अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 47

In marathi

शौर्य रूममध्ये आपला लॅपटॉप चालू करून त्यावर मूव्ही लावुन बघत बसतो..

जवळपास एक दीड तासाने त्याचे मित्र मंडळी त्याच्या रूममध्ये येतात.. 

वृषभ : तु मुव्ही बघत बसलायस?? रोहन बद्दल तुला काही वाटत नाही का??

शौर्य : माझ्या फेवरेट हिरॉचा मुव्ही आहे.. तु पण बघ.. आवडेल तुला.. पण तुला आत्ता इंटरवल नंतर बघावा लागेल..

वृषभ राज आणि टॉनीकडे बघतो.

वृषभ : रोहन मनवीचा फोन उचलत नाहीय.. काय करायचं शौर्य..??

शौर्य : तुम्हा लोकांना सांगु हा मूव्ही लास्ट मंथ रिलीज झालाय.. मला बघायचाच होता..आणि फायनली मी आज बघतोय.. म्हणुन मी खुप खुश आहे आज..

वृषभ : ए शौर्य तुला काय झालं?? तुला काहीच कस नाही वाटत..

शौर्य वृषभच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही.. मुव्ही बघण्यात दंग असतो..

राज : ए शौर्य आम्ही तुझ्याशी बोलतोय.. काय करायचं आत्ता.. ते तरी सांग..

तरीही शौर्य काहीच उत्तर देत नाही..

तुला मराठी समजत नाही का.. आम्ही तिघ तुझ्याशी बोलतोय शौर्य..

टॉनी शौर्यच्या पुढ्यातला लॅपटॉप खेचतच बोलतो..

शौर्य एक खोल श्वास घेत बाजुच्या टेबलवर असलेला मोबाईल घेत त्यात काही तरी करत बसतो..

शौर्य का अस वागतोयस..?? आम्ही रोहनबद्दल तुला काही तरी विचारतोय.. ठेव तो मोबाईल...वृषभ त्याचा मोबाईल त्याच्या हातातुन घेतच बोलला..

शौर्य : वृषभ तुला माहिती ना माझी लाईफ किती कॉम्प्लिकेटेड आहे.. आणि मी त्याच्या बद्दल विचार करून त्याच्या लाईफमध्ये इंटरफेर का करू??

वृषभ : शौर्य तो रागात बोलला यार.. तुला माहिती ना.. तुझ्यावर किती प्रेम करतो तो. त्यादिवशी तुझ्या हाताला लागलेली जखम बघुन तो कसा रिएक्ट झालेला..

शौर्य : मैत्री अशी नसते ना यार.. आत्तापर्यंत कधी त्याने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवलाय सांग..?? प्रत्येक गोष्टीत तो मला ब्लेम करत असतो.. कॉलेजला आल्याच्या पाहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत त्याने मला फक्त नि फक्त त्रास दिलाय.. आणि आज तर तो खुपच बोलला.. खुप हर्ट केलं त्याने मला.. तेही त्या फैयाजच्या पुढ्यात.. त्यात तो फैयाज काहीही कारण नसताना मला त्रास देतोय.. आत्ता रोहन त्याच्या सोबत म्हटलं तर तो अजुन त्रास देईल मला.. आणि ह्या वेळेला काही झालं ना तर मला विर परत इथे नाही पाठवणार यार.. रोहनला जस जगायच तस त्याला जगु दे.. फायनल एक्साम झाली मग मीच इथुन निघुन जाईल.. मी नाही येणार परत दिल्लीला.. 

(एवढं सगळं बोलताना शौर्यला थोडं भरून आलेलं)

राज : ए शौर्य तु नको ना अस काही डिसीजन घेऊस.. 

वृषभ : रोहन नाही रे त्रास देणार तुला.. त्याचा राग शांत होऊ दे..

शौर्य : वृषभ प्लिज ह्यापुढे रोहन टॉपिक नको.. तुम्हाला त्याच्यासाठी जे करावस वाटत ते तुम्ही करा.. बघा तुम्हा लोकांना त्याला ह्या सगळ्यातुन बाहेर काढता येत असेल तर.. पण मी नाही ह्यात पडणार..

