अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 48

In marathi

मुव्हीची स्तुती करतच सगळे थिएटर मधुन पडले.. राज मुव्ही मधले एक एक डायलॉग उलट सुलट बोलुन मित्र मंडळींना हसवत होता.. रोहन लांबुनच त्याच्या मित्रमंडळींची मज्जा मस्ती बघत होता.. 

मनवी : गाईज यार भुक लागलीय खुप.. चला ना काही तरी खाऊयात..

राज : एवढे पॉपकॉर्न खाऊन पण भुक लागते?? 

मनवी रागातच राजकडे बघते..

राज : लागतेच.. भुक हि लागतेच.. म्हणजे मी तेच सांगत होतो ह्या वृषभला एवढे पॉपकॉर्न खाऊन पण माणसाला भुक ही लागतेच.

(राज स्वतःची बाजु सावरत बोलला.. सगळे त्याला हसु लागतात)

मनवी : आत्ता लागलीय ना भुक तुला पण.. मग आपण सगळे मॅकडी मध्ये जाऊयात??

समीरा : मला चालेल..

मला पण.. एक एक करून सगळेच आपली संमती दाखवत तिथेच थांबतात.. 

खर तर सगळ्यांची नजर रोहनला शौधत असते..पण तो दुकानात लपुन बसलेला असल्यामुळे कुणाला दिसत नाही..

टॉनी : नक्की आला असेल ना रोहन इथे?? कारण दिसत नाही यार कुठे.

समीरा : हो ना. नाही तर उगाचच आपण टाईम पास करायचो..

(हळुच सगळे रोहन बद्दल डिस्कस करत असतात)

राज : मला पण कुठे दिसतच नाही तो..

शौर्य : तुम्हाला hide&sick गेम माहिती??

टॉनी : मग काय.. लहानपणी आम्ही खुप खेळायचो..

शौर्य : मग आत्ता पण खेळुयात चला

टॉनी : Are you serious??

शौर्य : आत्ता रोहनेच हा गेम आपल्यासोबत खेळायच ठरवलंय हटलं तर त्याच्यासाठी आपल्याला हा गेम खेळावाच लागेल ना..

समीरा : तुला खरच अस वाटत रोहन इथे आहे??

शौर्य : ऑफ कोर्स येस... तो इथेच आहे..

मनवी : आत्ता करायच काय ते सांग.. म्हणजे कस कळेल की तो आलाय इथे..

(रोहन लांबुनच ह्या लोकांच काय चालु ते बघत असतो.. मॉलमध्ये चालु असलेल्या गोंधळामुळे त्याला त्यांच बोलणं ऐकु येत नसत..)

शौर्य : गाईज आपण मॅकडी ला जातोय पण एकत्र नाही वेगवेगळे. वृषभ आणि मनवी तुम्ही दोघ एकमेकांचा हात पकडतच मॅकडीमध्ये जावा.. मनवीला अस वृषभचा हात पकडुन जाताना त्याला सहन नाही होणार.. कदाचित तो लगेच त्यांच्या पाठी जायला निघेल..आणि जसे वृषभ आणि मनवी एक्सलेटरने खाली जातील तस आपण जाऊयात..आणि अजुन एक जर रोहन दिसला तर इग्नोर हिम.. त्याला अस कळलं नाही पाहिजे की आपल्याला माहिती तो इथे आहे. Are you getting my point??

येस... (सगळे एकत्रच बोलतात)

मनवी : बट तो इथे नसला तर..

शौर्य : तर मग पुढच पुढे बघु.. त्याला अजुन संशय यायला नको तुम्ही दोघ निघा...

शौर्यने सांगितल्या प्रमाणे मनवी आणि वृषभ तिथुन जायला निघाले..

मनवी वृषभचा हात अगदी घट्ट पकडतच शौर्यने सांगितल्याप्रमाणे एक्सलेटरवरून मॅक-डी च्या दिशेने जायला निघाली.. रोहन ज्या दुकानात लपला होता त्या दुकानाच्या समोरून ते दोघे जाऊ लागले..

मनवी आणि वृषभला एकमेकांचा हात अस घट्ट पकडुन जाताना बघुन रोहनला राग अनावर होतो.. तो तसाच रागातच दुकानातुन बाहेर येऊन ते दोघ कुठे जातात ते बघत रहातो.. 

राज : ए गाईज तो बघा रोहन.. अजुन गेम सुरू पण नाही झाला आणि हा रोहन आऊट पण झाला यार.. शौर्य यु आर ग्रेट...

(राज इशाऱ्यानेच बाकीच्यांना रोहन दाखवतो..)

शौर्य : तुम्हाला आत्ता काय करायचं माहिती ना??

हो.... बोलत सगळे मॅक-डीच्या दिशेने जाऊ लागले..

समीरा : हा वृषभ आणि मनवी अचानक कुठे गायब झाले..?? आत्ता तर इथे होते..

समीरा रोहन ज्या दुकानाबाहेर त्यांच्याकडे पाठ करून उभा होता त्या दुकानाजवळ येतच बोलली.. 

समीराचा आवाज ऐकताच रोहन घाबरून जातो.. दुकानाबाहेर उभ्या ठेवलेल्या पुतळ्याचे कपडे बघतच तो त्यांच्या पासुन लपुन रहाण्याचा प्रयत्न करत होता..

(शट.. हे लोक अजुन इथेच आहेत हे मी विसरलोच. रोहन स्वतःशीच बोलत होता..)

