अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 32

In marathi

शौर्य वॉशबेसिनमध्ये आपल्या शर्टावर पाणी टाकत कोल्ड्रिंक सांडलेला भाग तेवढा धुत असतो.. तोच त्याच लक्ष समोर असलेल्या मिरर मधून दिसणाऱ्या दरवाजाकडे जात.. कोणी तरी दरवाजाच्या फटीतून त्याच्याकडे बघतय अस त्याला वाटत. 

रोहन तु आहेस का?? अस बोलत तो आपली मान पटकन मागे फिरवतो.. पण तिथे कोणीच नसत.. कदाचित मलाच भास झाला असेल अस बोलत तो ओल झालेलं शर्ट स्टीमर मशीन खाली धरत ते सुखवत असतो..

मनवी अशी इथे का उभी म्हणुन रोहन तिच्या मागुन येत तिला आवाज देतो.. रोहनने अस अचानक येऊन मागुन आवाज दिल्यामुळे ती थोडी दचकते.. 

रोहन : अस घाबरायला काय झालं??

मनवी : ते मी.. अ.. हा. तुलाच बोलावणार होते.. कुठे होतास तु??

रोहन : अग गाडीत ते.. म्हणजे.. ड्रिंक्सच्या बॉटल होत्या.. त्या..

मनवी : हे शर्ट धर.. शौर्य आत आहे.. त्याला दे...आणि डोन्ट वरी आज घेऊ शकतो पण थोडीशीच जास्त नाही..

मनवी दोन्ही हाताने रोहनचे गाल खेचत त्याच्याशी प्रेमाने बोलुन तिथुन निघुन जाते..

आज मॅडम खुश... रोहन मनातच बोलत आत जातो..

रोहन : शौर्य धर हे शर्ट घाल..

शौर्य : तु सोबत एक्स्ट्रा शर्ट घेऊन फिरतोस काय??

रोहन : अरे तस नाही..हे मनवी ने मला द्यायला घेतलेलं.. बट तु घाल.. आत्ता तु ओल्या शर्टमध्ये किती वेळ राहशील..

शौर्य : नाही नको.. मी स्टीमर खाली सुखवतो.. सुखेल ते..

रोहन : अरे बाहेर तुझी सगळे वाट बघतायत.. आणि हा शर्ट घालायला काय प्रॉब्लेम आहे..

वृषभ आणि टॉनीसुद्धा तिथे येतात..

वृषभ : अरे शौर्य किती वेळ लावतोयस..

रोहन : ह्याला बोलतोय हा शर्ट घाल पण हा ऐकतच नाही यार.. तुम्ही तरी समजवा.. थंडी किती आहे.. किती वेळ हा असा राहील..

टॉनी : एवढंच ना..बोलवा रे त्या समीराला.. तो आपलं थोडी ना ऐकतो तीचच ऐकेल..

शौर्य : तस नाही यार..

काढना शर्ट मित्रा.. का टाईमपास करतोस.. अस बोलत वृषभ शौर्यच्या शर्टच बटण काढु लागला..

शौर्य : माझं मी करतो दे तो शर्ट इथे.. 

मनात नसताना देखील आपलं ओल झालेलं शर्ट काढुन रोहनच्या हातातील शर्ट घेऊन त्याने घातलं..

हे शर्ट इथेच ठेव.. घरी जाताना आठवणीने घेऊन जा.. रोहनने तिथेच असलेल्या हॅन्डलला शौर्यच शर्ट अडकवल..

व सगळे हॉल मध्ये पुन्हा आले..

आपण दिलेला शर्ट शौर्यने घातलाय हे बघुन मनवी खुश होते.. 

समीरा : किती वेळ एक साध शर्ट बदलायला.. आणि हा शर्ट छान दिसतोय तुझ्यावर... 

शौर्य : थेंक्स...

राज शौर्यच्या गिटार सोबत खेळत बसलेला..

तोडशील ते.. आण इथे.. अस बोलत टॉनीने राजच्या हातातुन गिटार घेतलं...

मनवी म्युसिक सिस्टीम थोडा वेळ बंद केलस तर बरं होईल... 

टॉनीने रिक्वेस्ट करताच मनवीने म्युसिक सिस्टीम बंद केली..

टॉनी : सो गाईज.. तुम्हांला कदाचित महिती नसेल की शौर्य सुंदर अस गिटार वाजवतो..

