अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 36

In marathi

शौर्य आणि समीरा दोघेही हॉटेलमध्ये बसुन त्यांनी ऑर्डर केलेलं जेवण कधी येत त्याची वाट पहात होते.. समीरा काही बोलायला जाणार तोच शौर्यचा फोन वाजला.. राज आता ह्या वेळेला फोन करतोय.. 

समीरा : काही तरी काम असेल उचलुन तर बघ.. 

शौर्य फोन उचलुन कानाला लावतो...

राज : अरे शौर्य यार आहेस कुठे??

शौर्य : तु फोन का केलास ते सांग??

राज : माझी मेथ्सची टेक्सबुक तुझ्याकडे आहे का??

शौर्य : माझ्याकडे?? मी कधी घेतली तुझी टेक्सबुक??

राज : आहे की नाही तेवढं सांग??

शौर्य : नाही..

राज : मग तु बुक कम्प्लिट करायला कोणाची बुक घेतलेलीस..

शौर्य : ए राज यार.. तुझी बुक माझ्याकडे नाही.. आणि माझ्याकडे टेक्सबुक असताना मी तुझी का घेऊ..तु ठेव बघु..

फोन ठेवत राज आणि टॉनी एकमेकांना टाळी देतच हसतात.. 

समीरा : काय झालं??

शौर्य : त्याची मेथ्स टेक्सबुक शोधतोय तो.. त्याला वाटलं माझ्याकडे आहे.. तु काही तरी बोलत होतीस..

समीरा : ते हा... तु मुंबई सोडुन इथे का आलास??

शौर्य : मला नव्हतं यायच ग.. ते मम्माने पाठवलं..

(शौर्य समीराला त्याचा भुतकाळ सगळा सांगु लागला)

तरी तु मुंबईत यायची रिस्क घेतलीस... समीरा शौर्यचा हात पकडतच बोलली..

तुझ्यासाठी..( शौर्य दुसरा हात तिच्या हातावर ठेवत बोलला)

समीरा : एकदा बोलला असतास तर मी नाही तुला एवढा फोर्स नसता केला..

(शौर्य काही बोलणार तोच पुन्हा त्याचा फोन वाजला..)

शौर्य : राज..

समीरा : पुन्हा??

शौर्य : हा बोल..

राज : तुला हे सांगायला फोन केलाय की मला माझी मेथ्सची टेक्सबुक मिळाली..

शौर्य : वेरी गुड.. मग अभ्यास कर..

राज : तेच करायला बसलेलो. थोडं डाउट होता रे प्लिज हेल्प कर ना..

शौर्य : आता??? 

राज : हा मग कधी??

शौर्य : ए राज आता नाही हा.. एक काम करूयात आपण रात्री बसूयात

राज : नाही रात्री नको..आत्ताच.. मी रात्री अकाउंट शिकायला येणार आहे तुझ्याकडे..

शौर्य : तुला आजच का मेथ्स करायचंय पण.. दुसर काही तरी वाचत बसना इको वैगेरे..

राज : बस काय शौर्य.. एक तर मेथ्स मध्ये डाउट आहे म्हणुन तुला फोन केला तर तु अस करतोस.. त्यात पण तु एवढा भाव खातोस..

शौर्य : मी भाव नाही खात.. तु एक काम कर तु तो वाला सम सोडून दुसरा बघ.. मी रूमवर आल्यावर तुला समजवुन सांगेल.. नाही तर तु दुसर काहीतरी वाचत बसणं..

आणि आता मी फोन ठेवतोय.. बाय..बाय..

(राज पुढे काही बोलणार तोच शौर्यने फोन कट केला..)

राज आणि टॉनी पुन्हा एकमेकांना टाळी देतच हसु लागले..

समीरा : जेवन थंड होतंय जेवुन घे.

