. आणि गाडीत भरा मी आलो.. खाली जमिनीवर लोळत पडलेल्या गुंडांकडे बघत CBI विजय आपल्या सोबत घेऊन आलेल्या कॉन्स्टेबलला बोलतो..

विराज : तु एकट्याने एवढ्या सगळ्यांना मारलस शौर्य??

शौर्य : एकटा मारू शकलो असतो रे मी.. बट त्या गुंडांना मी नाही मारलंय त्या सगळ्यांना पोलिसांनीच मारलंय.. म्हणजे हा तुझा मित्र आणि त्याच्या सोबत इतर जे पोलिस तुला दिसतायत ना ती लोक लपायलाच इथे आलेली.. तितक्यात हि गुंड पण आली.. माझ्या सोबत पोलिस असताना मी का मारू त्यांना.. त्यांना मारून झाल्यावर तुझा आवाज आला. तुझा आवाज ऐकुन हे सगळे लपले.. आणि तो गुंड ज्याला मी मारल.. तो हे सगळे लपल्यावर आणि नेमकं तु आल्यावरच तो घरात आला... आत्ता त्याला माझ्या हातचा मार खायचा होता.. मग काय करू मी..

विजय : बट शौर्य मला अस वाटत तु पण CBI बनु शकतोस.. सगळा प्लॅन तस बघायला गेला तर तुझाच आहे..

शौर्य : प्लॅन तर माझा होता बट हे अस गोळी चालवण माझ्या प्लॅन मध्ये नव्हतं.. गोळी का चालवली तुम्ही..?? गन मधल्या सगळ्या गोळ्या काढुन अचानक गोळी कुठुन आली ह्या विचारानेच मी किती घाबरलो.. मला वाटलं विरलाच काही तर झालंय.. 

विराज : मोठ्या पप्पांच्या गन मध्ये गोळी नव्हती??

विराजकडे बघत चेहऱ्यावर गोड अशी स्माईल देत आपली मान नकारार्थी हलवत शौर्य विराजला नाही म्हणुन सांगतो.. 

विराज : कधी केलंस हे सगळं?

शौर्य : सगळं काही तुला मी नंतर सांगेल.. बट प्लॅन का चँज केलात तुम्ही?? बंदुकीत गोळ्या नाहीत हे ह्याच्या मोठ्या पप्पांना कळल्यावर ते काय करणार होते ते बघायच होत मला..

विजय : अनघाच्या सांगण्यावरून आम्ही प्लॅन चँज केलाय.. उगाच अजुन प्रकरण वाढु नये अस तिला आणि मला सुद्धा वाटत होतं.. तुला मारून टाकायचा प्रयन्त करत आहेत ह्या आरोपाखाली आम्ही त्यांना अटक केलीय.. बाकी त्यांनी त्यांच्या तोंडुन कबुल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल ह्याची जबाबदारी मी घेतो..

वरकुल मी निघतो.. काही गरज लागली की सांगतो तुला. विराजला मिठी मारतच विजय बोलतो..

अनघा : अजिबात नाही.. जे काही सांगायच असेल ते काका आणि शौर्यला सांगायच.. विराजला त्याच्या मोठ्या मम्मी पप्पांनी जरा रडुन दाखवलंना तर तो त्यांच्यावरचे कॅस मागे पण घेईल..

विराज : ह्या वेळेला अस नाही करणार मी.. 

नक्की?? शौर्य आणि अनघा कमरेवर हात ठेवत विराजला विचारतात..

विराज : हो नक्की.. बट विजय जे काही असेल ते तु काकालाच सांग.. मला खरच नको सांगुस.. आणि त्यांना जी काही शिक्षा द्यायची आहे ती दे.. 

शौर्य : बघ वहिनी.. अजुन पण मोठ्या मम्मी पप्पांवर प्रेम आहेच ह्याच...