शौर्य : गाईज तो बघा...

शौर्य अस बोलताच रोहनला घाम फुटतो.. त्याला अस वाटत कि शौर्य त्याच्याबद्दलच बोलतोय.. पुतळ्याजवळ असलेला त्याचा हात थरथरू लागतो

राज : अरे हो ना... अस कस करू शकतो यार हा वृषभ.. न सांगता मनवीला घेऊन आपल्या आधी मॅक-डी मध्ये जातोय.. 

शौर्य : ए राज राहू दे ना यार.. नवीन नवीन प्रेम आहे रे.. तु नाही समजू शकत..

(शौर्य अस बोलताच रोहन रागाने लालबुंद होत असतो)

सीमा : हा वृषभ ड्रग्स वैगेरे नाही ना घेत.. नाही तर मनवीला नंतर कळायचं की हा पण रोहन सारखाच..

टॉनी : नाही ग.. तो नाही घेत.. आणि घेत असेल ना.. तरी मनवी बोलली सोड तर सोडेल पण तो... रोहन सारखा नाही तो.. 

समीरा : गाईज नको ना त्या रोहनच नाव..

राज : हो ना.. परत ग्रुपमध्ये पण तो नकोच.. कसा बोलला तो आज आपल्याला..

शौर्य : बस ना यार.. म्हणजे आपण इथे उभं राहुन बोलण्यापेक्षा खाली जाऊन बसुन बोलूयात.. बर्गर खात खात..

समीरा : हो चालेल.. तस पण मला भुक लागलीय आणि तहान पण..

राज : मला सुद्धा..

सगळेच गप्पा गोष्टी करत तिथुन निघु लागले.. पण त्यांच बोलणं रोहनच्या काळजात सपासप वार करून गेलेलं..  

सगळेच एक्सलेटर वरून उतरून मॅक-डी मध्ये पोहचले ह्याची खात्री होताच रोहनसुद्धा तिथे जायला निघाला.. 

शौर्य : थोडी ओव्हर एकटींग होते यार... जास्त नका बोलु त्याला..

राज : तो पण जास्तच बोलला ना आम्हांला..

शौर्य : आत्ता तो ग्रुपमध्ये हवा की नकोय?? 

हवाय.. राज तोंड पाडतच बोलला..

शौर्य : आणि मनवीला वृषभसोबत बघुन त्याला खूप हर्ट झालंय.. कदाचित मनवी तो तुला फोन करेल.. बट..त्याचा फोन तु उचलायचा नाही..

मनवी : हम्म नाही उचलत..

शौर्य : गुड..

वृषभ सगळ्यांसाठी बर्गर, फ्राईस आणि कॉकने भरलेले ग्लासेस घेऊन येतो..

बर्गर खाण्याआधी शौर्यने सांगितल्या प्रमाणे सगळे आपापला मोबाईल हातात घेत फोटो सेक्शन करतात.. वेगवेगळ्या एंगलने सगळे आपापल्या मोबाईलमध्ये फोटो काढत असतात..

वृषभ : हा बघ रोहन.. त्या समोरच असलेल्या दुकानातुन आपल्याला लपुन बघतोय..

(आपल्या मोबाईल मधला फोटो झुम करून दाखवतच वृषभ बोलतो...)

शौर्य : मग चला प्लॅन नंबर 2 ला सुरुवात करूयात.. आणि राज तु रोहनची रिएक्शन बघ काय आहे ते..पण त्याला कळलं नाही पाहिजे की तु त्याच्याकडे बघतोयस..

राज : ओके...

मनवी एक दोन फ्राईसचे पिस वृषभला भरवते.. आणि वृषभ तिला..

रोहन लांबुनच हे सगळं बघत असतो.. त्याला आत्ता हे सगळं सहन होत नसत.. रागातच जाऊन वृषभची कॉलर पकडावी आणि सगळ्यांसमोर एक दोन त्याला लावुन द्यावी अस त्याला वाटत असत.. पण तो स्वतःच्या रागावर कंट्रोल करतो आणि तिथून निघून जातो.

राज : गाईज he went.. 

राज अस बोलताच सगळे मॅकडी मधुन बाहेर येऊन बघतात.. रोहन खरच मॉल मधुन बाहेर पडत असतो..

शौर्य : आपला प्लॅन काम करतोय गाईज.. एन्जॉय दि बर्गर पार्टी..

येस.... बोलत सगळे पुन्हा आपल्या जागेवर बसुन मज्जा मस्ती करत बर्गर, फ्राईस आणि त्यासोबतच कॉकचा आंनद घेत होते..

शौर्य : गाईज 7 वाजलेत.. आपण निघुयात?? आज साठी एवढंच बस झालं.. 

राज : हॉस्टेलमध्ये बॉर होतय यार. थोडं अजुन टाईमपास करूयात ना...गेम खेळायला जाऊयात गेमझोन मध्ये.

मनवी : ए हा गुड आयडिया..

सगळे गेम सेक्शनमध्ये गेम खेळायला गेले..

शौर्य मात्र आत्ता हातातलं घड्याळ बघु लागला.. 

शौर्य : गाईज यार साडे आठ वाजले.. प्लिज निघुयात..

समीरा : डिनर करून जाऊयात ना..

शौर्य : समीरा प्लिज नंतर कधी तरी.. आज नको..

वृषभ : हा शौर्य ना बोरिंग आहे यार.. समीरा सांग ना ह्याला..