शौर्य : हा राज ना कधी रूमवर साधं पुस्तक घेऊन नाही बसत आणि आज बघ.. मेथ्स शिकव म्हणुन पाठी लागलाय ते ही आत्ता वर रात्री तो माझ्याकडे अकाउंट शिकायला येतोय..

समीरा : आता ग्रुपमध्ये तु हुशार आहेस म्हटलं तर तुझ्याकडेच येणार ना.. बाय दि वे तुझी बुक्स झाली का कम्प्लिट?? आणि प्रोजेक्ट

शौर्य : नाही ना..

समीरा : मी काही हेल्प करू का तुला??

शौर्य : नाही नको.. मी करेल मॅनेज.

तेवढ्यात पुन्हा फोन वाजला.. शौर्यने फोन समीराकडे दाखवला.. मोबाईल स्क्रिनवर राजच नाव बघुन समीरासुद्धा गालातल्या गालात हसते..

शौर्य : राज काय आहे यार..?? 

राज : शौर्य तु रूमवर कधी येणार??

शौर्य : राज..आजच का रे तु एवढं फोन करून मला त्रास देतोस??
 
राज : लंच टाईम रे.. तुझी वाट बघतोय आम्ही..

शौर्य : ओहहह.. तुम्ही लोक जेवुन घ्या.. माझी वाट नका बघु.. 

राज : नक्की??

शौर्य : हो नक्की..

राज : बर...

शौर्य फोन कट करतो.. 

समीरा : तुझं जेवुन झालं असेल तर निघुयात आपण??

शौर्य : हम्मम्म..

दोघेही जेवण आटोपुन तिथुन बाहेर पडतात..

शौर्य : एक बोलू??

समीरा : हम्मम...

शौर्य : इथुन तुला सोडून जावस नाही ग वाटत.. अस वाटत इथे राहावं तुझ्यासोबत असच गप्पा मारत...

समीरा : जावं तर लागणार ना शौर्य.. आणि तसही दिवसभर आपण एकमेकांसोबत तर असतो..

शौर्य : पण मोकळेपणाने बोलता नाही ना येत.. 

(पुन्हा शौर्यला टॉनीचा फोन येतो)

शौर्य आता इरिटेट होतो..

शौर्य : टॉनी आणि राज तुम्ही जाणूनबुजून मला त्रास देत आहात अस आता मला खरच वाटु लागलय. तस पण मी आता रूमवरच येतोय.. पण माझ्यारूमवर जाण्याआधी तुम्हा दोघांच्या रूममध्ये येऊन.. आधी तुम्हा दोघांना भेटुन मगच मी माझ्या रूममध्ये जाईल.. ठिक आहे.. बाय..

टॉनीच काहीही ऐकुन न घेता शौर्य फोन ठेवून देतो..

समीरा : निघायच मग..

शौर्य : हम्मम.. 

दोघेही मॉलमधुन निघुन कॉलेजच्या गेटजवळ आले.. 

शौर्य फक्त समीराकडे बघत रहातो..

समीरा : मग निघु मी??

शौर्य मानेनेच नाही बोलतो..

समीरा : अरे राज तु इथे...

समीराने अस बोलताच शौर्य समीरा दाखवत होती त्या दिशेकडे बघु लागतो.. 

समीरा पटकन शौर्यच्या गालावर किस करत तिथुन पळ काढते..

शौर्य हसतच आपल्या गालावर हात फिरवत तिला बघत रहातो.. समीरानेहमी प्रमाणे त्याला ठेंगा दाखवतच हॉस्टेलमध्ये जाते..

शौर्यसुद्धा रूमवर येतो.. शॉपिंग केलेली बेग तो बेडवर ठेवताच पुन्हा फोन वाजतो..

ह्या वेळेला पुन्हा टॉनीचा फोन असतो..

शौर्य फोन कानाला लावतच त्या दोघांच्या रूमच्या दिशेने जायला निघतो..

