अतरंगीरे एक प्रेमकथा 25

In marathi

शौर्य खुप घाबरून गेला होता.. वरातीच्या गर्दीतील माणसांमध्ये लपुनच तो आत शिरला.. आत शिरताच जेवण बनवण्यासाठी एक खोली त्याच्या नजरेस आली.. क्षणाचाही विलंब न करता तो त्या खोलीत शिरला.. शौर्य अस लपुन छपुन कुठे चाललाय?? म्हणुन मनवी ही त्याच्या मागे त्याला बघायला त्या रूममध्ये शिरली.. शौर्य लपायला कुठे जागा मिळते का बघु लागला.. तोच भिंतीच्या कडेला टेकुन ठेवलेला भला मोठा पाण्याचा ड्रम त्याला दिसला.. ड्रम आणि भिंत ह्यांच्या मधोमध असलेल्या फटीत शिरून तो लपून बसला.. इथे अस किती वेळ त्याला लपुन रहावं लागेल हे त्याचं त्यालाच माहीत नसतं.. हृदय मात्र जोरात जोरात धडधडत होते.. अनिताचे शब्द आठवुन त्याला आता जाणवलेल की त्याने इथे येऊन खुप मोठी चुक केली होती. 

तु असा का लपलायस इथे??? 

घाबरून बंद केलेले डोळे त्याने मनवीच्या आवाजाने उघडले...

शौर्य : मनवी प्लिज तु इथून जा..

मनवी : मी का जाऊ...?? आधी सांग तु अस का लपलायस ते..

शौर्य : माझा डॅड इथे आलाय. त्यांना कळलं ना की मी मुंबईत आलोय तर मला दिल्लीला परत पाठवणार नाहीत ते..आय मिन मला इथेच ठेवुन घेतील.. बाकीची स्टोरी मग सांगतो पण तु आधी जा इथून.. 

मनवी : ओहहह.

(मनवी शौर्यकडे बघत तिथेच उभी राहिली)

शौर्य तिला विनवण्या करत तिथुन जायला सांगतात पण ती मात्र कोणत्या तरी विचारात हरवुन गेली..

इथे वृषभ विराजला घेऊन समीराच्या घरी आला त्याला वाटलं की शौर्य कदाचित रूममध्ये आला असेल..

शौर्य... ए शौर्य.. वृषभ रूममध्ये त्याला आवाज देत फिरत होता पण शौर्यचा आवाज काही येत नव्हता...

वृषभ : इथे नाही आला वाटत तो..मी सगळीकडे बघितलं

टॉनी : फोन सुद्धा उचलत नाही तो..

विराज : मला मी काय करू कळत नाही. (विराज डोक्यावर हात ठेवुन रडु लागलेला).

टॉनीने पुन्हा फोन लावला.. ह्या वेळेला शौर्यने फोन उचलला..

अरे आहेस कुठे तु.. टॉनी ने फोन स्पीकरवर ठेवत शौर्यला विचारलं..

शौर्यने त्याला तो कुठे आहे ते सांगितलं.. आणि फोन कट केला..

तिघेही पळतच पुन्हा हॉलवर जायला निघाले..

इथे सुरज आणि त्याची माणस हॉलवर शौर्यला शोधु लागले..

शोधता शोधता ते लोक जेवण बनवण्याच्या खोलीत घुसले.. 

इथे एक मुलगा आलाय का..?? (सुरजचा धारधार आवाज शौर्यच्या कानावर पडला.. शौर्य मनवीकडे बघत स्तब्ध झाला..)

एक मुलगा इथे गेलाय खर, ती बघा ती मुलगी दिसते ना तिथे... मनवीकडे बोट दाखवत..जेवण बनवऱ्या एका आचारीने सुरजला सांगितलं.. 

सुरजने त्याच्या माणसांना तिथं जाऊन बघायला सांगितलं तस ती माणसं मनवी आणि शौर्यच्या दिशेने जाऊ लागली..

