अतरंगीरे एक प्रेमकथा १४४

In marathi

इथे पिऊ वृषभकडे बघत आपल्या सोबत घेऊन आणलेल्या कटलेटचा डब्बा ऑपन करते.. खुप दिवसांनी आपल्या आवडीचे कटलेट्स बघुन वृषभ खुश होतच पिऊकडे बघतो..

वृषभ : आज सकाळीच तुला फोनवर बोललो आणि लगेच घेऊन पण आलीस तु..??

पिऊ : तुला हवं तर रोज घेऊन येत जाईल.. काही खावस वाटल तर अस फोन करून सांग मला..

वृषभ डब्यात हात टाकत कटलेट खायला जाणार तस पिऊ त्याचा हात पकडते.. 

तु राहु दे.. मी भरवते.. तुझे हात धुतलेले नाहीत.. आणि त्याच हाताने खाणार तु?? मी स्पुन वैगेरे घेऊन आलीय.. बेगेतुन स्पुन आणि सोबत आणलेले टीस्यु वृषभ समोर असलेल्या टेबलवर ठेवतच ती त्याला बोलते..

वृषभ आपल्या बहिणीकडे बघतो.. वृषभची बहिण आपल्या हाताची तीन बोट त्याला दाखवत इशाऱ्यानेच खुप छान आहे पिऊ अस बोलते.. पिऊच मात्र तिच्या पाठी उभ्या असलेल्या वृषभच्या बहिणीकडे लक्ष नसत.. तिची वृषभच्या मागे बडबड चालु असते.

"तुझ्यासाठी फ्रुटस पण कट करून आणलेत.. नको नको करत बसु नकोस. मी रात्री व्हिडीओ कॉल करेल तेव्हा डब्बा फिनिश दिसला पाहिजे मला.. आणि बिट पण आहे त्यात.. ते पण जेवताना खायचय तुला.. तस तु खातोस.. माझ्या दादा सारखा नाजुक नाहीस आणि माझ्यासारखा पण.. संध्याकाळचा डब्बा मी दादा कडे पाठवुन देत जाऊ का तुला?? अस हॉस्पिटलमधलं जेवण नको खाऊस.. मी एक काम करते मी दादाला सांगते.. दादाच तस ऐकतोस तु.. चालेल ना तुला?? नाही तर परत रागवशील माझ्यावर.. तुला न सांगता दादाला विचारलं मग.. 

वृषभ हनुवटीवर आपले हात ठेवत गालातल्या गालात हसत एकटक पिऊकडे बघत असती..

काही बोलशील का नाही.. मी एकटीच बोलतेय.. चमच्यात धरलेला कटलेटचा छोटा पिस त्याच्या तोंडाजवळ नेतच ती त्याला बोलते..

वृषभ थोडं लाजतच आपल्या बहिणीकडे बघतो.. 

त्याची बहिण एक डोळा मिटत हलकीच आपली मान तिरकी करत त्याला बिनदास्त खा अस बोलते..

पिऊ : डोकं जास्त दुखतंय का?? 

वृषभ नकारार्थी मान हलवत नाही बोलतो.. (तो तिला इशाऱ्यानेच पाठी ताई उभी आहे आ बोलतो.. पण पिऊच तो करत असलेल्या इशाऱ्याकडे लक्षच नसत.. )

पिऊ : मग दादा मम्मीला का अस बोलत होता.. मला माहिती मी टेन्शन घेते म्हणुन तु मला काही सांगत नाहीस..

वृषभ : तस नाही ग.. सकाळी खुप दुखत होतं डोकं.. 

पिऊ : जास्तच??

वृषभ : हे बघ.. तुझं अस असत.. आत्ता थोडे दिवस दुखेल ग राणी...

(आपण आपल्या बहिणीच्या पुढ्यात तिला राणी बोलतो हे कळताच वृषभ मध्येच थांबत आपल्या बहिणीवर नजर फिरवतो.. त्याची बहिण नजर मोठी करत त्याला चिडवत असते)

पिऊ : कसे झालेत?? आय नको तुला गरम गरम आवडत.. तरी निघता निघता घाई घाईत बनवले.. म्हणजे तुला गरम गरम खायला मिळतील म्हणुन.. बट तरी थंड झाले रे.. 

वृषभ : इट्स ओके.. आणि कटलेट छान झालेत.. ताई तु पण खाऊन बघ.. माझी पिऊ एकदम छान कटलेट्स बनवते.. म्हणजे सगळं जेवणच ती छान बनवते..

वृषभ अस बोलताच पिऊ मागे वळुन बघते.. वृषभच्या ताईकडे बघत इनोसेन्ट असा चेहरा करत ती वृषभकडे बघते.. आणि आपल्या हातातील डब्बा वृषभच्या हातात देत उभी राहते..

ताई : वृषभ तुझ्या पिऊला लाजायला खुप भारी येत हा..

(ताई अस बोलताच पिऊ मान खाली घालुन गालातल्या गालात हसु लागते.. वृषभ सुद्धा तीच ते लाजण बघण्यात हरवुन जातो)

अशी लाजु नकोस ग मला.. आणि एवढी फॉर्मेलिटी करायची काहीही गरज नाही.. बस बघु इथे.. (पिऊच्या हाताला धरत वृषभची ताई परत तिला टेबलवर ती बसवते)

हम्मम.. खरच की.. खुपच छान झालेत.. वृषभची बहिण डब्यातून कटलेट्सचा छोटासा तुकडा तोडून आपल्या तोंडात टाकतच पिऊला बोलते..

दोघेही आपलो एवढी छान स्तुती करतायत हे बघुन पिऊ लाजुन अगदी चुररर झालेली असते.. 

वृषभ : ताई घरी केलासना फोन?? पप्पा आहेत ना बरे??

ताई : फोनच लागेना.. हे बघ वरदच्या बाबांचा फोन..

(ताई फोनवर बोलत परत तिथुन बाहेर पडते)

पिऊ तु किती लाजतेस ग?? आपली ताई तिथून जाताच वृषभ पिऊला बोलतो..

तु मला सांगितलं का नाही ताई माझ्या मागे उभी आहे ते.. वृषभच्या हातातील डब्बा परत आपल्या हातात घेत थोडा नकटा राग वृषभला दाखवतच पिऊ बोलते..

माझं मी खातो राहु देत.. डब्बा तसाच घट्ट पकडत वृषभ पिऊला बोलते..

आत्ता भरवते ना मी.. वृषभची डब्या भोवतालची पकड सोडवतच पिऊ त्याला बोलते.. एकमेकांच्या होणाऱ्या स्पर्शाने दोघांच हृदय अगदी धडधडत असत..