टॉनी : शौर्य माझं इकोच टेक्सबुक तुझ्याकडे आहे का??मी मगाशी तेच विचारायला फोन केलेला पण तु काहीही ऐकून न घेता सरळ कट केलास..

शौर्य : हो ना माझ्याकडे आहे.. कुठे देऊ ते सांगा फक्त दोघांनी...

राज : फोन मधुन डबल डबल आवाज का येतोय.. बिघडला की काय फोन??

वृषभ : फोन बरोबर आहे.. फक्त शौर्य आता रेंजमध्ये येऊन बोलतोय.. म्हणजे रेंज एवढी भारी आहे ना.. तुम्ही फोन कट केलात तरी तुम्हाला आवाज ऐकु येईल..

टॉनी : म्हणजे ??

वृषभ : पाठी बघा मग कळेल...

दोघेही पाठी बघतात तर शौर्य.. हातातील मोबाईल बाजूला ठेवतच दोघेसुद्धा शौर्य पासुन लांब पळु लागले..

तुम्ही लोक मुद्दामुन करत होतात ना मला वाटलंच होत.. अस बोलत शौर्य बेड वर असलेली पिलो दोघांच्या दिशेने मारू लागला..

राज : अरे शौर्य मस्ती करत होतो यार.. तु पण काय??

शौर्य : तुला मेथ्स शिकायचं ना आधी तुला मेथ्स शिकवतो.. आणि मग टॉनी तुला तुझं इकोच बुक देतो परत..

शौर्य राजला पकडु लागला.. तोच वृषभने शौर्यला पकडलं..

शौर्य : वृषभ तु पण त्यांना सामील..

वृषभने पकडताच राज आणि टॉनी दोघांनी पकडुन शौर्यला बेडवर ढकललं.. 

शौर्य पुन्हा उठुन उभा रहाणार तोच टॉनी आणि राजने त्याला दोन्ही बाजुने घट्ट पकडलं..

वृषभ : आता बोल.. 

शौर्य : काय??

वृषभ : खर खर सांगायच कुठे फिरायला गेलेलास..

शौर्य : बोललो तर मॉलमध्ये गेलेलो.. आणि तुम्ही लोक मला त्रास का देत होतात.. 

राज : गाईज ह्याचा गाल बघा..

टॉनी : ओहहह हो.. 

शौर्य : काय??? 

वृषभ : वाह मिस्टर शौर्य देशमुख?? फक्त गालावरच का अजुन कुठे??

शौर्य समोरच असलेल्या मिरर मध्ये गाल बघतो.. समीराच्या लिपस्टिकचे निशाण त्याच्या गालावर उमटलेले असतात.. शौर्य गालवर हात ठेवत लपवु लागतो..

Kiss me
Close your eyes
Miss me
Close your eyes
Kiss me

I can wet your lips
And your fingertips
And happiness in your eyes
Kiss me
Close your eyes
Miss me
Close your eyes.

तिघेही मिळुन गाणं गातच शौर्यला चिडवु लागतात..

शौर्य : ते.. ते.. कलर लागलाय.. तुम्ही उगाच इस्यु करतायत..

राज : मॉलमध्ये फिरायला गेलेला की होळी खेळायला..

तिघेही जोरात हसत एकमेकांना टाळी देतात..

वृषभ : काय मित्रा पटेल अशी कारण तरी दे..

शौर्य : ते महत्वाचं नाही.. तुम्ही लोक टॉपिक चेंज नका करू... मला फोन करून का त्रास देत होतात ते सांगा..

(शौर्य रुमालाने गालावरील लिपस्टिक पुसतच बोलला)

राज : ए शौर्य राहू दे ना असच.. मस्त वाटत तुझ्या गालावर..

टॉनी : हो ना शौर्य असु दे तसच.. दाग लगणे से कुछ अच्छा होता हे तो दाग अच्छे होते..

पुन्हा सगळे एकमेकांना टाळी देत जोर जोरात हसु लागले..