शौर्य : ए वृषभ नंतर कधी तरी येऊयात.. आत्ता प्लिज निघुयात इथुन.. प्लिज...

(शौर्य रिक्वेस्ट करतच बोलला)

राज आणि इतर सगळेच त्याच्याकडे रागात बघु लागले..

शौर्य : अस नका ना बघु यार.. आपण नंतर येऊयात डिनरसाठी.. पण आत्ता हॉस्टेलवर जाऊयात..

राज : ह्याला हॉस्टेलवर गेल्यावर बघुयात.. नुसतं हॉस्टेल हॉस्टेल करत बसलाय..

(राज वृषभ आणि टॉनीला हळुच बोलतो..)

सगळेच तोंड पाडतच कॉलेजजवळ आले..

शौर्य : मग रात्री प्लॅन 3 साठी रात्री तैयार रहा सगळे.. 

येस बॉस...

मनवी स्कुटीवर बसत सगळ्यांना बाय करू लागली..

राज : रोहन हिला त्रास तर देणार नाही ना.. ही एकटीच जातेय म्हणुन विचारलं..

शौर्य  : मनवी तु जाशील ना सांभाळुन? 

मनवी : माझं टेन्शन नका घेऊ.. मी करेल मॅनेज.. आणि खुप थेंक्स शौर्य तु एवढा छान प्लॅन केलास.. आणि गाईज तुम्हाला पण... तुम्ही मला आणि रोहनला एकत्र आणायला एवढी मदत करताय..

शौर्य : फक्त त्याने ड्रग्स घेणं बंद करावा बस..

समीरा : नक्कीच करेल.. बाय दि वे नऊ वाजलेत.. अजुन उशीर नको...मनवी तु एकदा पोहचली की टेक्स्ट कर आम्हांला..

सगळेच मनवीला बाय करत रूममध्ये येतात..

शौर्य रूममध्ये शिरताच बाकीची मंडळीसुद्धा त्याच्या रूममध्ये येतात..

तिघेही हाताची घडी घालुन रागातच त्याच्याकडे बघत त्याच्या जवळ जातात..

शौर्य : काय झालं??

वृषभ : तुझ्यामुळे आम्हांला हॉस्टेलच जेवण जेवाव लागतय आज

(वृषभ शौर्यला मागे ढकलतच बोलला..)

राज : नेहमी तुझ्या मनासारखच करतोस..कधी तरी आमचा पण विचार करणा यार

(अस बोलत राजने शौर्यला ढकललंल)

शौर्य : मला बोलायला द्याल तुम्ही??

टॉनी : प्रत्येक गोष्टीच एक्सप्लॅनेशन असतच तुझ्याकडे..

(तोच शौर्यचा फोन वायब्रेट होऊ लागला.. विरचा व्हिडीओ कॉल येत असतो त्याला..)

म्हणून नाही बोललो...मित्रांना आपल्या मोबाईलची स्क्रिन दाखवतच तो बोलला..

विराजसोबत  व्हिडीओ कॉलवर बोलायला तो गेलरीत गेला..

वृषभ : ह्याचा भाऊ आहे का ह्याचा डॅड तेच कळत नाही.. किती दादागिरी करतो यार बिचाऱ्या शौर्यवर..

राज : तु शौर्यला बिचारा बोलुन, बिचारा ह्या शब्दाचा इन्सल्ट करतोयस.. 

टॉनी : पण शौर्यसुद्धा त्याच्या शब्दाबाहेर नाही ना.. त्यादिवशी बघितलस ना शौर्य कसली फायटिंग करत होता.. त्याच्या मॉमच पण ऐकत नव्हता तो.. मला तर आज वाटलेलं की फैयाजला मी शेवटच बघतोय..

वृषभ : ए बाबा गप्प अस काही बोलु नकोस..

राज : गप्प काय मला पण असच वाटलेलं.. जर त्याचा भाऊ नसता तर कदाचित फैयाज आज दुसऱ्या ग्रहावर असता हे नक्की.

वृषभ : हो न.. आणि शौर्य जेलमध्ये...

राज आणि टॉनी वृषभकडे बघत रहातात..

टॉनी : मनवी सोबत एक दिवस नाही राहिला तर तिच्यासारखं बोलायला लागला तु..

वृषभ : जस्ट शट आप हा..

राज : बघ तिचे डायलॉग पण बोलायला लागला तु..

दोघे वृषभला चिडवत असतात..

थोड्या वेळात शौर्य तिथे येतो.. तिघांना शांत करत त्यांना जेवायला घेऊन खाली जातो..

राज : वृषभ पोट भरून जेव आज तु...

वृषभ : अस का बोलतोयस तु...??

राज : ते काय आहेना जर समज उद्या रोहनने तुझ्या तोंडावरच मारलं तर. आणि त्यात तुझे दात वैगेरे तुटले तर.. मग उपाशी राहशील ना म्हणुन बोललो..

टॉनी आणि शौर्य हसु लागतात..

वृषभ छोटस तोंड करत शौर्यकडे बघु लागतो..

शौर्य : घाबरू नकोस ना वृषभ.. मी आहे ना.. म्हणजे मी त्याला सांगेल तोंडावर नको मारुस बाकी कुठेही मार चालेल..

पुन्हा तिघे वृषभला हसतात..

वृषभ : शौर्य मला खरच भीती वाटते यार नको ना अस काही बोलुन घाबरवूस..