समीरा : शौर्य खरच..

राज : तुला पण नाही सांगितलं ना ह्याने..

समीरा मानेनेच नाही बोलते..

रोहन : ए शौर्य आम्हांला पण दाखवना वाजवुन..

समीरा : शौर्य प्लिज..मला पण बघायचंय..

राज : आता तु बोललीस ना.. बघ लगेच गिटार घेऊन वाजवेल..

शौर्य : हो समीरा बोलली मग वाजवणारच.. (राजकडे बघतच शौर्य बोलला) समीरा स्पेसिअल तुझ्यासाठीच..

शौर्यने अस बोलताच सीमा समीराला चिमटा काढते..

येहहहहह...सगळे शौर्यला चिअरअप करतच बोलले...

शौर्य टॉनीच्या हातातलं गिटार घेत तिथेच एका टेबलवर बसतो.. समीराकडे बघतच तो एक भुवई उडवत तिला हळुच डोळा मारतो..

समीराही सगळ्यांसमोर त्याला एक फ्लेनकीस त्याला देते...

शौर्य नेहणीप्रमाणे हवेतल ते फ्लेनकीस कॅच करत हृदयापाशी धरतो..

ओहहहहहहह.. सगळे दोघांना  चिडवतच ओरडतात

शौर्य आपला अंगठा गिटारच्या तारांवर फिरवतो.. तसे सगळे एकदम शांत बसतात..

हम्मम् हम्मम्म्म हम्मम्म्म.....हम्मम्म

तुझसे ही तो मिली है राहत
तू ही तो मेरी है चाहत
तुझसे ही तो जुडी ज़िन्दगी
तेरी यादें हैं कुछ अधूरी
सांस आधि है कुछ है पूरी
आँखों में है कैसी ये नमी
मेरा मैं कहने लगा
पास आके न तू दूर जा
छूने दे होंठ तेरे
ज़रा साँसों में अपनी बसा

हम्म्म....
तुझे अपना बना लूं
तुझे तुझ से चुरा लूँ
तुझे खुद में
छुपा लूँ साहिबा
इक मुझ पे करम हो
तू ही मेरा सनम हो
तेरी मुझ पे नज़र हो साहिबा
ह्म्म्म आ.....हम्मम आ...

मर मैं जाऊँगा रेह न पाऊँगा
ग़म जुदाई का सेह न पाऊँगा
ए तुझे प्यार का वास्ता
तेरी यादें है कुछ अधूरी
सांस आधि है कुछ है पूरी
आँखों में है कैसी ये नमी
रात के चाँद तले
आगोश में मेरी तू आ
बाहों में ले लो मुझे
ज़रा सपनो में अपने बसा

मेरा मैं कहने लगा
पास आके न तू दूर जा
छूने दे होंठ तेरे
ज़रा साँसों में अपनी बसा...

शौर्य पूर्ण गाणं बोलेपर्यंत समीराकडेच बघत होता.. आणि समीरा ही त्याच्याकडे... गिटारच्या चाली सोबत त्याच्या तोंडुन पडणारे शब्दांचे सूर समीराच्या मनावर जादू करत होते.. एक टक त्याच्याकडे बघत ती ते गाणं ऐकण्यात हरवुन गेली होती..

मनवीने तोंडावर खोटं हसु आणतच जोरात टाळी वाजवत समीरा आणि शौर्यला लागलेली तंद्री तोडली.. मनवीने टाळी वाजवताच बाकीची मंडळीही शौर्यसाठी टाळ्या वाजवु लागली..

रोहन : तु सुंदर गातोस हे माहीत होतं पण तु त्याहुनही जास्त सुंदर अस गिटार वाजवतोस यार..

मनवी : ए शौर्य मलाही तुझ्याकडुन गिटार शिकायला आवडेल.. प्लिज मला पण गिटार शिकवशील..प्लिज प्लिज..

राज : आधी अकाउंट शिक मग गिटार वाजव..

राज ने अस बोलताच टॉनी त्याला टाळी देतच हसु लागला..

मनवी : एक मिनिट इथे अकाउंटचा काय प्रश्न आलाय.. आणि तसही ते तर मी शिकेलच.. आणि शौर्य तुला तर अकाउंट मध्ये आऊटऑफ मिळाले मग अकाउंट सुद्धा तुझ्याकडुन शिकायला आवडेल मला...

