अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 24

क्रमशः

( मागील भागात आपण पाहिलात की.. शौर्य ब्रूनोला भेटायला जातो.. विराजच्या नकळत शौर्य ब्रूनोला भेटतो. खुप दिवसांनी शौर्य दिसल्याने ब्रुनो त्याच्यावर भुंकून आपलं प्रेम व्यक्त करतो. ब्रुनोच्या आवाजाने विराज त्याला शोधायला जातो.. झाडाच्या पलिकडून ब्रूनोचा आवाज येत असतो.. विराज ब्रूनोला शोधत पूढे जातो..आता पुढे.) 

Excuse me... विराज झाडाच्या आड जाणार तोच वृषभ ने त्याला थांबवतच म्हटले..

विराज : yes

वृषभ : मला हा एड्रेस सांगता का जरा.. Please.... 

विराज वृषभच्या हातातला कागद घेतो आणि त्यातला एड्रेस बघतो.. आणि तो वृषभला काही सांगणार.. तोच मोठं मोठ्याने ब्रुनो भुंकण्याचा आवाज तिथे येतो.. विराज हातातील कागद तसाच पकडत ब्रुनोच्या आवाजाकडे धाव घेतो.. 

शौर्य रोहनच्या मागे बाईकवर बसलेला असतो.. पण ब्रुनो शौर्यची पेंट पकडुन होता.. जणु त्याला जाऊ नको म्हणुन सांगत होता..

विराजला काय चाललंय नक्की कळत नव्हतं.. 

ब्रुनो सोड.. मी नंतर येईल तुला भेटायला.. प्लिज प्लिज.. अस बोलत शौर्य ब्रूनोला पकडत थोडं लांब ढकलतो.. 

रोहन चल लवकर.. विर इथेच येतोय..

रोहनने बाईक चालु करत तिथुन धुम ठोकली..

ब्रुनो शौर्यची बाईक दिसेपर्यंत भूकत होता.. विराज त्याला उचलत शांत करत असतो.. तो त्या बाईककडे बघतो पण बाईक खुप लांब गेली असते..

ब्रुनो काय अस करतोस.. विराजला ब्रुनो आता कंट्रोल होत नसतो.. तो खिश्यातून पट्टा काढतच त्याच्या गळ्यात बांधतो आणि त्याला तिथुन नेतो.. हातातील कागद घेत तो वृषभ जिथे होता तिथे त्याला एड्रेस सांगायला जातो.. पण वृषभ तिथे नव्हता.

आता तर इथे होता.. कुठे गेला?? विराज जॉगिंग पार्क वर नजर फिरवतो.. पण त्याला कुठेच तो दिसत नाही..

ब्रुनोच्या भुंकण्याने तो भानावर येतो आणि त्याला घरी घेऊन जातो..

घरी आला तरी ब्रुनो भूकतच असतो.. अनिता देखील त्याच्या आवाजाने बाहेर येते..

अनिता : काय झालं?? हा अस का भूकतोय??

विराज : काही कळत नाही.. अचानक भुकू लागलाय.. म्हणजे आधी नॉर्मल होता.. कोणा तरी बाईक वाल्याच्या मागे लागलेला.. म्हणजे त्याला बघून भूकत होता.. बहुतेक कोणी तरी चोर वैगेरे असेल..

अनिता : हम्मम.. मी कामावर निघते. तु त्याला बघ काय हवं नको ते.. ठीक आहे..

एवढं बोलुन अनिता ही तिथुन निघते..

इथे रोहन गाडी थोडी पुढे नेत थांबवतो.. वृषभ धावतच मागुन बाईकजवळ येतो..

शौर्य : थोडक्यासाठी वाचलो..

वृषभ : पण तु भेटलास ना ब्रूनोला??

खुप खुप थेंक्स... वृषभला मिठी मारतच तो बोलला..

आणि मला.. मी पण मदत केली यार.. रोहन मुद्दामूनच थोडं तोंड पाडत बोलला..

काय तु... अस बोलत तिघेही बिलगले..

चला निघुयात इथुन घरी वाट बघत असतील सगळे..

वृषभ : तुला सासरी म्हणायचं का??

वृषभ रोहनला टाळी देतच बोलला..

शौर्य : हो तेच ते.. 

तिघेही समीराच्या घरात पुन्हा आले.. घरातील सगळीच मंडळी कामात व्यस्त होती.. सगळेच आता अंगावर पडेल ती काम करू लागले..

