अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 49

In marathi

विर मिस करतोयस तुला खुप.. (शौर्य डोळे पुसतच बोलला)

विराज : आत्ता परत काय झालं?? आणि रडतोयस का अस तु??

शौर्य : काही नाही झालं?? मला आठवण येतेय तुझी.. मला इथे नाही रहावस वाटत आता.. मला मुंबईला यावस वाटतंय..

विराज : तुला हे सगळं करायला मज्जा वाटते का?? मुंबई दिल्ली.. परत दिल्ली मुंबई.. मेन म्हणजे तुला मी आणि मम्मा तिथे पाठवतच नव्हतो.. तूच रडत बसलेलास.. माझं इयर वेस्ट होतंय, माझे मित्र मंडळी आहेत तिथे म्हणुन.. आत्ता काय झालं अचानक.. आणि एक मिनिट शौर्य, लास्ट टाईम मी USA वरून तुला फोन केलेला तेव्हा पण तु असच काहीस बोलत होतास.. मी तुला मिस करतोयस एन्ड ऑल.. लास्ट टाईम सारखा प्रॉब्लेम तर नाही ना परत क्रिएट केलायस.? परत मारामारी वैगेरे तर नाही ना केलीस?? का घरी परत कॉलेजमधुन फोन गेलाय?? काय केलंस ते सांग आधी मला..

शौर्य : विर तुला बोलायच काय आहे की अस काही झालं तरच मी तुला मिस करतो का??

विराज : ऑफ कोर्स.. नाही तर तु कधी करतोस का मला मिस?? सादा फोन सुद्धा करत नाहीस स्वतःहुन..

शौर्य : तुम्हां लोकांना आहे का टाईम माझ्यासाठी.. बघावं तेव्हा तुमची मिटिंग आणि तुम्ही दोघ.. अस वाटत ना कधी कधी तो तुमच्या पुढ्यातला लॅपटॉप फोडुन टाकावा..

विराज : हे बघ शौर्य तु तुला जरा आमच्या जागी ठेवुन विचार कर आणि मग बोल.. आणि आत्ता काय नवीन उपदव्याप करून ठेवलायस ते सांगशील प्लिज.. (विर थोडं रागातच बोलतो)

शौर्य : आत्ता खरच तुझ्या डॅडची मला आठवण येतेय.. असाच इरिटेट होऊन बोलायचा माझ्याशी जस तु बोलतोयस..

विराज : आत्ता इथे डॅडचा काय संबंध.. आणि शौर्य तु नुसतं डॅड पण बोलु शकतोस ना.. आता तर तो ह्या जगात पण नाही आहे यार.. नेहमी नेहमी काय तुझं.. तुझा डॅड.. तुझा डॅड.. मला नाही आवडत तु अस बोललेलं..

शौर्य : नाही ना जमत बोलायला मला... कारण तो तसाच वागला ना विर. तो तुझाच डॅड होता. माझा कधी झालाच नाही..  

विराज : ओके.. (विराज एक दीर्घ श्वास घेत येणारा राग कंट्रोल करत असतो) फक्त माझ्या डॅडचीच आठवण झाली का तुझ्या मम्माची पण..

शौर्य : एक मिनिट डॅड तुझाच होता आणि मम्मा पण तुझीच आहे.. 

विराज : शौर्य मोठा हो यार.. हे अस माझं तुझं करणं थांबव प्लिज.. तुझ्या अश्या वागण्याचा आणि बोलण्याचा त्रास होतो यार मला.. तुला माहिती मम्मा तुझ्यावर पण तेवढंच प्रेम करते.. फक्त तु प्रॉब्लेम क्रिएट करून तिला इरिटेट करतोयस.. काही तरी अपेक्षा आहेत यार तिच्या तुझ्याकडुन.. त्या तर ह्या जन्मी पूर्ण होतील अस तर वाटत नाही.. फक्त नेहमी नवीन प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवतोस लाईफमध्ये ते तुला छान जमत.. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे मारामारी.. ती तर नसानसांत भरलीय तुझ्या..आत्ता तुझ्याकडे बघुनच कळतंय.. आत्ता पण काही तरी मोठा प्रॉब्लेम क्रिएट केलायस.. आम्हा दोघांना तु त्रास द्यायचंच ठरवलंस तर तस सांग..

शौर्य : विर प्लिज.. तु तरी अस नको बोलुस. त्रास होतो यार मला.. लास्ट टाईम बोललो ना तुला.. तरी तु...