शौर्य : मला आवडलं असत पण मीच स्वतः एकही लेक्चर अटेंड नाही केलय.. मलाच तुम्ही लोकांनी मिळुन शिकवा.. एक महिन्यात काय काय शिकवलं ते..

रोहन : ए काय यार तुम्ही लोक कॉलेजमध्ये घुसतायत... पार्टीत या पुन्हा.. आता ह्या क्षणाला तरी कॉलेजचा विषय नको हा..फक्त आणि फक्त पार्टी..

वृषभ : म्युसिक ऑन...

मनवी पळतच जात लाईट बंद करते. डिस्को लाईट चालु करते आणि सोबतच ती म्युसिक सिस्टिम चालु करते..

मनवीने सुरुवातीलाच झिंगाट गाणं लावताच.. सगळे अगदी उत्साहित होऊन नाचतात.. 

मनवी जाणूनबुजून जिथे शौर्य आहे तिथेच नाचते जेणे करून नाचताना त्याचा स्पर्श तिला व्हावा.. संपुर्ण घरात काळोख आणि त्यात मध्येच कोणाच्याही तोंडावर दिसणारी डिस्कॉ लाईट त्यामुळे आजु बाजूला कोण नाचतय ह्याचा अंदाज येत नव्हता.. 

सगळेच एक एक गाण्यावर अगदी ठेका घेत प्रत्येक गाण्याचा आनंद लुटत होते.. रोहन, टॉनी, वृषभ आणि राज.. मध्येच नाच सोडून सोबत घेऊन आणलेल्या बियरची सगळ्यांच्या नकळत मज्जा घेत होते. शौर्यला त्यांचं काय चालु आहे कळत होतं.. पुन्हा गेल्या वेळेस झालं तस नको व्हायला म्हणुन तो शक्यतो त्यांच्या पासुन लांबच रहातो..

शौर्यचा फोन वायब्रेट होऊ लागतो.. फोन स्क्रिनवर नाव बघतो तर विराज.. हॉस्टेलवर गेल्यावर बोलु असा विचार करत तो फोन पुन्हा खिश्यात टाकतो.. पण पुन्हा फोन वायब्रेट होऊ लागतो.. विराजच काही तरी महत्वाचं काम असेल.. अस विचार करत तो सगळ्यांना बाजूला करतच मोबाईल मधुन पडणाऱ्या अंधुकश्या अश्या प्रकाशाच्या सहाय्याने अंधाराचा कानोसा कानोसा घेत एका रूममध्ये शिरतो. तिथे गाण्याचा फारसा आवाज येत नसतो.. (शौर्य जिथे चाललाय त्याच दिशेने मनवीही त्याच्या मागे जाते.. पण शौर्यला ह्याची काही कल्पनाच नसते)

शौर्य लगेच विराजचा फोन उचलतो..

किती वेळ यार फोन उचलायला.. शौर्यने फोन उचलल्या उचलल्या विराज नाराजी व्यक्त करतो..

शौर्य : तुला बोललो तर होतो आज पार्टी आहे माझी.. 

विराज : अरे हो.. सॉरी मी विसलरलोच.. पण न्युजच अशी आहे यार.. आणि तुला सांगितल्या शिवाय मला कंट्रोल नाही होणार..

शौर्य : काय झालं?? अनघा सोडुन गेली की काय तुला..

विराज : ए शौर्य मोबाईल मधुन बाहेर येऊन तुला मारेल परत अस बोललास तर..

शौर्य : मार बघु..

विराज : तुला नीट नाही बोलायच मग जाऊ दे..जा तुझ्या फ्रेंडसोबत एन्जॉय कर.. तुला त्यांच्यापुढे फेमिली कुठे दिसते..

शौर्य : काय यार विर.. तु तर माझी जान आहे यार.. बोल काय झालं..

विराज : हे बघ तीन न्यूज आहेत.. त्यातली एक  बेड न्यूज आहे आणि बाकीच्या दोन गुड न्यूज.. What you want to listen first..?

शौर्य : पहिली बेड न्युजच सांग.. बाकीच्या दोन गुड न्युज ऐकून बेड न्युज मे बी डायजेस्ट होईल मला..

विराज : ओके.. मग ऐक.. तुझा व्हिसा आलाय आजच..