विराज : शौर्य नेहमी नेहमी स्वतःच डोकं लावणं बंद कर. तु समजतोस तस काही नाही आहे.. मोठ्या पप्पांच्या खुप ओळखी आहेत इन केज जर ते जेल मधुन सुटले तर तुम्ही लोक परत मलाच ब्लॅम कराल म्हणुन बोलतोय.

विजय : मी असताना ते सहजासहजी नाही सुटणार रे वरकुल.. नको टेन्शन घेऊस.. बट आत्ता मी निघतो..

शौर्य : परत कधी येतोयस आमच्याकडे..??

विजय : वेळ मिळाला की नक्की येतो.. आम्हां CBI वाल्यांकडे वेळ किती आणि केवढा असतो हे तुला काल पासुन माझ्यासोबत राहुन कळलंच असेल ना??

शौर्य : हम्मम.. पण आमच्यासाठी वेळ काढुन एकदा नक्की ये.. आणि परत एकदा खुप खुप थेंक्स..

विजय : ओके.. बाय..

स्पाय कॅमेरे काढु ना रूममधून?? आर्यन आणि प्रतीक शौर्यजवळ येत त्याला विचारतात..

(विराज प्रश्नार्थी चेहरा करत त्याच्याकडे बघत असतो.)

शौर्य : बर झालं आठवण केलीस.. विजय.. रेकॉर्ड झालेले व्हिडीओ लागतील ना तुला??

विजय : लागतील म्हणुन काय विचारतोयस..?? लागतीलच.. त्याशिवाय आपण काहीही करू शकणार नाही.. हॉल मधलं आणि वरकुलच्या रूममधलं संपुर्ण व्हिडीओ रेकॉर्डिंग एका सी डी मध्ये टाकुन मला पाठवुन दे..

शौर्य : ओके..

आत्ता मी निघतो.. बाय.. विजय सगळयांना बाय करून तिथुन निघुन जातो..

शौर्य : माझ्या लॅपटॉप मध्ये सगळं सेव्ह केलात ना बरोबर..

आर्यन : प्रतीक केलं ना सेव्ह??

प्रतीक : सेव्ह तर महेश करणार होता..

महेश : मी तर रोहनला बोललो होतो.

(दिल्ली वाला रोहन प्रश्नार्थी चेहरा चौघांकडे बघतो..)

रोहन : मला अस काही करायला बोललले होते का तुम्ही लोक?? (रोहन प्रश्नार्थी चेहरा करतच सगळ्यांना विचारतो)

महेश : तुला नाही ह्या मुंबईतल्या रोहनला..

मला कधी सांगितलं?? कॅमेऱ्याच सगळं काही हा आर्यन बघत होता. मुंबईतील रोहन आर्यनकडे बघतच बोलतो..

अनघा आणि शौर्य आत्ता घाबरतच एकमेकांकडे बघू लागतात..

काका : म्हणजे काहीच सेव्ह नाही केलं??

आर्यन थोडा सिरीयस चेहरा करत शौर्यकडे बघु लागतो..

शौर्य : आर्यन प्लिज डोन्ट टेल मी नॉ... (शौर्य थोडं घाबरतच आर्यनला बोलतो)

आर्यन आपली मान नकारार्थी हलवत मानेनेच शौर्यला नाही म्हणुन बोलतो..

आर्यन तुला तर ना मी?? अस बोलत शौर्य रागातच आर्यन जवळ जाऊ लागतो..

सॉरी.. सॉरी.. मस्ती करत होतो.. मी सगळं काही तुझ्याच लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवलय.. विराजच्या मागे स्वतःला लपवतच आर्यन बोलतो..

शौर्य : मग एवढं सिरीयस तोंड का बनवलंस.. किती घाबरवलस आर्यन तु मला..