समीराच्या घरीही पावण्यांची लगबग सुरू झाली.. संपुर्ण घरभर अगदी पावणे.. आता दारात मंडप देखील बांधुन झाले.. तांदुळ निवडणे, चुडा भरणे अस करत एक एक कार्यक्रम होत गेले.. आता सगळे हळदीच्या कार्यक्रमाच्या तैयारीला लागले.. घरातील सुहासिनींनी ओव्या म्हणतच हळद कुटायला घेतली.. 

"हळद बारीक, हळद बारीक
भाऊ तुझ्या लग्नाची तारीख रे,
हळदीच्या गाड्या भाऊ, तुझ्या उलळत येती व..
हळद बारीक भाऊ, तुझ्या लग्नाची तारीख"...

खोबऱ्याच्या गाड्या भाऊ,  तुझ्या उलळत येती व..
हळद बारीक भाऊ, तुझ्या लग्नाची तारीख...

खारीकच्या गाड्या भाऊ, तुझ्या उलळत येती व..
हळद बारीक भाऊ, तुझ्या लग्नाची तारीख...

सुपारीच्या गाड्या भाऊ, तुझ्या उलळत येती व..
हळद बारीक भाऊ, तुझ्या लग्नाची तारीख...

बदामाच्या गाड्या भाऊ, तुझ्या उलळत येती व..
हळद बारीक भाऊ, तुझ्या लग्नाची तारीख...

संपुर्ण घरभर ओव्यांचा आवाज घुमत होता... शौर्य सोबत इतर सगळेच हे बघत ओव्यांचा अर्थ लावण्यात गुंतून गेले..

शौर्य ओव्या ऐकत तर होताच पण त्याच बरोबर आपल्या केमेऱ्यामध्ये आठवण म्हणुन क्लिक सुद्धा घेत बसलेला.. समीराच्या प्रत्येक हालचाली सगळ्यांच्या नकळत तो केमेऱ्यात टिपत होता. कारण ती आज खुप खास आणि जरा वेगळीच दिसत होती.. त्यात समिराने घातलेला पिवळसर असा मेक्सि ड्रेस. त्यावर गुलाबी रंगाने केलेल नक्षी काम.. सोबत मॅचिंग असे नाजुकसे झुमके आणि केसांची तिने तिला साजेल अशी घातलेली वेणी आणि त्यावर माळलेलं पिवळसर चाफ्याच फुल..  तिच्या नाजुक अश्या चेहऱ्यावर खुलुन दिसत होती.. शौर्यच लक्ष मात्र तिच्यावरून काही हटत नव्हतं.. समीराच लक्ष शौर्यकडे जाताच तिने इशाऱ्यानेच त्याला काय करतो म्हणुन विचारले.. आपल्या उजव्या अंगठ्यावर उजव्याच हाताची चाफेकळी टेकवत तीन बोट तिला दाखवत.. सुंदर... दिसतेस अस इशाऱ्यानेच तिला बोलला..

समीराने सुद्धा उजव्या हाताच्या पंजावर आपले गुलाबीसर ओठ चिकटवत हात शौर्यकडे करत एक फुंकर त्याच्या दिशेने मारत सगळ्यांच्या नकळत तिने शौर्यला फ्लेनकीस दिले.. शौर्यने देखील ते अलगद अस हवेत झेलत आपल्या धडधडणाऱ्या हृदयापक्षी नेले.. दोघांचं नवीन प्रेम अगदी फुलत होत.. समीरा घरात आलेल्या पावण्यांची उठबस करण्यात बिजी होती.. त्यामुळे संपुर्ण दिवस तीच आणि शौर्यच बोलणं किंवा भेटणं अस होतच नव्हतं.. पण शौर्य तिची एक झलक दिसण्यासाठी अगदी उत्सुक असायचा..

बोलता बोलता संध्याकाळ ही झाली.. दादाला आता पाटावर बसण्यात आले.. पुन्हा पारंपरिक पद्धतीने ओव्या म्हणतच सुरुवात झाली.. नवरदेवाला पहिली हळद कोण लावणार ह्यावरून आता बायका ओव्या म्हणु लागल्या..

हळदीचा मान वं.. मान आहे कुणाच्या दानी वं..
पहिला मान वं... मान कोणाच्या हाती वं..
पहिला मान वं... मान कोणाच्या हाती वं..
पहिला मान वं.. मान बापाच्या हाती वं...
दुसरा मान वं.. मान आईच्या हाती वं...
तिसरा मान वं.. मान बहिणीच्या हाती वं...
चौथा मान वं.. मान मामाच्या हाती वं...

अस बोलत एक एक जण हळद लावत होती..