टॉनी : तुझ्याशिवाय आम्ही कस काय करू यार?? तु खुप टोकाचा निर्णय घेतोयस शौर्य..

शौर्य : माझा लॅपटॉप दे... मला मूव्ही बघायचाय.. तुम्हांला बघायचा असेल तर बसु शकता..

वृषभ : शौर्य प्लिज यार..

शौर्य : टॉनी प्लिज लॅपटॉप दे ना.. प्लिज..

टॉनी शौर्यला लॅपटॉप देतो आणि सरळ तिथुन निघुन आपल्या रूममध्ये येतो..  त्याच्या मागोमाग वृषभ आणि राज पण निघुन जातात..

राज : आत्ता काय करूयात??

वृषभ : उद्या कॉलेजला गेल्यावर बघुयात मनवीचा काही कॉटेक्ट झाला का रोहनसोबत.. सध्या आपण पण शांतच बसूयात.. आपण करायला जायचो एक आणि घडायच एक.. त्यापेक्षा आपण शांत बसूयात..

टॉनी : मला पण तेच वाटत..

★★★★★

दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे सगळे गेटजवळ भेटतात..

वृषभ : मनवी रोहनचा काही फोन..??

मनवी मानेनेच नाही बोलते.. सगळ्यांना बाजूला करत क्लासरूममध्ये जाऊन बसते..

समीरा आणि सीमा तिच्या बाजुला जाऊन बसतात.. लेक्चर सुरू व्हायला अजुन थोडा वेळ बाकी असतो..

समीरा : मनवी, काय झालं??

मनवी शांतच असते.. फक्त डोळ्यांतुन तिच्या पाणी येत असत..

सीमा : शहहह.. रडु नकोस.. हे घे पाणी पी..

शौर्य आणि वृषभ लांबुनच तिला अस रडताना बघत असतात..

वृषभ : शौर्य काही तरी कर ना यार..

शौर्य : मी काय करू..?? आणि मी काल बोललो ना मला नाही पडायच ह्यात..

वृषभ : तु आत्ता सेल्फीश सारखा वागतोयस..

शौर्य : तुला बोलायच काय आहे?? मी रोहनला समजवायला जाऊ?? मग पुन्हा तो मला त्या फैयाज समोर काही तरी बोलेल ते गप्प ऐकुन घेऊ??

राज : मग आम्ही पण बोलू त्या फैयाजला.. पण प्लिज काही तरी कर.. तो फैयाज नाही यार चांगला.. प्लिज शौर्य..

शौर्य मनवीकडे आपली नजर फिरवतो.. समीरासुद्धा शौर्यला नजरेनेच इशारा करत मनवीची मदत कर अस सांगते..

शौर्य एक खोल श्वास घेत बेगेतुन बुक काढत ती वाचत बसतो..

वृषभ : शौर्य प्लिज ना.. आपला मित्र आहे यार तो.. प्लिज...

शौर्य : बघु.. 

सर वर्गात येतात.. लेक्चरला सुरुवात होते..

आज पहिल्यांदाच शौर्यच लेक्चरमध्ये लक्ष लागत नसत.. डोक्यात नुसतं रोहन आणि त्या फैयाजचे विचार येत असतात.. काल रोहन कसा वागला, काय बोलला हेच त्याला आठवत असत.. हाताच्या मुठीत पेन अगदी घट्ट पकडत तो आपल्या बुकमध्ये जोर जोरात आपटत कसला तरी विचार करण्यात गुंतला असतो..

वृषभ त्याचा हात पकडत त्याच्याकडे बघतो.. पण शौर्यच लक्षच नसत.. तरीही तो रागात आपला पेन जोर जोरात आपटत असतो..

वृषभ : शौर्य काय करतोयस?? शांत बस..

(वृषभ त्याच्या हातातलं पेन काढतच त्याला बोलतो)

सर लेक्चर घेऊन कधी निघुन जातात.. तस शौर्य हातात बेग घेऊन जायला निघतो..

शौर्य : मी लायब्ररीत जाऊन बसतो.. तुम्ही सगळे केंटिंगमध्ये आल्यावर मला कॉल कर...मी येतो..