वृषभ पिऊचा एक हात आपल्या हातात घट्ट पकडत तिच्याकडे बघतो..

पिऊ : वृषभ मी भरवणार कस..??

त्या हाताने.. वृषभ आपल्या हातातील डब्बा तिच्या समोर धरत तिला बोलतो..

पिऊ गोड अशी स्माईल त्याला देत त्याने हातात पकडलेल्या डब्यातून त्याला भरवु लागते.. 

तुझं हे अस डोकं दुखायच कधी थांबणार?? पिऊ काळजीच्या सुरात वृषभकडे बघतच त्याला विचारते..

वृषभ : परत तुझं तेच.. थोडे दिवस दुखेल ग ते.. तु टेन्शन घेऊस घेऊस आणि अभ्यासात लक्ष दे थोडं.. आणि त्रास करून अस रोज रोज भेटायला नको येऊस.. कळलं..??

हम्मम.. पिऊ काहीही न बोलता त्याला गप्प पणे कटलेट भरवु लागते

दोघांना थोडा वेळ मिळावा म्हणुन वृषभची बहिण दोघांपासून थोडं लांबच उभं रहाते..

इथे मुंबई गॅंगच काही तरी वेगळंच चालु असत..

शौर्य तु पण ना उगाचच एवढं टेन्शन घेतोस.. आपल्याकडे एवढे आघाडीचे क्रिकेटर असताना ह्या मोबाईलच... टे.. न्श... न.... तर.. अस बोलत मोबाइलकडे बघत रॉबिन घाबरतच आर्यन आणि महेशकडे आपली नजर फिरवतो..

आर्यन महेशकडे बोट दाखवत असतो आणि महेश आर्यनकडे.. दोघेही एकमेकांवर नाव टाकत आपल अंग काढत असतात..

रॉबिन.. शौर्य रागातच रॉबिनवर ओरडतो..

तसा रॉबिनच्या हातुन मोबाईल खाली पडतो. आधीच फुटलेला मोबाईल त्यात परत पडल्यामुळे अजुन फुटतो..

शौर्य रागाने लालबुंद झाला असतो.. रॉबिनच्या हातुन खाली पडलेल्या मोबाईलकडे एकटक बघतच असतो.. घरी जाऊन आपल्या मम्माला काय सांगायच हा विचार त्याच क्षणी त्याच्या डोक्यात येतो. येणाऱ्या विचाराने आतुन घाबरून सुद्धा गेला असतो..

रॉबिन : तुम्ही लोक खाली बेटिंग करायसाठी गेलेले की फिल्डिंग?? काय हालत केलीय यार आपल्या शौर्यच्या मोबाईलची..??

आर्यन : मोबाईल ह्याच्या जवळ आलेला आणि ह्याच्या हातातुन कॅच सुटली..

(आर्यन महेशकडे बोट दाखवतच बोलतो)

महेश : ए आर्यन आपल्या दोघांच्या मध्ये होता..

आर्यन : मग तु का नाही पकडली..

महेश : तु पण कॅच सोडलीस ना??

आर्यन : हो पण तुझ्या जास्त जवळ होता ना.

एक मिनिट.. शौर्य रागातच ओरडतो.. तसे सगळे शांत होतात..

SD सॉरी.. ह्या आर्यन आणि महेशमुळे झालं.. हे दोघ कॅच पकडतील अस वाटलं ह्या रॉबिनला.. म्हणुन ह्या रॉबिनने.. प्रतीक माघार घेतच शौर्यला बोलतो.

ए रॉबिन काय .. रॉबिन ?? एक अशी चमाट देईल ना मी तुला.. आधीच बोललो होतो फुटबॉल प्लेयर्स ना तु क्रिकेट खेळायला पाठवतोयस.. आपल्या ग्रुपचे धोनी आणि कोहली आहेत अस कोण बोललं??

(रॉबिन प्रतीकवर थोडं भडकतच बोलतो)

प्रतीक : कोण बोललं म्हणजे..? एक मिनिट हे असले डायलोग हा नैतिक बोलला मी नाही.... ए नैतिक तु बघ आत्ता..

रॉबिन : ए नैतिक नाही अनैतिक आहे तो.. ह्याचे सगळे प्लॅनच असे असतात.. त्यात हि दोघ.. तो बोलला म्हणुन स्वतःला लगेच धोनी आणि कोहली समजु लागले.. नाही कॅच पकडायला जमत तर नाही बोलायच ना.. मला ना तुम्हा लोकांसोबत बोलायच नाही.. मी जातो घरी..

रॉबिन सुद्धा सगळ्यातुन अंग काढत लिफ्टच्या दिशेने जाऊ लागतो..

तस शौर्य त्याच्या मागे जात रागातच त्याचा हात पकडत जोरातच मागे मुरघळतो..

आहह.. शौर्य तु उठ सुठ माझाच हात का पकडतो.. ज्यांनी कॅच सोडली त्यांचा पकड ना.. रॉबिन शौर्यला बोलतो..

रॉबिन तस बोलताच शौर्य अजुन जोरात त्याचा हात मुघळतो..

माझा हात मोडशील रे शौर्य.. आणि मी एकटा नव्हतो यार.. हि लोक पण होती..  रॉबिन कळततच शौर्यला बोलतो

मोबाईल खाली कोणामुळे पडला?? तुझ्याच मुळे ना?? शौर्य अजुन जोरात रॉबिनचाच हात मुरघळतच त्याला विचारतो..

रॉबिन : शौर्य सिरियसली दुखतोय हात.. प्लिज यार.

शौर्य : माझा मोबाईल खाली पडण्याआधी जसा होता तसा माझा मला परत द्यायचा.. मगच तुझा हात सोडणार मी..

रॉबिन : ए आर्यन खाली जाऊन दहा पॅकेट फेव्ही क्विक घेऊन ये जा.. मी चिकटवुन देतो ह्याला ह्याचा मोबाईल.. जसा होता अगदी तसाच..

अजुन पण तुला जॉक सुचतायत का रॉबिन.. शौर्य रागातच रॉबिनवर ओरडतो..

रॉबिन : जॉक तु करतोय ना शौर्य?? एक तर माझा हात असापाठी पिरघळतोयस वर मला मोबाईल होता तसा करून द्यायला सांगतोस..  कसा देणार सांग..?? मी घरी डॅड कडुन पैसे घेऊन तुला देतो.. प्लिज हात सोड.. 

शौर्य : तुझा डॅड वन लॅक्स देईल तुला??

रॉबिन : म्हणजे तुला पण माहितीना नाही देणार ते.. तरी एवढे पैसे मागतोयस ह्या गरिबाकडे.. 