शौर्य : ए कोल्हापूरकर तु कधी पासुन घाबरायला लागलास..

वृषभ : आत्ता रोहन समोर त्याच्याच गर्लफ्रेंडला फिरवतो म्हटलं तर तो माझी काय हालत करेल हे विचार करून भीती वाटते मला..

टॉनी : जेव गप्प.. आम्ही आहोत तुझ्यासोबत..

शौर्य : हो ना.. आणि मी असताना तु नको घाबरुस..

तिघेही वृषभची समजुत काढत जेवण आटोपुन आपापल्या रूममध्ये झोपायला जातात..

इथे रोहनची मनस्थिती काही ठिक नसते.. मनवीला अस वृषभच्या जवळ गेलेलं बघुन तो बैचेन होत असतो.. डोळ्यांसमोर त्याला फक्त वृषभ आणि मनवीच दिसत असतात.. सोबत त्याच्या मित्रमैत्रिणींच बोलणं त्याला आठवत असत..  भर थंडीत सुद्धा तो घामाघूम होत असतो.. डोकं अगदी घट्ट धरतच तो बेडवर पडतो.. अंगसुद्धा त्याच अक्षरशः थरथरत असत.. स्वतःवर कंट्रोल करायच तो ठरवतो.. थरथरत्या हातात फोन घेत तो मनवीला लावतो.. पण मनवी काही फोन उचलत नसते.. वारंवार तो मनवीला फोन लावतो पण ती काही उचलत नसते..मनवीला सॉरी मेसेज करण्यासाठी तो व्हाट्सए ऑपन करतो.. पण मनवीचा वृषभसोबतचा व्हाट्सएप डीपी बघुन तो मोबाईल तसाच बेडवर लांब फेकुन देतो..

बेडमागे लपवलेले इंजेक्शन नेहमीप्रमाणे तो आपल्या हातात घेतो.. आणि एकटक त्या इंजेक्शनकडे बघत रहातो... स्वतःच्या हातावर तो टोचणार.. तोच त्याचा हात थांबतो.. इंजेक्शन रागातच तो लांब फेकुन देत जोरात ओरडतच रडतो.. 

तोच रोहनचा मोबाईल वाजतो.. मनवीचा फोन असेल.. अस त्याला वाटत..  तो खुश होतच बेडवर पडलेला मोबाईल घेतो.. पण फोन हा फैयाजचा असतो.. तोंड पाडतच तो त्याचा मोबाईल उचलतो..

फैयाज : अरे किधर हे भाई तु..?? आजा जलदी.. कबसे तेरा वेट कर रहे हे..

रोहन : मेरा मुड बहोत खराब हे.. में नही आ रहा हुं किधर. बाय...

(फैयाज पुढच बोलणं ऐकुन न घेता रोहनने फोन कट केला डोकं बेडवर ठेवतच तो रडु लागतो..)

मोबाईलवर मेसेज ट्युन वाजते...

कॉलेजगृप मधुन शौर्यने मेसेज केलेला.. रोहनने लगेच ग्रुपवर क्लिक करत शौर्यने केला मेसेज वाचला..

शौर्य : Is Every1 ready 4 tomorrows plans?? Especially Manvi & Vrushabh??

(ह्यांचा कोणता प्लॅन आत्ता?? रोहन मनातच विचार करू लागला..)

मनवी : I am ready... & very very exciting for rock climbing..

वृषभ : me 2..

शौर्य : so we will meet tommorow sharp 6 am.. near by college get.. 

ok..
ok..

एक एक जण आपली संमती दाखवत ग्रुप वर मेसेज करत होते..

मनवीला खरच वृषभ आवडायला लागला.. आणि म्हणुन ती माझे कॉल इग्नोर करते.. अस रोहनला आत्ता खरच वाटु लागलेलं.. उद्या जाऊन बघावच लागेल नक्की काय चालु आहे दोघांच...

रात्रभर तो मनवी आणि वृषभचाच विचार करतच जागा रहातो..

पाच वाजतात तस त्याच्या मोबाईलचा अलार्म वाजतो… पटकन फ्रेश होत बाईकला किक मारतच तो कॉलेजच्या दिशेने जायला निघतो.. सहा वाजायला अजुन पंधरा मिनिटं बाकी असतात.. कॉलेजवळ असलेल्या गार्डनच्या इथे तो बाईक पार्क करतो.. आणि गार्डनमध्येच लपुन बसतो.. थंडी भरपुर जाणवत असते.. आपले हात एकमेकांवर घासत अंगात थोडी उष्णता निर्माण करत जाणवणारी थंडी थोडी कमी करण्याचा तो प्रयत्न करत असतो.. सहाला पाच मिनिट अजुनही शिल्लक असतात तोच शौर्यचा कॉलेज ग्रुपवर मेसेज येतो..

शौर्य : Sorry guys, we need to cancel today's plan... 

समीरा : No issue..

मनवी : ????

सगळे एक एक करून ग्रुपवर्ती रिप्लाय देऊ लागले..

शौर्य : after lecture will go out 4 lnch..

पुन्हा सगळे ओके म्हणुन त्यावर संमती दाखवु लागले..

(अस कस यार हे लोक अचानक प्लॅन केन्सल करू शकतात.. रोहन स्वतःच्याच मनाला प्रश्न करू लागला. )

रागातच बाईकवर बसुन तो निघुन आपल्या घरी येतो.. कधी जाऊन मनवी आणि वृषभला जाब विचारतो अस त्याला झालेलं.. 