वृषभ : हो.. पण शांत रहा काही करू नकोस..

शौर्य वृषभला काही न बोलताच तिथुन निघून लायब्ररीत येतो..

लायब्ररीत एक वेगळीच शांतता असते.. एक चेअर घेऊन त्यावर बसतच बेगेतुन मेथ्सचे बुक्स काढतो.. एक खोल श्वास घेत अभ्यासात कॉन्सनट्रेट करतो.. मेथ्सचा आत्तापर्यंत राहिलेला अभ्यास तो करत बसतो.. 

सगळे लेक्चर होताच वृषभ शौर्यला फोन लावुन गेटजवळ बोलवुन घेतो.. त्याची वाट बघत बाकीची मंडळीसुद्धा तिथेच थांबतात..

समीरा आणि सीमा मनवीची समजुत काढत असतात.. मनवी मात्र गेट बाहेर दिसणाऱ्या रोहनकडे रागात बघत असते.. 

ती रागातच त्याच्याकडे जायला निघते..

समीरा तिचा हात पकडतच तिला मानेने नको म्हणुन सांगत असते.. मनवी समीराचा हात झटकतच रोहनकडे जाते.. ती अशी रागात रोहनकडे गेलीय हे बघताच बाकीची मंडळी सुद्धा तिच्या मागोमाग जातात..

समोर मनवी उभी आहे तरी रोहन तिच्याकडे इग्नोर करत मित्र मंडळीसोबत गप्पा गोष्टी करण्यात बिजी असतो..

मनवी : माझा फोन का नाही उचलत आहेस तू??

तरी रोहन मनवीकडे बघत नाही.. 

रोहन I am talking to you... मनवी रागातच ओरडते..

रोहन : आवाज खाली ठेवुन बोलायच माझ्याशी.. मला पण असाच राग येत होता जेव्हा तु माझा फोन उचलत नव्हतीस तेव्हा..

मनवी : रोहन मी फोन उचलत नव्हती त्याला रिजन होत काही तरी..

रोहन : अच्छा..  मग तुला काय वाटलं मी माझ्या फोन वर लागलेली रिंगट्युन ऐकायला मिळते म्हणुन फोन उचलत नव्हतो..??

(रोहनची मंडळी हसतच त्याला साथ देऊ लागतात)

मनवी : ह्या चिप लोकांसमोर तु माझा इन्सल्ट करतोयस रोहन..
(रोहनच्या मित्रांकडे बोट दाखवतच मनवी बोलते)

रोहन : आणि ह्या चिप लोकांनसमोर तु माझा करतेस..
(रोहन तिच्या मित्र मैत्रिणींकडे बोट दाखवत बोलतो)

शौर्य पण तिथे येऊन दोघांच काय चालु आहे ते बघत रहातो..

मनवी : रोहन खुप अति करतोयस आत्ता तु.. तुझ्या सारख्या मुलावर प्रेम केलं ना ही माझ्या लाइफमधली सगळ्यात मोठी चुक आहे आहे असं आत्ता मला खरच वाटतंय..

रोहन : थेंक्स फॉर दि कॉम्प्लिमेंट.. (रोहन क्रुर हसु दाखवतच मनवीला बोलला)

(बाईकच्या पाठी बसलेला फैयाज रोहनच्या पाठीवर शाबासकी देत त्याला चिअर अप करत हसतो..

मनवी : रोहन प्लिज स्टॉप दिस.. मला त्रास होतोय.. कस समजत नाही तुला..

(मनवी रडतच त्याला बोलु लागली)

समीरा : मनवी तु चल बघु इथुन..

मनवी : हा अस कस वागु शकतो ग.?? कस कळत नाही ह्याला ह्याच्या अश्या वागण्याचा त्रास होतोय मला..

समीरा : मनवी सगळे बघतायत इथे प्लिज चल आत..

(रोहन एक टक कुठे तर बघत असतो)

फैयाज : सब उसको देख रहे हे.. लेकीन इन सब मे सिर्फ हम हे जो आपको देख रहे हे।

समीरा रागातच फैयाजकडे बघत रहाते..

फैयाज : उफफ...