शौर्य : अस बोलतोस तर ठिक आहे मग.. जसा माझा मोबाईल तुटला तस तुझा हातच तोडतो मी.. म्हणजे हॉस्पिटलच बिल तुझ दीड लाखाच्या आस पास येईल. मग तुझा डॅड दीड लाख देईल.. 


आर्यन : SD पागल झालायस का तु?? काय करतोयस..


टिट फॉर टेट.. फक्त ह्याचाच नाही तुम्हा सगळ्यांचाच हात असा मोडणार मी.. सगळ्यांकडे रागातच आपली नजर फिरवत शौर्य जोरातच रॉबिनचा हात मुरघळतो..

रॉबिनच जोर जोरात ओरडण चालु असत.. सगळेच मित्र मंडळी घाबरतच शौर्यकडे बघत त्याला समजवत असतात.. पण शौर्य कोणाच काहीही ऐकुन घ्यायच्या मुड मध्ये नसतो..

तोच लिफ्ट ऑपन होऊन त्यातून ज्योसलीन आणि रितु बाहेर येते.. त्यांच्या मागोमाग समीरा आणि मानव सुद्धा असतात..

शौर्य काय करतोयस?? ज्योसलीन शौर्य जवळ जात त्याच्यावर ओरडतच त्याला विचारते..

रॉबिन : Hey jyo pls help me .. I didn't do anything re.. 

ज्योसलीन : शौर्य हात सोड त्याचा.

शौर्य : माझा मोबाईल फोडलाय ह्याने. तो बघ.. मला माझा मोबाईल दे मी ह्याचा हात सोडेल.. नाही तर जसा मोबाईल तुटलाय तसा ह्याचा हातच तोडणार मी..

रॉबिन : तरी तुझं तेच... तु हात सोड मग देतो तुझा मोबाईल..

ज्योसलीन : तु तुझ्या ह्या तुटलेल्या मोबाईलसाठी माझ्या रॉब चा हात तोडणार?? आर यु मॅड??

शौर्य : ए ज्यो तो तुटलेला मोबाईल घरी घेऊन गेलो ना माझ्या घरचे माझ्यावर तुटून पडतील.. आणि ह्या तुझ्या रॉब पेक्षा माझ्या मोबाईलची वेल्यु मार्केट मध्ये जास्त आहे.. कळलंना??

ज्योसलीन : तु त्याचा हात सोडतोयस का नाही ते सांग??

नाही.. शौर्य रागातच ज्योसलीनला बोलतो..

ज्योसलीन : शौर्य मी आंटीला फोन करून तुझी कम्प्लेन्ट करेल हा..

ज्योसलीन अस बोलताच शौर्य रागातच तिच्याकडे बघत रॉबिनचा हात अजुन जोरात पिरघळतो..

आहह.. शौर्य.. हात मॉडेल यार माझा.. ए ज्यो तु मला वाचवायला आलीस की ह्याला भडकवायला.. 

ज्योसलीन : शौर्य हात सोड त्याचा..

रोहन : शौर्य सोडना हात.. खरच मोडशील त्याचा हात..

आर्यन : ए SD आम्ही सगळे मिळुन देतो तुला तुझा मोबाईल.. त्याचा हात सोड तु.. प्लिज..

शौर्य : कस देणार?? आणि ह्याला सोडुन मी घरी काय सांगु?? 

महेश : आम्ही सगळे तुझ्या घरी येऊन तुझ्या घरच्यांना सॉरी बोलतो. आणि तुझा मोबाईल पण तुला देतो.. तु त्याचा हात सोड. प्लिज..

शौर्य रागातच रॉबिनचा हात सोडतो.. आणि पडलेला मोबाईल उचलतो..

ज्योसलीन : हात दुखतोय का??

खुप.. एका हाताने आपला हात दाबतच रॉबिन बाजुलाच असलेल्या बाकड्यावर जाऊन बसतो..

रोहन : समीरा तु?? वृषभला भेटायला आलीस??

रोहन समीरा ज्याच्यासोबत उभी होती त्याच्याकडे बघतच तिला विचारतो.

समीरा : हो म्हणजे तु पण आज जाणार बोललास ना म्हणुन तुला पण भेटायला आलीय.. बट काय चालु होत इथे..??

रोहन : ते.. शौर्यचा मोबाईल फुटला.. म्हणुन हे सगळं..

समीरा : ओहह.. शौर्य न्यु मोबाईल घे ना.. एवढं का राग करतोयस..?

एवढं सोप्प आहे का ते?? अस बोलत शौर्य आपल्या हातातील मोबाईलकडे बघत आत्ता काय करायचं ह्याचा विचार करू लागतो..

समीरा : तुझ्यासाठी कठिण काय आहे त्यात..??

नैतिक : 89000 चा मोबाईल होता त्याचा.. तो घेऊन 3 महिनेच झालेत. त्यात 3 दिवसांपुर्वी त्याने 25000 टाकुन डिस्प्ले बसवला.. आत्ता घरी कळलं मग विर तर ह्याला काही सोडणार नाही..

एवढं माहिती असुन मोबाईल सोबत मस्ती करता तुम्ही लोक.. जरा सिरीयसनेस पणा आहे का नाही?? नैतिक जवळ येत त्याची कॉलर धरतच शौर्य बोलतो..

आर्यन : SD सॉरी ना.. आम्ही कंट्रीब्युशन करतो आणि मोबाईल देतो तुला..

महेश : हा बट आमच्या पॉकेट मनीमधुन आयफोन येणार नाही.. 

आर्यन : हा म्हणजे ऐंशी नव्वद हजार नाही जमणार.. 

नैतिक : एक महिन्यात आम्ही कसे पण करून जमवतो आणि तुला आयफोन घेतो..

प्रतीक : USA मध्ये तुला कुरिअर करतो.. मग तर चालेल?? 

रोहन : मी देतो तुला पैसे.. तस पण हे सगळं माझ्या मुळेच झालंय.. मिच बिट लावली नसती तर हे अस काही झालंच नसत.. आय एम सॉरी..

प्रतीक : आमची पण चुकी आहे.. आम्हीच थोडं अति केलं.

रॉबिन : ह्या नैतिक ने..

नैतिक : सॉरी ना.. SD सॉरी ना.

शौर्य : मोबाईल दे तुझा??

नैतिक : ए SD.. आत्ता देतो बोललो ना तुला तुझा मोबाईल परत.. माझ्या मोबाईलवर का राग काढतोयस.. माझा मोबाईल फुटला तर घरचे फोडतील यार मला.. 

शौर्य रागातच नैतिककडे बघत रोहनकडे बघतो... रोहन मोबाईल दे तुझा...