शौर्य : काय यार विर.. तु मम्माला समजवणार होतास.. मला नाही ना जायचय यार US ला..

अरे हो.. हो.. विराज मध्येच त्याला तोडत बोलला..

शौर्य : पूर्ण मुड खराब केलास विर.. आत्ता पार्टीत पण माझं लक्ष नाही लागणार माझं..

विराज : अरे तु गुड न्युज ऐकुन बेड न्युज डायजेस्ट करणार होतास..

शौर्य : बर सांग गुड न्यूज...

विराज : बघ पहिली गुड न्यूज अशी आहे..की..

विराज पुढे काही बोलणार तोच अनिताने काही कामासाठी त्याला आवाज दिला..

ए शौर्य प्लिज तु फोन चालुच ठेव.. मी आलोच एक मिनिटात..

शौर्य : अरे विर यार माझी पार्टी.. 

विराज : एकच मिनिट ना शौर्य.. काय यार तु..होल्ड कर...आलोच

शौर्य तसाच फोन कानावर लावुन तिथे उभा रहात पाठी फिरला.. तोच मनवी त्याच्या मागे.. शौर्यचा धक्का लागल्याने मनवीचा तोल जावु लागला.. शौर्यने तिला हातावर झेलत सरळ उभं केलं..

शौर्य : सॉरी ते माझा लक्ष नव्हता.. तु मागे कधी आलीस.. 

मनवी : तु इथे काय करतोयस..?

शौर्य : फोन आलेला... बाहेर आवाज खुप आहे म्हणुन इथे आलो.. पण तु इथे काय करतेस??

मनवी : तु आलास म्हणुन आली.. तस पण मला तुला कॉम्प्लिमेंट द्यायची होती..

शौर्य : कश्याबद्दल??

मनवी : शर्ट आवडला तुला??

शौर्य : मनवी प्लिज तु इथुन बाहेर जा.. रोहन पुन्हा मिस अंडरस्टेंडिंग करून घेईल..

मनवी : मी समजवेल त्याला..

शौर्य फोन कानाला लावतच मनवीशी बोलत होता..

तोच विर फोनवर बोलु लागला..

विराज : सॉरी शौर्य मम्माने बोलवलेलं.. तर तु ऐकतोयस..

हॅलो.. शौर्य..

शौर्य : अ.. हा.. विर बोल..

(शौर्य मनवीकडे बघतच विर सोबत फोनवर बोलु लागला.. खर तर इथे कोणी आलं की पुन्हा गैरसमज करून घेईल अस शौर्यला वाटुन भीती वाटत होती..)

विराज : तर पहिली गुड न्युज अशी आहे की मम्माने तुला US ला पाठवण्याचा विचार मनातून काढुन टाकलाय.. 

विराजला वाटलं की त्याच्या बोलण्यावर शौर्य काही तरी रिऍक्ट करेल पण तस काही झालं नाही..

विराज : काय झालं काही तरी बोल..

शौर्य : विर ऐकन..मी तुला हॉस्टेलवर गेल्यावर फोन करू का??

विराज : काय झालं?? 

शौर्य : ते.. अ.. मी तुला रूमवर गेल्यावर बोलतो.. प्लिज रागवु नकोस..

विराज : मी वाट बघतोय तुझ्या फोन ची..

शौर्य फोन कट करत मनवीकडे बघतो.. आज मनवीची नजर त्याला थोडी वेगळीच जाणवत असते..

मनवी शौर्यची कॉलर नीट करतच त्याच्याकडे बघते..

मनवी : माझा अंदाज परफेक्ट होता.. शर्ट बघ तुला परफेक्ट झालंय..  आणि तुझ्यावर छान दिसतंय.. 

शौर्य : म्हणजे?? तु हे शर्ट...

शौर्य मनवीचा हात बाजुला काढतच तिला बोलला..

मनवी : हो तुलाच घेतलेलं.. पण तुला अस दिल असत तर तु ते सहजासहजी घेतलं नसतस..

शौर्य : मनवी का अस वागतेस तु.. 

मनवी : कारण मला तु आवडतोस शौर्य.. 

(शौर्यच्या गालावरून हलकेच आपल एक बोट फिरवत एक अश्लील इशारा त्याला देत ती बोलली)

मनवी स्टे अवे.. मनवीवर शौर्य जोरातच ओरडला...