शौर्य डोळे बंद करून होता.. अचानक मनवी त्याच्या जवळ जात त्याच्या खांद्यावर हात ठेवुन त्याच तोंड आपल्याजवळ करू लागली..

व्हॉट आर यु डुइंग?? शौर्य मनवीला हळु आवाजात बोलला..

मनवी : जस्ट सी एन्ड वोच...

शौर्य मनवीला लांब ढकलत होता पण ती अजुन जवळ खेचत होती..

जर आपण अस राहिलो तर ती माणस तिथुनच जातील..

शौर्य आता मनवीच्या अश्या जवळ आल्याने इरिटेट होत होता.. तो तिला काही बोलणार पण पुन्हा सुरजचा आवाज आला..

लवकर बघा.. तिथे कोण आहे ते..तसा तो शांत झाला..

सुरजची माणस हळूहळू पुढे येऊ लागली.. मनवीने शौर्यच्या खांद्यावर हात ठेवत त्याच्याकडे एकटक बघत राहिली..

सुरजच्या माणसांना मनवी एका मुलाला मिठी मारतेय अस वाटलं.. पुढे अजुन काही विचित्र बघायला नको अस बोलुन ते तिथुन निघाले.. आणि शौर्यला बाहेर शोधु लागले..

शौर्य डोळे मिळुन तसच असतो.. आणि मनवी त्याच्या गालावर पडलेली सुंदर अशी खळी बघण्यात हरवुन गेली असते.

हे काय चाललंय..?

रोहनच्या आवाजाने मनवी भानावर येते..

शौर्य पासुन लांब होत ती रोहनकडे बघते..

तु...तु कधी आलास??? मनवी घाबरतच रोहनला बोलते.

रोहन : ते महत्वाचं नाही तुम्ही दोघ इथे काय करताय ते महत्वाचं आहे माझ्यासाठी.. (रोहन थोडं रागातच बोलत होता).

मनवी : ते तु शौर्यलाच विचार तो सांगेल..

शौर्यच लक्ष मात्र रोहनच्या बोलण्याकडे नसत.. तो सुरज आणि त्याचे इतर साथीदार तिथे दिसत आहेत का ते बघत असतो..

शौर्य मी काही तर विचारतोय.. रोहन रागातच शौर्यला बोलतो..

तुला एवढ भडकायला काय झालं?? शौर्य रोहनला शांत करत बोलला..

रोहन : भडकु नाहीतर काय करू..

शौर्य : रोहन प्लिज हळु बोल..

रोहन : मग तु आणि ही इथे काय करत होती ते मला कळलंच पाहिजे..

शौर्य : ती इथे काय करत होती ते मला नाही माहीत.. मी इथे लपलेलो कारण ... 

शौर्य पुढे काही बोलणार तोच वृषभ, टॉनी आणि विराज त्याला शोधत तिथे आले..

रोहन : कारण काय??

रोहनच मागून आलेल्या वृषभकडे लक्षच नव्हतं..

शौर्य : विर...

विरला पाहुन शौर्य घाबरून गेला..

शौर्य पुढे काही बोलणार तोच विराज ने सणसणीत त्याच्या कानाखाली मारली.. 

विर आय एम सॉरी..

शौर्य रडतच त्याला सॉरी बोलु लागला.. 

पण विराज काही ऐकुन घेत नव्हता.. पुन्हा त्याने त्याच्यावर हात उचलला..

तरी विचारलेल मी तुला.. तु आलायस तर सांग.. तुला सगळं तुझ्या मनासारखच जगायचं असत.. आयुष्यात मोठं व्हायचं का नाही तुला का अजुन लहान बनुनच वावरायचा.. तु थांब मम्मालाच सांगतो.. 

अस बोलत विरने हातात मोबाईल घेतला..