आर्यन : मला घाबरा बोललेलास ना SD तु.. तु पण काही कमी घाबरा नाहीस.. आणि तु माझ्या सारखाच किंवा त्यापेक्षा थोडा जास्त घाबरा आहेस हे मला कोणाला तरी दाखवायचं होत..
(आर्यन रोहनकडे बघतच बोलतो)

प्रतीक : काय मग दिल्लीकर काढा 2000 रूपीस.. SD पण घाबरा आहे हे प्रूफ झालं.. 

रोहन : हे अस स्टुपिड सारख घाबरवुन तुम्ही तो घाबरा आहे हे प्रुफ करणार का??

आर्यन : ए प्रतीक हे दिल्ली वाले हरल्यावर लगेच रडायला लागतायत यार..

रोहन : रडण्याचा प्रश्नच येत नाही ह्यात.. हे अस नको ते काही केलं मग घाबरणारच ना तो..

प्रतीक : पण बिट तर तो घाबरतो की नाही हे बघायची लागली होती ना..

रोहन : whatever it is..This is the wrong way to scare him..

आर्यन : ए हॅलो.. कोणत्या व्हे ने घाबरवायच हे ठरलं नव्हतं.. तु करेक्ट व्हे ने 2000 रूपीस कधी हा.. 

तिघेही एकमेकांसोबत आर्ग्युमेंट करत असतात.. 

शौर्य : एक मिनिट.. असल्या नकोत्या वेळेला नको ती बिट्स लावता तुम्ही..

आर्यन : तु घाबरलास.. हा बिट हरलाय.. ह्याला दोन हजार रुपये द्यायला सांग.. 

शौर्य : ये इथे मी देतो तुला दोन हजार..

महेश : SD तुला पण आमच्या सोबत आईस्क्रीम खायला भेटेल.. तु आमच्या बाजुने बोल.. 

आर्यन : बघ तर.. SD ला कळतच नाही काही..

रोहन : तुमच्या बाजुने का बोलणार तो.. अस घाबरण वेगळं आणि मी बोलत होतो ते घाबरण वेगळं होत..

आर्यन : घाबरण्याचे प्रकार तु आम्हाला बिट लावण्याचा आधी एक्सप्लॅन करायला हवे होतेस मिस्टर दिल्ली कर..

प्रतीक : बघ तर.. घाबरण हे घाबरणच असत. अस घाबरवण आणि तस घाबरवण मध्येच कुठुन आलं तुझं..?? तु बिट लावायच्या आधी अस काही बोलला होतास..

रोहन : तुम्ही मुंबईकर अस वेड्यासारखं डोकं लावणार हे माहिती असत तर बोललो असतो..

शौर्य : तुम्ही लोक परत चालु झालात.. आर्यन रूममध्ये जाऊन ते स्पाय कॅमेरा काढुन आण.. 

आर्यन आणि प्रतीक रोहनला खुन्नस देतच तिथुन विराज आणि शौर्यच्या रूममध्ये लावलेला स्पाय कॅमेरा काढतात.. महेश आणि रोहन मिळुन हॉल  मधील कॅमेरा काढतात..

विराज : हे सगळं पण तु केलेलंस शौर्य..

शौर्य : फक्त हेच नाही.. अजुन खुप काही केलेलं आणि खुप काही करणं बाकी आहे अस बोल..

विराज दादा.. साक्षी विराजला आवाज देत त्याच्या जवळ येत त्याला घट्ट मिठी मारून भेटते.. 

विराज : तुला पण आठवण नाही आली ना माझी..??

साक्षी : खुप येत होती रे.. पण तुला फोन करायचा नाही.. असा शौर्य दादाने दम दिलेला मला.. फक्त दादानेच नाही तर ह्या वहिनीने पण.. आणि बाबा मोबाईल पण देत नव्हता माझ्याकडे.. पण तु तरी यायचस ना लोणावळ्याला.. मी वाट बघत होती तुझी..

विराज : लोणावळा?? (विराज प्रश्नार्थी चेहरा करतच अनघा आणि शौर्यकडे बघतो) आज माझं काही खर नाही.. एक एक मोठं मोठे धक्के मला तुम्ही लोक मला देतायत.