विराज : का नको बोलु शौर्य.. तुला तिथे मी माझ्या जबाबदारीवर पाठवलं.. आत्ता जर घरी जाऊन मम्मा कडुन मला कळलं की तुझी परत कम्प्लेन्ट आलीय तर तुला मी मुंबईला नाही आणणार.. सरळ दिल्लीवरून USA ला पाठवणार.. एवढं लक्षात ठेव तु.. कारण तुझ्या वारंवार येणाऱ्या कम्प्लेन्टिमुळे मम्माला खुप त्रास होतोय शौर्य.. आणि सगळ्यात जास्त मला.. अजुन किती सहन करायच तुला आम्ही लोकांनी?? दिल्लीला गेल्यापासून एक सादा फोन तुला मम्माला करावासा नाही वाटत का?? एवढा तु मित्र मैत्रीणीत रमुन जातोस.. साद माझ्याकडे पण तु कधी तिची चौकशी करत नाहीस.. एवढं कस कठोर झाला तु.. आधी तर असा नव्हतास.. तुला प्रत्येक गोष्ट मला शिकवावी लागणार का?? तर तस सांग.. ते ही करतो तुझ्यासाठी.. आत्ता लहान नाही आहेस यार तु.. लाईफ जरा सिरीयसली घे..

शौर्य : विर तु काहीही ऐकुन न घेता अस कस बोलु शकतोस मला.. 

विराज : कारण मगाशी मम्माने मला फोन केलेला.. तिला काही तरी सांगायच होत मला पण ती टाळाटाळ करत होती.. मुंबईला आल्यावर बोलूयात अस ती बोलली मला..आत्ता तुझ्याशी बोलुन तर असच वाटत की तिला तुझ्याबद्दलच सांगायच असेल.. पण मी विचार करतोय तस जर खरच असेल ना शौर्य.. तर तु आहेस आणि मी आहे..

शौर्य : ग्रेट.. म्हणजे दोन दिवस तु लांब नाही गेला तर तुला तिचे फोन तरी येतात विर.. माझं काय??

विराज : तुझं काय म्हणजे?? शौर्य तु आधी निट वागायला आणि बोलायला शिक आणि मग बोल माझ्यासोबत.. मला कंटाळा आलाय यार आत्ता..

शौर्य : मग नको बोलुस माझ्यासोबत.. यु एन्जॉय युअर ट्रिप.. लव्ह यु... बाय.. टेक केअर..

विराज पुढे काही बोलणार पण शौर्य फोन कट करतच स्विच ऑफ करून बेडवर ठेवतो.. डोक्याला हात लावत तो तसाच बसुन रहातो..

वृषभ, राज आणि टॉनी त्याच्या बाजुला येऊन बसतात.. 

शौर्य : गाईज डिनरला जाऊयात.. भूक लागलीय खुप..

(चेहऱ्यावर हसु आणतच तो मित्रांना बोलला)

वृषभ : चल.. 

(उगाच विषय वाढायला नको म्हणुन सगळे जेवायला खाली जातात)

शौर्य तो अगदी नॉर्मल आहे असं मित्रांना दाखवत असतो. जेवुन झाल्यावर सगळे बाहेर नेहमीप्रमाणे वॉक करायला जाऊ लागले.. 

शौर्य : मी आज नाही येत वॉकला तुम्ही जावा मी रूमवर जातोय.. मला झोप येतेय..

वृषभ : थोडा वेळतरी चल..

शौर्य : नाही नको.. गुड नाईट.. बाय..

तिघेही शौर्यला त्याच्या रूममध्ये जाताना तिथेच उभं राहुन बघत रहातात..

शौर्य रूममध्ये येताच गिटार हातात घेतो..एक खोल श्वास घेत घरातील सर्व लाईट बंद करत तो गेलरीत जाऊन बसतो.. एक बोट गिटारच्या तारांवर फिरवत खुप जुन्या आठवणीत शिरतो.. इतक्या जुन्या की त्याला त्याचा लाडका बाबा आठवत असतो.. त्याच्यासोबत घालवले प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यांसमोरून तरंगत असतात.. एक एक क्षण आठवुन त्याच्या ओठांवर हलकेच अस हसु येत असत आणि तोच त्याला आठवतो त्याच्या बाबा सोबतचा तो शेवटचा क्षण... एक टक बाबाची त्याच्यावर स्थिरावलेली नजर.. आणि त्याच नजरेतुन त्याच्या बाबाने सोडलेला प्राण.. 

शौर्य येणार रडु आत्ता गाण्यात उतरवत होता.. गिटार वाजवतच तो त्याच्या बाबाच्या आठवणीत गाणं गाऊ लागला..

किसे पुछूँ ? है ऐसा क्यों ?
बेजुबान सा ये जहां है

ख़ुशी के पल, कहाँ ढूढूं ?
बेनिशाँ सा वक़्त भी यहां है

जाने कितने लबों पे गीले हैं
ज़िन्दगी से कई फासले हैं

पसीजते हैं सपने क्यों आँखों में
लकीरें जब छूते इन हाथों से यूँ बेवजह

जो भेजी थी दुआ
वो जाके आसमां से यूँ टकरा गयी
की आ गयी है लौट के सदा

जो भेजी थी दुआ
वो जाके आसमां से यूँ टकरा गयी
की आ गयी है लौट के सदा

खुप भरून आलेलं त्याला.. गिटारवर जमिनीवर उभं धरतच त्यावर डोकं ठेवुन डोळे मिटुन शांत बसुन रहातो...