ऐसे न मुझे तुम देखो
सीने से लगा लूंगा
तुमको मैं चुरा लूँगा तुमसे
दिल में छुपा लूंगा…

(फैयाज गाणं गातच समीराला चिडवु लागतो)

शौर्य रागातच समीराजवळ येतो..

शौर्य : समीरा मनवीला घे आणि चल इथुन..

फैयाज : ए शौर्य यार क्यु तु बार बार बीच में आकर पुरा मुड खराब कर रहा हे ।

शौर्य : समीरा प्लिज मनवीला घे आणि चल इथुन..

(शौर्य फैयाजकडे रागात बघतच बोलतो)

समीरा मनवीचा हात पकडते आणि तिला आपल्या सोबत घेऊन केंटींगमध्ये येते..

रोहन : देख फैयाज तु शौर्य को फालतु में भडका रहा हे.. वो सिर्फ उसके भाई की वझसे शांत हे.. 

फैयाज : प्यार करता हु यार समीरा से..सच्चा प्यार.. उस शौर्य के साथ उसे देखता हुं तो खून खोल उठता हे मेरा । अगर ये शौर्य नही होता तो आज समीरा मेरी होती ।

रोहन : फिर भी यार.. जरा सोच.. उस दिन उसका भाई नही होता ना तो पक्का तेरा एक हाथ या फिर एक पेर गायब रहता..

फैयाज : तु मेरेको डरा रहा हे.. और तुझे क्या लग रहा हे में तेरी इन बातोसे डरुंगा..? तो ऐसा हरकीस नही हे.. हाथ पेर तो में उसका तोंडुगा देख लेना तु..

रोहन : नाईस जॉक..

फैयाज : तु उसके साथ हे की मेरे बे.. 

रोहन : ऑफ कोर्से तेरे यार.. पर देख में तेरेको उसकी हिस्ट्री बतात हुं.. फिर तु भी समझ जायेगा..

रोहन फैयाजला समजवतच गेट बाहेरच बसतो..

शौर्य सोबत बाकीची मंडळी येऊन केंटिंगमध्ये येऊन मनवीला समजवत बसतात..

सीमा : मनवी पाणी घे.

सीमा पाण्याचा ग्लास मनवीला देतच बोलते..

मनवी : नको मला काही..

शौर्य डोक्याला हात लावुन शांत रहाण्याचा प्रयत्न करतो..

समीरा : मनवी नको ना ग रडुस.. 

मनवी : मग काय करू?? कस वागतोय बघितलं ना तु.. तुम्ही लोक बोललात मी फोन केला तर तो सुधरेल.. पण नाही.. त्याला नाही फरक पडत मी त्याच्या आयुष्यात असले नि नसले.. त्याला फक्त नशा करायचीय.. ते ही त्या फैयाज सोबत राहुन.. आणि मी नाही आता त्याच्या सारख्या मुलासोबत राहू शकत..

वृषभ : ए शौर्य काही तरी कर ना यार.

शौर्य : तु काय केलंस मगाशी ते सांग?? तो रोहन मनवीला बोलत होता तेव्हा एका शब्दाने त्याला काही बोललास.?? तो फैयाज समीराला त्रास देत होता तेव्हा बोललास काही त्याला.. तेव्हा का गप्प बसलात तुम्ही लोक??

वृषभ मान खाली घालून शांत बसतो..

वृषभ : त्या फैयाजची भीती वाटते यार आम्हाला.. सुरुवातीला आम्ही रोहनला पण घाबरायचो.

राज : हो ना.. त्यात तुझ्यासारखी फायटिंग पण येत नाही आम्हाला..

शौर्य : घाबरूनच बसा तुम्ही..  तुमचं काहीच होऊ शकत नाही.. खर तर आज फैयाजला रोहनच्या पुढ्यातच..(शौर्य मुठ आवळतच बोलतो)

समीरा : शौर्य प्लिज शांत हो.. (समीरा मध्येच शौर्यला थांबवत बोलते) आणि तु मारामारी वैगेरे करणार नाहीस.  मला नाही आवडत तुझ्या तोंडुन अस मारामारीच्या गोष्टी ऐकताना. शांत पणे काही मार्ग निघतो का ते बघुयात जेणे करून रोहन आणि मनवी एकत्र येतील..