रोहन जास्त विचार न करता खिश्यातुन लगेच मोबाईल काढुन शौर्यच्या समोर धरतो..

शौर्य : गाथा टेन्शन घेईल तिथे.. अचानक फोन बंद झाला म्हणुन वहिनीला पण फोन लावेल ती.. म्हणुन मागत होतो मोबाईल. थेंक्स रोहन.. एक फोन करायचाय मला.

रोहन जवळ जात त्याचा मोबाईल शौर्य घेतो.

हा धर.. सगळेच आपला मोबाईल त्याच्या समोर धरतच त्याला बोलतात..

शौर्य : नकोय आत्ता.. एक एक नमुने नुसते..

रागातच सगळ्यांवर नजर फिरवत शौर्य गाथाला फोन लावत मगाशी उभ्या असलेल्या खिडकीजवळ जाऊन उभं रहातो..

शौर्य : हॅलो.. 

गाथा : फोन का स्विच ऑफ येतोय तुझा..?? आणि हा नंबर??

शौर्य : रोहनचा आहे.. त्याच्या मोबाईलवरून फोन लावलाय तुला..

गाथा : तुझा मोबाईल??

शौर्य : परत..

गाथा : परत काय?? 

शौर्य : खिडकीबाहेर पडला आणि फुटला.. 

गाथा : काय?? परत?? (गाथा थोडं घाबरतच शौर्यला विचारते..)

शौर्य : हम्मम..

गाथा : असा कसा खिडकी बाहेर पडला??

शौर्य जे काही घडलं ते सगळं गाथाला सांगतो..

गाथा : शौर्य आत्ता परत मोबाईल रिपेअरिंगला खर्च??

शौर्य : ह्या वेळेला रिपेअर होईल अस वाटत नाही ग..

(मोबाईलच्या झालेल्या अवताराकडे बघतच शौर्य गाथाला बोलतो)

गाथा : मग नवीन मोबाईल?? 

शौर्य : आत्ता मोबाईल नाही म्हटलं तर नवीनच मोबाईल घ्यावा लागेल ना..

गाथा : मग घेणार तर सादा फोन घे.

शौर्य : आयफोनच..

गाथा : आयफोनमध्ये आणि नॉर्मल फोन मध्ये काय फरक असतो??

शौर्य : मला नाही माहीत.. म्हणजे मी आयफोन सोडुन दुसर मॉड्युल कधी युज नाही ग केलं..

गाथा : मग आत्ता युज कर. 

शौर्य : तु बोलतेस म्हणुन केलं असत ग.. बट मला मला आयफोनच आवडतो.. 

गाथा : म्हणजे तु परत ऐंशी नव्वद हजारचा फोन युज करणार??

शौर्य : आत्ता ते विर वर डिपेंड आहे ना.. तो मला किती पैसे देतो त्यावर..

गाथा : परत जिजु मोबाईलसाठी पैसे देतील..??

शौर्य : आत्ता पर्यंत तोच देत आलाय ना.. 

गाथा : जिजूंनी खरच बिघडवलय तुला.. दि लाच सांगते मी ह्या वेळेला तुला महागातला मोबाईल घेऊन द्यायचा नाही म्हणुन..

शौर्य : अजुन..??

गाथा : अजुन काय शौर्य?? पैसे वेस्ट होतात ना मोबाईल मागे.. आपल्या रिलेशनला अलमोस्ट 8 मंथ होतील.. तेव्हा पासुनचा हा तुझा तिसरा मोबाईल आहे शौर्य.. प्लस मोबाईल साठी तु खर्च केलेस ते वेगळे.. 

शौर्य : आत्ता मुदामुन नाही ना करत ग.. 

गाथा : आय नॉ शौर्य.. म्हणुनच सादा मोबाईल वापर अस बोलतेय मी तुला.. 

शौर्य : बघु.. आत्ता मी हॉस्पिटलमध्ये आहे.. घरी साडे नऊ दहा पर्यंत जाईल.. मग रात्री लॅपटॉप वरून व्हिडीओ कॉल करतो मी तुला.. तो पर्यंत तु अभ्यास कर आणि रात्री तुझा अभ्यास वैगेरे बाजुला ठेवुन फक्त नि फक्त तु माझ्यासोबतच बोल.. चालेल??

गाथा : चालेल बट घरी काय सांगणार.??

शौर्य : काहीच नाही.. आणि तु वहिनीला पण काही सांगु नकोस.. विरकडे पैसे नाही मागत मी मोबाईलसाठी. USA ला गेल्यावर माझं मी नवीन मोबाईल घेतो.. 

गाथा : गुड.. स्वतःच्या पैस्यांनी घेतलास म्हटलं तर नीट वापरशील तरी..

शौर्य : गाथा मी मोबाईल नीटच वापरतो ग.. मित्र मंडळी अशी भेटलीत मग काय करू मी..

गाथा : जो पर्यंत अशी मित्र मंडळी आहे तोपर्यंत सादा मोबाईलच वापर..

शौर्य : बाय.

गाथा : शौर्य खुप म्हणजे खुप जास्तच हट्टी आहेस तु.. जे हवं म्हणजे हवच..

शौर्य : एवढा पण हट्टी नाही ग मी..

गाथा : तु खरच हट्टी आहेस.. 

शौर्य : तस असत मग तुझ्याकडुन पण जे पाहिजे असत ते न घेता तुला सोडलं असत का?? नाही ना केला हट्टी पणा त्यादिवशी?? 

(शौर्य अस बोलताच गाथा शांत होते..)

आत्ता तु शांत राहिलीस म्हणजे मी हट्टी नाही आहे.. हो ना??

गाथा : दि मला नेहमी बोलते.. बोलण्यात तुझ्या शौर्यचा हात कोणी पकडु नाही शकत.. आत्ता मला पटतंय.. 

शौर्य : आत्ता वहिनी बोलते मग मला पण पटवुन घ्यावच लागेल.. आणि वहिनी वरून आठवल.. तु वहिनीला माझा मोबाईल कसा फुटला हे का सांगितलंस??

गाथा : तु अशी तिथे USA मध्ये राहून मारामारी करतोस.. वरच्यावर तुझं काही ना काही चालु असत... तुला काही झालं मग?? समजवुन सांगितलं तर ऐकत नाही.. जिजूंनी समजवल मग ऐकशील.. म्हणुन सांगितलं..

शौर्य : धन्य आहेस तु.. माझ्या मागे माझी एवढी काळजी करतेस हे कालच मला वहिनीकडुन कळलं.. तुझ्या अश्या काळजी करण्यामुळे आणि माझ्या मित्रांच्या अतरंगीपणामुळे बहुतेक उद्याच USA जावं लागणार आहे मला.. मी तर विचार करतो आजच जातो USA निघुन..