तोच रूममधली लाईट लागली.. शौर्य गिटारवरून तोंड वर करतच बघतो तर समोर त्याचे मित्र मंडळी त्याच्यासाठी टाळ्या वाजवत असतात..

शौर्य : तुम्ही लोक वॉकला गेले नाही..

वृषभ : तुला सोडुन कस जाऊ?? आणि बरच झालं नाही गेलो ते नाही तर तुझं गाणं मिस केलं असत.. तु गिटार तर भारी वाजवतोसच पण गाणं तर त्याहुन भारी गातोस..

राज : हो ना.. तु गिटार शिकायला जायचास का??

शौर्य : घरी रहायला नको म्हणुन.. मार्शल आर्ट्स, सिंगिंग क्लासेस, डान्स क्लासेस, फुटबॉल ट्रेनिंग, क्रिकेट ट्रेनिंग, गिटार क्लासेस, ड्रम क्लासेस सगळ्याच गोष्टीचे क्लासेस लावलेले मी.. 

राज : घरी का रहायच नव्हतं तुला?? 

शौर्य : भीती वाटायची ना विरच्या डॅडची.. अस रोहनसारखच काळोखात कोंडुन ठेवायचा मला.. मारायचा, त्रास द्यायचा मला.. मेंटली टॉर्चर करायचा खुप.. त्याला मी त्याच्या नजरेसमोर नाही आवडायचो.. मी फक्त ना फक्त गिटार क्लास आणि फुटबॉल ट्रेनिंगला आवडीने जायचो.. बाकीचे क्लासेस तर मी फक्त त्याच्यापासुन स्वतःला लपवण्यासाठी लावलेले. तुम्हांला माहिती आत्ता गायलेलं गाणं तर मी सगळ्यात पहिल्यांदा गिटारवर वाजवलेलं.. सरांच्या पाठी लागुन शिकुन घेतलेलं मी.. बाबासाठी.. त्याची आठवण आली की ते गाणं गायचो.. इव्हन आत्ता पण.. You know what... I wish there were some visiting hours in heaven..

टॉनी : मिस करतोसना बाबाला..

शौर्य : खुप..(आत्तापर्यंत मित्रांसमोर तो रडु आवरत होता.. पण आत्ता मात्र डोळ्यांतुन येणार पाणी नाही अडवू शकला तो.) खुप आठवण येते यार खुप म्हणजे खुप.. त्याला सांग ना परत यायला नाही तर मला तरी त्याच्यासोबत न्यायला.. मला नाही जमत अजुन त्याच्याशिवाय राहायला..

टॉनी : ए शौर्य अस नको ना काही बोलुस.. आय नो तुला त्रास होतोय.. बट तु अस बोलतोस त्याने आम्हांला त्रास होतोय रे..

वृषभ : जिथे असेल ना तिथुन तुझे बाबा तुला बघत असतील आणि तु अस रडलेलं त्याला नाही आवडणार त्यांना.. शांत हो बघु..  मला पण नाही आवडत तु अस तोंड पाडुन बसलेलं.. आणि चल बघु इथून आपण मस्त पैकी मूव्ही बघुयात आज लॅपटॉपवर... तेवढंच तुला बर वाटेल..

तिघेही शौर्यसोबत बाहेर बेडवर जाऊन बसतात..

शौर्य आपले डोळे पुसतच लॅपटॉप ऑन करतो..

राज : शौर्य गेल्या वेळेला मी तुला काही तरी बोललेलो..

टॉनी : आणि मी पण..

शौर्य : काय??

राज : स्पीकर आणलेस?? आणि गेल्यावेळेला तु आमच्या खाण्या-पिण्याच्या गोष्टीकडे पण दुर्लक्ष केलेस..

शौर्य : स्पिकरच आपण नंतर बघुयात.. आणि खायच सामान बोलशील तर चॉकलेट्स आहेत.. विरने लास्ट टाईम दिलेले.. बाकी काही नाही माझ्याकडे.. 

टॉनी : हे बघ शौर्य ह्या वेळेला आम्ही तुला माफ करतो नेक्स्ट टाईम अस काही चालणार नाही हा आम्हाला..एटलिस्ट आमच्या खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे तरी लक्ष देत जा यार..

शौर्य बाजूलाच असलेली पिलो जोरात दोघांना मारू लागलो..

ए शौर्य काय करतोस.. दोघेही त्याच्यापासुन दुर पळतच त्याला बोलले..

शौर्य : खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे लक्ष देतोय.. पोटभरून खावा..

(शौर्य त्यांना उशीने मारतच त्यांच्या मागे पळत होता)

वृषभ : तुमचं झालं असेल तर करू चालु मूव्ही..

टॉनी : ए शौर्य अस हसताना छान दिसतोस.. परत नको हा रडुस..

