अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 23

क्रमशः

सगळेच मज्जा मस्ती करत चौपाटीला आले.. लहान मुलांसारखं एकमेकांच्या अंगावर वाळु उडवन चालु होत.. रात्रीचा थंडावा, समुद्राच्या उधळणाऱ्या लाटांचा आवाज त्यावर ओढलेली चांदण्याने भरलेली आकाशी रुपी चादर... आणि मधुनच ढगांच्या आडून दिसणारा तो चंद्र जणु निसर्गाच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता.. रात्र असल्याने माणसांची वर्दळ देखील कमी होती.. त्यामुळे शांततेने ही तिथे हजेरी लावलेली अस म्हणायला काही गैर नाही.. सगळेच आता ह्या निसर्गच्या सानिध्यात थोडे फार हरवुन गेलेले..

राज : इथुन जावस वाटत नाही यार.. 

हो न...

शौर्य : गाईज, हॉरर स्टोरी होऊन जाऊदेत... ह्या अंधारभऱ्या शांततेत..

सीमा : मला चालेल..

राज : मला पण..

हळुहळु सगळेच आपली संमती दर्शवत होते.. 

टॉनी : पण एक अट आहे.... सगळ्यांनी लांब लांब बसायचं..

राज : ए नाही हा.. अस काही नको..

वृषभ : ए टॉनी अस नको रे..  जी लहान मुलं आहेत ना आपल्या ग्रुप मध्ये ती मोठ्यांचा हात पकडुन बसू देत....

(वृषभने असे बोलताच टॉनी त्याला टाळी देत हसु लागला..)

राज : हो का.. मग ये माझा हात पकडून बस..

वृषभ : मी इथेच बसणार.. तु घाबरत असशील तर तु इथे येऊन बस..

राज : मी....मी नाही हा घाबरत..

वृषभ : मग बस तिथे मला काय... 

टॉनी : चला मी घेऊ सांगायला स्टोरी.. 

राज : तु सांगणार??

टॉनी : काय प्रॉब्लेम आहे का?? नाही तर ये तु येऊन सांग..

राज : भडकतो कश्याला यार तु.. मी आपलं सहज म्हणुन विचारलं..

समीरा : लवकर काय ते चालु करा तुमचं.. घरी पण जायचय..

मनवी : काय ग तु.. एन्जॉय करू दे ना जरा.. नुसतं काय घरी जायचं असत तुला..

समीरा : घरी गेल्यावर माझी एन्जॉयमेंट बाहेर पडेल.. म्हणुन बोलते ग..

रोहन : आम्ही समजवु ग तुझ्या घरच्यांना. 

टॉनी : गाईज वेळ नको वाया घालवू.. मी स्टोरी सांगायला स्टार्ट करतो. तुम्ही सगळे तैयार?

तैयार.... सगळे एकत्रच बोलतात...

एकदा कामावरून परतत असताना.. अविनाशची फॉर व्हिलर सुनसान रस्त्यातच बंद पडते... गाडीतुन बाहेर उतरून तो गाडीला काय झालं हे बघत असतो.. पण काही केल्या गाडी चालु होत नसते.. रस्ता इतका सुनसान की रस्त्याच्या दुतर्फा असणार जंगल सोडलं की तिथे कोणीच नव्हते.. अचानक खुप वेळाने समोरून जाणार एखादं दुसर अवघड वाहनांच ट्रक... त्या व्यतिरिक्त तिथे कोणीच ये जा करत नव्हतं..  आजु बाजुला असणाऱ्या जंगलातुन खुप चित्र विचित्र असे आवाज येत होते... (टॉनी आवाज काढतच बोलतो)

कोणाची मदत घ्यावी त्याला काही कळत नव्हतं.. तोच अविनाशच्या खिश्यात असणारा फोन वाजला.. 

आणि इथे समीराचा.. समीरा तिथेच फोन वर बोलु लागली..

वृषभ : ए समीरा.. हळुना..

सॉरी... सॉरी.. टॉनी तु कँटीन्यु कर मी येते...अस बोलत समीरा उठुन थोडं बाजुला जाऊन बोलु लागली.. पण समोरून कोणी काही बोलतच नव्हतं..

ती फोन कट करून पुन्हा जागेवर येऊन बसायला निघाली तोच तिची धडक तिच्या मागे असणाऱ्या शौर्यला झाली..

समीरा काही बोलणार तोच शौर्यने आपला हात तिच्या तोंडावर ठेवत तिला तिथुन थोडं लांब नेलं..