गाथा : शौर्य.. नको ना राग करुस.

शौर्य : राग मी नाही माझ्या घरचे करतील आज.. आणि ऐकणं मी रात्री बोलतो तुझ्याशी.. रोहन आज दिल्लीला जाईल.. थोडा टाईम त्याच्यासोबत स्पेन्ड करतो..

गाथा : हम्मम्म.. काळजी घे..

शौर्य : तु पण.. लव्ह यु.. बाय.

गाथा : लव्ह यु टु..

गाथा सोबत बोलुन होताच शौर्य रोहनजवळ येत त्याचा मोबाईल त्याच्या हातात देतो.. सगळी मित्र मंडळी तोंड पाडतच शौर्यकडे बघत असतात..

शौर्य : तुम्ही लोक इथे का थांबलेत असे.. आत जायच ना..

समीरा : सगळे एकत्र गेलो असतो ना.

शौर्य : कुठे एवढी फॉर्मेलिटी करत बसतेस तु.. तसही मी मगाशीच त्याला भेटुन आलोय..

रोहन : तरी आमच्यासोबत चल परत..

आर्यन : SD सॉरी ना.. आम्ही देतो बोललो ना तुला मोबाईल..

(आर्यन शौर्यजवळ येतच त्याला बोलतो)

शौर्य : नकोय मला तुमचा मोबाईल.. USA गेल्यावर माझं मी घेतो..  आणि अशी नको ती मस्ती करताना दहा वेळा विचार करा..

रागातच सगळ्यांकडे बघत शौर्य आतमध्ये वृषभला बघायला निघुन जातो..

त्याच्या मागोमाग रोहन, समीरा आणि मानव आत वृषभला भेटायला जातात.. मुंबईची सगळी मंडळी बाहेरच असलेल्या बाकड्यावर बसुन आत्ता काय करायचं ह्याचा विचार करू लागतात..

अरे आज मानव पण आला.. कसा आहेस?? वृषभ अस बोलताच पिऊ उठुन उभी राहत तिच्या मागुन येणाऱ्या शौर्य, मानव, समीरा आणि रोहनकडे बघते....

मानव : कसा आहेस??

वृषभ : आहे ठिक..

मानव : इथे जास्तच आवडतंय का?? घरी जायचा विचार आहे का नाही??

वृषभ : नेक्स्ट विक घरीच असेल मी..

समीरा : खरच??

वृषभ : हम्मम.. 

समीरा : तुझ आणि रोहनच झालंना सॉर्ट आऊट??

वृषभ : रोहनला जस रागवता येत ना तस मला अजिबात रागावता नाही येत.. आणि रोहनवर कितीही कोणी रागवायच ठरवलं तरी त्याला नाही जमणार..

रोहन : खरच??

वृषभ : हम्मम..

रोहन : तुझं सगळं फायनल झालं का??

पिऊकडे बघत इशारा करतच रोहन वृषभला विचारतो

वृषभ : हम्मम.. 

रोहन : तुम्हां दोघांची जोडी छान वाटते..

वृषभ : कोणत्या दोघांची?? ह्या दोघांची की माझी आणि पिऊची??

ह्या दोघांची म्हणजे?? रोहन प्रश्नार्थी चेहरा करतच समीराकडे बघतो.. समीरा आपले डोळे मोठे करत आणि थोडं घाबरत वृषभकडे बघते..

अजुन काहीच नाही?? वृषभ थोडं सिरीयस चेहरा करत तिला विचारतो.

समीरा मानेनेच नाही बोलते.. आणि मानव वर आपली नजर फिरवते..

मानवला जे समजायचं तो समजुन जातो.. 

मानव : तुम्ही गप्पा मारा मला एक कॉल करायचाय.. मी आलोच..

अस बोलत मानव तिथुन बाहेर निघुन जातो...

कोण आहे हा?? मानव बाहेर गेल्या गेल्या रोहन समीराला विचारतो..

वृषभ : मानव दीक्षित.. समीरा ज्याच्या खऱ्याने प्रेमात आहे असा तो.. हो ना समीरा??

समीरा थोडं लाजत मानेने हो बोलते.

रोहन : मीच मुर्ख जे कोणालाच समजु नाही शकलो.. कठीण आहे बाबा..

समीरा : ताई तुम्ही कसे आहात..??

(वृषभची ताई तिथे येताच समीरा तिला विचारते)

ताई : एकदम मस्त..

समीरा : तुमचा टिंग्या??

ताई : तो पण मस्त..  गावी त्याच्या आजीकडे आहे.. इथे नाही आणायला त्याला??

समीरा : एकटा रहातो का??

ताई : तो राहतोय की.. पण आम्हांलाच करमेनास झालंय.. 

समीरा : पिऊ तु कशी आहेस??

पिऊ : मी पण छान..

वृषभ : शौर्य तु अस तोंड पाडुन का बसलायस?? जास्तच घाबरवल की काय मुंबई गँगने??

शौर्य : खुपच जास्त.. 

रोहन : त्याच्या मोबाईल..

मोबाईलला रेंज नाही आहे यार इथे.. ह्या रोहनच्या मोबाईलवरून गाथाला फोन करावा लागला.. मध्येच रोहनला थांबवत इशाऱ्यानेच त्याला काही नको सांगूस अस तो बोलतो..

वृषभ : काय इशारे करतोयस त्याला??

शौर्य : ते तो दिल्लीला जातोय आजच.. तुला त्याने सांगितल का ते विचारतोय..

वृषभ : ए रोहन रहा ना थोडे दिवस??

रोहन : तुझ्यासोबत इथे हॉस्पिटलमध्ये राहु का??

वृषभ : माझं घर आहेना मित्रा.. ताई आत्ता घरीच जाईल.. ताईसोबत जा.. आई बाबा आहेत घरी.

शौर्य : माझ्या घरीपण रहा म्हणुन बोलतोय मी त्याला.. बट गार्गी शिवाय त्याला करमत नाही रे.. सिंगल असता तर राहिला असता.. हो ना रोहन.??

रोहन : आत्ता तुझ्या आयुष्यात गाथा आहे मग तु जास्त चांगल समजु शकतोस मला..

शौर्य : मग तर वृषभ सुद्धा समजु शकतो तुला.. कारण त्याच्या आयुष्यात पण आत्ता पिऊ आहे... हो ना वृषभ..

वृषभ : हम्मम..

समीरा : ए गाईज मला एक गुड न्यूज द्यायची तुम्हांला..