(टॉनी शौर्यला मिठी मारतच बोलला..)

राज : आत्ता पण जावस वाटतंय का मुंबईला??

शौर्य मानेनेच नाही बोलतो..

राज : येह हुई ना बात..

(शौर्यला टाळी देतच तो बोलतो)

शौर्य दिवसभर घडलेला सगळा प्रसंग विसरून तिघांसोबत मूव्ही बघण्यात गुंतून जातो..

★★★★★

दुसऱ्यादिवशी चौघेही नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी हॉस्टेल बाहेर पडले..

राजच लक्ष फुटपाथच्या कठड्यावर गुढग्यात डोकं खुपसुन बसलेल्या रोहनकडे जात..

राज : हा रात्रभर एवढ्या थंडीत इथेच होता..??

वृषभ : कोण??

राज रोहनकडे बोट दाखवतच बोलतो..

सगळेच एकमेकांकडे बघु लागतात..

शौर्य : तु रात्री घरी का नाही गेलास??

शौर्यचा आवाज ऐकताच रोहन मानवर करून बघतो.. शौर्यच्या हाताला पकडतच तो उभं रहातो..

शौर्य : का वागतोस रोहन तु अस?? इथे अस रात्रभर बसुन तुला काय प्रूफ करायचय??

रोहन : तुझ्या समोर काय प्रुफ करू यार.. मी कसा आहे हे माझ्यापेक्षा तु चांगलं ओळखतो.. माझ्या मूर्खपणा मुळे तुला काल त्रास झाला त्याबद्दल सॉरी शौर्य.. पण मुद्दामुन नाही केलं यार.. 

शौर्य : अस नसत ना रोहन.. तुला वाटेल तेव्हा तु नीट बोलशील..नाही वाटलं तर समोरच्याला हर्ट होईल अस काहीस बोलुन जाशील.. तुला वाटल तर तु रागवशील आणि सोडून जाशील.. आणि तुला वाटलं तर तु परत येशील आणि सॉरी बोलशील..  सगळं तु तुझ्या मर्जीने करणार का?? मला पण इमोशन्स आहेत यार.

रोहन : सॉरीना... परत नाही होणार अस.. 

रोहन कानाला हात लावतच घुडग्यावर बसतो..

संपुर्ण कॉलेज त्याच्याकडे बघत असत..

समीरा, मनवी आणि सीमा पण तिथेच उभं राहुन सगळं बघत असतात.

वृषभ : ए रोहन.. उठ बघु.. 

रोहन : जो पर्यंत तुम्ही लोक मला माफ नाही करत मी नाही उठणार इथुन..

राज आणि टॉनी इशाऱ्यानेच शौर्यला त्याला माफ कर म्हणुन सांगतात..

फ्रेंड्स.... शौर्य आपला उजवा हात रोहनच्या पुढे करतच त्याला बोलतो..

रोहन लगेच आपला उजवा हात त्याच्या हात देत उठुन त्याला मिठी मारतो..

रोहन : मला नव्हतं कळत यार मी कस वागत होतो ते.. खुप त्रास दिला मी तुला आणि सगळ्यांनाच.. आता परत नाही अस वागणार.. तु बोलशील तस वागेल मी.. प्लिज नको रागवुस माझ्यावर..

शौर्य : मी बोलेल तस खरच वागशील?

रोहन : तुझी शप्पथ... ड्रग्स आणि सिगारेट घेणं पण बंद करेल.. 

शौर्य : उशिरा का होईना पण ऐकलस माझं.. आत्ता सगळ्यात जास्त जिला त्रास दिला तिला एकदा सॉरी बोल..

(मनवीकडे इशारा करतच शौर्य रोहनला बोलला)

रोहन मनवीकडे जात.. कानाला हात लावतच तिला सॉरी बोलतो...

मनवी : परत अस नको वागुस रोहन.. 

रोहन : नाही वागणार.. तु बोलशील तस वागेल.. प्लिज मला सोडुन नको जाऊस आणि वृषभ मनवी माझी आहे यार.. तु अस कस वागु शकतोस माझ्यासोबत..

रोहन अस बोलताच त्याचे मित्र मैत्रिणी त्याला हसु लागतात...

रोहन डोळे पुसतच सगळ्यांकडे बघतो..

रोहन : तुम्ही लोक असे हसताय का मला??

राज : ते तुला त्रास देण्यासाठी आम्ही सगळं नाटक करत होतो..

रोहन : म्हणजे वृषभ आणि मनवीच??

शौर्य : अस काही नाही..  ते दोघे एकटींग करत होते.. तु मॉलमध्ये आमच्या मागे फिरत होतास ते पण आम्हांला माहिती होत.. सॉरी म्हणजे तुला थोडा त्रास दिला.. पण काही ऑप्शनच नव्हता.. तुला समजवुन सांगितलं तरी तु समजत नव्हतास.. रागवुन बघितलं तर उलट तुच आमच्यावर रागवत होतास.. आणि नको त्या लोकांसोबत राहुन आम्हांला त्रास देत होतास.. म्हणुन ते आम्ही..