सॉरी ना विर.. पुन्हा नाही होणार अस... शौर्य विराजचा मोबाईल हातातुन खेचुन घेत बोलला..

वृषभ : प्लिज आंटीला ह्यातलं काही सांगु नको.. आणि शौर्यला आम्ही फोर्स केलं.. तो नव्हता येत इथे.

रोहन : विर तु शांत हो..प्लिज

विराज : कसा शांत होऊ.. इथून बाहेर नाही पडू शकत हा.. मुंबईत प्रत्येक ठिकाणी डॅडची माणस आहेत.. हा अजुन जिवंत आहे हे ह्याच नशीब..

वृषभ : आपण काही तरी मार्ग काढु.. तु अशुभ अस काही बोलु नकोस..

विराज : काय मार्ग काढणार.. शौर्य मम्माला फोन करावाच लागेल.. तीच हेल्प करू शकते आण तो मोबाईल दे इथे..

शौर्य : विर माझं मी जाईल बरोबर.. प्लिज मम्माला नको ना सांगु ह्यातलं. आणि तु पण टेन्शन नको घेऊस..

तुला अजुनही सिरीयसनेस कळत नाही का शौर्य... का माझा अंत बघतोयस तु.. शौर्यची कॉलर पकडतच विर बोलला...

मोबाईल आण माझा इथे..

शौर्य : नाही.. तु मम्माला फोन नाही करणार.. प्लिज ना विर.. तुला माझी शप्पथ आहे..

विराज : नाही करत आण इथे मोबाईल..

विराजने फोन लावुन फोन वर बोलायला सुरुवात केली..

हॅलो डॅड.. मला महत्वाच तुझ्याशी काही तरी बोलायचंय..

सुरज : लवकर बोल..

विराज : मला शौर्य कुठे आहे ते कळलं.. तो इथेच आहे..तु लवकर ये..

(विराजच फोनवरच अस बोलणं ऐकून सगळेच आता एकदम घाबरून गेले..)

शौर्य : विर... (शौर्य डोळ्यांत पाणी आणत विराजकडे बघू लागला..) विराजने हातानेच त्याला शांत बस अस सांगितलं.. आणि तो पुन्हा फोनवर बोलु लागला..

सुरज : आहे कुठे तो.. ते तरी सांगशील..

विराज : तो.. श्री च्या घरी आहे.. तुला श्री च घर माहीतच असेल ना?? आपण लास्ट टाईम इथे आलेलो.. पेपर्सवर काही सिग्नेचर हवी होती श्री ची म्हणून..

सुरज : अ.. हो माहिती आहे..मी लगेच येतो.. तु त्याला तिथुन जाऊ देऊ नकोस..

विराज : तो जायच्या तैयारीत आहे डॅड.. मी एकटा नाही हँडल करू शकत तु प्लिज गाडी घेऊन ये..

सुरज : गाडीची किल्ली तुझ्याकडे आहे.. ते सोड मी येतो. तु त्याच्यावर नजर ठेव. आणि माझ्या कॉटेक्टध्ये रहा.

विराज : अ... हो लवकर ये..

सुरज मिळेल तशी वाट काढत श्री च्या घरी जायला निघाला.. 

विराज : शौर्य आपल्याकडे हिच वेळ आहे इथुन पळायची..

शौर्य : माझी बेग..

वृषभ : ते आम्ही बघतो तु प्लिज निघ इथुन

विराजने शौर्यचा हात पकडत त्याला गाडीत बसवलं. गाडी एकदम वेगात पळवली..

गाडीत त्याने पुन्हा फोन लावला..

वृषभ : हॅलो.. प्लिज माझं बोलणं नीट ऐक.. मला आत्ताच्या आता चेन्नईच बुकिंग हवंय.. लगेच.. ते मी सगळं सांगतो प्लिज..

आणि फोन ठेवला..