नेहमीप्रमाणे सगळेच गेटजवळ उभं राहुन मनवीची वाट बघत गप्पा मारत असतात..

रोहन बाईकवरून उतरत सरळ वृषभजवळ जातो.. रोहनला अस रागात बघुन वृषभ खर तर घाबरून गेला असतो पण तो तस अजिबात दाखवत नाही..

रोहन : मनवी पासुन लांब रहायच.. आत्ता नीट सांगतोय.. नेक्स्ट टाईम वेगळ्या भाषेत सांगेल..

मनवी : एक मिनिट.. मिस्टर रोहन...

रोहन मागे वळुन बघतो.. मनवी नुकतीच कॉलेजमध्ये आली असते..

मनवी : तु कोण सांगणारा त्याला माझ्यापासुन लांब रहायला... लांब तु रहायच माझ्यापासुन.. एवढ्या सकाळ सकाळी तुझ्यासारख्या ड्रग्स एडिक्ट मुलाच तोंड पण बघावस वाटत नाही मला..

रोहनला आपल्या हाताने रागातच बाजुला सारत.. वृषभचा हात सगळ्यांसमोर पकडत मनवी त्याला आत घेऊन जाते.. रोहन फक्त मनवीला वृषभचा अस हात पकडुन आत जाताना बघतच राहतो..

शौर्य : राज आज सकाळ सकाळी थंडी खुप होती ना.. (शौर्य रोहनकडे बघतच राजला बोलतो)

राज : हो ना..

शौर्य : तुला माहिती माझ्या रूमच्या खिडकीतुन आपल्या कॉलेजच्या गार्डनजवळील सर्व एरिया दिसतो.. आणि आज तर स्पेसिअल काही तरी बघायला मिळाल मला..

राज : काय बोलतोस..

शौर्य : चल आत तुला सांगतो..

राज आणि शौर्य एकमेकांच्या गळयात हात घालतच रोहनच्या पुढ्यातून आत जाऊ लागले

रोहन फक्त शौर्यकडे रागात बघतच रहातो.. 

पाठुन फैयाज आणि इतर मित्र मंडळी त्याला आवाज देत असतात.. रागातच जाऊन तो त्याच्या बाईकवर बसतो..

फैयाज : तु आज जलदी क्यु आया कॉलेज में??

रोहन रागातच असतो..  कसला तरी विचार तो करत असतो.. फैयाजच्या प्रश्नाच तो उत्तर देत नाही..

फैयाज : क्या हुआ बता तो..

रोहन : वृषभ और मनवी का चक्कर चल रहा हे । आज दोपहर को लंच के लिये जाणे वाले हे ।

फैयाज : तो उनके लिये हॉटेल बुक करणे का सोच रहा हे या मेनु डीसाईड कर रहा हे..।

फैयाज अस बोलताच सगळे रोहनला हसु लागतात.. 

हस मत मेरे पे.. मुझे गुस्सा आता हे.. फैयाजची कॉलर पकडतच तो त्याला बोलला.. तसे सगळे शांत बसतात..

 इथे सगळे मनवीच कौतुक करत होते..

सीमा : मस्त एकटिंग केलीस हा मनवी.. मानलं पाहिजे तुला..

मनवी : एक मिनिट मी एकटिंग वैगेरे नव्हती करत.. ते सगळं आतुन येत होतं.. एक तर चूका स्वतः करायच्या आणि वर इतरांवर दादागिरी.. मला रोहनचा हाच स्वभाव पटत नाही..

समीरा आणि सीमा मिळुन मनवीला शांत करत होते.. तर दुसरीकडे रोहनला घाबरून गेलेल्या वृषभला शौर्य धीर देत होता..

वृषभ : मला नाही बाबा अजुन एकटिंग करायची.. बस झालं..

शौर्य : किती घाबरतोस यार तु.. काही नाही होत.. ती मनवी बघ घाबरते काय??

वृषभ : तिचा तो बॉयफ्रेंड आहे यार.. तिला थोडीना तो काही करणार.. तो तिचा राग पण माझ्यावरच काढणार.

शौर्य : अस नाही काही करणार तो आणि मी आहेना तुझ्या सोबत..

वृषभ : तरी पण नको..

शौर्य : ठिक आहे तुझी मर्जी मग.. तुला जर असच वाटत असेल कि रोहन नको सुधारायला मग इट्स ओके.. नको एकटिंग करुस

वृषभ शौर्यकडे बघतच रहातो..  वृषभ शौर्यला काही बोलणार तेवढ्यात सर वर्गात येतात.. आणि लेक्चरला सुरुवात करतात.. वृषभ सरांकडे बघत तर असतो पण लेक्चरमध्ये त्याच लक्ष मात्र काही लागत नसत.. सर लेक्चर घेऊन जातात तरी त्याच लक्ष अजुनही ब्लॅकबोर्डकडेच असत..

शौर्य : ए वृषभ तु बोलशील तस करूयात..पण अस टेन्शन नको घेऊस.. आपण रोहनशी बोलून बघुयात.. बघु तो काय बोलतो ते म्हणजे थोडा तरी बदल झाला असेल त्याच्यात हे नक्की.. मी लायब्ररीत आहे.. लेक्चर झाल्यावर फोन कर मला.. आणि प्लिज अस तोंड पाडुन नको बसुस.. नाही आवडत मला तुला अस तोंड पाडुन बसलेलं बघुन..