रोहन : ह्या मागे नक्कीच तुझंच डोकं असणार.. तुला तर मी..

(रोहन हसतच शौर्यला मारायला त्याच्या मागे जाऊ लागला)

सॉरी यार.. शौर्य हसतच दोन हात कानाला लावत त्याच्या पासुन लांब पळु लागला..

राज : त्याला हाततर लावुन दाखव तु..

टॉनी : खुप त्रास दिलास आम्हाला..

वृषभ : होणं..

अस बोलत वृषभ, राज आणि टॉनी रोहनला पकडून त्याला मारू लागले.. कॉलेजच्या गेट बाहेरच आत्ता दंगा मस्ती चालु झाली होती..

सीमा : लेक्चर चालु होईल यार.. बस करा..

शौर्य : ए रोहन चल लेक्चरला

रोहन : ए शौर्य प्लिज हा.. आज नको.. एक तर रात्रभर थंडीत बसुन पुर्ण अंग दुखायला लागलय माझं.. मी उद्यापासून येतो..

वृषभ : कारण द्यायला सुरुवात झाली का??

शौर्य : ए वृषभ कारण नाही देत तो.. खरच दुखत असेल.. 

रोहन : थेंक्स यार शौर्य तूच समजुन घेऊ शकतो मला..

शौर्य : पण उद्या नक्की ये लेक्चरला...

रोहनला बाय करत सगळे क्लासरूमध्ये यायला निघाले..

समीरा : फोन का बंद करून ठेवलायस तु?? मी रात्री फोन करत होती तुला..

शौर्य : मे बी बेट्री डेड झाली असेल. मी बघितलंच नाही ग फोन..

समीरा : नक्की??

शौर्य : तु का करत होतीस फोन.. काही काम होत का??

समीरा : हो काम होत तुझ्याकडे.. लेक्चर सुटलास की भेट..

(समीरा थोडं रागातच शौर्यला बोलते.. आणि तिथुन निघुन जाते)

हिला काय झालं आत्ता?? शौर्य तिथेच थांबुन विचार करू लागतो..

वृषभ : काय झालं??

शौर्य : काही नाही.. 

वृषभ : चल मग..

क्लासरूमध्ये येऊन शौर्य समिराकडे बघतच तिला इशाऱ्यानेच काय झालं म्हणुन विचारत असतो पण ती अजुनही त्याच्याकडे रागातच बघत असते..

मागे बसुन राज आणि टॉनी दोघांच काय चालु आहे ते बघत असत..

राज : वृषभ आज वातावरण खुप गरम आहे.. शौर्यला जरा नीट सांभाळुन राहायला सांग..

वृषभ : का काय झालं शौर्यला??

शौर्य : मला कुठे काय झालं??

राज : समीरा का भडकलीय तुझ्यावर..

शौर्य : तुला काय माहीत ती भडकलीय माझ्यावर.?

टॉनी : आम्ही बघितलं ना आत्ता.. आमचं लक्ष होत तुमच्या दोघांच काय चालु आहे त्यावर..

शौर्य : तेच लक्ष जरा ना अभ्यासात दे.. दोन मार्क थोडे जास्त पडतील..

टॉनी : पण प्रश्न इथे तो आहेच नाही.  ती का भडकली तुझ्यावर हा आहे..

शौर्य : एक काम कर ना.. तु तिलाच विचार न जाऊन.. आणि मग मला सांग.. म्हणजे मला पण कळेल ती का रागावली ते..

टॉनी : ठिक आहे विचारतो.. ए समीरा.. हा शौर्य बघ काय बोलतो..

टॉनी काय करतोयस?? (टॉनीच्या तोंडावर हात ठेवतच शौर्य त्याला बोलतो)

समीरा : काय बोलतोय तो..??

राज : आज लंचला बाहेर जाऊयात का विचारतोय.. पार्टी देतोय शौर्य. ह्या मनवीचा रोहन सुधारलाना म्हणून..

मनवी : आज नको ना.. शौर्य तु उद्या पार्टी दे.. आज रोहन नाही आहे रे..

शौर्य : ओके...

राज आणि टॉनी एकमेकांना टाळी देतच हसु लागतात..

शौर्य : तुम्हा दोघांना तर मी बघतोच..

राज : उद्या पार्टीत बघच तु..

शौर्य राजकडे इग्नोर करतच समिराकडे बघु लागतो.

वृषभ : बहुतेक आज लेक्चर नाही होणार वाटत.. 

(शौर्यच वृषभच्या बोलण्याकडे लक्षच नसत तो समीराकडेच बघत असतो..)

तुझ्याशी बोलतोय.. लक्ष कुठेय तुझं.??