शौर्य : तुम्ही लोक ना.. जाऊ दे.. मला बोलायचंच नाही तुम्हां लोकांशी.. मला काम आहे.. 

अस बोलत शौर्य तिथुन निघुन आपल्या रूममध्ये येतो.. आणि बुक कम्प्लिट करायला घेतो..

★★★★★

कॉलेजमध्ये बुक सबमिट करायचा दिवस उजाडला..

सगळे नेहमीप्रमाणे कॉलेज गेटजवळच उभे होते..

समीरा : तुझी झालीना बुक कम्प्लिट??

शौर्य : थोडी बाकी आहे.. तस पण दोन वाजेपर्यंत द्यायची आहे ना.. तोपर्यंत होईल

वृषभ : नक्की??

शौर्य : हम्मम

तोच गेटजवळ रोहनची बाईक येते. सगळेच त्याच्या बाईककडे बघत रहातात.. कारण बाईकच्या मागे मनवी बसली असते..

वृषभ त्याच्या मागे उभा असलेल्या शौर्यकडे बघायला जातो पण शौर्य मागे नसतो.. तो जाऊन क्लासरूममध्ये बसलेला असतो.. आणि सोबत समीरा पण..

हॅलो गाईज.... मनवी आल्या आल्या सगळ्यांना हॅलो करते...

बाकीची इतर मंडळीही तिला हॅलो करतात..

सगळे मिळुन क्लासरूममध्ये येतात.. मनवी नेहमीप्रमाणे समीराच्या बाजूला जाऊन बसते..

मनवी : हॅलो समीरा..कशी आहेस??

समीरा : कॉलेजमध्ये तर तु येत नव्हतीस.. मला उलट तुला विचारायला हवं तु कशी आहेस.. बिजी होतीस वाटत खुप..

मनवी : अस का बोलतेस..

समीरा : मी फोन करत होती तुला.. उचलला नाहीस.. निदान मिस कॉल बघून माणुस पुन्हा कॉल करतील तर ते पण नाही.. 

मनवी : अग फोन बिघडलेला माझा.. डिस्प्ले गेलेला फोनचा.. त्यामुळे नाही कळलं मला.. काय काम होत तुझं??

समीरा : कॉलेज सुटल्यावर कळेलच तुला..

सीमा : मेथ्स बुक केलीस का कम्प्लिट???

मनवी : नाही.. वेळच नाही मिळाला..

सीमा : मग आता??

मनवी : आता काय??नाही झाली बुक कम्प्लिट नाही तर कुठुन देऊ...

सीमा : अग 20 मार्क्स आहेत त्याला.. म्हणजे मेथ्सच टेन्शन कमी झालं असत तुझं.. आणि तुला ते सर काय बोललेलं आठवत ना. जो प्रॅक्टिकल बुक सबमिट नाही करणार त्यांना ह्या पुढे मेथ्सच लेक्चर अटेंड करायला नाही मिळणार.

मनवी : अरे हा.. मी विसरलीच होती.. आता काय करू मी..

समीरा : आता काय करणार.. नाही झाली बुक कम्प्लिट तर कुठुन देणार..

(समीरा मनवीच्याच सुरात मनवीला बोलते).

तेवढ्यात मेथ्सचे सर येतात..

प्रेसेंटी घेताच ते मेन मुद्याला हात लावतात..

सर : Those who have not submitted their practical book, kindly submit it before 2 pm. After that it wont be taken and also will not be allowed to seat in my lectures

अनाऊन्समेंट झाल्यावर सर लेक्चर घेऊन तिथुन निघुन जातात..

सर निघुन जाताच शौर्य आपली अपुर्ण बुक पुर्ण करायला घेतो..

समीरा सुद्धा शौर्यच्या डेस्कवर येऊन बसते..

समीरा : काही हेल्प हवी का??