(तिथे टॉनीची हॉरर स्टोरी सुरू होती आणि इथे शौर्य आणि समीराची लव्ह स्टोरी सुरू होण्याच्या मार्गावर होती.)

टॉनी : हा तर मी कुठे होतो??

फोन वाजतो ना त्याचा तिथे... राज घाबरतच त्याला बोलला...

टॉनी पुढे सांगु लागतो..

आईचा फोन असेल म्हणुन त्याने न बघताच उचलला.. तो काही बोलणार तोच समोरून ती व्यक्ती बोलायला लागली..  

तयारीला लागा... वेळ झाली निघायची.. आणि फोन स्विच ऑफ.. तो आवाज एका स्त्री चा होता..

कामावरून निघताना तर मी चार्जिंग केलेली लगेच कसा काय स्विच ऑफ झाला...तो स्वतःशीच बोलला.. कधी न घाबरणार आता मात्र घाबरू लागला... पाठी कोणी तरी आहे असं त्याला वाटलं.. तो मागे वळुन पाहणार तोच.... तोच... पुन्हा त्याचा फोन वाजला.. (टॉनीची एकटिंग बघुन सगळेच आता घाबरू लागलेले.. सर्वात जास्त तर राज)

आता तर हा फोन स्विच ऑफ झालेला परत कसा काय चालु झाला.??? तो स्वतःलाच प्रश्न करत होता..  हृदय बंद पडुन प्राण बाहेर पडतो की काय अस त्याला झालं.. स्क्रीनवर आईच नाव बघुन त्याचा जीवात जीव आला.. एकही क्षण वाया न घालवता त्याने आईचा फोन उचलला.. 

आई : अरे बाळा वाजले बघ किती.. कुठे राहिलास??? एक तर सकाळीच तुला सांगितलं अमावस्या आहे आज लवकर ये.. 

आईच बोलणं अर्धवटच राहील आणि फोन पुन्हा स्विच ऑफ..

त्याने एक नजर आकाशात फिरवली.. चंद्र कुठे काही दिसत नव्हता..

पाठून कुणाचा तरी गुरगुरण्याचा आवाज येत होता.. 

त्याने वळुन पाठी बघितल तर....

टॉनी डोळे मोठे करत राजच्या मागे बघु लागला..

तु अस माझ्या मागे का बघतोयस.... राज घाबरतच टॉनीला बोलला...

टॉनी : ते तु.. तु पाठी बघितलस तर कळेल तुला..

राज घाबरतच मागे बघु लागला..

आणि मागच दृश्य बघुन मोठ्याने किंचाळत वृषभला मिठी मारत बिलगला..

सीमाने हसतच राजला घाबरवण्यासाठी तोंडासमोर घेतलेलं केस मागे केले... आता सगळेच त्याला हसत चिडवु लागले..

सगळे हसायला लागले तस राजने डोळ्यांवरून हात काढुन बघितलं तर सीमा त्याला चिडवत होती.. सीमाच काय सोबत इतर सगळेच..

आता मात्र पकडा पकडीचा खेळ सुरू झाला.. राज सगळ्यांनी त्याला टार्गेट करत घाबरवल म्हणुन त्यांना मारायला त्यांच्या मागे पळु लागला..

तिथे त्यांची पकडा पकडी रंगात आलेली आणि इथे... 

इथे शौर्य समीराला पाहिजे तस घुडघ्यावर बसुन.. तिचा हात हातात घेत तिला ते तीन प्रेम रंगी शब्द बोलण्याच्या तैयारीत होता..

शौर्य : समीरा.. MK कॉलेज मधला माझा पहिला दिवस आठवलाना.. की तो क्षण असा डोळ्यांसमोरून जातो जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं.. आणि नकळत हरवुन गेलो.. तु हसतच अशी माझ्याजवळ येत होतीस..आणि वाऱ्याची मंद अशी झुळक तुझ्या केसांची छेड काढत जणु मला तुझ्याकडे खेचत होती.. त्यात तुझे ते आकर्षित असे डोळे.. नक्की कळत नव्हतं ग हे प्रेम आहे की आकर्षण.. कदाचित आकर्षण असेल म्हणून मी स्वतःलाच समजवत बसलो.. पण कधी तुला कॉलेजमध्ये यायला जरा उशीर झाला ना की मलाच करमेनास व्हायचं.. तु त्या पार्टीनंतर माझ्यावर रागावलीना इथे ह्या हृदयावर घाव झाल्यासारखं वाटलं मला.. मग माझं मलाच जाणवु लागलं की आकर्षण असत तर ह्या भावनाच नसत्या... बस मला फक्त एवढंच तुला सांगायचय... की...