(शौर्यच तोंड आपल्याकडे फिरवतच वृषभ त्याला बोलला)

शौर्य : काय झालं??

समीरा शौर्यकडे बघतच क्लासरूमधुन बाहेर पडते..

वृषभ : काय तरी नक्कीच झालय.. काय झालं सांग बघु.

एक मिनिटात आलो मी.. अस बोलत शौर्य समीराच्या पाठूनच  क्लासरूमधुन पडला..

वृषभ : कुठे चाललास??

आलोच...

समीरा रागातच प्ले हाऊसच्या दिशेने जावु लागली.. शौर्य तिला आवाज देतच तिच्या मागे जाऊ लागला..

नेहमीप्रमाणे प्ले हाऊसच्या पायरीवर जाऊन समीरा बसली..

शौर्य : काय झालं समीरा?? तु अशी रागावलीस का माझ्यावर??

समीरा : तुला मेथ्स प्रॅक्टिकल बुक रोहनच्या नावाने सबमिट करायची काय गरज होती.. आणि मला खोटं बोललास तु.. माझी बुक कम्प्लिट नाही झालो म्हणुन.. अस कस करू शकतो शौर्य तु.. 

शौर्य : आता परत तु भडकशील म्हणुन नाही सांगितलं ग.. आणि माझं मेथ्स चांगलं आहे. रोहनला लेक्चरला बसायची गरज आहे म्हणून ते मी..

समीरा : शौर्य ओव्हर कॉन्फिडन्स नको होऊस.. आणि एक लिमिट असते प्रत्येक गोष्टीची.. जर तुझी बुक इंकम्प्लिट नसती तर रोहनने दिली असती का??

शौर्य : आपण का अपेक्षा ठेवायची इतरांकडुन..

समीरा : शौर्य पण माझ्या पण अपेक्षा आहेत ना तुझ्याकडुन... तुझ्या फेमिलीच्या पण अपेक्षा असतील ना तुझ्याकडुन?? त्याकडे पण जरा लक्ष दे.. तुझ्या रेंकिंगवर परिणाम होईल त्याचा.. कळतंय तुला मला काय बोलायच ते... तु मैत्रीत खुप गुंतत चाललायस.. 

शौर्य : सॉरी ना.. नेक्स्ट टाईम प्रत्येक गोष्ट तुला विचारून करत जाईल.. 

समीरा : शौर्य तु मला प्रत्येक गोष्ट विचारून कर अस नाही रे वाटत मला.. पण जी गोष्ट करतोस ती विचार करून कर अस वाटत.. एवढं पण नको चांगल वागुस की समोरचा तुझा फायदा घेईल.. 

शौर्य : समीरा बस ना आत्ता आणि कोण कश्याला फायदा घेईल.. उगाच नकोना काहीही बोलुस.. तसही मी नेक्स्ट इयर मुंबईलाच जाणार.. 

समीरा : का??

शौर्य : असच.. मला जावस वाटत..

समीरा : आणि माझं काय??

शौर्य : तु पण चलना मुंबईला..

समीरा : मला नाही यायच मुंबईत.. 

शौर्य : का नाही यायच तुला मुंबईला?? तुझी फेमिली तर तिथेच आहे ना?? उलट ती लोक घरी पण असतात तुझ्यासोबत.. तुझ्याजागी मी असतो ना तर मी असा वेडेपणा करत दिल्लीला आलोच नसतो.. मस्त पैकी फेमिली सोबत एन्जॉय केलं असत..

समीरा : पण बर झालं मी असा वेडेपणा केला ते.. जर दिल्लीला यायचा वेडेपणा केलाच नसता तर तु कसा भेटला असताच..

शौर्य : ते तर आहेच. पण ती माझ्या प्रश्नाच उत्तर दे आधी.. तु का मुंबई सोडुन दिल्लीला आलीस??

समीरा : ते बाबा..

शौर्य : तु पण तुझ्या वडिलांना बाबा बोलतेस??

समीरा : हो मला तुमच्या लोकांसारखं डॅड बोलायला नाही आवडत..

शौर्य : मी पण बाबाच बोलायचो..

समीरा : त्यादिवशी तर डॅड.. डॅड करत होतास..

शौर्य : तो विरचा डॅड ना.. माझा बाबा तर मी लहान असतानाच सोडुन गेला मला.. बर ते सोड तु तुझं सांग..

समीरा : बाबांमुळेच मी इथे आली.. बाबा माझा व्यसनी होता..म्हणजे त्याची व्यसनच होती.. जी एखाद्याच कुटुंब उध्वस्त करू शकतात अशी.. 

शौर्य : म्हणजे??