शौर्य : नाही होतच आलीय.. तोपर्यंत तुम्ही तुमची बुक देऊन या.. 

सीमा : सगळे एकत्रच जाऊयात ना??

शौर्य : एक काम करा तुम्ही लोक बुक सबमिट करा आणि केंटींगमध्ये बसा तिथेच भेटुयात..

सगळ्यांना त्याच म्हणणं पटत.. त्याप्रमाणे ते लोक बुक सबमिट करून केंटिंगमध्ये बसतात..

शौर्यची बुक पूर्ण होताच तो टिचर रूममध्ये जायला निघतो..

तोच बाहेर रोहन आणि मनवीच बोलणं त्याला ऐकु जात..

मनवी : मी काय करू रोहन.. मला नाही जमलं बुज कम्प्लिट करायला.. सर ह्यापुढे लेक्चर बसायला देणार नाहीत मला..

रोहन : तु एक काम कर.. माझी बुक दे.. 

मनवी : आणि मग तुला??

रोहन : माझं सोड.. मी करेल एडजस्ट..

अस बोलत रोहनने मनवीला स्वतःची बुक दिली..

मनवीने ही पुढचा मागचा विचार न करता बुकवर स्वतःच नाव टाकत सरळ टीचररूम मध्ये बुक द्यायला गेली..

रोहन टिचररूम बाहेरच मनवीची वाट बघत होता.. तोच शौर्य त्याच्या समोर येतो..

रोहन शौर्यकडे बघुन न बघितल्या सारख करतो.. 

शौर्य रोहनला काही बोलणार तोच मनवी बाहेर येते.. रोहन तिच्या खांद्यावर हात टाकत शौर्यकडे रागाने बघत तिथुन निघुन सरळ केंटिंगमध्ये जातो..

समीरा : मनवी... तु शौर्यला ब्लॅकमेल का करतेस??
(मनवी केंटिंगमध्ये येताच समीरा मनवीला प्रश्न करते)

समीराच्या प्रश्नाने मनवी थोडी घाबरी घुबरी होते..

रोहन : समीरा तुला पण त्याच म्हणणं खर वाटत का??

समीरा आपल्या हाताची पाच बोट दाखवतच रोहनला थांबायला सांगते..

मनवी : तु.. तु क...काय बोलतेस ते मला कळत नाही आहे.. 

(मनवी थोडं अडखळतच बोलते)

वृषभ : मनवी तु गेल्यावर रोहन आणि शौर्यमध्ये भांडण झालीत..आणि शौर्यच अस म्हणणं आहे की तु त्याला ब्लॅकमेल करतेस..

मनवी : तो बोलला आणि तुम्हाला लगेच पटलही ते.. ब्लॅकमेल मी त्याला नाही तो मला करत असतो.. आणि रोहन माझ्या मते मी तुला आधीही सांगितलंय ह्या बद्दल..

रोहन : मी तेच बोललो ह्या लोकांना..

तेवढ्यात शौर्य तिथे येतो..

शौर्य दिसताच मनवी जाणुन बुजून त्याच्या शर्टची कॉलर पकडतच त्याला विचारते..

मनवी : कधी मी तुला ब्लॅकमेल केलं शौर्य..

शौर्य मनवीकडे रागात बघतच मोबाईध्ये शेवटच त्याच आणि मनवीच रेकॉर्ड झालेलं बोलणं सगळ्यांना ऐकवतो..

शौर्यच्या मोबाईलमध्ये आपला कॉल रेकॉर्ड ऐकताच मनवी शौर्यची कॉलर सोडते..

शौर्य : रोहन तुझा फोन ठेवला ना त्यांनतरचा हा कॉल रेकॉर्ड आहे..  नीट ऐक...

(मनवी : तुझ्याच फोनची वाट बघत होती शौर्य मी.. मला माहित होतं तु फोन करणार ते..