शौर्य : माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे.. 

सगळे चेहरयावर तेज आणतच शौर्यकडे बघतात..

शौर्य : म्हणजे पटलं तर बघा.. आपण आत्ता पर्यंत त्याला राग दाखवुन त्याची सवय सुटते का बघत होतो.. पण आत्ता आपण त्याच्या ओपोझीट करायच.. 

टॉनी : म्हणजे..??

शौर्य : मनवी रोहनचा विक पॉईंट आहे.. we all knows.. सो मनवी तुला ती गोष्ट करायची जी रोहनला आवडत नाही.. 

मनवी : त्याने काय होईल??

शौर्य : ते तुला ती गोष्ट केल्यावर दिसेलच.. पण ह्यासाठी आपल्या सगळ्यांना तिला मदत करावी लागेल..

आम्ही तैयार आहोत.. सगळे एकत्रच बोलतात..

समीरा : आत्ता करायच काय??

शौर्य : आपण आत्ता मूव्ही बघायला जातोय..

वृषभ : काय?? तु बरा आहेस ना..

शौर्य : रोहन समोर आपण खुप खुश आहोत अस दाखवायचं.. आपल्याला काहीच फरक नाही पडत त्याच्या अश्या वागण्याचा हे आपल्याला त्याला दाखवायचं. इस्पेसिअली मनवी तुला.. तो बाहेरच असणार मनवीची वाट बघत.. कारण मनवीला अस रडताना बघुन त्याला खूपच वाईट वाटलंय हे नक्की.. सो मनवी.. तु दुःखी आहेस हे त्याला अजिबात दाखवायच नाही.. आणि अस काही तरी कर की रोहनला खुप राग यायला हवा तुझ्या वागण्याचा जसा त्याच्या वागण्याचा तुला आलाय.. मी काय बोलतो ते कळतंय ना तुम्हा लोकांना..??

मनवी : मला कळतंय.. रोहन मला इतर कोणासोबत बघुच शकत नाही.. 

शौर्य : मग हा वृषभ आहेच तुला मदत करायला.. काय वृषभ..

वृषभ : मी काय करू??

शौर्य : तुला आत्ता काय एक्सप्लॅन करावं लागेल का?? फक्त मनवी तुझी  गर्लफ्रेंड आहे असं दाखवावं लागेल रोहनला..

वृषभ : वेडा झालंयस काय तु.. मला नाही जमणार..

राज : आत्ता तर तु मदत करायला तैयार होतास तिला..

वृषभ : मग तुच बन ना तिचा बॉयफ्रेंड..

राज : काल पर्यंत तर मला टॉनीची गर्लफ्रेंड म्हणुन चिडवत होतास. आज लगेच बॉयफ्रेंड बनायला सांगतोस.. ते ही मनवीचा

वृषभ : का?? घाबरलास??

सीमा : ए वृषभ त्यात घाबरण्यासारख काय आहे?? तुला फक्त एकटिंग करायचीय..

समीरा : हो ना..

वृषभ : मी ट्राय करेल.. 

शौर्य : आपण नेहमीसारखीच मज्जा मस्ती करत इथुन कॉलेजबाहेर निघतोय.. आणि त्याला कळलं पाहिजे आपण मूव्ही ला जातोय ते..

सो रेडी गाईज...शौर्य आपला हाथ सगळ्यांच्या समोर करतच बोलतो..

सगळे एक एक करून त्याच्या हातावर हात ठेवत येस करत ओरडतात..

रोहन शौर्यने सांगितल्याप्रमाणे कॉलेजच्या गेट समोरच आपल्या मित्रमंडळींसोबत बसलेला असतो..

फैयाज : रोहन तेरी वाली आ रही हे देख.. साथ में फंटर लोग भी हे..

रोहन बाईकच्या मिररमधुनच तिला बघत असतो..

राज : ए मनवी तुझी स्कुटी इथेच राहू दे.. आपण मूव्ही वरून आल्यावर घेऊन जाऊयात..

टॉनी : ए समीरा आणि सीमा यार.. तुम्ही तिथे थिएटरमध्ये गेल्यावर गप्पा मारा ना.