वृषभ : कसली??

समीरा : मी आत्या होणार आहे.. 

अरे वाहह.. तिघेही एकत्रच बोलतात..

वृषभ : कॉंग्रेच्युलेशन.. दादा आणि वहिनीला पण सांग..

रोहन : माझ्याकडुन पण..

शौर्य : आणि माझ्याकडुन सुद्धा.. तस पण लास्ट टाईम तुझा दादा आणि वहिनी USA मध्ये भेटलेला मला..

समीरा : हो.. बोलला मला तो..

शौर्य : वहिनीची तब्येत कशी आहे??

समीरा : आहे ठिक.. ये ना घरी कधी तरी.. 

शौर्य : तु आत्या झालीस ना मग बेबीला बघायला नक्की येतो..

समीरा : तेव्हा तु USA असशील शौर्य.. USA जाण्याआधी येऊन जा ना.. तु USA कधी जातोयस??

शौर्य : आज रात्रीच्याच फ्लाईटने जायचा विचार करतोय मी तर..

रोहन : मी देतो बोललो ना तुला न्यु मोबाईल.. का टेन्शन घेतोयस?

वृषभ : काय झालं मोबाईलला?

(शौर्य शांत बसुन रहातो.)

वृषभ रोहनकडे बघत काय झालं म्हणुन विचारतो..

समीरा : नेक्स्ट मंथ एक्साम आहे वृषभ.. हॉस्पिटलमध्ये बसून अभ्यासाला सुरुवात कर..

(विषय बदलावा म्हणुन समीरा बोलते)

वृषभ : व्हॉट?? टाईम टेबल आलं का??

समीरा : टाईम टेबल आणि नॉटस मी तुला व्हॅटसएप करते.. अभ्यासाला लाग.. खुप आराम केलास..

वृषभ : हम्मम.. 

(पिऊला वृषभच्या चेहऱ्यावर अभ्यासाची चिंता लगेच दिसू लागते)

पिऊ : वृषभ आत्ता अभ्यासाच टेन्शन नको घेऊस... जेवढं जमेल तेवढाच अभ्यास कर.. जास्त स्ट्रेस करून घेऊ नकोस.. नाही जमत मग राहू दे एक्साम.. कळलं??

हम्मम.. वृषभ पिऊकडे बघत आपली मान हलवतच बोलतो..

शौर्य : पिऊ दम भारी देतेस हा आमच्या वृषभला..

रोहन : आणि वृषभ पण भारी घाबरतो..

शौर्य आणि रोहन वृषभची मज्जा घेत असतात..

वृषभ : शौर्य तुला माहिती गार्गी रोहनला काय बोलते.. 

(वृषभ अस बोलताच रोहनच हसु कुठे तरी गायब होत.. )

काय बोलते.. रोहनवर नजर फिरवतच शौर्य वृषभकडे बघतो..

समीरा : अहो रोहन...

शौर्य : what?? 

वृषभ : ती ह्याला अहो जावो करते..

समीरा अस बोलताच सगळेच रोहनला हसु लागतात..

सगळे एकमेकांची मज्जा मस्ती करत असतात.. आठ कधी वाजुन जातात हे कळतच नाही..

शौर्य : रोहन.. 8 वाजले रे.. 9.30 ची फ्लाईट आहे ना तुझी??

अरे हो.. रोहन हातातील घड्याळात बघतच बोलतो..

रोहन : मला वृषभसोबत थोडं बोलायच आहे.. पर्सनल.. 

शौर्य : ओके.. आम्ही आहोत बाहेर... 

रोहन : शौर्य तु थांबलास तर चालेल.. म्हणजे तु थांब.. बाकी... (रोहन मध्येच थांबत बोलतो)

समीरा : मी आहे बाहेर.. 

सगळेच बाहेर निघुन जातात..

वृषभ : आत्ता तु फॉर्मेलिटी करणार.. स्वतः रडणार आणि आम्हां दोघांना पण रडवणार.. आम्हांला सवय आहे रे ह्या सगळ्याची..

रोहन : पिऊ खुप छान आहे.. खुप म्हणजे खुप.. दुपारी मी त्यांच्या घरीच होतो जेवायला.. आर्यन जबरदस्ती करून घेऊन गेला मला.. तुला परफेक्ट मॅच होते ती.. 

वृषभ : नक्की ना??

रोहन : हम्मम..

शौर्य खिश्यातुन रुमाल काढत रोहनच्या हातात देतो..

हे काय?? रोहन रुमाल हातात पकडतच शौर्यला विचारतो..

शौर्य : तु मोठं मोठे डायलॉग मारणार. मग आम्ही दोघे पण रडणार.. परत थोड्या महिन्यांनी तु असच वेड्यासारखं करणार. मग परत असच.. 

रोहन : माहिती ना मी वेडा आहे.. तरी माझा राग करता तुम्ही लोक.. तुम्हां दोघांशिवाय नाही ना कोण मला.. म्हणजे आत्ता गार्गी आहे.. बट तरी.. तुम्ही लोक अस राग नका करू यार माझा..

वृषभ : ए रोहन आत्ता बस हा.. 

नाही तर काय?? नुसतं रडत रहाणार.. आणि परत असले नको ते उद्योग 
केलेस मग बघच तु.. शौर्य रोहनचे डोळे पुसतच त्याला बोलतो...

रोहन : लवकर बरा हो यार... आणि तुझी चॉईज एकदम छान आहे.. तुझ्यासारखीच आहे आणि तु मला सांगितलेलीस ना अगदी तशीच..

वृषभ : थेंक्स..

शौर्य : तु तुझ्या गार्गीला कधी भेटवतोस? मला पण ऐकायचं यार ती तुला अहो रोहन कस बोलते ते..

शौर्य अस बोलताच रोहन हसु लागतो..

शौर्य : वृषभ तु काहीही बोल.. बट आपला हा रोहन काही गोष्टीत खरच एकदम बेस्ट आहे रे.. आज माझ्यासाठी खुप काही केलं त्याने.. मगाशी पण पुढचा मागचा विचार न करता लगेच मोबाईल पण दिला.. 

रोहन : बस काय शौर्य.. तुम्हां दोघांसाठी येह जान भी हाजीर हे मेरे दोस्त..

वृषभ : रोहन राग कमी कर.. आणि हट्टी पणा कमी कर..जे मनात ठरवतोस तेच करतोस तु..

रोहन : ए वृषभ तु लेक्चर नको देऊस आत्ता.. मला उशीर होतोय..

शौर्य : लेक्चर वाटतंय तुला..

शौर्य रोहनचा हात पकडतच त्याला बोलतो.