(एकटक कुठे तरी हरवुन जात शौर्यला ती सांगु लागली)

समीरा : स्त्री... त्यांना खुप नाद होता स्त्रियांचा.. त्यात माझी आई.. अगदी आंधळा विश्वास ठेवायची त्यांच्यावर.. सुरुवातीला बाहेरच सगळं चालायच.. मग हळुहळु घरापर्यंत सगळी लफडी त्यांची येऊ लागली. आई आम्हां दोघांकडे बघुन शांत रहायची.. पण एक दिवस त्या तिच्या शांततेने वाचा फोडली.. कारण बाबा एका बारमधल्या मुलीसोबत लग्न करून तिला घरी घेऊन आलेले.. सोबत त्या बाईची माणस.. आईने घरात घेण्यास नकार दिला.. मग काय.. आमच्यासमोर तिला मारू लागले.. आणि तिच्या हाताला धरून तिला आणि आम्हांला घराबाहेर काढलं.. मी सातवीत होती तेव्हा आणि दादा बारावीत.. दादाची बोर्डाची एक्साम तोंडावर आलेली.. अश्या वेळेला करणार काय?? आईने काकांना फोन केला आणि बाबांनी केलेला पराक्रम त्यांच्या कानावर घातला.. काका आमच्यासाठी आमचे बाबा झाले.. काका काकीनी आम्हाला त्यांच्या घरी रहायला आसरा दिला.. दादाच्या शिक्षणासाठीचा सगळा खर्च काकांनी केला... दादाला सरळ मार्गी लावले.. बीजीनेस उभारण्यात त्याला मदत पण केली.. आणि इथे बाबा जिला बायको म्हणुन घेऊन आलेले ती त्याचा सगळा पैसा संपवुन त्याला सोडून निघुन गेली.. एकटे पडले ते... मग आम्ही आठवलो त्यांना.. काका,काकी, माझी आई आणि माझा दादापण ह्यांना तु भोळेपणाचा कळस म्हटलं तरी चालेल.. बाबांनी माफी मागितल्यावर लगेच माफ करून त्यांना घरी रहायला पण दिलं.. पण मला नाही जमत होत त्यांच्यासोबत रहायला.. कारण मी अश्या माणसाला नाही माफ करू शकत ज्याने माझ्या आईला रडवल ते ही एका परक्या स्त्री समोर.. मग मीच मुंबई सोडुन दूर जाण्याचा निर्णय घेतला.. दादाची इथे बिजीनेस मिटिंग असतातच.. मग त्यानेच माझं इथे एडमिशन केलं.. म्हणजे त्याला मला भेटता पण येईल म्हणुन..

शौर्य : मला काय वाटत माहिती समीरा.. जर समोरचा आपल्याकडे त्याने केलेल्या चुकांबद्दल मनापासुन माफी मागत असेल तर माफ करावं त्याला.. तु पण बेटर फिल करशील.. आणि समोरचा चूक आहे की बरोबर हे ठरवणारे आपण नसतोच ग.. सगळं तो वर्ती बसलायना तो ठरवतो.. आत्ता बघ त्यांनी सगळ्यात जास्त तुझ्या आईला त्रास दिला.. पण तिने मन मोठं करून त्यांना माफ केलं.. तुझा दादा.. तो पण त्यांना माफ करू शकतो.. मग तु का नाही.. आणि एक बोलु.. बाबा जवळ आहे ना तो पर्यंत मिठी मारून घे त्याला.. नंतर आठवणीच रहातील ग.. चुका सगळेच करतात ग.. मग ती चुक सुधारण्यासाठी संधी शोधत असतात.. काहींना  चुक सुधारण्याची संधी मिळते तर काहींना नाही मिळत.. शेवटी डिसीजन तुझा आहे.. बघ तुला जमत का माफ करायला.. मी तुझ्या जागी असतो.. तर मी नक्कीच माफ केल असत.. 

समीरा शौर्यच्या बोलण्याचा विचार करू लागते.. 

तोच शौर्यला लांबुनच फैयाज फुटबॉल फेकुन मारतो.. 

फैयाज : ए शौर्य डिस्टरब तो नही ना हुआ??

(फैयाज हसतच शौर्यला बोलतो)

शौर्य : हा इथे कसा काय येऊ शकतो.. सस्पेंड केलं तरी..

समीरा : तु चल इथुन..

समीरा शौर्यचा हात पकडतच त्याला तिथुन घेऊन जाऊ लागते..

फैयाज : अरे बॉल तो पास करके जा.. 

शौर्य : उसको बॉल नही फुटबॉल कहते हे.. और ओपोसीटर को फुटबॉल पास नही करते.. कमसे कम यह दो चिजे तो तु सिख कर आता और बाय दि वे.. तुने हाथो के साथ साथ पैरोमे भी मेहंदी लगाई हे क्या?? ज्यो इधर आके फुटबॉल लेकर नही जा सकता..।

फैयाज : आज तो कुछ ज्यादा हि उड रहा हे।

शौर्य : थेंक्स यार.. तेरे मूहसे मेरे लिये कॉम्प्लिमेंट सूनके अच्छा लगा..

समीरा : शौर्य प्लिज चल इथुन..