शौर्य : मोठा धक्का तर तु मला दिलेलास.. सोड हा टॉपिक.. नंतर मी बोलणारच आहे तुझ्याशी..

अस बोलत शौर्य आपल्या मित्र मंडळींसोबत घराबाहेर जातो..

आर्यन : SD कॅमेरा काढलाय..आम्ही निघु का आत्ता?? 

शौर्य : तुम्ही कुठे चालले आत्ता.. जेवुन जावा..

प्रतीक : घरी जेवायसाठी सगळे वाट बघतायत आमची.. संध्याकाळी भेटुयात

शौर्य : तुम्ही सगळे इथे जेवुन जातायत.. 

आर्यन : घरी जेवण केलंय रे.. हे बघ पिऊचा फोन.. अजुन लेट झाला तर मम्मी ओरडेल रे मला.. अजुन लेट होण्याआधी मी निघतो.. संध्याकाळी 6 वाजता भेटुयात.. आणि मग सगळे एकत्रच हॉस्पिटलमध्ये जाऊयात.. चालेल??

शौर्य : ओके चालेल.. 

आर्यन :  रोहन चल घरी..

रोहन : नाही नको.. शौर्य वृषभला बघुन मी आज लगेच निघतोय घरी जायला..

शौर्य : लगेच कुठे चाललास?? रहा थोडे दिवस..

रोहन : कामं आहेत रे.. ह्या टाईमला मला तुझ्यासोबत रहायला खरच नाही जमणार.. आपण आत्ताच वृषभला भेटुयात ना. प्लिज

शौर्य : जेवुन जाऊयातना?? 

रोहन : ओके चालेलं..

तो आज माझ्याच घरी जेवेल.. SD तुझं जेवुन झाल्यावर आम्हांला पिकअप कर.. अस बोलत आर्यन रोहनच्या गळ्यात हात घालत जबरदस्ती करत आपल्या घरी घेऊन जाऊ लागतो..

शौर्य : फॉर थर्टी पर्यंत येतो मी.. रेडी रहा.

हो... बाय एव्हरी वन असे बोलत सगळेच तिथुन जाऊन लागतात..

शौर्य विराजकडे बघतो तर विराज अनिताचा हात पकडत सोफ्यावर बसुन  तिच्यासोबत बोलत असतो.. बाकीची घरातली मंडळी सगळेच सोफ्यावर अगदी शांत बसुन असतात..

काय झालं मम्मा.. अनिताच्या बाजुला बसत आपला एक हात तिच्या खांद्यावर टाकतच शौर्य तिला बोलतो..

अनिता काहीही बोलत नाही ती शांत बसुन असते.. 

शौर्य : मम्मा आत्ता सगळं ठिक आहे ग.. उशिरा का होईना पण त्यांना त्यांची शिक्षा मिळाली ना.. 

अनिता अजुनही शांत बसुन असते..

विराज : मम्मा.. आय एम सॉरी..

विराज अनिताचा हात आपल्या हातात पकडतच तिला बोलतो..

इट्स ओके... तुम्ही सगळ्यांनी जेवुन घ्या.. मला जेवण नकोय.. मला बर नाही वाटत मी थोडं आराम करते.. विराजच्या हातातुन आपला हात सोडवतच अनिता बोलते..

अनिता तिथुन निघुन जाते.. सगळे सोफ्यावर शांत बसुन असतात..

विराज अनघाकडे बघतो.. अनघा आपले डोळे अलगद असे मिटत त्याला इट्स ओके आहे अस सांगते.. 

शौर्य : मी जेवण ऑर्डर करतोय सगळ्यांसाठी.. मला खुप भुक लागली आहे.. 

शौर्य सगळ्यांसाठी जेवण ऑर्डर करतो.. 