शौर्य : मनवी का अस वागतेस ग तु.. तो रोहन जीव देईल अग.. प्लिज त्याला फोन कर.. प्लिज.. तु माझा राग ताच्यावर का काढतेस.. तो वेड्यासारख प्रेम करतोय ग तुझ्यावर..त्याच्या प्रेमाची जरासुद्धा कदर नाही का ग तुला..

मनवी : नाही..

शौर्य : मनवी अस नको बोलुस ग.. तो खरच त्याच्या जीवच काही बर वाईट करून घेईल.. प्लिज त्याला एकदा कॉल कर..

मनवी : ठिक आहे.. तु बोलतोस तर.. मी त्याला कॉल करेल पण माझ्या दोन अटी आहेत त्या तुला मान्य असतील तर ठिक नाही तर जाऊ दे.. 

शौर्य : काय अट आहे तुझी..

मनवी : काल जे घडलं ते तु कुणालाही सांगणार नाहीस. इव्हन समीराला सुद्धा..

शौर्य : तु बोलशील तस.. नाही सांगत मी कुणाला.. पण प्लिज त्याला कॉल कर..

मनवी : समीराची शप्पथ घेऊन सांग की तू कोणाला सांगणार नाही....

शौर्य : समीराची शप्पथ मी नाही सांगत कुणाला. प्लिज आता तरी त्याला कॉल कर.

मनवी : आणि दुसरी अट तर ऐक..

मनवी मी तुझ्या पाया पडतो तु त्याला कॉल कर.. तु बोलशील ते सगळं मला मान्य आहे.. प्लिज.. रोहनला कॉल कर आधी.

मनवी : ओके)


रोहन : मनवी.. 

मनवी : व्हॉट??. ह्यावरून काय प्रुफ करायचय तुला की मी तुझ्या मागे आहे.. उलट मी पार्टीत जे घडलं ते कुणाला सांगु नकोस हे बोलत होती.. जेणेकरून तुमची फ्रेंडशिप तुटु नये.. आणि तूच तर मला रोहनबद्दल भडकवलेलंस.. त्याच काय?? रोहन मला पार्टीमध्ये ह्यानेच तुझ्याबद्दल नको नको ते सांगुन भडकवलेलं.. म्हणुनच मी अस वागत होती..

शौर्य : मनवी उगाच तोंडाला येईल ते का बोलतेस?? मी का तुला रोहनबद्दल भडकवू.. 

मनवी : ते तुलाच माहिती.. उगाच इथे सगळ्यांसमोर भोळेपणाचा आव नको आणुस.. माझा फोन सुद्धा नेमका अश्याच वेळेला बिघडला..नाही तर माझ्याकडे पण प्रूफ होते तुझ्याबद्दल..तु कसा आहेस त्याचे..

शौर्य : रोहन ही खोटं बोलतेय यार... 

मनवी : मी खरं खोटं करतच नाही आहे. रोहन तुला विश्वास ठेवायचा तर ठेव नाही तर घेऊन बस तुझ्या मित्राला अस बोलत मनवी तिथुन जाऊ लागली..

समीरा : मनवी काय ते क्लीअर बोलुन जा.. अर्धवट का बोलतेस...

मनवी : मी काही चुकीच वागलीय अस मला तरी वाटत नाही.. आणि ह्या ऑडिओ बद्दल बोलशील.. तर मी शौर्यला एक चान्स देत होती.. कारण माझ्यासाठी रोहन आणि त्याची फ्रेंडशिप तुटलेली मला नव्हतं आवडणार..
तुम्हा लोकांना विश्वास ठेवायचा तर ठेवा नाही तर नका ठेवु..

(मनवी रागातच तिथुन निघुन गेली)

रोहनसुद्धा तिच्या मागुन जाऊ लागला..

शौर्य : रोहन तुला एवढा प्रूफ दाखवुन सुद्धा तुला माझ्यावर विश्वास नाही काय??