शौर्य सुद्धा दादाला हळद लावण्यासाठी उत्सुक होता.. तोच ज्योसलीन ने हळदीच्या कार्यक्रमाला येऊन तिची उपस्थिती दाखवत सगळ्यांना सरप्राईज दिल..

शौर्य : ज्यो तु..

ज्योसलीन : आता समीराने बोलवलं मग बोलली चला जाऊयात..त्या निमीत्ताने तु तरी भेटशील पुन्हा..

हेय ज्योसलीन थेंक्स फॉर कमिंग.. समीरा ज्योसलीनला मिठी मारत बोलली..

समीराने नुकतीच दादाला हळद लावलेली.. त्यामुळे तिचे हाथ पूर्ण पणे हळदीने माखले होते.. तिने लगेच शौर्यच्या गालावर पूर्ण हळद लावली.. आणि तिथुन पळ काढला..

शौर्यलाही आता समीराला हळद लावायची होती.. पण समीरा सहजासहजी हातात काही लागणार नव्हती..

शौर्यने आणि इतरांनीही दादाला हळद लावली.. हळद लावुन होताच शौर्यची नजर समीराला शोधत होती.. पण समीरा जाणुन बुजून आई सोबतच रहात होती.. 

घराबाहेरून पियानोच्या सुरांसोबत ढोल आणि ताश्यांचा आवाज घुमत होता.. सगळेच नाचायला बाहेर गेले.. भावाची करवली म्हणुन सीमा आणि मनवीने मिळुन समीराला बाहेर नाचण्यासाठी आणले.. पण बाहेर इतर सगळ्यांसमोर कस समीराला हळद लावणार??  उगाच कोणी बघेल म्हणुन शौर्यने ही विषय सोडुन दिला आणि बेधुंद होत नाचु लागला.. समीरा नाचताना त्याला ठेंगा दाखवतच चिडवत होती.. शौर्य तीच ते चिडवन बघुन अजुन तिच्या प्रेमात पडत होता. 

शौर्यने सुद्धा आता ठरवलं की काही झालं तरी समीराला हळद ही लावायचीच.. शौर्यच लक्ष बाजुलाच असणाऱ्या ज्योसलीनकडे गेलं.. शौर्य जाणून बुजुन समीराला इग्नोर करत ज्योसलीनकडे बघत नाचु लागला.. ज्योसलीन सुद्धा शौर्यचा हात पकडत नाचु लागली.. दोघांना अस जास्त जवळ आलेलं बघुन समीराला थोडं बैचेन वाटु लागलं.. तिने शौर्यकडे रागात नजर फिरवली पण शौर्य तिच्याकडे बघत नव्हता.. शेवटी समीरा शौर्यच्या बाजुला जाऊन आपल्या ग्रुप सोबत नाचायला जाते..पण तरीही शौर्य जाणुन बुजून ज्योसलीनकडे बघतच नाचत होता.. आता न राहवुन समीरा ने शौर्यचा हात पकडत त्याला माझ्या पाठुन ये अस सांगितलं.. आणि स्वतः वाट काढतच पुढे निघाली.. शौर्यला तेच हवं होतं.. शौर्य मनोमन खुश होतच तिच्या मागे जायला निघाला.. समीरा पुढे जात घराच्या मागच्या बाजुला जाऊन शौर्यची वाट बघत थांबली..

काय चाललय तुझं?? शौर्य आल्या आल्या समीराने शौर्यला प्रश्न केला..

शौर्य : कुठं काय?? तुझ्या भावाची हळद एन्जॉय करतोय..

समीरा : मी ज्योसलीनबद्दल बोलतेय...

शौर्य : तिला तूच बोलवलं ना..

समीरा : हो.. पण तिच्या एवढं जवळ जाऊन नाचलेलं मला नाही आवडत..

शौर्य : ठिक आहे नाही नाचत पण आता तर तुला हळद लावू शकतो ना मी...

समीरा शौर्यकडे बघते आणि हसु लागते..

शौर्य : तुला अस हसायला काय झालं..?? 

हात बघ तुझे...  हातातली हळद सुकलीय पुर्ण.. आता कस काय हळद लावणार तु..?

शौर्य : अस...

शौर्य हळूहळू पुढे सरकू लागला तस तस समीरा मागे जाऊ लागली..

काय करतोयस...? समीरा मागे असणाऱ्या भिंतीला टेकली..

शौर्यने दोन्ही हात भिंतीला टेकवले.. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत  हरवून गेले..

शौर्य कोणीतरी येईल.. समीरा घाबरतच बोलली..

शौर्य : येऊ दे की मग.. मी तुला आता हळद लावल्याशिवाय सोडणार नाही.. हातात हळद नाही तर काय झालं गालावर तर आहे ना माझ्या...