जेवण येताच आत्या आणि काकी सगळ्यांना जेवण सर्व्ह करू लागतात..

शौर्य एका प्लॅटमध्ये जेवण काढुन घेत आपल्या मम्माच्या रूममध्ये जातो..

अनिता बेडवर डोळे मिटुन अगदी शांत बसुन असते.. 

मम्मा... शौर्यच्या आवाजाने ती डोळे उघडते.. तस डोळ्यांत आत्तापर्यंत कस बस अडवून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी येते.. पटकन डोळ्यांतुन येणार पाणी ती पुसते.. 

शौर्य हातातील जेवणाच ताट तिथेच बाजुला ठेवतो.. 

मम्मा.. नको ना ग रडुस.. अनिताचा हात आपल्या हातात घेतच तो तिला बोलतो.. तस अनिताला अजुन भरून येत..

शौर्य : मला ना आत्तापर्यंत बाबा खूप बरोबर वाटायचा ग मम्मा.. म्हणजे माझा बाबा कधी चुकणार नाही अस वाटायच.. बट दोन दिवसांत अस वाटतंय की माझी मम्मा माझ्या बाबा पेक्षा खुप छान आहे.. कारण तु ट्रान्सपरंट आहेस ग मम्मा.. आणि वर्ल्ड मधली सगळ्यात बेस्ट मम्मा आहेस तु.. मीच तुला कधी समजु नाही शकलो.. ना तुला आणि ना तुझ्यातल्या फिलींग.. माझी मम्मा कधीच आणि कुठेच नाही चुकली.. जर चुकली असेल तर बाबाने तिला नको ती चुक करायला भाग पाडल असेल अस वाटतंय मला.. 

(अनिता अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी शौर्यकडे बघत रहाते...)

अनिता : अस का बोलतोयस तु अचानक..? तुझा बाबा खुप चांगला होता.. मीच नाही समजु शकले त्याला..

शौर्य : बाबाने पण नाही ना ग समजुन घेतलं तुला.. प्रेम नव्हतं मग का तुझ्यासोबत लग्न केलं त्याने.. 

अनिता : होऊन गेल्या ना गोष्टी.. विसरून जाऊयात.. त्रास होतो ते आठवुन..

शौर्य : ओके.. जेवुन घे..

आत्ता भुक नाही आहे अस अजिबात बोलणार नाहीस.. नाही तर मी पण जेवणार नाही.. कळलं तुला..?? आपल्या मम्माला दम देतच शौर्य बोलतो..

अनिता जबरदस्ती ओठांवर गोड अस हसु आणत शौर्यने आणलेलं ताट हातात घेते.. 

आज मी माझ्या लाडक्या मम्माला माझ्या हाताने भरवतो..

अनिता : माझं मी जेवते..  तु राहु दे.. 

शौर्य : अजिबात नाही.. मी भरवतो बोललो ना तुला.. मग मीच भरवणार.. 

शौर्य आपल्या मम्माला आपल्या हाताने भरवत असतो तोच दरवाजा नॉक करत विराज आत येतो..

अनिताला शौर्यने रेकॉर्डिंग मध्ये ऐकवलेले विराजचे शब्द आठवत असतात.. विराज तिच्या बाजुला येऊन बसतो.. पण अनिता त्याच्याकडे बघत नसते.. एकटक ती शौर्यकडे बघत असते..

विराज अनिताच्या बाजुला जाऊन बसतो..

विराज : मला माहिती तु अजुन रागवलीस माझ्यावर.. 

(अनिता काहीही न बोलता शांत बसुन असते..)

अनिता : शरु तु जेवुन घे जा बघु.. खाली सगळे वाट बघत असतील तुझी..

शौर्य : मी तुला जेवण भरवणार.. त्या नंतर तु तुझं औषध वैगेरे घेणार आहेस आणि गप्प पणे आराम करणार आहेस.. डॉक्टरांनी जास्त त्रास करून घ्यायचा नाही अस सांगितलंय तुला.. (शौर्य रागातच विराजकडे बघत बोलतो)

विराज : काय होतंय मम्मा तुला??