शहहहहह त्याच्या ओठांवर आपलं एक बोट ठेवत ती त्याला शांत करत बोलली... मनवीच्या अश्या वागण्याने शौर्य खुप घाबरून गेलेला.. 

किती घाबरतोस बघ.. कस धडधड करू लागलंय तुझं हृदय..मनवी त्याच्या छातीवर आपले कान टेकवतच बोलली..

शौर्य : मनवी माझं फक्त नि फक्त समीरावर प्रेम आहे.. तुला समजतय मी काय बोलतोय ते..

मनवी : मग असू दे ना..मी तुम्हा दोघांच्यामध्ये कुठे येतेय..? मला फक्त तु हवा आहेस बस..(अस बोलत मनवी शौर्यला घट्ट मिठी मारते)

मनवी सोड अग.. शौर्य तिने मारलेली मिठी सोडवतच तिला बोलला..

शौर्य : त्यादिवशी मी माझा गैरसमज झाला अस समजुन शांत बसलो पण आता नाही.. आता मीच रोहनला जाऊन सांगतो.

मनवीला लांब ढकलतच शौर्य तिथुन बाहेर जाऊ लागला.

मनवी त्याचा हात घट्ट पकडत त्याला तिथे थांबवते..

मनवी : रोहनला पटेल अशी गोष्ट सांग.. जी गोष्ट त्याला कधी पटणारच नाही ती सांगुन तु स्वतःला त्याच्या पासुन दूर करशील...

मनवीच हात झटकतच शौर्य तिथुन बाहेर पडला त्याच्या मागोमाग मनवीसुद्धा..

सगळेच अजुनही नाचत होते.. सगळे असे चांगल्या मुड मध्ये असताना त्यांना ही गोष्ट सांगुन त्यांचा मुड ऑफ करावा.. ही गोष्ट शौर्यच्या मनाला पटत नव्हती.. मनवीच अस वागणं बघुन शौर्य खर तर घाबरून गेला होता.. 

शौर्य तिथेच सोफ्यावर डोक्यावर हात ठेवुन बसलेला.. होऊन गेलेल्या गोष्टीचा तो विचार करत होता. राज शौर्यला जबरदस्ती नाचायला चल बोलत असतो पण आता शौर्यच लक्ष कश्यात लागत नसत.. राजसुद्धा त्याला जास्त फोर्स करत नाही.. तो सरळ समीराला सांगतो.. समीरा सुद्धा त्याला नाचायसाठी बोलवत असते पण तो तिला सुद्धा नकार देतो.. 

समीरा म्युसिक सिस्टीम वर गाणं स्टॉप करते..  बाजुलाच लाईटीचा स्विच असतो.. ती लाईट स्विच ऑन करते.. 

ए समीरा यार गाणं लाव ना... सगळेच गाणं थांबल्यावर तिला बोलतात..

समीरा म्युसिक सिस्टीमला कनेक्ट असलेल्या मोबाईल वर तिच्या आवडीचं गाणं लावते...

(सुन, साथिया, माहिया
बरसा दे इश्क का गीत स्याहियाँ

रंग जाऊँ, रंग, रंग जाऊँ री
हाँ, री मैं
तुझपे मैं झर, झर, झर जाऊँ
हाँ, री

हूँ, पिया, बस तेरी मैं
हो, छू ले तो खरी मैं
(तो खरी मैं, खरी मैं)

सुन, साथिया, माहिया)

आपला एक हात शौर्य पुढे करते.. पण शौर्यचा आता नाचण्यातला आणि त्याच सोबत पार्टीतला रस निघुन गेला असतो.. 

ती जबरदस्ती त्याचा हात खेचतच त्याला आपल्या समोर उभं करते.. त्याच्या एका हाताचा पंजा आपल्या हातात घट्ट पकडते.. डोळ्यानेच आपली भुवई उडवत त्याला जणु नाचायसाठी प्रवृत्त करते..समीराच्या नाजुक अश्या हाताचा स्पर्श होताच शौर्य तिच्या डोळ्यात बघण्यात हरवुन जातो. समीरा दुसरा हात शौर्यच्या पाठीवर ठेवते.. शौर्यचा हात सुद्धा नकळत समीराच्या कंबरेवर जातो.. दोघेही वाजणाऱ्या बिट्स वर आपली पकड पकडत एकमेकांना साथ देतच नाचतात.. दोघांचाही सालसा अगदी रंगात आला असतो.. शौर्यच्या होताच बोट पकडतच समीरा गोल फिरत पुन्हा त्याच्या जवळ जाते.. दोघेही एकमेकांत हरवुन गेले असतात.. सगळेच त्यांना चिअरअप करत असतात पण दोघांच लक्ष फक्त एकमेकांकडेच असत.. दोघेही आजु बाजुला कोणी आहेत हेच विसरून गेले असतात..