आय....  (शौर्य आय बोलताच दोघांच्याही ही भोवताली हार्ट शेपच लाल लाईट असणार रिंगण तैयार झालं.. समीराला हे सगळं अनपेक्षित होत..)

लव्ह...( पुन्हा अजुन एक लाल लाईटीतल रिंगण तैयार झालं)

यु ... समीरा...(आता एक बाण तैयार असलेल्या हार्ट शेप्सच्या लाइटीतुन आर पार जात आहे अस काहीस लाईटीच डेकोरेशन शौर्यने केलेलं..)

समीराला शौर्यने दिलेले सरप्राईज खुप आवडलं ते तिच्या डोळ्यांतुन शौर्यला दिसत होत..

शौर्य समीराच्या उत्तराची वाट बघत होता.. तो तसाच घुडग्यावर बसुन तिच्या डोळ्यांत बघत होता.. एक मिनिटं का होईना समीरा शौर्यकडे अशीच बघत राहिली..

जास्त वेळ समीराने ही वाया न घालवता शौर्यला उभं केलं.. तिच्या तोंडुन शब्द बाहेर पडतच नव्हते..

शौर्य : आता तरी ती हो बोलेल ना ग??? तिला हवं तसं प्रपोज केलं मी..

समीराच्या डोळ्यांतुन नकळत पाणी येऊ लागलेल.. समीरा दोन्ही हात तोंडावर ठेवत मानेनेच हो बोलली.. आणि घट्ट अशी तिने शौर्यला मिठी मारली.. समीराने अशी मिठी मारताच शौर्यच हृदय मात्र अजुन जोरात धडधडु लागलं.. 

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या ह्या हृदयाची धडधड मला अशीच ऐकायची शौर्य.. आय लव्ह यु टु...एवढं बोलत समीराने तिच्या प्रेमाची कबुली दिली..


ए ले ले शौर्य... बाकीची मित्र मंडळी ही दोघांना शोधत तिथे आली.. शिट्या वाजवत दोघांना चिडवु लागले..

बाकीचे आले तसे दोघेही एकमेकांपासून लांब झाले.. दोघेही लाजुन एकदम चुररर झालेले..

टॉनी : कसलं भारी डेकोरेशन यार.. तुझं अस लाईटीचा बिजीनेस वैगेरे आहे का?? नाही म्हणजे एवढ भारी तुला सुचलच कस..

वृषभ : अरे हे सगळं प्री-प्लॅन होत.. म्हणजे आम्ही सकाळी सामान आणायला गेलेलो ना तेव्हाच आम्ही म्हणजे शौर्यने समीरासाठी हे सगळं प्लॅन केलंल...

रोहन : ओहहह.. एकदम भारी यार..

मनवी : हो ना. काही तरी शिका त्यांच्याकडुन..बाय दि वे उशीर होतोय निघुयात... समीरा तुझी ही घरी वाट बघत असतील..

टॉनी : एवढंच एन्जॉय करायचं होतं का तुला?? 

मनवी : हो.. मला झोप पण आलीय आता

समीरा : घरी दादा पण वाट बघत असेल.. खरच निघायला हवं आता..

शौर्यला तिथुन खर तर जावसं वाटत नव्हतं पण घरी जावं तर लागणार होतं..

सगळे घरी परतले..

समीरा आत जाणार तोच शौर्य ने तिचा हात पकडत तिला मागे खेचलं..

समीरा : काय करतोयस तु.. कोणी तरी बघेल..

शौर्य : माझं प्रपोज अर्धवटच राहील अग... तुझ्यासाठी काही तरी आणलेलं ते दिलंच नाही तुला..

हाताची मूठ हळुहळु खोलत तो समीराला दाखवु लागला..

सुंदर अस ब्रेसलेट होत त्यात.. त्याला अर्धच हार्ट शेपच पेंडल लटकेल पण आकर्षीत होत.. कोणालाही बघताच क्षणी आवडेल अस..

समीरा : इतकं महाग..

शौर्य : तुझ्या पुढे ह्याची किंमत काहीच नाही.. तुला आवडलं??

समीरा : पण अर्धचं हार्ट का..??