अनिता : काही नाही.. मी आहे बरी.. 

विराज खाली मान घालुन बसुन असतो.. शौर्य अधुन मधुन विराजकडे एक नजर फिरवत आपल्या मम्माला भरवत असतो.. जेवण भरवुन होताच औषध आणि पाण्याचा ग्लास तिच्या हातात देतो..

अनिता प्रेमाने शौर्यच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्याच्याकडे बघते..

शौर्य : जेवुन झाल्यावर मी हॉस्पिटलमध्ये जाईल वृषभला भेटायला.. त्यानंतर रोहन दिल्लीला जातोय ना मग त्याला सोडायला एअरपोर्टवर जाईल.. उशीर झाला तर रागवु नकोस..

अनिता : नाही रागवत.. पण थोडा आराम करायचास.. दोन दिवस मी तुला झोपलेल बघितलंच नाही..

येऊन आराम करतो ग.. तुला काही लागलं तर साक्षीला नाही तर वहिनीला आवाज दे.. विराजकडे बघतच शौर्य आपल्या मम्माला बोलतो..

अनिता : हम्मम..

विराज : मम्मा बोल ना ग माझ्याशी..

शौर्य : विर मम्माला खरच बर नाही.. डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितला आहे.. आपण निघुयात इथुन.. जेणे करून ती आराम करेल.. प्लिज..

विराज इनोसेन्ट असा चेहरा करत अनिताकडे बघतो.. आणि जास्त काही न बोलता तिच्या रूम मधुन बाहेर पडतो..

अनिता विराजला अस रूम मधुन जाताना बघतच रहाते.. तो रूम बाहेर पडताच ती शौर्यकडे बघते..

शौर्य : ह्याच्या मोठ्या मम्मी पप्पांचे नखरे झाले आत्ता ह्याचे नकरे चालु होतील.. एकटिंग करण्यात तुझ्या मोठ्या मुलाचा हात कोणीच नाही पकडु शकत.. वरून धवनला पण मागे टाकेल इतकी भारी एकटिंग करता येते ह्याला.. नखरे तर मुलींच्या वर आहेत त्याचे.. अजिबात लक्ष देऊ नकोस तु.. राहु दे उपाशी त्याला.. तस पण सकाळी माझ्यासोबत असताना ब्रेकफास्ट वैगेरे पण नीट केला नाही त्याने.. म्हणजे केलाच नाही आहे त्याने.. बट इट्स ओके.. भुक लागली की गप्प पणे जेवेल. नाही जेवला तर लास्ट टाईम सारखा आजारी पडेल.. पडु दे आजारी.. त्याला हिच शिक्षा हवी.. 

अनिता : अस नको ते काय बोलतोयस तु आज??

शौर्य : आपण बोललो नाही त्याच्याशी तर त्याच असच काहीस होत हे माहिती ना तुला.. तु काही तरी बोलशील म्हणुन किती वेळ बसलेला तो इथे.. का राग करतेयस त्याचा??

अनिता : उगाच राग करतेय का मी.. कस बोलत होता तो त्याच्या मोठ्या मम्मी पप्पांना.. ?? 

शौर्य : मम्मा सोड ना ते सगळं.. आत्ता कोणीच नाही ग त्याच.. परत तो आजारी पडला मग मी इथेच अडकुन राहील बघ.. विरच आजारी पडण कस असत हे तुला पण माहितीय.. नीट बोल त्याच्याशी.. आणि त्याला जेवायला खाली पाठव.. मी वाट बघतोय त्याची.. मी म्हणजर सगळेच.. सगळयांना भुक लागलीय.. हा नाही आला मग सगळेच जेवायचे थांबतील..