रोहन : सॉरी.. बट उशीर होतोय रे.. वृषभ तु फोन वरून लेक्चर दे... आय मीन जे बोलायच ते बोल.. 

दोघांनाही घट्ट अशी मिठी मारतो आणि वृषभला बाय करत त्याच्या वॉर्डमधुन बाहेर पडतो..

बाहेर आर्यन असतो..

रोहन : मित्रा घरी 7 वाजता येतो बोललेलास..8 वाजले..

आर्यन पिऊ कडे बघत हातातील घड्याळात बघतो..

रोहन : ती वृषभच्या नादात आणि तु तुझ्या ह्या गँगच्या नादात विसरून गेलास..

आर्यन : आज खरच दिवस बेकार आहे यार.. जाऊ दे.. थोडा ओरडा खाईल मी.. चल तुला एअरपोर्टवर सोडायला येतो आम्ही.

रोहन : नाही नको.. आधीच उशीर झालाय.. माझ्यामुळे अजुन नको.. 

आणि हे तुमचे 4000.. (आर्यनचा हात पूढे करत.. दोन हजारच्या दोन नोटा त्यावर टेकवतच रोहन बोलतो) 

(सगळेच रोहनकडे बघु लागतात..)

असे का बघतायत.. दिल्लीवाला हुं यार.. जुबान का एकदम पक्का..

शौर्य : ह्या 4000 साठी माझं किती हजारांच नुकसान केलं तुंही..?

तुला दोन आईस्क्रीम एक्स्ट्रा देऊ नंतर.. आत्ता गरम झालेल डोकं दोन दोन आईस्क्रीम खाताच थंड होईल.. रॉबिन ज्योसलीनच्या मागे लपतच शौर्य ला बोलतो..

शौर्य : ज्यो कस तुला हँडल करते देव जाणे

ज्योसलीन : जस गाथा तुला हँडल करते तसच मी त्याला करते..

शौर्य : ए ज्यो.. तु त्याची बाजु घेऊन मला काही बोलायच नाही हा?? मी आधीच सांगतोय.

ज्योसलीन : काय करशील??

(ज्योसलीन हाताची घडी घालत नेहमी प्रमाणे शौर्यला एटीट्युड दाखवतच बोलते)

शौर्य : मला चॅलेंज नको करू हा ज्यो.. मग रडशील तु..

ज्योसलीन : अच्छा?? काय करशील आत्ता तु सांगच..

शौर्य : मी लास्ट सांगतोय ज्यो.. मला चॅलेंज नको करुस..

ज्योसलीन : केलं चॅलेंज..

शौर्य : क्रॉस युअर फिंगर नाव्ह..

आर्यन : काय चाललंय तुमचं?? भांडतायत का तुम्ही दोघ..

ज्योसलीन : हात बघ त्याचा.. 

रोहन : तु मोबाईल बघ मग ह्याचा. 

शौर्य : बघ तर.. रॉबिन ही जास्त मला बोलली ना मग तुझा दुसरा हात पण गेलाच म्हणुन समज..

रॉबिन : आत्ता मी काय केलंय यार..??

शौर्य : ते तुझ्या ज्यो ला विचार.. आज भांडायच्या फुल मुडमध्ये दिसतेय ही.. माझ्या गाडीतुन घेऊन नाही आलो म्हणुन राग काढतेय आत्ता..

ज्योसलीन : तु त्याचा हात मोडत होतास म्हणुन बोलतेय मी..

शौर्य : रॉबिन उद्या दुसरा हात रेडी ठेवच तु..

(ज्योसलीनकडे रागात बघतच शौर्य रॉबिनला बोलतो)

ज्योसलीन : धमकी देतोस.. आंटीकडेच तुझी आज कम्प्लेन्ट करणार मी..

रोहन : ए शौर्य मी लहान असताना अस करायचो यार.. कोणी मारलं ते त्याच्या घरी जाऊन कप्लॅन्ट एन्ड ऑल..

(रोहन हसतच शौर्यला टाळी देत बोलतो..)

शौर्य : ज्यो लहानच आहे अजुन.. त्याहुन लहान तर हा रॉबिन.. पहिलं जरा काही केलं तर मम्मी मम्मी करायचा.. आत्ता ज्यो ज्यो करतो.. 

सगळेच रॉबिनला हसु लागतात..

रोहन : ए रॉबिन भारी आहे यार तु.. शौर्य पासुन हात थोडा सांभाळुन ठेव तो.. आत्ता मला उशीर होतोय.. सगळ्यांना बाय..

रॉबिन : आम्ही पण येऊ एअरपोर्टवर??

शौर्य : तुझ्या छोट्या मम्मीकडे परमिशन घेतलीस??

शौर्य ज्योसलीनकडे बघतच रॉबिनला चिडवतो.. तसे सगळेच रॉबिनला हसु लागतात..

आपल्या मित्र मंडळींना बाय करत रोहनला सोडायला तो एअरपोर्ट वर जायला निघतो..

किती भांडता तुम्ही दोघ?? लिफ्टमध्ये शिरताच समीरा शौर्यला बोलते..

शौर्य : ते आमचं लहानपणापासुन तसच आहे ग.. त्यात तिच्या रॉबिनचा हात मी पिरघळला म्हणुन तिला राग आला.. उद्या पर्यंत डोकं शांत होईल मग घरी येईल माझ्या.. 

रोहन : मोबाईल घेऊयात तुला चल..

शौर्य : माझं मी घेतो.. 

समीरा तुझ्याकडे पीन आहे का?? गेट बाहेर लावलेल्या ज्यो च्या स्कुटिकडे बघतच शौर्य बोलतो..

समीरा आणि मानव एकमेकांकडे बघत परत शौर्यकडे बघतात..

समीरा : कश्यासाठी..??

शौर्य : आहे तर दे लवकर.. नाही तर मी दुकानातून घेतो विकत..

समीरा बेगेतुन पिन काढुन शौर्यच्या हातात देते.. शौर्य पळतच ज्योसलीनच्या स्कुटीजवळ जात तिच्या स्कुटीच्या दोन्ही टायर मधली हवा काढुन टाकतो..

रोहन : शौर्य काय करतोयस?? कोणाची स्कुटी आहे ही??

शौर्य : आपल्या ज्यो ची रे.. मला चॅलेंज करते बोलते मग अस काहीतरी करावच लागेल ना..

मानव : वरकुल सारखाच आहेस तु पण..

शौर्य : त्याचा भाऊ म्हटलं तर थोडे गुण त्याच्यातलेच असणार ना.

थेंक्स.. समीराच्या हातात पिन देतच शौर्य तिला बोलतो..

सगळे मिळुन रोहनला एअर पोर्टवर ड्रॉप करतात..