कारण अर्ध माझ्याकडे आहे.. शौर्य त्याचा हातातील अर्ध हार्ट असलेलं पेंडल समीराच्या हातातील ब्रेसलेटला जोडुन ते पूर्ण करतच दाखवु लागला..

शौर्य : कस वाटलं हे..?? 

समीरा : मी इमॅगीन केलेलं ना त्यापेक्षा ही खुप छान आहे..

समीरा हातात ब्रेसलेट घालतच शौर्यला बोलली..

समीरा : हे सोन्याचं तर नाही ना.. शौर्य..

शौर्य मानेनेच हो बोलतो..

शौर्य.. एवढं महाग नको.. समीरा ब्रेसलेट काढत बोलली..

मी जाणुन बुजुन सोन्याचं घेतलं..कारण त्यात असलेलं माझं हार्ट तु जपशील खात्री आहे पण ते ब्रेसलेटला लावलय त्यामुळे मी तुला आयुश्यात माझ्याकडुन पहिल्यांदाच दिलेलं गिफ्टही जपशील..

अस...मग ठिक आहे तुलाही माझ काहीतरी ऐकावं लागेल.. समीरा गळ्यातील चैन काढतच बोलली.. शौर्य ती काय करते ते बघतच बसला..

समीराने शौर्यच्या हातातील पेंडल त्या चैनीत टाकत ती चैन शौर्यकडे दिली..

शौर्य : अग समीरा.. तु.. म्हणजे.. हे बघ मी हे नाही घेऊ शकत.. तुझ्या घरी कळलं तर.. त्यांना तुझ्या गळयात चैन नाही दिसली तर..

समीरा : फिकर नॉट.. आणि ही चैन तु दिल्लीला गेल्यावर घाल.. आता जपुन ठेव. आणि खर प्रेम असेल तर ती जपुन ठेवशील आणि आता लगेच घेशील ही.. कारण त्यात माझं हृदय आहे.. 

समीरा शौर्यच्या हातात चैन देत एक गोड स्माईल त्याला देतच तिथुन आत निघाली.. मनवी दोघांचंही बोलणं दरवाज्याआड रहात ऐकत होती. पण दरवाज्या आड असल्याने कुणाला दिसली नाही..

शौर्य ही रूममध्ये आला.. बाकी तिघ तो कधी येतोय त्याची वाट बघत होते.. तो आत आला तस त्याला पकडत उशीने मारायला सुरुवात केली..

शौर्य : अरे झालं काय.. आ... मला असे मारताय का तुम्ही लोक..??

रोहन : तु आम्हाला न सांगता कस काय एवढं प्लॅन केलंस..

टॉनी : आम्हांला हॉरर स्टोरी मध्ये गुंतवलस..

राज : तुझ्यामुळे मी आज हार्ट एटेक ने मरता मरता वाचलो..

शौर्य : अरे सगळं अचानक झालं..

टॉनी : हा वृषभ तर मगाशी बोललाना प्री प्लॅन होत तुझं..

शौर्य : अरे पण मी आज करेलच अस मलाच वाटत नव्हतं.. फक्त डेकोरेशन मी प्लॅन केलेलं..जर हॉरर स्टोरी सांगायला तुम्ही तैयार झालाच नसतात तर..  आणि सर्वात महत्वाचं प्रपोज करणं म्हणजे सोप्प नसत.. हिंमत असावी लागते त्यासाठी.. रोहन तुला तर एक्सपिरियन्स आहे ना.. तु तर समजुन घे.. आणि बाय दि वे... ह्याने सुद्धा मनवीला प्रपोज केलं तेव्हा आपल्याला कुठे सांगितलं.. मग ह्याला का सोडलं..

राज : बॉस तु समीराला प्रपोज केलं.. तिला पटवन इजी नाही. मनवीला कोणीही सहज पटवु....

(राज दोन्ही हात तोंडावर ठेवत रोहनकडे बघु लागला)

मनवीला काय?? बोल पूढे.. रोहन थोडं रागातच बोलला..

टॉनी : रोहन सोड ना.. चुकुन निघालं असेल यार...

रोहन : मनवी बद्दल पुन्हा जॉक नकोय मला राज..

राज : सॉरी..

रुमच वातावरण थोडं गरम झालेलं..

वृषभ : शौर्य झोप उद्या जायचय ना आपल्याला.. ब्रूनोला भेटायला..

शौर्य : हम्म पण तू उठशील का एवढ्या लवकर?? 6 वाजता??

वृषभ : उठेल.. तुझ्यासाठी..