शौर्य अनिताच्या रुममधुन बाहेर पडतो आणि खाली डायनिंग टेबलवर येऊन बसतो..  सगळेच जेवायसाठी त्याची आणि विराजची वाट बघत थांबले असतात..

काका : वहिनी जेवली ??

शौर्य : हम्मम..

काकी : विराज कुठे राहिला..

शौर्य : पाच मिनिटांत येईल तो.. तुम्ही जेवुन घ्या.. 

काका : एकत्रच बसुयात.. 

सगळे विराजची वाट बघत डायनिंग टेबलवर बसुन असतात.. डायनिंग टेबलवर शांतता असते..

अनिता विराजच्या रूममध्ये जाते.. विराज गेलरीत एकटाच बसला असतो..

अनिता : खाली सगळे जेवणासाठी वाट बघतायत तुझी.. 

आपली मम्मा आलीय हे कळताच विराज तिच्या जवळ जात तिला मिठी मारतो आणि रडु लागतो...

अनिता : विर तु अस रडलेलं मला अजिबात आवडत नाही हा.. 

विराज : मग तु बोलत का नाही आहेस माझ्याशी.. मला त्रास होतो..

अनिता : तु जेवुन घे.. आपण शांत पणे बोलूयात ह्या विषयावर..

विराज : आधी बोल मग मी जेवेल..

अनिता : विर तुझ्याकडुन अश्या हट्टी पणाची अपेक्षा मला अजिबात नाही आहे.. तु आल्याशिवाय तिथे कोणी जेवणार नाही माहिती न तुला.. सगळेच खुप दमलेत आणि सकाळपासुन उपाशी आहेत.. साक्षी सुद्धा.. ह्या दोन तीन दिवसांत तु स्वतःचाच विचार केलायस निदान ह्या वेळेला तरी ह्या माणसांचा विचार कर.. आणि जेवुन घे.. मला खरच बर नाही वाटत आहे.. तुझ्याच पुढ्यात औषध घेतलं ना मी.. मल थोडं आराम करु देत.. आपण रात्री निवांतपणे बोलुयात..

विराजच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत ती तिथुन निघुन जाते..

विराज जास्त काही न बोलता आपले डोळे पुसतो आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसतो..

साक्षी : विराज दादा किती उशीर.. मला खुप भुक लागलेली..

विराज : जेवुन घ्यायचं ना तु..

काका : एवढ्या दिवसांनी तु भेटलास म्हटलं तर ती तुझ्याशिवाय जेवेल का विराज??

विराज बाजुलाच बसलेल्या साक्षी कडे बघतो.. साक्षी हसतच त्याच्याकडे बघत असते.. 

सॉरी माझ्यामुळे उशीर झाला तुला.. विराज आपला एक हात कानाला लावतच तिला बोलतो..

इट्स ओके रे दादा.. पोळी भाजीचा एक घास विराजला भरवतच ती त्याला बोलते..

दोन दिवस विराज हे सगळं मिस करत होता.. आपली हक्काची माणस आपल्या समोर आहेत आणि मुळात ती आपल्यासोबत पहिल्या सारख बोलतायत हे बघुन विराजला खूप छान वाटत.. 

शौर्य : काकी संध्याकाळी तु जेवण बनवशील?? जर तु दमणार नसशील तर?? कोणी तरी तुझ्या हातच जेवण खुप मिस करत होत ग??

शौर्य तिरक्या नजरेने विराजकडे बघतच काकीला बोलतो..

काकी : आज संध्याकाळी माझ्या विराजच्या आवडीच जेवण बनवेल मी..

काकी हसतच विराजकडे बघत बोलते..

साक्षी विराजच्या कानात काही तरी सांगु लागते..

ओके डन.. विराज हसतच तिला डाव्या हाताने हाय फाय देतच बोलतो..

काका : काय चाललंय दोघांच??

साक्षी : बाबा आम्हा दोघांच सिक्रेट आहे रे ते..