वृषभ एक स्माईल देत शौर्यला बाय करतो..

शौर्य नेहमीप्रमाणे लायब्ररीत जाऊन बसतो.. बेगेतुन टेक्सबुक काढत तो ती समोर ठेवतो.. खिश्यात ठेवलेला मोबाईल बाहेर काढत त्यावर आलेले नोटिफिकेशन बघत मोबाईल पण तो स्वतःच्या बाजुला ठेवतो.. बुक हातात घेऊन ती ऑपन करणार तोच रोहन त्याची बुक आपल्या हातात घेत भुवया उडवतच त्याच्याकडे बघतो..

शौर्य : रोहन तु..?? आणि माझी बुक का घेतलीस?? बुक दे माझी..

रोहन : ये आणि घे..

(रोहन लायब्ररीतुन बाहेर पळतच निघतो)

शौर्य तसाच त्याच्या मागे पळत जातो.. रोहन पटापट जिने चढत कॉलेजच्या एकदम वरच्या मजल्यावर जातो.. वरचा संपुर्ण फ्लॉर खाली असतो..

शौर्य : रोहन का अस वागतोयस..? प्लिज बुक दे.. 

(शौर्य धापा टाकतच त्याला बोलतो)

रोहन काहीही न बोलता एका क्लासरूम मध्ये रागातच बुक टाकतो.. 

रोहन : आत जा आणि घे..

शौर्य : किती त्रास देणार यार तु.. 

रोहन : आणि आज सकाळी तु दिलास ते??

शौर्य : मी तुला इनविटेशन देऊन बोलवलेलं का ये म्हणुन..? तु तुझ्या मर्जीने आलेलास ना..

रोहन : पण प्लॅन तर माझ्यासाठी केलेलास ना??

शौर्य शांत बसतो..

शौर्य : रोहन मला माझी बुक दे..

रोहन : आत जा आणि घे..

नेहमी त्रासच देत बसतोस.. अस बोलत शौर्य रोहनजवळ येत रागातच त्याला ढकलतो आणि क्लासरूमच्या आत शिरत आपली पडलेली बुक उचलायला जातो... तस रोहन क्लासरूमचा दरवाजा बंद करतो..

दरवाजा उघड..रोहन प्लिज यार.. शौर्य आतुन दरवाजा ठोकतच बोलतो..

रोहन : आज लंचला कसे जातात तेच बघतो मी..

शौर्य : ए रोहन प्लिज.. दरवाजा उघड यार..

रोहन लायब्ररीत जाऊन शौर्यची बेग आणि तिथेच असलेला त्याचा फोन घेतो.. आणि पुन्हा कॉलेजच्या एकदम टॉप फॉरवर जातो. 

ज्या रूमबाहेर त्याने शौर्यला ठेवलं असत त्या रूमबाहेर तो त्याची बेग आणि मोबाईल ठेवतो..

रोहन : आज इथेच रहायच शौर्य तु..

शौर्य : ए रोहन सॉरी यार.. प्लिज दरवाजा उघड.. प्लिज.. 

रोहन : नाही उघडणार.. लंच टाईम होईपर्यंत इथेच रहायच तु.. बघतोच आत्ता तुम्ही लोक कसे लंचला जाता ते..

शौर्य : रोहन तु अस कस वागु शकतोस.. प्लिज दरवाजा उघड..

शौर्य आतुन रोहनला रिक्वेस्ट करत असतो.. पण रोहन त्याच बोलणं ऐकायला तिथे काही थांबला नसतो..

खाली येऊन तो आपल्या बाईकवर बसतो..

फैयाज : क्या हुआ??

रोहन : शौर्य को लॉक कर दिया... अब देखता हु कैसे ये लोग लंच के लिये जाते हे..

फैयाज : अरे वाह रे मेरे शेर.. चल पार्टी करते हे इस बात पे..

रोहन : नही.. कॉलेज बंद होने के पहले उसको वहासे निकालना हे..

फैयाज : पागल हे क्या?? अभि उसको निकाल क्यु रहा हे उधरसे?? रेहने दे उसको वहापे..

रोहन : दोस्त हे यार वो मेरा.. में ज्यादा उसके उपर गुस्सा नही रेह सकता..। कॉलेज बंद होणे के पेहले में उसको उधरसे निकलुंगा..। 

फैयाज त्याच्या बाकीच्या मित्र मंडळींना इशाऱ्यानेच काही तरी खुनवत होता..

फैयाज : अभि चलते हे इधरसे कॉलेज बंद होने के पहले आ जाते हे.. क्या बोलते हो भाई लोग तुम..

ए हा रोहन चल ना.. वैसे भी बहोत टाईम हे कॉलेज बंद होने के लिये...

(ग्रुपमधील एक जण अस बोलताच.. रोहन हातातील घड्याळ बघतो)

त्याला पण त्यांच म्हणणं पटत.. 

सगळे बाईकवरून तिथुन त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी जातात..

सगळे एकावर एक बिअरच्या बॉटल ऑर्डर करत राहतात..

रोहन खर तर घेत नसतो.. पण मित्रांनी जास्त फोर्स केल्यामुळे तो ती घेतो.. फैयाज सोबत इतर मित्रमंडळी त्याला जाणुन बुजुन जास्त बिअर पाजतात..
 
इथे लेक्चर संपवुन सगळे गेटजवळ येऊन उभे रहातात..

वृषभ शौर्यला फोन लावतो.. 

समीरा : काय झालं??