मनवीला शौर्यने समीराला अस पकडलेल सहन होत नसत.. तिचा बीपी वाढत असतो.. शौर्यला अस समीरासोबत नाचताना बघुन ती वेडीपिशी होत होती..

अचानक म्युसिक थांबत... तसे समीरा आणि शौर्य दोघेही भानावर येतात.. सगळेच म्युसिक सिस्टीमकडे बघतात..

रोहन : अग मनवी का थांबलस?? किती मस्त नाचत होते दोघे..

मनवी : डिनर ऑर्डर करायचाय?? दहा वाजत आलेत...

सगळ्यांना तीच म्हणणं पटत.. तसेही सगळे दमले असतात.. तसेच सोफ्यावर बसतात.. शौर्य मनवीकडे बघत असतो.. मनवी त्याला गोड स्माईल देत आत निघून जाते.. 

शौर्यला काय करावं ते कळत नसत.. पण त्याने ठरवलं असत काहीही झालं तरी तो आज घडलेला प्रकार रोहनला सांगेल.. त्याला नाही सांगु शकलो तर समीराला तर ही गोष्ट तरी सांगायला हवी.. पण आज नको.. अस त्याच मन त्याला बोलत असत..

मनवी सगळ्यांसाठी डिनर ऑर्डर करते.. सगळेच मज्जा मस्ती करत जेवतात. शौर्यला मात्र तो कधी एकदाच हॉस्टेलवर जातोय अस होत असत.. त्याच जेवणात लक्षच नसत..

काय शौर्य तु जेवतच नाही.. अस बोलत मनवी जबरदस्ती त्याच्या ताटात राईस वाढायला घेते..

अग मनवी नको मला..माझं झालंय.. तो तिचा हात पकडतच तिला बोलतो.. आपण मनवीचा हात पकडलाय हे लक्षात येताच शौर्य पटकन हात सोडतो.. मनवी लगेच राईस त्याच्या ताटात टाकते..

शौर्य डोक्यावर हात ठेवतो.. त्याला ह्या क्षणाला कस रिएक्ट व्हावं हे कळतच नसत.. 

समीरा : तुला नकोय तर नको खाऊस.. आण इथे मी खाते.. 

शौर्य : नाही इट्स ओके.. 

रोहन : ए शौर्य खाना.. तुला काय झालंय मागासपासून शांत आहेस ते..

शौर्य : ते.. डोकं दुखतंय खूप..

मनवी : माझ्याकडे गोळी आहे डोके दुखीची देऊ का??

शौर्य : काही गरज नाहीय...

(शौर्य रागातच बोलतो.. हा मनवीला अस रागात का बोलतोय म्हणून सगळे त्याच्याकडे बघु लागतात..)

शौर्य : म्हणजे तशी गरज नाही.. झोपल्यावर बर वाटेल.. 

रोहन : झालं आपण निघुयात..

जेवुन झाल्यावर सगळे निघतात तिथुन.. आणि आपापल्या रूमवर परततात..

शौर्य रूमवर येताच मनवीने दिलेलं ते शर्ट काढुन टाकतो.. आपल्या बेगेतुन साधस टिशर्ट काढुन ते घालतो.. विराज शौर्यच्या फोनची वाट बघत असतो.. खुप वेळ झाला शौर्य फोन करत नाही..त्याला सुद्धा आता झोप येत असते.. आपणच फोन करावा बहुतेक शौर्य विसरला असेल म्हणुन विराजच पुन्हा फोन करतो.. 


विरच नाव मोबाईल स्क्रिनवर बघुन शौर्यला आठवत की तो पार्टीवरून आल्यावर विराज ला फोन करणार होता..

विर सॉरी मी फोन करायला विसरलोच तुला.. फोन उचलल्या उचलल्या शौर्य बोलतो..