(फैयाज : ए लोग मुव्ही देखने जा रहे हे??

रोहन : तुने भी वही सुना क्या?? 

फैयाज रोहनकडे बघत रहातो..

रोहन : ऐसे मत देख यार.. मेरे को लगा मेने कुछ गलत सुना..)


समीरा : सॉरी ते आम्ही विचार करत होतो की आफ्टर मुव्ही काय करायच..

शौर्य : ते आपण नंतर बघु.. म्हणजे मूव्ही झाल्यावर विचार करूयात.. 

सगळे मज्जा मस्ती करतच रोहन समोरून जाऊ लागले.. 

रोहन त्यांना अस नॉर्मल झालेलं बघुन त्यांच्याकडे बघतच रहातो..

थोडा वेळ तो तसाच शांत बसुन रहातो..

रोहन : हम लॉग मॉल जा रहे हे..

फैयाज : क्यु?? अभी तेरेको भी मूव्ही देखने जाना हे क्या??

रोहन : तुम लोग चल रहे हो या में अकेले जाऊ.. 

फैयाज : ज्या फिर अकेले.. वो लोग जान बुझके तेरेको उनकी बातोंमें बेहका रहे और तु उनके बेहकावे में आ रहा हे..

(फैयाज बाईक वरून उतरुनच त्याला बोलतो.. )

रोहन : शाम को मिलते हे बाय...बाय गाईज..

(आपल्या मित्र मंडळींना बाय करतच..तो बाईकला किक मारतो आणि तिथुन निघतो..)

इथे शौर्य आणि इतर मित्र मंडळी मज्जा मस्ती करत त्याला जाताना दिसतात.. तस तो त्यांच्या पुढ्यातूनच बाईक सुसाट पळवत तिथुन निघतो.. 

वृषभ : शौर्य तुझा प्लॅन काम करतोय रे.. साहेब बघ आपल्या पहिलेच जाऊन हजर असतील मॉलमध्ये..

राज : तो घरी गेला असेल तर..

शौर्य : तो मॉलमध्येच गेलाय..

राज : कश्यावरून..?

मनवी : मला पण वाटत तो घरीच गेला असेल.. तो कश्याला मॉलमध्ये जाईल??

शौर्य : कॉलेज गेटजवळ चला मग दाखवतो..

वृषभ : ए शौर्य यार मूव्ही मिस होईल..

शौर्य : होऊ दे.. आपण तीन वाजताचा शो बघायला जाऊयात.. थोडं रोहनला पण त्रास देऊयात.. मज्जा येईल..

शौर्य आपल्या भुवया उडवत सगळ्यांकडे बघु लागला..

समीरा : करायचं काय??

शौर्य त्यांना त्याला सुचलेला प्लॅन सांगतो..

सगळे असे पुन्हा कॉलेज गेटजवळ जाऊन उभे रहातात..

फैयाज : अरे येह लोग मूव्ही के लिये गये थे ना?? वापस क्यु आये??

शायद केन्सल हुवा रहेगा.. तु रोहन को कॉल करके बता.. (त्याच्या ग्रुपमधला एक जण फैयाजला सांगतो तस फैयाज रोहनला फोन लावतो.. पण रोहन बाईकवर असल्यामुळे फोन नाही उचलत..)

मॉलमध्ये पोहचताच रोहन बाईक पार्क करतो आणि पळतच मॉलमध्ये शिरून एका दुकानात लपुन आपली मित्र मंडळी कधी येतात त्याची वाट बघत बसतो.

जवळपास पंधरा वीस मिनिट उलटुन जातात.. तरीही त्याच्या मित्र मंडळींचा अजुन काही आता पत्ता नसतो.. 

नक्की इथेच येणार होते ना पिक्चर बघायला का दुसरीकडे कुठे गेले असतील..रोहन स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारू लागतो..

तोच फैयाजचा त्याला फोन येतो..

फैयाज : किधर हे तु??

रोहन : मॉल में... क्यु क्या हुआ..

फैयाज : अरे ये लोग वापस आ गये कॉलेज में.. तेरे को मामु बना रहे थे शायद..

(फैयाज हसतच बोलला)

रोहन : व्हॉट... 