सगळे सकाळपासुन खुप दमल्यामुळे पडल्या पडल्या झोपुन गेले..

रोहनला पहाटे जाग आली तेव्हा त्याला शौर्य आणि वृषभ तैयार होत कुठे तरी जाताना दिसले..

रोहन : कुठे जातायत?? एवढ्या सकाळी?? (रोहन डोळे चोळतच बोलु लागला)

वृषभ : काल तर बोललेलो ह्याला ब्रुनोला बघायचंय..

रोहन : ओहह हा मी विसरलो.. मला पण यायचंय..

वृषभ : चल की मग..

शौर्य : मला भीती वाटते यार.. मला कोणी बघितलं तर खूप प्रॉब्लेम होईल..

घरातुन निघताना शौर्यच मन मात्र घाबर घुबर होत होतं.. पण रोहन आणि वृषभ त्याची समजूत काढत त्याला नेतात..

वृषभ : मी कालच दादा कडुन त्याच्या बाईक ची किल्ली घेतलीय.. चल बस...

थांब एक मिनिट.. (शौर्य बसणार.. तोच वृषभ पुन्हा त्याला थांब म्हणुन सांगतो..)

हा स्कार्फ बांध आधी तोंडाला आणि रोहन हा तु बांध.. जर शौर्यची मॉम असेल तर ती आपल्याला लगेच ओळखेल..म्हणून हा स्कार्फ.. ह्या स्कार्फने तिला कळणार नाही आपण आहोत ते.

रोहन : ती तुला पण ओळखते.. तु काय करशील??

हा हेल्मेट आहे की.. वृषभ हेल्मेट घालतच बोलला..

आता बसा लवकर.. 

दोघेही जॉगिंग पार्क जवळ पोहचले..

तिघेही बाईक बाजुला पार्क करत तिथेच बसले..

रोहन : कुठेय रे तुझा ब्रुनो???

दहा मिनिटं आहेत.. मॉम नाही तर विर घेऊन येईलच त्याला इतक्यात..

तिघेही ब्रूनोची वाट बघत तिथे बसले..

थोड्याच वेळात त्याला लांबुन वीर येताना दिसला सोबत त्याचा लाडका ब्रुनो ही.. कोणाशी तरी फोन वर बोलत तो एका बेंचवर बसला.. फोनवर बोलतच त्याने ब्रूनोच्या गळ्यातील पट्टा काढला आणि त्याला मोकळं केलं.. पण ब्रुनो तिथे बसला..

रोहन : हा एवढ्या सकाळ सकाळी कोणाशी बोलतो..

शौर्य : काय माहीत.. मी ही आज बघतोय..

वृषभ : अरे पण तो ब्रुनो तिथेच बसलाय त्याच काय??

शौर्य : मी आणतो तेव्हा तर मस्त खेळत असतो हा..आज काय झालं??

खुप वेळ झाला तरी ब्रुनो तिथेच बसुन होता.. शेवटी न राहवुन शौर्य तिथे जायला निघतो.. 

वृषभ : कुठे चाललायस??

शौर्य : तुम्ही इथेच थांबा मी आलो..

शौर्य जाणुन बुजून ब्रूनोच्या बाजूने जातो.. . शौर्य ब्रूनोच्या बाजुला जाताच ब्रुनो शौर्यकडे बघत भुकू लागतो.. 

आणि त्याच्या मागे जातो... विर मात्र फोन मध्ये गुंतून गेलेला असतो त्यामुळे ब्रुनो असा गेलाय हे त्याच्या लक्षात येत नाही..

विर पासुन लांब आलोय हे जाणवताच शौर्य ब्रूनोला उचलुन घेतो. खूप दिवसांनी आपला आवडीचा माणूस भेटला म्हणुन ब्रुनो शौर्य वर मोठं मोठयाने भूकत होता.. शौर्यसुद्धा त्याचे मुके घेत होता. शौर्यला ब्रूनोला अस सोडुन पुन्हा जावंसं वाटत नव्हतं..

थोड्याच वेळांत विर फोन ठेवतो.. ब्रुनो त्याला कुठे दिसत नाही म्हणुन तो त्याला शोधायला निघतो.. एका झाडाच्या आड त्याला ब्रूनोच्या भूकण्याचा आवाज येतो म्हणुन तो तिथे जायला निघतो

(आता पूढे काय?? विराजला शौर्य मुंबईत आहे हे कळेल?? त्यासाठी प्रतीक्षा करा पुढील भागाची.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all