विराज : वाटलेलंच.. म्हणुन मीच फोन केला.. झाली का पार्टी..

शौर्य : हम्मम्म.. झाली..

विराज : मगाशी फोन का ठेवलास?? 

शौर्य : ते.. विर तु सिरियसली ऐकशील तर मी सांगतो.. नाही तर राहू दे..

विराज : ऐकतो बाबा सांग..

शौर्य विराजला पार्टी घडलेला प्रकार सगळा सांगतो..

 विराजला ऐकुन हसुच येत..

शौर्य : विर मी सिरियसली तुला सांगतोय नि तु हसतोयस.. 

विराज : काय यार तु.. नको त्या गोष्टीच टेन्शन घेत बसतोस.. एकदा त्या मनवीलाच सरळ भाषेत सांगुन बघ.. समजली तर ठिक नाही तर मग समीराला सांग.. कारण तिच्या अश्या वागण्याने पुन्हा तुम्हा सगळ्यांच्या मैत्रीत परिणाम होईल..

शौर्य : हम्मम बघतो.. बाय दि वे तु काय सांगत होतास..??

विराज : म्हणजे मगाशी मी सांगितलेलं तु ऐकलच नसशील..

शौर्य : म्हणजे बेड न्यूज ऐकली.. नंतरच काही नाही ऐकलं.. गुड न्यूज काय आहे??

विराज : पहिली गुड न्यूज अशी आहे की मम्माने तीच माईंड चेंज केलंय.. म्हणजे ती तुला US ला जाण्यासाठी फोर्स करणार नाही.. 

शौर्य : येहहहह... ही ज्यूज ऐकून मला थोडं रिलॅक्स फील होतय.. आणि अजुन एक गुड न्यूज..

विराज : मम्माने माझ्या आणि अनघाच्या लग्नासाठी परवानगी दिली..

शौर्य : काय बोलतोस ब्रो.. कॉंग्रेच्युलेशन.. मग कधी येऊ मी मुंबईला परत..

विराज : तीन वर्षांनी..

शौर्य : काय यार तु.. ह्याच वर्षी कर ना..

विराज : तीन वर्षानीच.. तुला बोललो ना ती शिकतेय अजून..

शौर्य : हम्मम बट दोन्ही न्यूज ऐकून मी एकदम खुश झालोय.. आणि तुला बोललो ना त्याप्रमाणे बेड न्यूज डायजेस्ट झाली मला..

विराज : हम्म आणि तु इतर कोणत्याच गोष्टीच टेन्शन नको घेऊस.. आपण चुकीच नाही हे तुला माहिती ना.. मग तर अजिबातच घ्यायच नाही.. 

शौर्य : हम्मम..

विराज सोबत फोन वर बोलुन शौर्यला थोडं रिलॅक्स फील वाटत होतं.

इथे मनवी शौर्यचाच विचार करत असते.. जर शौर्यने समीराला सांगितलं तर ती खुप मोठा इस्यु क्रिएट करेल.. हा विचार करून मनवी शौर्यला फोन लावते .

खर तर शौर्यला फोन उचलायचा नसतो पण विराजने सांगितल्याप्रमाणे एकदा तिला समजवुन बघायला काहीच हरकत नाही..अस विचार करून तो फोन उचलतो..

मनवी : शौर्य आज जे झालं त्याबद्दल खरच आय एम सॉरी.. पण तु कुणाला ह्या बद्दल सांगु नकोस प्लिज.. समीराला अस काही कळलं तर ती माझ्यासोबतची फ्रेंडशीप तोडेल.. 

शौर्य काही बोलतच नसतो फक्त तीच बोलण ऐकत असतो..

मनवी : प्लिज काही तरी बोल शौर्य..

शौर्य काहीच न बोलता सरळ फोन कट करून टाकतो..

मनवी पुन्हा पुन्हा त्याला फोन लावते.. पण आता शौर्य मात्र फोन उचलत नाही.. तो फोन तसाच सायलेंट वर ठेवत झोपुन जातो..

मनवी मात्र रात्रभर शौर्यला फोन आणि मेसेज करत रहाते.. उद्या शौर्य कसा वागेल हेच तिला कळत नसत..

(काय होईल पुढे?? त्यासाठी प्रतीक्षा करा पुढील भागाची.. हा भाग कसा वाटला ते ही कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all