एअरपोर्टवर त्याला ड्रॉप करून होताच मानव नेहमीप्रमाणे समीराला सोडायला घरी जाऊ लागतो..

गाडीत मानव आणि समीरा दोघेही शांत बसुन असतात..

गाडीतील शांत बघुन मानव FM वर गाणी लावतो.. आणि सोने पे सुहाग म्हणतात तस दोघांना साजेल अस गाणं FM वर लागलं असत.


प्यार हुआ इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यों डरता है दिल
प्यार हुआ इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यों डरता है दिल
केहता है दिल रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल
केहता है दिल रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल

मानव गाडी चालवता एक नजर समीरावर फिरवतो.. समीरा सुद्धा त्याच्याकडे बघत असते.. पण दोघांमधील शांतता ही तशीच असते.. समीरावरची नजर हटवत FM बंद करत मानव समोर बघुन गाडी चालवु लागतो.. FM तर बंद होत पण समीरा गाणं तसच गुणगुणत असते.. मानव तीच ते गुणगुणन एन्जॉय करत गालातल्या गालात हसत असतो.. 

समीरा : मला माहिती मी इतकं पण छान नाही गात..

मानवच हसु कुठे तरी गायब होत.. आणि पुन्हा समीराकडे त्याची नजर जाते.. 

मानव : तुझ ते गुणगुणन खुप छान वाटत होत म्हणुन मी FM बंद केला.. 

(मानव अस काही बोलताच समीराच्या गालावर हसु येत..)

मला तर अस वाटत अस गुणगुणण्या पेक्षा तु गाणं गाव..

समीरा : तु पण गणार असशील तर गाईल मी..

(मानव शांत बसून रहातो..)

समीरा : काय झालं??

मानव : माझ्या तोंडुन गाणं ऐकशील तर लांब पळुन जाशील ग तु..

समीरा : मी ती नाही ना.. जी तुझ्यापासून पळुन गेली..

आपल्या भुवया उडवतच समीरा मानवला बोलते.. खूप दिवसांपासुन मानव तिच्या समोर त्याच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.. पण त्याला व्यक्त होता काही येत नसत.. 

हिच ती वेळ आणि हाच तो क्षण अस बोलत मानव समीराकडे बघतो..

तु मला सांभाळुन घेणार असशील आणि साथ देणार असशील तर मला आवडेल तुझ्यासोबत गाणं गायला..

दोघेही एकमेकांना गोड अशी स्माईल देतात..

सॉ स्टार्ट..?? समीरा मानवकडे बघत त्याला विचारते..

मानव आपली होकारार्थी मान हलवत समीराला हो म्हणुन बोलतो.

दोघेही एकमेकांना साथ देत गाणं गायला सुरुवात करतात..

¶¶प्यार हुआ इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यों डरता है दिल
प्यार हुआ इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यों डरता है दिल
केहता है दिल रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल
केहता है दिल रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल....¶¶¶


गाडी समीराच्या घराजवळ येते.. समीराला मानवला सोडून गाडीतुन उतरून जावस वाटत नसत.. पण घरी हे जावंच लागणार होत..

थेंक्स... नेहमीप्रमाणे फॉर्मेलिटी करत समीरा मानवाच्या गाडीतुन बाहेर पडते..

समीरा... मानव तिला आवाज देत थांबवतो..

मागे वळून हलकिच आपली मान हवेत उडवत ती त्याला काय झालं म्हणुन विचारते..

मानव : उद्या रात्री डिनरला जाऊयात??

समीरा खूप वेळ त्याच्याकडे बघत रहाते.. तिच्या अश्या बघण्याने मानव आतुन खुप घाबरून जातो.. परत ही रागवते का काय??

मला वाटलं तु आजच मला डिनरला घेऊन जाशील.. बट इट्स ओके.. तुला उद्या जावस वाटतंय मग जाऊयात.. समीरा हसतच मानवला बोलते.. तीच ते बोलणं आणि हसन बघुन मानवाची खात्रीच होते की समीरा आपल्या प्रेमात आहे..

मानव : तुला प्रॉब्लेम नसेल मग आत्ता पण जाऊयात आणि उद्या पण..

समीरा जास्त काही न बोलता आपल्या दादाला फोन लावते..  दादाकडुन परमिशन मिळताच ती परत मानव सोबत गाडीत बसते..

मानव गाडी एका रेस्टोरेंट बाहेर पार्क करतो.. दोघेही रेस्टोरेंटमध्ये शिरतात..

इतरांप्रमाणे तु ऑर्डर कर.. मी ऑर्डर कर अस दोघांचंही चालु असत.. 

तु मी करण्याच्या नादात फायनली मेनु बुक होतो..

मानव आज मनभरून समीराकडे बघत असतो.. मानवकडे चोरून पहात असणारी समीराची नजर आज मात्र त्याच्यावर स्थिरावली असते..

वेटर दोघांच्या समोर जस्य प्लेट्स ठेवतो तशी एकमेकांवरची त्यांची नजर हटते.

मानव : समीरा.. मला खुप दिवसांपासून तुला काही तरी सांगावस वाटतंय.. म्हणजे रोज सांगण्याचा प्रयत्न करत असतो मी पण नाही जमत ग..  अस काही सांगुन परत तुझ्यासारख्या मैत्रिणीला मी गमवेल म्हणुन मी थोडं घाबरत होतो.. तु मैत्रीण म्हणुन कायम सोबत असावी अस मला वाटत होतं म्हणजे तु असशीलच आय नॉ बट मला तु खुप आवडतेस हे मी तुला ह्या आधी सुद्धा म्हटलं.. पण आज काल तु मला खुप म्हणजे खुप जास्तच आवडतेस.. विल यु मेरी मी??

समीरा समोर एका पायावर घुडघ्यावर बसत.. नेहमी समीरासाठी आपल्या सोबत घेऊन फिरणारी रिंग तिच्या समोर धरतच मानव तिला बोलतो..


काय असेल समीराच उत्तर..??

क्रमशः

(पाहुया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा..)


©भावना विनेश भुतल

(निवेदन : ईरावरती चाललेल्या आगळ्या वेगळ्या स्पर्धेत मी सहभाग घेतल्यामुळे हि कथा लिहायला हवा तसा वेळ मिळत नाही.. कथेचे पुढील भाग जमेल तसे मी पोस्ट करेल.. ह्या कथेसोबत मी माझ्या मनरंगी टिम सोबत लिहित असलेल्या प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी ह्या कथेला सुद्धा तितकाच प्रतिसाद द्या.धन्यवाद)

🎭 Series Post

View all