शौर्यला आता कळत नव्हतं की तो विराजला कोणत्या तोंडाने सांगेल की तो दिल्लीला राहतो..

तरी घाबरत का होईना त्याने सांगायचं ठरवलं

शौर्य : मारणार नसशील तर एक सांगायचय.. 

(शौर्य दोन्ही हात गालावर ठेवत बोलला..)

विराजने जोरात ब्रेक मारत गाडी थांबवली..

विराज : आता अजुन काय केलंस??

शौर्य : ते.. तु.. दिल्लीच बुकिंग कर.. मी दिल्लीला रहातो..

विराजने काहीच रिएक्शन नाही दिली.. त्याने गाडी चालु केली.. पुन्हा फोन लावला... आणि समोरच्या व्यक्तीला दिल्लीच बुकिंग करायला सांगितलं.. आणि शांत पणे गाडी ड्राइव्ह करू लागला..

शौर्य : विर सॉरी..

विराज निशब्द होता..

विर प्लिज बोलणं.. शौर्य त्याला समजवतच बोलला..

पण विर गाडीच चालवत होता.. शौर्यच कोणतंच बोलणं तो ऐकत नव्हता..

शौर्य : विर जर तु आता माझ्याशी बोलला नाही ना तर.. तर मी...तुझ्या डॅड ला फोन करेल.. आणि मग बघ.. 

तरीही विर शांतच..

शौर्य : विर बघ.. मी करेल फोन.. 

शौर्यने फोन हातात घेतला पण विर काही प्रतिसादच देत नव्हता..

शौर्य : बघ.. मी करतो कॉल त्यांना आणि सांगतो टाका मारून मला.. तुला नाही फरक पडत..

विरने आता शौर्यकडे बघितलं..

विर : अजुन सुधारला नाहीस तु.. मला ब्लॅकमेल करायला तुला चांगलंच जमत...

शौर्यने ड्राइव्ह करतानाच विर ला मिठी मारली..

शौर्य : विर मॉमने भीतीने मला तुलाच काय कुणालाच मी दिल्लीला आहे हे कळु देऊ नको अस म्हटलेलं रे. कारण तुझा डॅड..

विराज : शेवटी रक्ताच नात महत्वाच असत शौर्य.

शौर्य : अस नाही आहे विर.. मॉमने तुला परक्या सारख कधी वागवलय अस मला कधीच आठवत नाही.. तुला तरी आठवत का सांग..? उलट लहानपणी तुला प्रत्येक गोष्ट ती आधी आणून द्यायची.. आणि खर सांगु तु लकी आहेस.. तुझ्याकडे डॅड पण आहे आणि मॉम पण.. 

आणि अजुन एक गोष्ट सांगु.. (विराज काही बोलणार तोच शौर्य त्याला थांबवत पुन्हा बोलु लागला)

माझ्याकडे मॉम आहे पण आज मला माझा बाबा पुन्हा नव्याने उमगला ते ही तुझ्या रुपात.. प्लिज माझ्यावर पुन्हा नाराज नको होऊस..

विराज : तु रडलास म्हणजे तुला अस वाटत की मीही रडावं..म्हणुन एक एक डायलॉग मारतोस.. 

विराज शौर्यचे केस विस्कटत बोलला..

तोच विराजच्या फोन वर त्याच्या डॅड चे दोन येत असतात.. पण विराज आता फोन उचलत नाही..

शौर्य : डॅड तुला काही करणार नाही.. मला भीती वाटते.. नाही तर तु पण चल दिल्लीला..

विराज : माझं टेन्शन नको घेऊस मी तस ही इतक्यात घरी जाणार नाही.. मी पुण्याला जाणार आहे.. एक दोन विक ने मग मुंबईत येईल.. 

शौर्य : बाय दि वे.. सकाळ सकाळी कोणाशी बोलत होतास???

विराज एक संशय भरी नजर शौर्यवर फिरवतो..

विराज : तुला काय माहीत..