समीराच हृदय जोर जोरात धडधडू लागलं..

समीरा : शौर्य..

समीरा पुढे काही बोलणार पण शौर्यने आपल एक बोट तिच्या नाजूक अश्या ओठांवर ठेवत तिला शांत बस म्हणुन सांगितले..

समीराने लाजेने मान खाली घातली..शौर्यने तिची हनुवटी वर करत तीच तोंड आपल्याकडे केलं.. समीराने डोळे बंदच ठेवले.. शौर्य आपला गाल तीच्या गालावर  चिकटवला.. तस समीराच संपुर्ण अंगातुन जणु वाफा निघतात की काय अस काहीस झालं.. 

लावली की नाही हळद... शौर्य हळुच समीराच्या कानात बोलला..

तशी समीरा भानावर आली.. लाजुन अगदी चिंब झाली.. तिने त्याला लांब ढकलत तिथून पळ काढला.. शौर्य केसांवर हात फिरवत फक्त तिला जाताना बघत होता.. तोही थोड्या वेळाने पुन्हा नाचु लागला..

अचानक कुठे गेलेलास म्हणुन ज्योसलीन त्याला विचारू लागली.. 

त्याने इशाऱ्यानेच मी इथेच होतो म्हणून सांगितले..

आता नाचताना मात्र तो समीराकडे बघतच नाचत होता.. ज्योसलीनने शौर्यला हातातील घड्याळ दाखवलं..व इशाऱ्यानेच त्याला सांगितलं की मी निघते.. 

शौर्य हि तीला ठिक आहे म्हटला.. पण जेवुन जा. 

शौर्य सगळ्यांनाच जेवायला चल म्हणुन बोलला.. सगळे ग्रुप करून एकत्रच जेवायला बसले.. जेवुन होताच शौर्यने ज्योसलीनला घरी जाण्यासाठी कार बुक करून देऊन दिली.. समीराने ही तिला तिच्या भावाच्या हळदीला आल्याबद्दल आभार मानले.. उद्या लग्नाला ही ये अस म्हटलं..

शौर्यने हात पुढे करत तिला एडवांस मध्ये  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..

शौर्यने दिल्याबरोबर बाकीच्यांच्याही लक्षात आलं.. तस बाकीच्यांनी तिला शुभेच्छा देत निरोप दिला.

नाचुन सगळीच मंडळी दमली होती.. कधी झोपतो अस झालेलं.. उद्या सकाळीच लग्न म्हणजे लवकर उठुन तैयार व्हावं लागणार होत.. म्हणुन रात्रभर गप्पा गोष्टी न करता सगळे झोपुन गेले.. शौर्य आणि समीरा दोघांना मात्र आज झोप काही येत नव्हती.. प्रेमाच्या पण थोडं पलीकडे आज त्यांचं नात शिरकाव करू पहात होत.. दोघेही त्याच गोष्टीचा विचार करत होते.. सकाळ कधी झाली हे त्यांना कळलंच नाही.. बाहेर पाहुणे मंडळींची गडबड जाणवु लागली..

सगळेच पटापट तैयार होऊन बाहेर पडले..लग्नाचा हॉल हा घराजवळच होता.. वरात थोड्याच वेळात निघणार होती.. शौर्यला समीरा सकाळपासुन काही दिसली नव्हती.. नवरदेवाची आता बाहेर पडण्याची वेळ झाली.. त्याच्या सोबतच हात तळी घेऊन समीरा बाहेर पडली.. शौर्यला ती समीरा आहे ह्यावर विश्वासच बसत नव्हता.. मोरपीस रंगाची नववारी.. केसांचा आंबोडा व त्याच्या भोवताली माळलेला मोगऱ्याचा गजरा.. गळ्यात व कानात  घातलेले मोत्यांचे दागिने.. आणि खास करून नाकात घातलेली नथ तिच्या सौंदर्यात भर पाडत होती.. शौर्य तिच्या ।मराठमोळ्या रूपावर अगदी फिदा झालेला.. 

दादा घोड्यावर चढला तस ढोल नगाडे वाजु लागले.. त्या आवाजाने शौर्य भानावर आला.. वृषभ आणि टॉनीने मिळुन शौर्यला खेचत नाचायला घेतले. हळुहळू वरात पूढे सरकु लागली.. शौर्यही बेधुंद होत नाचु लागला.. 

हॉलवर इतर मंडळी कधी वरात येते ह्याची वाट बघत होते.. आणि त्या मंडळींमध्ये सुरज आणि विराजही होते.