वृषभ : शौर्य फोन उचलत नाही. आपण केंटिंगमध्ये जाऊन बसुयात मे बी येईल तो.. मिस कॉल बघुन..

केंटिंगमध्ये बसून अर्धा तास उलटुन जातो पण शौर्य काही येत नाही..

राज : रूम वर तर गेला नसेल ना??

वृषभ : अरे पण फोन उचलायला काय हरकत आहे..

शौर्य फोन उचलत नाही म्हणुन सगळे त्याच्यावर नाराज होत असतात..

वृषभ, राज आणि टॉनी केंटींगमधुन रूमवर जातात.. पण शौर्यची रूम लॉक असते..

राज : हा रूमवर नाही मग कुठे आहे..

वृषभ : लायब्ररीतच असेल..

टॉनी : लायब्ररीत एवढा वेळ?? 

राज : असेल पण अभ्यासात घुसला असेल तर..

समीरासुद्धा शौर्य फोन उचलत नाही म्हणून वृषभला फोन लावते.. पण शौर्य अजूनही रूमवर आला नाही हे कळताच ती पण थोडी आत्ता घाबरून जाते.. ती तशीच त्याला शोधायला लायब्ररीत जाते.. पण तो तिथे नसतो..

सगळेच शौर्यला शोधत असतात.. पण तो कुठे भेटतच..

प्ले हाऊसजवळ बसुन शौर्य कुठे जाईल ह्याचा अंदाज ते लावतात..

जवळपास पाच वाजुन जातात पण अजुनही शौर्यचा पत्ता नसतो..

वृषभ : त्या फैयाज ने काही केलं तर नसेल ना??

समीरा सकट सगळे घाबरतच वृषभकडे बघतात..

समीरा : प्लिज अस काही बोलू नकोस..आपण वाट बघुयात.. मे बी इथेच कुठे तरी असेल तो..

वृषभ : मला आत्ता भीती वाटतेय यार..

राज : रोहनला विचार ना कॉल करून.

वृषभ जास्त विचार न करता रोहनला फोन लावतो.. रोहन त्याच्या बेडरूममध्ये अगदी गाढ झोपलेला असतो..

वृषभ : गाईज फोन नाही उचलत आहे यार हा.. 

घड्याळ अगदी पुढे पुढे पळत असत.. वृषभ दोनदा जाऊन हॉस्टेलच्या वॉचमनला शौर्य बद्दल विचारतो पण अजुन आलाच नाही हेच उत्तर त्याला वॉचमनकडुन ऐकायला मिळत..

समीराला आत्ता रडु येत असत..

सगळी मित्र मंडळी तिला धीर देत असतात.. पण ती खुप घाबरून गेली असते..

रात्रीचे नऊ वाजत आले तरी शौर्यचा काही आता पता नसतो..

दुपारी घेतलेली ड्रिंकची नशा रोहनची उतरते.. तस तो डोळ्यांवर पाणी मारतच फ्रेश होतो.. घड्याळात बघतो तर नऊ वाजले असतात.. मोबाईल न बघताच खिश्यात टाकतच जेवणासाठी तो खाली जातो.. डायनींग टेबलवर बसुन ताटात जेवण वाढुन घेतो.. जेवायला सुरुवात करणार तोच समीराचा फोन त्याला येतो..

रोहन जास्त विचार न करता समीराचा फोन उचलतो..

शौर्य कुठेय रोहन??? समीरा रडतच त्याला विचारते..

रोहन : कुठे म्हणजे?? मला काय माहिती कुठेय?? असेल ना ति..

(रोहन पुढे काही बोलणार तोच त्याला सकाळी त्याने केलेला पराक्रम आठवतो)

ओहहह शट...मी आलोच तिथे.. अस बोलत समीराचा फोन कट करत जेवणाच्या ताटावरून तो तसाच उठत आपल्या रूममधून बाईकची किल्ली घेत कॉलेजच्या दिशेने जायला.

कॉलेज गेटजवळच सगळे त्याची वाट बघत असतात..

वृषभ : कुठेय शौर्य??

रोहन : ते मी त्याला रागात वर्ती रूममध्ये कोंडून ठेवलेलं.. आणि मी विसरून गेलो..

राज : तुझं डोकं आहे का ठिकाणावर.. 

राज रोहनची कॉलर धरतच बोलतो..

समीरा धावतच कॉलेजच्या बाहेर असलेल्या वॉचमनला रिक्वेस्ट करते..

वॉचमनने आत जायला परमिशन देताच सगळे पळतच सिक्स फ्लॉरवर जातात.. संपुर्ण कॉलेजमध्ये काळोख असतो..

मोबाईल मधुन पडणाऱ्या टॉर्चच्या सहाय्याने रोहन त्यांना त्या रूमजवळ घेऊन जातो.. रूम बाहेर शौर्यची बेग आणि मोबाईल तसाच पडुन असतो..

वृषभ पटकन दरवाजाला लागलेली कडी उघडतो आणि आत जातो..

शौर्य दरवाजा जवळच डोकं टेकुन झोपला असतो..

शौर्य.. तु बरा आहेस ना... वृषभ त्याला हलवतच उठवतो.

समोर वृषभला बघताच शौर्य त्याला घट्ट मिठी मारतो.. आणि रडु लागतो..

वृषभ : ए शौर्य घाबरू नकोस यार..आम्ही आलोत.. तु चल बघु इथून..

वृषभ शौर्यला घेऊन येतो..