शौर्य : ब्रूनोला भेटायला आलेलो ना.. तेव्हा बघितलं मी.. चल सांगुन पण टाक आता..

विराज : ते मी कंपणीच्या फोन संदर्भातच बोलत होतो..

शौर्य : नक्की..

विराज : नक्की म्हणजे तुला म्हणायचं काय आहे??

शौर्य : काही नाही..

विराजने पुन्हा फोन करून तिकीट बद्दल चौकशी.. पण सर्व सीट फुल असल्याने त्याला आजच्या दिवशीच दिल्लीला जाणार तिकीट मिळालंच नाही.. 

गाडी त्याने बाजुलाच पार्क केली..

शौर्य : आता काय करायचं??

शौर्यच्या प्रश्नाचं उत्तर न देता तो मोबाईल मध्ये काही तरी करण्यात गुंतून गेला..

गाडी बाहेर उतर.. आपण ही गाडी इथेच ठेवुन दुसऱ्या गाडीने पुण्याला जातोय..

शौर्यने ही जास्त प्रश्न करता सरळ गाडीतुन बाहेर उतरला.. विराज ने बुक केलेल्या केबमध्ये दोघेही बसुन पुण्याच्या दिशेने रवाना झाले..

विराज : भुक लागली असेल ना तुला??

शौर्य : मला... ?? नाही तर..

विराज : नाश्ता केलेलास का सकाळी??

शौर्य : नाही..

विराज : मग काय खाल्लं जे तुला अजुन भूक नाही लागली..

तुझ्या हाताचा मार.. शौर्य गाल चोळतच बोलला..

विराजला हसु आलं.. त्याने हसतच त्याची मान पकडली.. आणि त्याला सॉरी म्हटल..

जोरात लागलं का?? प्रेमाने त्याला विचारू लागला

शौर्य : आता जोरात मारलं मग लागणारच ना.. 

विराज : एवढा कसा रे नाजुक तु..

शौर्य विराजला काही बोलणार तोच त्याला वृषभ फोन करतो.. त्याची चौकशी करायला.. शौर्य वृषभला मी ठिक आहे.. पोहचलो की फोन करतो अस सांगुन फोन ठेवतो.. पुण्याला पोहचायला अजून दोन तास तरी लागणार असतात.. विराजसुद्धा मोबाईल मध्ये काही तरी करण्यात बिजी असतो.. गाडीत एसीचा थंडावा आणि त्यात शौर्यची खुप दिवसांपासूनची अपुरी झोप त्यामुळे डोळे आता त्याचे पेंगत होते. झोप उडवण्याचा प्रयत्न करत असतो पण शेवटी झोप लागतेच..

विराज : मी हॉटेल बुक केलय दोघांसाठी. आजची रात्र तिथे काढुयात. उद्या पुण्यावरून तु दिल्लीला जा.. आणि मी काय म्हणतो आपण मुंबई क्रोस झालं की जेऊया का डायरेक्ट पुण्याला गेल्यावर..
 
(विराज एकटाच बोलत असतो)

शौर्य गाढ झोपुन गेला असतो.. 

विराज पुढे काही बोलणार तोच शौर्यची मान त्याच्या खांद्यावर येऊन पडते.. विराज त्याच्या केसांवर हात फिरवतो आणि त्याला झोपु देतो..

पुढे आता काय विराज करणार हे त्याच त्यालाच कळत नसत..

रोहन मनवीला सॉरी बोलत तिच्या मागे फिरत असतो.. पण मनवी मात्र मला आता तुझ्याशी बोलायचं नाही म्हणुन रोहनला टाळत असते..  

नकळत आपण शौर्यच मन ही दुखावलं अस रोहनला वाटत असते.. कोणत्या तोंडाने शौर्यकडे माफी मागु हेच त्याला कळत नसत.. म्हणुन रोहन शौर्यला कॉल करतो..