फैयाज : समीरा मुझे बोल देते आप.. आप जहाँ लेकरं चलोगे उधर आपके साथ चलेंगे ।

समीरा : फिर चलो.. प्रिंसिपल सर के पास चलते हे।

शौर्य फैयाजला हसु लागतो..

शौर्य फैयाज समोर समीराचा हात घट्ट पकडत तिथुन निघुन सरळ केंटिंगमध्ये येतो...

समीरा : शौर्य तु का त्याच्या तोंडाला लागतोस..?? थोडा टाईम अजुन तिथे राहिला असतास ना तर मारामारी झाली असती हे कन्फर्म होत..

शौर्य : मग मी घाबरतो का काय त्याला..??

समीरा : आणि तुझा भाऊ लास्ट टाईम सारखा आला असता तर.

शौर्य : मग काय गेलो असतो परत मुंबईला.. 

समीरा : मग जाच तु मुंबईला..

समीरा शौर्यचा हात रागात सोडतच त्याला बोलते..

शौर्य : मस्ती करतोय ग.. अशी कशी तु लगेच भडकतेस.. 

समीरा : मगासपासून नुसतं मुंबईला जायच लावलयस तु..

शौर्य : तुला नाही आवडत तर नाही बोलत मी..

समीरा : गुड बॉय..  लव्ह यु...

(शौर्यचे दोन्ही गाल खेचतच समीरा बोलते)

दोघेही केंटिंगमध्ये येऊन बसतात..

बाकीची मंडळी आधीपासूनच तिथे हजर असतात..

राज : कुठे होते तुम्ही दोघ..

शौर्य : तुला कश्याला हव्यात नसत्या चौकश्या..

राज : आत्ता सांगण्यासारख नसेल तर नको सांगुस..

(सगळेच तोंडावर हात ठेवत शौर्यला हसु लागतात)

शौर्य : मॅड तुला कळत का काय बोलतोस ते.. सोड.. मी पण कुणाशी बोलत बसलोय.. मी सॅंडविच घेऊन येतो.. 

टॉनी : वृषभ गेलाय..  तु बस.. तुम्हां दोघांसाठी पण घेऊन येईल तो..

समीरा : मनवी??

टॉनी : दोघेही एकत्रच गेलेत सॅंडविच आणायला..

तोच दोघेही सगळ्यांसाठी सॅंडविच घेऊन येतात..

शौर्य राजकडे रागात बघतच त्याच्या समोरील केचअपची बॉटल घेतो.. आणि आपल्या सॅंडविचवर जाणूनबुजुन हळुहळु टाकत रहातो

राज : तुझी रांगोळी काढुन झाली असेल तर दे तो केचअप इथे...

वृषभ : रांगोळी?? क्स सुचत यार राज तुला..

(वृषभ हसतच बोलतो..)

शौर्य : तुला येते का सॅंडवीचवर रांगोळी काढायला??

(शौर्य केचअपची बॉटल टेबल खाली धरत राज सोबत बोलता बोलता त्याच झाकण लूज करतो)

राज : बॉटल दे इथे मग दाखवतो..

शौर्य : धर.. बघूया तरी किती छान रांगोळी काढतोस ते.. आणि ती प्लॅट जरा लांब धर मग नीट जमेल काढायला..

शौर्य अस बोलताच राज सॅंडवीचची प्लॅट लांब धरायची सोडुन जवळ धरतो.. आणि केचअपची बॉटल उलटी करून सॅंडवीचवर सॉस टाकणार तोच त्या बॉटलच झाकण खाली पडुन सगळा सॉस टेबल सोबत त्याच्या कपड्यांवर पडतो..

(सगळे राजला हसु लागतात)

शौर्य : तरी बोललो होतो लांब धर..ऐकत नाही तु माझं.. बघ आता तुझं टी-शर्ट पण खराब झालं ना

शौर्य... (राज जोरात ओरडतच शौर्यला मारायला जातो.. शौर्य टेबल भोवतीच गोल गोल फिरत रहातो)

शौर्य : राज मला पण असाच राग आलेला जेव्हा तु माझं शर्ट खराब केलेलस तेव्हा..

राज : आज परत मी तुझं शर्ट खराब करणार..

शौर्य : मग ये कर ये..

राज आणि शौर्यची केंटिंगमध्ये मस्ती चालू असते.. सगळेच त्यांची मज्जा मस्ती बघत सॅंडवीचचा आनंद घेत असतात..

★★★★★

इथे विराज शौर्यचा फोन स्विच ऑफ येत असतो म्हणुन अस्वस्थ होत असतो.. त्याच ट्रिप मध्ये लक्षच लागत नसत.. शौर्यची चिंता त्याला सतावत असते.. ट्रिप मधूनच दिल्लीला निघून जावं अस त्याला वाटत असत..

(आत्ता पुढे काय?? विराज येईल दिल्लीला शौर्यला भेटायला.. पाहूया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.. धन्यवाद)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all