शौर्य रोहनचा हात पकडत त्याला थांबवतच बोलला.. रोहनने दुसऱ्या हाताने शौर्यच्या हातातुन आपला हात सोडवत तिथुन निघतो.

राज : रोहन थोडं जास्तच करतोय.. एवढं पण मनवीवर विश्वास कस काय ठेवु शकतो तो..

वृषभ : शौर्य तु नको टेन्शन घेऊ आम्ही आहोत तुझ्यासोबत..

वृषभ शौर्यला धीर देतच बोलला..

★★★★★

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सगळे कॉलेज गेटजवळ जमले.. 

मनवी आणि रोहन एकत्रच क्लासरूममध्ये आले..

दोघांनाही आलेलं बघताच बाकीची मंडळी सगळी लेक्चरमध्ये जाऊन बसली..

रोहन : मनवी ऐक ना..मेथ्सच लेक्चर आहे ग आज पण.. मी एक काम करतो मी इथेच थांबतो.. अकाउंटच लेक्चर चालू होईल ना तेव्हा मी येतो..

मनवी : काही होत नाही रे.. तु चल.. सरांच्या लक्षात पण नसेल

मनवी रोहनला जबरदस्ती क्लासरूममध्ये घेऊन येते..

रोहन नेहमी प्रमाणे वृषभच्या बाजुला जाऊन बसतो.. मनवी सुद्धा समीरा आणि सीमाच्या बाजूला जाऊन बसते..

पण समीरा तिच्याकडे बघतसुद्धा नाही..

मनवी : हॅलो सीमा..

सीमा तिला हात दाखवत हॅलो करते..

तेवढ्यात मेथ्सचे सर क्लासरूम मध्ये येतात आणि प्रेसेंटी घ्यायला सुरुवात करतात..

सर : Before I start this lecture, I already inform  yesterday that whoever miss to submit the practical book will not come to my class. so i have the list of names. In this list there are names of student who have not sbmitted the practical book..
Whom ever student name i am taking , please go out..

And one more thing I don’t want any explanation from any student please leave the room right now

रोहन आणि मनवी एकमेकांकडे बघु लागतात.. 

रोहन : उगाच आलो मी लेक्चरला..

वृषभ : तु तर केलीस ना बुक सबमिट.. मग

रोहन : नाही ना केली...

राज : त्यादिवशी तर बोललेलास की केली म्हणुन??

रोहन : हा पण आता नाही केलीय..

वृषभला रोहन काय बोलतो ते कळतच नाही..

सर लिस्ट मधुन एकेकाच नाव घेत होते..

रोहन आपलं नाव घेण्यासाधीच उठुन उभं रहाण्याच्या तैयारीत होता.. तोच सरांनी शौर्यच नाव घेतलं..

शौर्यच नाव घेतच सगळेच शॉक झाले..

वृषभ : ह्याने तर रात्रभर जागून बुक कम्प्लिट केलेली..ह्याच नाव कस काय त्या लिस्ट मध्ये..

राज : सरांचा मे बी गैरसमज झाला असेल..

शौर्य समीराकडे बघु लागला.. समीरासुद्धा प्रश्नार्थी चेहरा करत शौर्यकडे बघु लागली..

शौर्य काहीही न बोलता क्लासरूम मधुन बाहेर पडु लागला..

सर : Mr Shaury, I didnt expected this from you..

शौर्य : Sorry सर...

एवढं बोलुन शौर्य क्लासरूमच्या बाहेर पडला..


(मनवी ह्या केरेक्टर बद्दल सर्वच इरिटेट होत आहेत हे माहिती पण delusional disorder असलेली व्यक्ती कशी वागु शकते आणि त्या सोबतच त्याच्या पालकांनी किती काळजी घ्यावी हे दाखण्याचा उद्देश आहे.. बाकी हा भाग कसा वाटला ते कळवा.. जर कथा आवडत असेल तर पुढील भागाची प्रतीक्षा करा..)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all