शौर्य : आईस्क्रीम हवी असेल.. अजुन काय सिक्रेट असणार हीच.. हो ना साक्षी??

साक्षी तोंड पाडतच विराजकडे बघत शौर्यकडे बघु लागते..

शौर्य : अस तोंड पाडत बघतेयस म्हणजे असच असेल.. बट अस चोरून चोरून दोघेच का खातायत.. सगळ्यांसाठी ऑर्डर करा ना..

काकी : अजिबात नाही.. साक्षी.. नेक्स्ट मंथ एक्साम आहे.. सॉ नॉ आईस्क्रीम..

साक्षी तोंड पाडतच जेवू लागते.. 

नेहमी प्रमाणे सगळे झोपल्यावर आपण आईस्क्रीम पार्लर मध्ये जाऊन तुझी फेव्हरेट आईस्क्रीम खाऊयात.. विराज हळुच साक्षीच्या कानात सांगतो.. तशी साक्षी खुश होत त्याच्याकडे बघत त्याला हाय फाय देते..

चांगला प्लॅन आहे.. बट मी तुमचा हा प्लॅन सक्सेस फुल होऊ देणार नाही.. शौर्य थोडा नकटा राग दाखवतच विराज आणि साक्षीला बोलतो..

विराज : तुला काय झालं?

शौर्य : तुमचा प्लॅन मला कळलेला आहे.

विराज : अच्छा?? काय कळल सांग तुला..

शौर्य आपला मोबाईल काढुन विराजला व्हाट्सएवर मॅसेज करतो..

विराज मोबाईल काढुन शौर्यने केलेला मॅसेज वाचतो..

【After everyone sleeps at night, you are going to the ice cream parlor.. to eat Sakshi's favorutie ice cream】

मॅसेज वाचुन झाल्यावर विराज आश्चर्य चकित होत शौर्यकडे बघतो.. शौर्य भुवयांसोबत एका हाताने आपली कॉलर पण उडवत विराजकडे बघत असतो..

काका : शौर्य काय चालु आहे ह्या भाव बहिणीच कळेल का मला??

शौर्य : ते विर आणि साक्षी रात्री.. (शौर्य विराज आणि साक्षीकडे बघत दोघांनाही घाबरवत काकासोबत बोलत असतो.. विराज आणि साक्षी एकमेकांकडे बघत परत शौर्यकडे बघतात)

साक्षी : शौर्य दादा.. तु पण आमच्या टिम मध्ये आहेस..

शौर्य : अस बोलतेस मग काकाला नाही सांगत की तुम्ही दोघे आज रात्री परत नवीन हॉरर मुव्ही बघणार आहात ते...

काका : काल हॉरर मुव्ही बघुन रात्रभर झोपेत ओरडण चालु होत साक्षी तुझं.. विराज हिच अजीबात ऐकु नकोस..

विराज : हम्मम..

(विराज शौर्यकडे बघत असतो)

सगळेच नेहमी प्रमाणे मज्जा मस्ती करत जेवत असतात..

इथे रोहन आर्यनसोबत त्याच्या घरी जात असतो. आर्यन आणि इतर मित्रमंडळींची रस्त्यात मस्ती चालु असते.. सगळे रोहनला तो हरलेल्या बिट चे दोन हजार रुपये देत नाही म्हणुन चिडवत असतात.. रोहनच लक्ष मात्र त्यांच्याकडे नसत.. वृषभ आपल्याला माफ करेल की नाही ह्याचा विचारात तो करत असतो..

क्रमशः

(वृषभने खरच रोहनला माफ करायला हवं?? वृषभ आणि रोहनची भेट होईल?? अनिता विराजसोबत फिक्यासारखं बोलेल?? पाहुया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते मात्र नक्की कळवा.. तुम्ही केलेल्या कमेंट वाचुन कथा पुढे लिहिण्यास एक वेगळीच स्फूर्ती मिळते.. धन्यवाद)

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all