आता वरातही हळुहळु हॉल जवळ पोहचली.. इथे सुरजचे फोन वाजला सुरुवात झाली.. कारण शौर्य कुठेय हे सुरजच्या माणसांना कळलं होतं.. पण वरातीत वाजणाऱ्या ढोल तश्याच्या आवाजाने त्याला ऐकु जात नव्हत.. तो फोन कट करत बाहेर बोलायला जाऊ लागला.. विराजला सुद्धा त्याचा खास मित्र म्हणुन तो ही वरात बघायला बाहेर आला..

वृषभ ने शौर्यला खांद्यावर उचलुन घेतलेलं असत.. आणि शौर्य नाचत असतो.. तोच शौर्यच लक्ष हॉलबाहेर फोनवर बोलत असणाऱ्या सुरजवर पडत.. शौर्य पूर्ण घाबरा घुबरा होतो.. तो वृषभला खाली घ्यायला सांगतो.  पण वृषभ मात्र त्याच काही ऐकत नाही..  विराजच लक्ष मात्र गोड्यावर बसलेल्या त्याच्या मित्राकडे असत.. त्याच्याच बाजूला नाचणारा शौर्य त्याला दिसत नाही.. पण इथे सुरजचा नजरेतून तो काही सुटत नाही.

वृषभ मला खाली घे... प्लिज... शौर्य जोरात ओरडतो..

इथे सुरज आणि त्याची माणस गर्दी बाजुला सारत वरातीत घुसतात.. डॅड असा मध्येच कुठे घुसला म्हणुन विराज बघतो..आणि तो ही त्याच्या मागे घुसतो.. वृषभ शौर्यला खाली उतरवतो.. तस शौर्य तिथुन लपायला म्हणुन बाहेर पडतो.. पण त्याला जाणवत की अजुन दोघे तिघे त्याच्या ओरही ये आहेत..

शौर्यला काय झालं असं अचानक म्हणुन वृषभ देखील त्याच्या मागे पळत जातो.. तोच त्याची धडक विराजशी होते..

वृषभ : तु...

विराजला तिथे बघुन वृषभ घाबरतो.. 

वृषभसुद्धा तिथुन पळ काढतो पण विराज त्याचा हात घट्ट पकडतो आणि त्याला बाजुला घेतो.. 

विराज : कोण आहेस तू आणि काल मला एड्रेस विचारून पळालास का??

वृषभ : ते.. अ.. हा मी दुसऱ्याला एड्रेस विचारला.. त्यांनी मला सांगितलं..

विराज : कसा काय?? तो कागद तर माझ्याकडे होता..

वृषभ : प्लिज मला सोड.. मी नंतर बोलतो तुझ्याशी.. 

वृषभची नजर शौर्यला शोधत होती पण तो दिसत नव्हता..

टॉनी : काय झालं?? आणि ह्यांनी तुला अस का पकडलं.. 

वृषभ : काही नाही रे.. तु शौर्य बघ कुठे आहे.. 

विराज समोर आपण शौर्यच नाव घेतलंय ह्याची जाणीव होताच वृषभ जीभ चावतो..

विराज : शौर्य.. कोण शौर्य..??

विराज घाबरा घुबरा होत वृषभला विचारतो..

टॉनी : ए हॅलो तु शौर्यला ओळखतो काय?? शौर्य देशमुख..

विराज : शौर्य इथे आहे..

वृषभ : हो..

शट... वृषभला सोडत विराज शौर्यला शोधायला लागतो.. 

टॉनी : झालं तरी काय??

विराज शौर्यला संपुर्ण रस्ता शोधतो ना त्याला शौर्य कुठे दिसत ना त्याचे वडील.. विराजला ज्यांचू भीती होती तेच नेमकं घडलेलं.. हात पाय अगदी गळुन पडत होते त्याचे..

वृषभ : तो इथेच असेल आपण शोधुयात त्याला.. 

गरज काय होती त्याला इथे यायची.. तरी मी फोन करून विचारलं त्याला तु इथे आलायस का म्हणुन तर खोटं बोलला तो माझ्याशी.. सिरीयसनेस नाही कळत का? मारून टाकतील त्याला.. विराज वृषभवर भडकत बोलला..

टॉनी सुद्धा विराजच बोलणं ऐकून आता घाबरून गेला..

(कथेत लिहिलेल्या ओव्या ह्या पारंपारिक पद्धतीच्या आहेत ज्या मी गुगलवर शोधुन लिहिल्या आहेत..एक मनोरंजन म्हणुन.. आता शौर्यच नक्की काय होईल त्यासाठी पुधील भागाची प्रतीक्षा करा.. आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all