फैयाज : आजा अब तु भी इधर..

रोहन : ठिक हे रख आता हुं...

रोहन फोन कट करून खिश्यात ठेवतो.. आणि पुन्हा कॉलेजच्या दिशेने परत यायला निघतो..

शौर्यसोबत इतर मंडळी तिथेच उभी राहुन फैयाजच फोन वरच बोलणं चोरून ऐकतात...

शौर्य : चला मग निघायचं??? मुव्हीला??

शौर्य आपली भुवई उडवतच आपल्या मित्रांकडे हसत बघत विचारतो..

सगळेच गालातल्या गालात हसतात..

समीरा : चल..

राज : ए शौर्य.. आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊयात.. म्हणजे रोहनला आपण दिसणार नाही.. 

शौर्य : चला मग..

सगळेच आत्ता परत मॉलमध्ये जायला निघाले..

अरे फैयाज येह लोग किधर तो वापीस जा रहे हे.. 

फैयाज खिश्यातुन फोन काढतच परत रोहनला फोन लावतो.. पण रोहन पुन्हा बाईकवर असल्यामुळे फोन उचलत नाही..

इथे रोहन कॉलेजच्या गेटजवळ पोहचतो..

फैयाज : तेरे को फोन कर रहा था में..

रोहन : बाईक पे था यार.. किधर हे येह लोग..

फैयाज : वो लोग तो कब का इधरसे निकल गये..

रोहन : तुने मेरे को झूठ बोलके यहा पे क्यु बुलाया फिर.??

(रोहन रागातच फैयाजची कॉलर पकडत बोलतो)

फैयाज : ए शाने.. वो लोग तेरे जाने के बाद इधर आये.. और कुछ तो आपस में खुचुर फुचुर कर रहे थे और वापीस चले गये..

रोहन त्याची कॉलर सोडुन आपल्या केसांवर हात फिरवतच काही तरी विचार करू लागला..

रोहन : कुछ तो चल रहा हे इन लोगोंके दिमाग में..

रोहन परत बाईकला किक मारत बोलला..

फैयाज : अब किधर जा रहा हे तु.. ??

रोहन : उन लोगोंका क्या चल रहा हे वो देखने.. 

फैयाज : छोड ना उन लोगोंको..

रोहन : ऐसे कैसे छोडू.. मनवी हे उन लोगोंके साथ...

रोहन पुन्हा मॉलच्या दिशेने जायला निघाला..

शौर्य आणि इतर जण सोबत पॉपकॉर्न घेत मूव्ही बघायला थिएटर मध्ये घुसतात...

रोहन थिएटर बाहेरच एका दुकानाच्या आडाला लपुन रहातो.. त्यांच्या मनात नक्की काय चालु असत हे त्याला बघायच असत..

सहा पावणे सहाच्या दरम्यान मूव्ही संपतो..

शौर्य : गाईज मला अस वाटत रोहन बाहेरच असेल कुठे तरी.. 

समीरा : मला पण असच वाटतंय.. 

शौर्य : मनवी तुला काय करायचय हे लक्षात आहे ना.

मनवी : येस बॉस..

शौर्य : आणि वृषभ थोडी नीट एकटिंग कर.. प्लिज.. 

वृषभ : मला भीती वाटतेय यार..

मनवी : नको ना घाबरुस.. मी तुला काही खाणार नाही..

वृषभ : तु नाही ग तुझा तो रोहन खाईल मला.

शौर्य : ए वृषभ मी आहे तुझ्यासोबत.. तुला काही होणार नाही ही माझी गैरेंटी..

राज : गॉड ब्लेस यु वृषभ..

वृषभ : राज तु मला घाबरवतोयस..

कधी तरी सिरियसली घे... शौर्य जोरातच राजच्या डोक्यात मारत बोलला

बेस्ट ऑफ लक वृषभ... राज डोकं चोळतच बोलला..

सगळेच शौर्य ने सांगितलेल्या प्लॅनला फॉलो करायच अस मनात ठरवूनच  थिएटरमधुन बाहेर पडले..

(नक्की काय प्लॅन ठरला असेल?? पाहुया पुढील भागात.. आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all