समोर रोहनला बघून शौर्यला त्याचा खुप राग येत असतो.

रोहन : शौर्य आय एम सॉरी.

शौर्य : वृषभ प्लिज. रूम वर जाऊयात. मला ह्याच तोंस बघायची पण इच्छा नाही.. 

रोहन : शौर्य माझं ऐकुन तर घे एकदा..

वृषभ : का ऐकून घेणार तो तुझं.. तुझ्यासाठीच काल पासुन आम्ही सगळे मेहनत घेत होतो.. तुझी ड्रग्सची नशा सुटावी म्हणून.. आणि मुळात तु शौर्य सोबत अस वागूच कस शकतो यार. खुप केलय यार त्याने तुझ्यासाठी.. तु सुधारावा, तु पुढे यावा म्हणुन प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी होता तो.. तुला माहिती तुला लेक्चरला बसता यावं ह्यासाठी त्याने स्वतःची..

वृषभ प्लिज.. ... (शौर्य मानेनेच वृषभल नाही म्हणुन सांगत असतो..)

वृषभ : शौर्य प्लिज हा मला आज थांबवायच नाही तु.. रात्रभर जागरण करून मेथ्स बुक कम्प्लिट केली ह्याने. पण तुला तुझी बुक मनवीला देताना बघितली.. मग काय.. स्वतःची बुक तुझ्या नावाने सबमिट केली. का तर तुला लेक्चरला बसता यावं म्हणून.. तुला प्रॅक्टिकलमध्ये 20 मार्क्स मिळावे म्हणुन.. आणि तुला साद कळु पण दिल नाही यार त्याने.. तुला काय इथे कोणालाच माहीत नसेल..
(वृषभ अस बोलताच सगळेच शौर्यकडे बघत रहातात..)

आणि तु त्याच्यासाठी काय केलंस सांग..  तुझ्या बर्थडेला त्याच्यावर हाथ उचललास, मनवीमुळे त्याच्यासोबत मैत्रीसुद्धा तोडलीस.. त्यादिवशी तर फैयाज समोर तुझ्या तोंडाला येईल ते त्याला बोलत होतास.. आणि आज तर हद्दच केली राव तु... काय मागितलं होत त्याने तुझ्याकडे?? सांगणं.. ड्रग्स घेणं बंद कर एवढी साधी अपेक्षा होती यार त्याची.. ते पण तुझ्यासाठीच.. तु सुधारलेला त्याला बघायच रे रोहन.. त्यालाच काय आम्हां सगळ्यांनाच.. पण तु मनातुन उतरून गेलास रे.. 

रोहन : शौर्य प्लिज मला माफ कर.. मी चुकलो.. फक्त तुम्ही लोक लंचला जाऊ नका हेच वाटत होतं रे मला.. आणि मी तीन वाजता येऊन खोलणारच होतो.. पण ते मित्रांनी ड्रिंक पाजली यार.. मग विसरूनच गेलो मी..

शौर्य : समीरा आपण भेटु उद्या कॉलेजमध्ये.. रात्र खुप झाली तुम्ही दोघी हॉस्टेलवर जावा.. विर फोन करत असेल मला..

शौर्य रोहनकडे न बघताच तिथुन निघुन जातो..

रोहन : शौर्य यार एवढी मोठी शिक्षा नको ना देऊस शौर्य प्लिज.. वृषभ प्लिज तु तरी समजव ना त्याला

पण कोणीच त्याच ऐकुन न घेता सरळ हॉस्टेलमध्ये निघुन जातात..

शौर्य रूमवर येताच डोक्याला हात लावुन शांत बसलेला असतो..

टॉनी : शौर्य, आपण डिनर करून येऊयात.. तु काहीच खाल्लं नाहीस..

वृषभ : मी तुझ जेवण घेऊन येऊ का इथे..

शौर्य : नाही मी येतो खाली.. तुम्ही व्हा पुढे.. विरशी बोलुन येतो..

राज : आम्ही आहोत इथे.. एकत्रच जाऊयात..

शौर्य विराजला फोन लावतो..

विराज : माझा फोन का नाही उचललास?? आहेस कुठे तु??

शौर्य : रूमवरच आहे..

विराज : मग व्हिडीओ कॉल कर.. 

शौर्य : विर विश्वास ठेवना.. 

विराज : शौर्य व्हिडीओ कॉल कर.. 

शौर्य रागातच फोन कट करतो.. आणि मोबाईल खाली ठेवतो..

वृषभ : ए शौर्य प्लिज थोडं शांततेत बोलणं..

शौर्य : डोकं काम नाही करत यार.. त्यात हा विर.. विश्वासच नाही ठेवत..

तोच विराजचा व्हिडिओ कॉल येतो..

डोळे पुसतच तो त्याचा फोन उचलतो..

विराज : मगाशी का नाही फोन उचलला..

शौर्य : असच

विराज : तु रडत होतास का?

शौर्य मानेनेच नाही बोलतो..

विराज : नक्कीच तु रडला आहेस.. काय झालं सांग बघु.. 

शौर्य : विर ते.. मला मुंबईला परत यायचय.. मला नाही रहायच इथे...

शौर्य रडतच त्याच्या भावाला सांगतो...

वृषभ, राज आणि टॉनी त्याच्याकडे बघतच रहातात..


क्रमशः

©भावना विनेश भुतल

(शौर्य खरच जाईल मुंबई?? पाहूया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

🎭 Series Post

View all