शौर्य इतका गाढ झोपेत असतो की फोनच्या आवाजानेही त्याला जाग येत नाही.. विराज फोन घेतो आणि सायलेंटवर टाकतो..

शौर्य नाराज असेल म्हणुन माझा फोन उचलत नाही असा रोहन गैरसमज करून घेतो.. 

समीराला मात्र शौर्य कुठे गेला हे काहीच कळत नसत.. ती तिच्या पावण्यांची उठ बस करण्यात बिजी असते.. अश्यातच सीमा समीराला गाठते आणि तिला घडलेला प्रसंग सांगते.. समीराला काय रिऍक्ट करावं कळत नाही. ती धावतच चेंजिंग रूममध्ये जाते..तिच्या मागोमाग सीमा ही जाते... समीरा मोबाईल घेऊन शौर्यला फोन लावते.. शौर्य फोन उचलत नाही म्हणुन समीरा अजूनच घाबरते.. वारंवार समीरा फोन करते म्हणजे काही तरी काम असेल असं समजून विराज फोन उचलतो..

शौर्य तु कुठे आहेस?? बरा आहेस ना. किती फोन केले तुला..?उचलत का नाही तु.. तु फोन उचलत नाहीस म्हणुन मी किती घाबरले माहिती..... तुला कस रे कळत नाही..

विराज : एक मिनिट.... मी विराज आहे शौर्यचा भाऊ.. (विराज समीराला मध्येच थांबवत बोलला) शौर्य झोपलाय.. तु वारंवार फोन करत होतीस मला वाटलं की काही काम असेल म्हणुन फोन उचलला.

समीरा डोक्यावर हात मारून घेते.. आता काय बोलाव ते तिला कळत नाही.. लाजेने एकदम चुरररर झालेली असते..

शौर्य आहे ना बरा..??

विराज : हो आहे बरा.. तो उठला की फोन करायला सांगतो.. चालेल..??

समीरा : हम्मम.. ठेवते...

एवढं बोलुन समीरा फोन ठेवते..

सीमा तिला काय झालं म्हणुन विचारते..शौर्य बरा आहे न??

समीरा : आहे बरा.. त्याच्या भावाने फोन उचलला..

सीमा : अरे देवा म्हणजे तु जे बोलली ते सगळं त्याच्या भावाने ऐकलं का??

समीरा मानेने हो बोलते.. तस दोघी हसतात..

अचानक मनवी येऊन रडतच समीराला मिठी मारते..

समीरा : मनवी काय झालं?? तु अशी रडते का??

मनवी : समीरा तु मला माफ कर..

समीरा : अग पण झालं तरी काय??

मनवी : रोहन माझ्यावर संशय घेतो.. त्याने मला आणि शौर्यला नको त्या अवस्थेत बघितलं.. आम्ही तस काही करत नव्हतो ग.. पण ते.. शौर्य ने..

समीरा : मनवी तु काय बोलतेस?? नीट काय ते सांग..

समीरा आता चिडतच मनवीला बोलत होती..

हे तु शौर्यला दे.. त्याला सांग मला हे नकोय.. माझं फक्त रोहनवर प्रेम आहे..अस बोलत समीराने शौर्यला दिलेली चैन ती समीराच्या हातात देते आणि तिथुन निघुन जाते..

समीरा ती चैन बघत रहाते.. आणि सीमाकडे बघते..

ही चैन हिच्याकडे कशी आली मी तर ही शौर्यला दिलेली.. समीराला शौर्यच काय चालु आहे हे कळतच नव्हतं.. आता संशयाच भूत तिच्या डोक्यात शिरत चालेल..

क्रमशः

(आता पुढे काय?? मनवीने का अस केल? खरच तीच शौर्य वर प्रेम आहे की अजून काही.. त्यासाठी पुढील भागाची प्रतीक्षा करा आणि भाग कसा होता ते ही कळवा)

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all